चला तर जाणुया अकोला जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Akola District Information

पश्चिम विदर्भात वसलेला अकोला जिल्हा (Akola District)! ’काॅटन सिटी’ म्हणुन सर्वत्र असलेली या जिल्हयाची ओळख आजतागायत कायम आहे.

अकोला हे शहर आदिम काळापासुन विदर्भाचा भाग आहे. प्राचीन काळात होउन गेलेल्या राजा अकोलसिंह यांच्या नावावरून या शहराचे नाव अकोला पडले असावे असे इतिहासात डोकावल्यास आपल्याला समजते. चला तर जाणुया अकोला शहर व संपूर्ण जिल्ह्याची माहिती.

Akola District

चला तर जाणुया अकोला जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Akola District Information in Marathi

राजा अकोलसिंहने गावाचे रक्षण करण्याकरता या ठिकाणी मातीची मोठी भिंत उभारली होती पण याला किल्ल्याचे स्वरूप औरंगजेब साम्राज्याचा नवाब असदखानाने प्राप्त करून दिले.

मुगल सम्राट औरंगजेबा ने अकोला हे गाव असदखानाला बक्षिस म्हणुन दिले होते. त्या काळी अकोल्याच्या चारही बाजुने मोठी भिंत बांधण्यात आली त्याला चार मोठे दरवाजे ठेवण्यात आले,  दहिहंडा वेस, बाळापुर वेस, अगरवेस आणि गजवेस अशी त्यांची नावं!

आज असदगड किल्ल्याची काळाच्या ओघात दुरावस्था झाली असली तरी त्याच्या मजबुत भिंती आजही त्याच्या भक्कमपणाची साक्ष देत भुतकाळाचे स्मरण करून देतात.

अत्यंत सुबक व मनमोहक शहीद स्तंभ 1857 च्या उठावाचे प्रतिक म्हणुन नगरपालीकेच्या वतीने बांधण्यात आला आहे, किल्ल्याच्या पुर्ननिर्मीती करता आणि शहीद स्तंभाच्या बांधकामाकरता 20,951 मजुरांनी काम केल्याचे सांगण्यात येते, 1957 साली सुरू झालेले हे कार्य 12 एप्रील 1959 ला पुर्ण झाले.

मोर्णा नदीच्या किना.यावर वसलेला हा किल्ला अकोला शहराचे ऐतिहासिक महत्व आणि वैभवाची साक्ष देतो.  किल्ल्यावरून दिसणारा सुर्याेदय आणि सुर्यास्त मनाला सुखावणारा आहे.

अकोला जिल्हयातील तालुके – Akola District Taluka List

1) अकोला 2) बाळापुर 3) पातुर 4) बार्शिटाकळी 5) मुर्तीजापुर 6) अकोट 7) तेल्हारा

अकोला जिल्हयाविषयी काही उपयुक्त माहिती – Akola District Information

अकोला जिल्हयाची लोकसंख्या (akola district population) जवळपास 18,13,906

अकोला जिल्हयाचे एकुण क्षेत्रफळ (Akola district’s Total Area) 5428 वर्ग कि.मी

1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 938

मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्ग 6 या शहरातुन गेला आहे (Highway No 6)

साक्षरतेचे प्रमाण 88.5ः

सर्वठिकाणी जनावरांना खाण्याकरता देण्यात येणारी ’ ढेप ’ हीचा भाव जगात एकमात्र ’ अकोल्यात’ ठरवला जातो.

कापसाचे मोठया प्रमाणात उत्पादन या जिल्हयात घेतल्या जायचे. या शिवाय सोयाबिन, तुर, उडीद ही इतर पिकं देखील मोठया प्रमाणात या भागात होतात.

अकोला हे शहर दोन भागात विभागल्या गेले आहे, मोर्णा नदीच्या एका बाजुला असलेले जुने शहर आणि दुस.या भागात तयार झालेले नवे शहर.

अकोल्यातला असदगढ किल्ला आणि जवळ असलेले बाळापुर किल्ला आणि नरनाळा किल्ला या शहराला जुना इतिहास असल्याची साक्ष देतात.

शहराच्या उत्तरेला अमरावती जिल्हयातील अंजनगाव सुर्जी दर्यापुर हे तालुके पुर्वेकडे अमरावती दक्षिणेकडे वाशिम आणि पश्चिमेकडे बुलढाणा जिल्हा आहे. (1999 पर्यंत वाशिम हा अकोल्याचाच भाग होता)

महान हे मोठे धरण असुन शहराला याच धरणातुन पाणीपुरवठा केला जातो.

वान हे मोठे धरण तेल्हारा तालुक्यात असुन नैसर्गीक रित्या डोंगराच्या मधे वसलेल्या या धरणाला तीन जिल्हयांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत अकोला, बुलढाणा आणि अमरावती.

राजराजेश्वर हे महादेवाचे मंदीर शहराचे आराध्यदैवत असुन अतिशय प्राचीन अश्या या मंदीराला जागृत देवस्थान मानल्या जातं, बरेच अनुभव आणि आख्यायिका या मंदीराशी जोडल्या गेल्या आहेत.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोल्याच्या वैभवात भर घालणारे विद्यापीठ कृषी संबंधी नवनवे संशोधनं करण्याकरता प्रसिध्द आहे त्याचा विस्तीर्ण असा हिरवागार परिसर मनाला सुखावणारा आहे.

या विद्यापीठा समोरच महाबीजची मोठी इमारत दिमाखात उभी आहे.

सर्वोपचार रूग्णालय या जिल्हयातील शासकीय रूग्णालयामुळे रूग्णांची मोठया प्रमाणात गर्दी शहरात पहायला मिळते.

शहरात खाजगी रूग्णालयांची मोठया प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने दुरूनदुरून रूग्ण उपचाराकरता या ठिकाणी येतात.

कॅन्सर चे मोठे रूग्णालय ’तुकाराम हाॅस्पीटल’ या नावाने शहरात सेवा प्रदान करत आहे.

कोचिंग क्लासेस या शहरात मोठया प्रमाणात असल्याने शिक्षणाकरता आणि स्पर्धापरिक्षांच्या अभ्यासाकरता विद्यार्थी मोठया प्रमाणात इथे येत असतात.

शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अभियांत्रीकी महाविद्यालय या शहरात असल्याने दुरदुरचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाकरता येत असतात.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या शहरात असुन मोठेमोठे उद्योग या ठिकाणी उभारलेले आहेत.

शहरात विमानतळ असुन लवकरच विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

रेल्वेसेवा आणि बससेवा उपलब्ध असल्याने शहर मोठमोठया शहरांशी सहजतेने जोडल्या गेले आहे.

अकोला शहरापासुन नागपुर 247 कि.मी. आणि मुंबई 568 कि.मी अंतरावर आहे.

अकोला जिल्हा उन्हामुळे देखील ओळखला जातो, हिवाळा आणि पावसाळा हे जरी इथले सामान्य ऋतु असले तरी उन्हाळा मोठया प्रमाणात तापतो.

अकोल्यात प्रत्येक श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी साजरा होणारा कावड उत्सव संपुर्ण भारतात फक्त अकोल्यात साजरा होतो. शहराबाहेरच्या 15 कि.मी. दुरवरून पायी चालत जाउन कावडधारी नदीचे पाणी आणुन राजराजेश्वराला जलाभिषेक करतात.

अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळं – Places to Visit in Akola

 • सालासार बालाजी मंदीर – Salasar Balaji Temple

अकोला शहरातील गंगा नगर भागात 2014 साली या मंदीराची निर्मीती करण्यात आली असुन अतिशय विस्तीर्ण परीसरात देखणे मंदीर भावीकांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधुन घेण्यात यशस्वी झाले आहे. मंदीरात हनुमानाची, श्रीराम दरबार, राधाकुष्णाची, आणि महादेवाची मुर्ती स्थापीत करण्यात आली असुन स्वच्छ आणि सुशोभीत केलेला परिसर पाहुन मनाला प्रसन्नता आणि शांतीचा लाभ मिळतो, समोरच हिरवळीचा बगीचा तयार केला असुन विविध रंगीबेरंगी कारंजे देखील आकर्षक आहेत. नित्य होत असलेली भजनं, धार्मीक कार्यक्रमांमुळे भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

 • अन्नपुर्णा माता मंदीर – Annapurna Mata Mandir

येथुन काही अंतरावर अन्नपुर्णा मातेचे मंदीर देखील पाहाण्यासारखे आहे.

 • राजराजेश्वर मंदीर – Raj Rajeshwar Temple

अकोला शहरातील जुने शहर भागात असलेले हे मंदीर अकोला शहराचे ग्रामदैवत आहे. फार प्राचीन असा इतिहास या मंदीराला लाभलेला असुन महादेवाचे फार भव्य असे शिवलिंग या ठिकाणी आहे.

या मंदीराविषयी एक कहाणी सांगितली जाते ती अशी

राजा अकोलसिंहाची पत्नी या महादेवाची निस्सिम भक्त होती ती भल्या पहाटे या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता नियमीत या मंदीरात येत असे, राजा अकोलसिंहाला राणीवर संशय आल्याने त्याने एकदा तिचा पाठलाग केला राणी शिवलिंगाचे दर्शन घेत असल्याचे पाहुन राजा मनोमन खजील झाला पण संशय घेतल्याने राणी दुखावली गेली तिने राजेश्वराला स्वतःमधे सामावुन घेण्याविषयी साकडे घातले त्याचक्षणी पिंड दुंभगुन राणी त्यात गुप्त झाली, पुढे कित्येक दिवस राणीचे केस आणि साडीचा पदर शिवपिंडी बाहेर होते पण नित्य पुजेमुळे आज तो पदर जरी त्या ठिकाणी दिसत नसला तरी शिवपींडीला पडलेली भेग आजही पहायला मिळते .

प्रत्येक सोमवारी, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला राजराजेश्वराच्या दर्शनाकरता भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी या ठिकाणी पहायला मिळते.

या शिवाय राणीसती मंदीर, रिझर्व माता, अक्कलकोट ची देवी ही देवीची मंदीर नवरात्रात भाविकांच्या गर्दीने ओसंडुन वाहात असतात.

 • पातुरची रेणुका माता – Renuka Mata Temple

अकोला शहरापासुन जवळपास 30 कि.मी. अंतरावर पातुर तालुक्यात उंच गडावर आई रेणुकेचे मंदीर आहे. जे भाविक माहुर ला जाउन रेणुका देवीचे दर्शन घेउ शकत नाही ते या ठिकाणी येउन दर्शनाचा लाभ घेतात. हिरव्यागार उंच गडावर आई रेणुकेचे हे मंदीर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. या गडावरून संपुर्ण पातुर चे विहंगम दृश्य नजरेस पडते.

जवळपास दोनशे ते 250 पाय.या चढुन मंदीरात दर्शनाकरता जाता येते, मंदीरात आल्यानंतर आई रेणुकेचा मुखवटा दृष्टीस पडतो आणि भाविक सर्व श्रम कष्ट विसरतात. पातुरला रेणुकामातेच्या दर्शनाला यावयाचे असल्यास अकोल्यावरून मोठया प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी बसेस उपलब्ध आहेत शिवाय खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येते.

 • काटेपूर्णा अभयारण्य – Katepurna Wildlife Sanctuary

अकोला शहरापासुन 30 कि.मी. अंतरावर निसर्गाने वेढलेले आणि प्राकृतिक सौंदर्याचा परिसस्पर्श झालेले काटेपुर्णा अभयारण्य पशु पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अनेक पक्षी आणि प्राणी इथे वास्तव्याला असुन निसर्गप्रेमी मोठया संख्येने इथे भेट देण्याकरता गर्दी करतात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वृक्ष येथे असुन जवळपास 115 प्रकारच्या वनस्पती इथे आढळतात.

काटेपुर्णा अभयारण्य चार शिंगाच्या अॅंटीलोप आणि भुंकणा.या हरणाकरता प्रसिध्द आहे. या व्यतिरीक्त काळे हरीण, कोल्हा, जंगली डुक्कर, ससा, निलगाय, जंगली मांजरी, मोर आणि माकड देखील आहेत. काटेपुर्णा जलाशयामुळे या ठिकाणी विविध प्रजातींचे पक्षी देखील आकर्षीत होतात.

 • नरनाळा किल्ला – Narnala Fort

अकोल्यापासुन साधारण 65 कि.मी. अंतरावर नरनाळा किल्ला असुन यालाच शहानुर किल्ला देखील म्हंटल्या जातं.  या किल्ल्याचे नाव राजपुत शासक नरनल सिंह यांच्या नावावरून ठेवण्यात आले. 15 व्या शतकात या किल्ल्यावर मोगलांनी कब्जा केला आणि याचे पुर्ननिर्माण केले त्यामुळे याला शहानुर किल्ला देखील म्हंटले जाते.

आज या किल्ल्याची दुरावस्था झाली असुन ब.याच गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तरीही बुलंद दरवाजा, येथील तोफ, किल्ला पाहाण्यासारखा आहे. आजुबाजुला असलेले सृष्टीसौंदर्य पाण्याचे तलाव येथील निसर्गसौंदर्यात भर घालतात.

खटकाली, पोपटखेड येथील धरण ही देखील प्रेक्षणीय स्थळं असुन पाहाण्यासारखी आहेत वळणावळणाच्या या रस्त्यावर खाजगी वाहनाने येणे श्रेयस्कर ठरते.

 • वारी हनुमान – Wari Hanuman Mandir

तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान हे ठिकाण भाविकांकरता आणि पर्यटकांकरता आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. रामदास स्वामींनी या ठिकाणी हनुमानाची मुर्ती स्थापीत केली असुन दुरून दुरून या ठिकाणी भाविक दर्शनाकरता आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता येत असतात.

मंदीरा नजीक हनुमान सागर प्रकल्प नावाचे मोठे धरण असुन आसपासच्या परीसरातील सर्वात मोठे धरण म्हणुन प्रसीध्द आहे. डोंगरांच्या सान्निध्यात तयार झालेल्या या धरणातुन पावसाळयात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर या मंदीराजवळचा परिसर अतिशय सुरेख दिसतो. या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात भंडारे आणि रोडगे करण्याकरता एकत्र येतात.

मामा भाच्चा नावाचा डोह या ठिकाणी असुन या ठिकाणी मामा आणि भाच्च्याने एकत्र अंघोळ करू नये असे मानल्या जाते. या ठिकाणी येण्याकरता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असुन खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येतं.

 • पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणुन नावलौकीक मिळवलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर अकोला शहराचे वैभव आहे. 20 ऑक्टोबर 1969 ला या कृषी विद्यापीठाची अकोल्यात स्थापना झाली.

संशोधनं, कृषी शिक्षण, शिक्षण विस्तार, अनुसंधान अश्या जवाबदा.या कृषी विद्यापीठ आज पार पाडत आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे विदर्भातील 11 जिल्हे कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.

कृषी विद्यापीठाचे नागपुर येथे एक केंद्र असुन गडचिरोली येथे नुकतेच एक केंद्र स्थापीत झाले आहे.

विद्यापीठ परिसर फार विस्तीर्ण असुन हिरवळीने नटलेला आहे. मोर, ससे, विविध सापांच्या प्रजाती, हरीण येथे नेहमी पहायला मिळतात.

इथली हवा शुध्द आणि प्रदुषणरहीत असल्याने सकाळच्या वेळेस माॅर्निंग वाॅक करण्याकरता शेकडो नागरिक इथे येतात.

आणखी वाचा:

Sanchi Stupa Information

History

लक्ष्य दया: तुमच्या जवळ अकोला जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया अकोला जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Akola District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट : Akola District – अकोला जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

3 COMMENTS

 1. India’s first Railway earliear known as one down Calcutta mail connecting west n East India was routed through Apple city. And geographically Its nodal place of India. I proud to be its my home city

 2. akola pasun rudrayni deviche mandir paryatan sthal ahe…
  shivay matrubhakt tape hanuman eetihasic mandir mornecha kathaver ahe….

 3. जुना शहरामधे खंडेलवाल हायस्कुल नंतर सर्वात पहिले म्हणजे १९७४साली जगदंबाश्रम शक्तिपीठ येथे श्री रेणुका मातेची स्थापना झालेली आहे. त्यावेळी नगरपालिका असल्यामुळे हा भाग सुकापुर नावाने सरकार दरबारी रजिष्टर आहे. आणि आज जुना शहरात खंडेलवाल शाळेपासुन पुढे जी नविन वस्ती बसलेली आहे ती श्री रेणुका मातेच्या स्थापने नंतरच झालेली आहे. खुप कुटूंबांची कुलदेवता असणार्‍या रेणुका मातेचे भक्त ह्या मंदिरात प्रार्थना व नवसाला प्रसन्न होऊन आशिर्वादीत करणारे देवीचे देवस्थान म्हणुन या मंदिराला ओळखतात. या मंदिरात संपुर्ण भारत भरातुन देवी भक्त व परदेशात स्थाईक झालेले कित्येक भारतीय आवर्जुन दर्शनास येवुन देवी दर्शनाने शक्तिप्रसादाची अनुभुती घेतात….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here