Tuesday, July 15, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

पंजाबराव देशमुख एक महान व्यक्तिमत्व

Dr. Panjabrao Deshmukh

तु ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा

पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या महान व्यक्तिमत्वाने हिमालयाच्या उंचीचे कार्य करून ठेवले आहे. आज ते पाहाता त्यांची दुरदृष्टी वर्तमानाचा वेध घेणारी आणि भविष्यातील पाऊले ओळखणारी होती याची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. एका ध्येयाने प्रेरीत झालेले ते व्यक्तिमत्व होते. भाऊसाहेबांचे उद्दीष्ट, ज्ञान आणि दुरदृष्टी अचंबित करणारी होती.

एक महान व्यक्तिमत्व पंजाबराव देशमुख – Dr Panjabrao Deshmukh Information in Marathi

Panjabrao Deshmukh Information in Marathi

पंजाबराव देशमुख यांची माहिती – Dr Panjabrao Deshmukh Mahiti

नाव (Name):पंजाबराव देशमुख (भाऊसाहेब)
जन्म (Birthday):27 डिसेंबर 1898, पापळ जिल्हा अमरावती
पत्नीचे नाव (Wife Name):विमलाबाई
प्रशिक्षणसंस्था:श्री शिवाजी शिक्षण संस्था
शिक्षण (Education):
  • प्राथमिक शिक्षण: पापळ
  • पुढिल शिक्षण: अमरावती
  • उच्चशिक्षण: एडिनबर्ग आणि आॅक्सफर्ड विद्यापीठ
  • 1952 ते 1962 कृषी मंत्री
मृत्यु (Death):10 एप्रील 1965, दिल्ली

भाऊसाहेबांच्या कारकिर्दीवर एक दृष्टीक्षेप: 

  • खासदार
  • भारतिय घटना समितीचे सदस्य
  • केंद्रिय कृषिमंत्री
  • कृषी आणि सहकार क्षेत्रात अनेक संस्थांचे अध्यक्ष
  • आंतरराष्ट्रीय समित्यांचे सदस्यत्व, अध्यक्षपद
  • समाजसेवक, राजकारणी

भाऊसाहेब म्हणायचे ’’माझ्या पुढच्या सात पिढया या संस्थेतुन मॅट्रिक झाल्या म्हणजे माझे काम झाले’’ पंजाबरावांच्या थोर कार्यामुळे आणि थोर पुण्याईने आज दुसरी, तिसरी पिढीच आपल्याला उच्चशिक्षीत झालेली पहायला मिळते आहे.

शेतकरी ऋणात जन्माला यायचा ऋणात जगायचा आणि ज्यावेळी त्याचा मृत्यु व्हायचा त्यावेळी देखील तो ऋणात मरायचा ही परिस्थीती पंजाबराव देशमुखांनी अगदी जवळुन पाहीली, अनुभवली आणि शेतक.याची हालाखीची अवस्था जर संपवायची असेल तर शेतकरी शिकायला हवा ही भावना त्यांच्या मनात होती आणि म्हणुन त्यांनी शेतक.यांकरता अपार कष्ट करून कृषी विद्यापिठा ची पायाभरणी केली.

भाऊसाहेबांची महत्वाकांक्षा उत्तुंग होती आणि या गरूड झेपेला केवळ आकाशाची मर्यादा होती. त्याग आणि समर्पणाची भावना भाऊसाहेबांमधे ओतप्रोत भरलेली होती. त्यांच्या लावलेल्या रोपटयाचा आज वटवृक्ष झालेला पाहावयाकरता ते असायला हवे होते. गाडगेमहाराज आणि भाऊसाहेब जे मुल्यशिक्षण समाजाला देत होते ते आज हरविलेले दिसते.

भाऊसाहेबांनी विदेशातुन बॅरिस्टरची पदवी मिळवली. त्यांना वाटले असते तर वकिल होउन त्यांनी खो.याने पैसा कमविला असता. पण त्यांनी तसे केले नाही. बहुजन समाजाला, शेतक.यांना त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.

शाळेचे महत्व त्यांनी जाणले होते आणि म्हणुन शाळा उभारण्याकरीता झोळी हातात घेऊन देणग्यांकरता त्यांनी समाजापुढे हात पसरविले. संस्थेचा सर्वांगिण विकास व्हावा या करीताच जणु ते जगले कारण या संस्थेच्या माध्यमातुन शेतक.याचा विकास त्यांना साधायचा होता. ही संस्था म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता.

त्यांच्या प्रत्येक कृतीतुन सामाजिक मुल्यांची रूजवणुक झाली. अश्या पध्दतीने शिक्षणाचे मुल्य समजण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्याला तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, पंजाबराव देशमुखांसारख्या थोर व्यक्तिमत्वांची आवश्यकता आहे.

भाऊसाहेंबांनी केलेल्या कार्यामुळे हे घडले:

  • भाऊसाहेबांनी त्यांच्या संस्थेची उभारणीच शेतक.याचे हित लक्षात घेउन केली.
  • त्यांचे स्वप्नं होते की कास्तकार शिकला पाहिजे.
  • शिक्षण खेडयापर्यंत पोहोचले. शेतकयाची मुले उच्चशिक्षीत झाली आणि होत आहेत.
  • आज आजुबाजुच्या जिल्हयांमधे जी साक्षरता आपल्याला पहावयास मिळते त्याची मुळं पंजाबराव देशमुखांच्या कृतीत रूजलेली आहेत.
  • शेतकरी व्यवसायात व्यापारात फार उंचीवर पोहोचला नसला तरी देखील लहान.मोठे व्यापार करण्याची तो हिम्मत करतांना दिसतो आहे.
  • शेतकरी गावाच्या आर्थिक विकासात सहभागी झाला आहे.
  • कृषी महाविद्यालयाचे आणि कृषी विद्यापिठांचे संशोधन गाव खेडयापर्यंत पोहोचते आहे.
  • त्या संशोधनातुन शेतकरी नवनवे प्रयोग करण्यास पुढाकार घेतांना दिसतो आहे.
  • अधिक उत्पादनाकरता शेतकरी बांधव नवनव्या तंत्रज्ञानाचा आणि बियाण्यांचा उपयोग करतायेत.
  • संस्थेच्या वैद्यकिय महाविद्यालयाची सेवासुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधी ! स्वातंत्र्य मिळावे या करीता त्यांचे साधन ’’सत्याग्रह’’ हे होते. समाजाच्या उध्दाराकरीता संत गाडगे महाराजांनी त्यांचे साधन म्हणुन ’’झाडु’’ हाती घेतला.

तर भाऊसाहेबांनी समाजाच्या उन्नतीकरीता साधन म्हणुन ’’शिक्षण’’ महत्वाचे मानले. संत गाडगे महाराजांना भाऊसाहेबांच्या कार्याचे फार कौतुक होते व नितांत आदर देखील!

शिक्षणा व्यतिरीक्त कृषी आणि सहकार क्षेत्रात देखील भाऊसाहेबांनी क्रांती घडवुन आणली होती त्यामुळे गाडगे बाबांच्या हृदयात त्यांच्याविषयी अपार प्रेम होते.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved