गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Gadchiroli Jilha Mahiti

गडचिरोली पुर्वी चंद्रपुरचाच एक तालुका होता 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्हा म्हणुन अस्तित्वात आला.  विदर्भाचा एक भाग असलेला हा जिल्हा!

Gadchiroli District Information

गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Gadchiroli District Information In Marathi

प्राचीन काळात राष्ट्रकुट, चालुक्य, देवगिरीचे यादव आणि त्यानंतर गडचिरोलीमधले गोंड यांच इथे राज्य होतं.  गडचिरोली हा जिल्हा राज्याच्या उत्तर पर्वेकडे स्थित आहे. जिल्हयाला आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सिमा जोडलेल्या आहेत.

गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादामुळे देखील प्रचलीत आहे, नक्षली इथे घनदाट जंगलात आणि डोंगरांवर आश्रयाला आहेत.

गडचिरोली जिल्हयात एकुण 12 तालुके आहेत – Gadchiroli District Taluka List

 1. गडचिरोली
 2. आहेरी
 3. आरमोरी
 4. भामरागड
 5. चामोर्शी
 6. देसाईगंज
 7. धानोरा
 8. एटापल्ली
 9. कोर्ची
 10. कुरखेडा
 11. मुलचेरा
 12. सिरोंचा

गडचिरोली जिल्हयाविषयी उपयुक्त माहिती – Gadchiroli Jilha Chi Mahiti

 • एकुण लोकसंख्या 10,72,942
 • एकुण क्षेत्रफळ 14,412 वर्ग कि.मी. (ग्रामीण 14,336.76 वर्ग कि.मी आणि शहरी 24 वर्ग कि.मी.)
 • 2011 पर्यंत हा जिल्हा सिंधुदुर्ग नंतर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे.
 • 1000 पुरूषांमागे 976 स्त्रिया
 • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 या जिल्हयातुन गेला आहे.
 • साक्षरतेचा दर 1%
 • या जिल्हयात मुख्यतः बांबु आणि तेंदुपत्त्याचे उत्पादन केल्या जाते
 • मुख्य व्यवसाय शेती असुन मुख्य पिक तांदळाचे त्यानंतर ज्वारी, आळशी आणि गहु.
 • गोंड, मडिया, मराठी, हिंदी, तेलगु, बंगाली आणि छत्तीसगढी या भाषा बोलल्या जातात.
 • चामोर्शी तालुक्यातील आष्टी मधे पेपर मिल आणि देसीगंज मधील पेपर पल्प फॅक्ट्री सोडल्यास संपुर्ण जिल्हयात मोठया प्रमाणात उदयोग नाहीत.

पर्यटनस्थळं – Places To Visit in Gadchiroli

 • लोकबिरादरी प्रकल्प –  Hemalkasa

मडीया गोंड आदिवासींकरता आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरता आपले संपुर्ण जीवन इथं समर्पीत करणारे गांधीवादी विचाराचे पुरस्कर्ते बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचा हा लोकबिरादरी प्रकल्प खरोखर भेट देण्यासारखाच!

भामरागड तालुक्यात हेमलकसा इथं हा प्रकल्प असुन डॉ. प्रकाश आमटे यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मंदाकिनी आणि त्यांची मुलं आज हा प्रकल्प सांभाळतायेत. सेवा समिती, एक रूग्णालय, एक शाळा, पशु अनाथालय हे प्रकल्प सामाजिक दातृत्वात आज इथं सुरू आहेत. गडचिरोलीपासुन याचे अंतर 160 कि.मी. आहे.

 • छपराळा वन्यजीव अभयारण्य – Chaparala

छपराळा वन्यजीव अभयारण्य 140 वर्ग कि.मी. विस्तीर्ण पसरलेले असुन आजुबाजुला मार्कहांडा आणि पेडिगुंडम पहाड आहेत. अभयारण्याला लागुन प्रणिता नदी वाहाते शिवाय हे अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमावर स्थित आहे.

वाघ, आहे यचित्ता, जंगली मांजरी, अस्वल, जंगली कुत्रे, हरिण, आणि अन्य जनावरांचे इथे वास्तव्य अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम काळ हा फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान आहे.

छपराळा वन्यजीव अभयारण्य चामोर्शी तालुक्यात असुन इथुन अंतर 14 कि.मी. आणि गडचिरोलीपासुन अंतर 44 कि.मी. दुर आहे. इथे येण्याकरता चामोर्शीतुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत शिवाय खाजगी वाहनाने देखील इथे पोहोचता येते. राहाण्याकरता चामोर्शीत शासकिय विश्राम गृह असुन खाजगी हाॅटेल्स देखील उपलब्ध आहे.

 • वडाधम जिवाश्म पार्क – Wadadham Fossil Park

गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा तालुक्यात वडाधम नजीक हा जिवाश्म पार्क आहे. गडचिरोलीपासुन दक्षिणेकडे 189 कि.मी. आणि सिरोंचा पासुन 19 कि.मी. हा जिवाश्म पार्क अस्तित्वात आहे. पुरातत्व संशोधनाची आवड असणा.या काही पुरातत्ववेत्त्यांनी या ठिकाणाचा शोध लावला.

नक्षलग्रस्त परिसरात हे जिवाश्म आढळुन आले आहेत या जिवाश्मांना डायनासोर म्हणत असुन लाखो वर्षांपुर्वी यांचं इथं अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. 1959 साली कोनापल्ली आणि पोचपल्ली इथं डायनासोर चे संपुर्ण जिवाश्म आढळल्याने मोठा शोध लागला आज त्या जिवाश्माला कलकत्त्यातील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

इथे येण्याकरता नजीकचे रेल्वेस्टेशन चंद्रपुर असुन, बसने यायचे असल्यास सिरोंचा पासुन बसेस उपलब्ध आहेत.  खाजगी वाहनाने देखील इथे भेट देता येते. राहाण्याकरता सिरोंचा इथे शासकिय विश्राम गृह आणि खाजगी होटल्स देखील उपलब्ध आहेत.

 • मार्कंडा महादेव मंदीर – Markandadeo Devasthan

चामोर्शी तालुक्यातील हे मंदीर अतिप्राचीन असुन संपुर्ण जिल्हयात महादेवाचे हे मंदीर फार प्रसिध्द आहे.  वैनगंगेच्या तिरावर असलेले हे मंदीर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदीराचे बांधकाम अतिशय जुने असुन रेखीव शिल्पे आपलं लक्ष वेधुन घेतात. महाशिवरात्रीला मोठया प्रमाणात गर्दी होत असुन श्रावण महिन्यात देखील भाविकांची इथं गर्दी पहायला मिळते. मार्कंडा येथील महादेव मंदीराला भेट दयायची असल्यास नागपुर, चंद्रपुर आणि गडचिरोलीतुन चामोर्शी आणि त्यांनतर मार्कंडा अशी बससेवा उपलब्ध आहे.

 • आलापल्ली चे वनवैभव – Allapalli

आलापल्ली मधले वनवैभव जर आपल्याला अनुभवायचे असेल तर तुम्हाला भामरागड च्या रस्त्याने आलापल्ली पासुन 16 कि.मी. दुर यावे लागेल. 6 हेक्टर मधे पसरलेल्या या परिसराचा विस्तार 1953 साली करण्यात आला.  टिक, तेंदु, धवल, कुसुम, येन अश्या अनेक वनस्पतीशिंवाय गुंज, तरोटा, गुळवेल सारख्या वनौषधी, विभीन्न प्रजाती इथे पहायला मिळतात.

वनौषधींचा अभ्यास करणारे विदयार्थी इथे नेहमी येतात. आपल्याला जर या विषयाची आवड असेल आणि हे वनवैभव अनुभवायचे असेल तर आलापल्लीत राहाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. आहेरी तालुक्यात आलापल्ली असुन इथे येण्याकरता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असतात.

या व्यतीरीक्त भामरागड वन्यजीव अभयारण्य, बिनगुंडा धबधबा भामरागड, कोर्ची तालुक्यातील टिपागड, धानोरा येथील खोब्रामेंधा, आरमोरी येथील भंडारेश्वर मंदीर ही ठिकाणं देखील प्रेक्षणीय असुन इथे देखील आपल्याला भेटी देता येतील.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ गडचिरोली जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Gadchiroli District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: Gadchiroli District – गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

2 COMMENTS

 1. गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस मदत केंद्राची नावे व त्यांची ठिकाणे आणि जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांची माहिती व नद्यांचे संगम…

 2. चपराळा हा देवस्थान चामोर्शी वरुण ४६ किलोमीटर आहे.तर गडचिरोली वरुण ८१ किलोमीटर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here