यवतमाळ जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Yavatmal Jilha Mahiti

प्रत्येक शहराचा आणि जिल्हयाचा अभ्यास करतांना किंवा त्याबाबत माहिती घेतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या जिल्हयाला एक इतिहास आहे, यवतमाळ शहराला देखील इतिहासाची अशीच किनार लाभलेली आहे. या भागाने अनेक राजामहाराजांचा उदय.अस्त पाहिला आहे.

महाभारतात विदर्भाचा उल्लेख आढळतो तव्दतच यवतमाळचा देखील उल्लेख सापडतो त्यानंतर मौर्य साम्राज्य, सातवाहन, वाकाटक राजवंश, चालुक्य राजवंश, राष्ट्रकूट वंश, यादव वंश, दिल्ली चे सुल्तान, पुढे 1853 ला जिल्हा ब्रिटीशांच्या सत्तेखाली आला. 1903 ला यवतमाळ ला हैदराबाद च्या निजामाने करारावर घेतले होते…. असा यवतमाळचा इतिहास सांगतो…

Yavatmal District Information in Marathi

यवतमाळ जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Yavatmal District Information in Marathi

यवतमाळ जिल्हयाच्या पुर्वेला चंद्रपुर जिल्हा, आंध्रप्रदेश ची सीमा आणि नांदेड, अमरावती आणि वर्धा जिल्हा उत्तरेला तर परभणी अकोला पश्चिमेकडे आहेत.

यवतमाळ जिल्हा दक्षिणी पर्वत रांगामधे वसलेला जिल्हा असुन या पर्वतरांगा पर्वेकडुन पश्चिमेकडे पसरलेल्या आहेत.

यवतमाळ जिल्हयात दोन मुख्य नद्या वाहातात. एक पैनगंगा आणि दुसरी वर्धा नदी. वर्धा नदी मध्यप्रदेशातुन उगम पावते पैनगंगा वर्धा नदीची मुख्य सहाय्यक नदी आहे.

यवतमाळ जिल्हयात येणारे तालुके – Yavatmal District Talukas

 • यवतमाळ
 • आर्णि
 • उमरखेड
 • कळंब
 • पांढरकवडा
 • घाटंजी
 • जरी जामणी
 • दारव्हा
 • दिग्रस
 • नेर
 • पुसद
 • बाभुळगांव
 • महागांव
 • मरेगांव
 • राळेगांव
 • वणी

यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटन स्थळं – Tourist Places in Yavatmal District

यवतमाळ जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने आणि धार्मीक स्थळांच्या दृष्टीने देखील तसा समृध्द जिल्हा आहे.  या जिल्हयाला भेट दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणांना भेटी देउ शकता.

 • कळंब चिंतामणी – Chintamani Ganesh Temple, Kalamb

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक कळंब चा चिंतामणी अवघ्या विदर्भाचे आराध्यदैवत मानले गेले आहे. भाविकांची अपार श्रध्दा या गणेशाप्रती असल्याने बाराही महीने दर्शनाकरता भाविकांची इथे मोठी गर्दी पहायला मिळते.

या मंदीराचे बांधकाम देखील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना आहे. नवसाला पावणारा चिंतामणी अशी देखील या गणेशाची किर्ती दुरवर पसरली आहे. या मंदीरात गणेश कुंड देखील आहे त्याचे पाणी अतिशय पवित्र मानले गेले आहे.

हिंदु धर्मीयांच्या सण उत्सवात तर इथे मोठया मोठया यात्रा पहायला मिळतात, श्री चिंतामणीची यात्रा माघ महिन्यात शुक्ल पक्षात प्रतिपदेपासुन सुरू होते. मंदीर परिसरात भक्तांकरता निवासाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री चिंतामणीचे कळंब येथील मंदीर वर्धा यवतमाळ रस्त्यावर आहे. यवतमाळपासुन अवघ्या 25 कि.मी. वर आणि वध्र्यापासुन 55 कि.मी. वर हे मंदीर आहे. नागपुर पासुन या मंदीराचे अंतर जवळपास 115 कि.मी. आहे. जवळचे रेल्वेस्थानक वर्धा असुन नजिकचे विमानतळ नागपुर आहे.

 • बोरेगांव बांध –  

पर्यटकांकरता बोरेगांव बांध एक चांगला विकल्प आहे शहरापासुन अवघ्या 5 कि.मी. अंतराव असल्याने शहरातील नागरिक देखील लहान मुलांना फिरायला या ठिकाणी घेउन जातात. नौकाविहार, उंटाची सफारी, खाण्यापिण्याची चंगळ यामुळे हे ठिकाण लहान मुलांचे देखील आवडते ठिकाण झाले आहे. राहाण्या खाण्याची देखील चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध आहे शिवाय MTDC चे रिसाॅर्टस् देखील येथे उपलब्ध आहेत.

 • टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य – Tipeshwar Wildlife Sanctuary, Yavatmal

यवतमाळ मधल्या सर्वात लोकप्रीय पर्यटन स्थळांमधे या अभयारण्याचा समावेश होतो 148.63 वर्ग किलोमिटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्याला निसर्गाचं देणं भरभरून मिळालं आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी अभ्यासकांना पहायला मिळतात. अनेक गावं या अभयारण्याच्या आजुबाजुला वसल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीला आज मोठा धोका निर्माण झाला आहे.  या जंगलात वाघ, जंगली डुक्कर, चित्ता, हरिण, ब्लु बेल, एंटीलोप्स, बाइसन, पहायला मिळतात.

 • सहस्त्रकुंड धबधबा – Sahastrakund Waterfall

सहस्त्र धारा तब्बल 40 फुटावरून खाली पडत असतांनाचे विहंगम दृष्य तुम्हाला तुमच्या नजरेत कैद करायचे असेल तर तुम्ही या धबधब्याची सैर एकदा करायलाच हवी.  यवतमाळ पासुन साधारणतः 150 कि.मी. वर असलेले हे ठिकाण डोळयाचे पारणे फेडणारे आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर असलेले हे ठिकाण!

याची आणखीन एक गंमत म्हणजे या धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग यवतमाळ जिल्हयातल्या उमरखेड तालुक्यात आहे.  धबधब्याच्या काठावर पंचमुखी महादेवाचे मंदीर आहे भाविकांचे हे श्रध्दास्थान असल्याने याकरता देखील इथे गर्दी असते.

धबधब्यावर सैर करून आल्यानंतर लागुन असलेल्या बगीच्यात निवांत बसुन धबधब्याला पाहात राहाणे अतिशय नयनरम्य वाटते.  बगीच्यात अनेक रंगाची फुलपाखरं या ठिकाणी पहायला मिळु शकतात. तेव्हां पाण्याचा अद्भुत नजारा बघण्याकरता एकदा सहस्त्रकुंड धबधब्याला भेट द्यायला नक्की जा!

याव्यतीरीक्त जगत् मंदीर, जामवाडी, पैनगंगा अभयारण्य, महादेव मंदीर,  प्रेरणास्थल, रंगनाथ स्वामी मंदीर, केळापुरची अंबादेवी, दिग्रस ची घंटीबाबाची यात्रा, हे सगळे यवतमाळ जिल्हयाचे अलौकीक असे भुषण आहे.

यवतमाळ जिल्हयाविषयी काही महत्वाची माहिती – Yavatmal Jilha Chi Mahiti

यवतमाळ शहरात अजुन रेल्वेमार्ग नसल्याने संपुर्णतः बसेस आणि महामार्गावरून येणा.या वाहनांवरच वाहतुक सुरू आहे.  बसेस चे आवागमन चांगले असल्याने येण्याजाण्यात अडचण नाही.

रेल्वेमार्ग नसला तरी शकुंतला या ब्रिटीशांच्या काळातील रेल्वेचा या शहराला इतिहास आहे ज्या रेल्वेचा खर्च आणि विनीमय आजही ब्रिटींशांच्या ताब्यात आहे, ही एक आश्चर्याची बाब आहे.

 • यवतमाळ जिल्हयाची एकुण लोकसंख्या 2011 नुसार 20,77,000 शहरी 17%
 • क्षेत्रफळ एकुण 13,584 वर्ग कि.मी.
 • साक्षरतेचे प्रमाण 57.96ः
 • 1000 पुरूषांमागे 951 स्त्रिया
 • राष्ट्रीय महामार्ग 7
 • रेमंड ची मोठी कंपनी या जिल्हयात असल्याने एक वेगळे महत्व या शहराला आहे.
 • ज्वारी आणि कापुस ही मुख्य पिकं या जिल्हयात घेतली जातात.
 • संत्रा, लिंबु आणि लाकडाचे फर्निचर यांची येथुन मोठया प्रमाणात निर्यात केली जाते.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ यवतमाळ जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

1 thought on “यवतमाळ जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top