गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Gondia Jilha Mahiti

महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा! गोंदिया मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याच्या अगदी जवळचा जिल्हा आहे. मोठया प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असल्याने गोंदियाला तांदुळाचे शहर म्हणुन देखील ओळख आहे. या शहराला महाराष्ट्राचे प्रवेशव्दार देखील म्हणतात.

Gondia District Information In Marathi

गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Gondia District Information In Marathi

या शहराचे नाव आदिवासी गोंड समुदाय मोठया प्रमाणात असल्याने गोंदिया असे ठेवण्यात आले आहे. पुर्वी इथे मोगलांचे साम्राज्य असल्याचे पुरावे मिळतात.

गोंदीया जिल्हयातील तालुके – Gondia District Taluka List

गोंदीया जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत

 1. गोंदिया
 2. तिरोरा
 3. गोरेगांव
 4. देवरी
 5. आमगांव
 6. सेल्कासा
 7. अर्जुनी मोरगांव
 8. सदाक अर्जुनी

गोंदिया जिल्हयाविषयी उपयुक्त माहिती – Gondia Jilha chi Mahiti

 • लोकसंख्या 13,22,635
 • क्षेत्रफळ 5,234 वर्ग कि.मी.
 • साक्षरतेचे प्रमाण 85%
 • 1000 पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण 991
 • तांदळाचे उत्पादन मोठया प्रमाणात असल्याने शहराला ’तांदळाचे शहर’ म्हणुनही ओळख.
 • रेल्वेवाहतुक, विमानवाहतुक आणि बससेवेने शहराला जोडलेले आहे.
 • तांदुळाचे शहर असल्याने शहराच्या अवतीभवती 250 तांदळाच्या मिल्स आहेत.
 • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (मुंबई हावडा) या शहराच्या मधुन गेला आहे.
 • जास्त उष्णता आणि जास्त थंडी असे दोन्ही ऋतु या जिल्हयात अनुभवायला मिळतात.
 • गोंदिया जिल्हयात आजही आदिवासींचे मोठया प्रमाणात वास्तव्य असुन जंगल आणि अरण्यात त्यांचा अधिवास आहे.
 • शहरात तांदळाच्या मिल्स तर आहेतच शिवाय छोटया स्तरावर तंबाखु उद्योग देखील आहे.

गोंदीया जिल्हयातील पर्यटनस्थळं – Tourist Places In Gondia District

 • हाजरा धबधबा – Hajra Fall

सेल्कासा तालुक्यातील हाजरा फॉल्स पावसाळयात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. दरेकासा रेल्वेस्टेशन पासुन 1 कि.मी. अंतरावरचा हा धबधबा पावसाळयात पर्यटकांच्या गर्दीने अगदी फुलुन गेला असतो. इथे आल्यानंतर नैसर्गिक वनसंपदेचा आणि मोठया पहाडांचा मनमुराद आनंद घेता येतो हे ठिकाण ट्रेकिंग ची आवड असणा.यांना कायम आकर्षीत करत असतं. हा परिसर दाट जंगलाने आणि उंच उंच पर्वतांनी झाकल्या गेला आहे. हे ठिकाण गोंदिया डोंगरगड रेल्वे स्टेशन च्या मधे येत असुन मुंबई हावडा या मुख्य रेल्वे लाईनवर आहे. ऑगस्ट ते डिसेंबर हा भेट देण्याकरता सर्वोत्तम काळ आहे.

 • चिचगड –  Chichgad

कच्छगढ हे ठिकाण गोंदियापासुन 55 कि.मी. अंतरावर असुन हे ठिकाण पाहाण्याकरता दुरून दुरून पर्यटक येत असतात. जवळपास 25000 वर्ष जुनी ही गुफा पर्यटकांना आकर्षीत करते पुरातत्व खात्याचा अभ्यास करणा.यांना असे आढळुन आले की त्या काळी दगडाव्दारे बनविल्या जाणा.या अवजारांचा उपयोग केला जात असे. ट्रेकर्सकरता हे आवडीचे ठिकाण असुन स्थानिक आदिवासींकरता हे स्थान पुजनीय आहे. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान भेट देण्याकरता योग्य काळ आहे.

 • नागझिरा वन्यजिव अभयारण्य – Nagzira Wildlife Sanctuary

गोंदिया पासुन साधारण 60 कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले नागजिरा वन्यजीव अभयारण्य अनेक वन्यपशुपक्ष्यांचे माहेरघर असुन पर्यटनाकरता उत्तम ठिकाण आहे. आजही या अभयारण्याला कृत्रीमतेचा स्पर्श झालेला नसल्याने निसर्गाची आवड असणारे पर्यटक इथे मोठया प्रमाणात भेट देतात.

आज लुप्त होत चाललेल्या ब.याच प्रजाती इथे वास्तव्याला आहेत. पक्ष्यांच्या निरीक्षणाची आवड असणा.यांकरता हे अभयारण्या स्वर्गापेक्षा कमी नाही, 166 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती निरीक्षणाअंती इथे आढळुन आल्या आहेत. वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, माकड, चितळ, नीलगायी, चैसिंगा, अस्वल, भुईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे असे अनेक प्राणी इथे पहायला मिळतात.

सापाच्या जवळजवळ 36 प्रजाती इथे असुन त्यातल्या 6 प्रजाती तर आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत ज्यात रॉक पायथन, धामण, भारतीय कोबरा, रसेल वायपर, चेकर्ड किलबॅक  आणि कॉमन मॉनिटर येतात.

इथे येण्याकरता जवळचे बसस्थानक साकोली आणि तिरोरा असुन पर्यटकांकरता या ठिकाणी निवासाची सोय आहे.

 • नवेगांव नॅशनल पार्क – Navegaon National Park               

नवेगांव नॅशनल पार्क गोंदिया जिल्हयाच्या दक्षिणेला स्थित असुन महाराष्ट्राच्या पुर्वेकडे आहे. पार्क 133.78 वर्ग कि.मी. क्षेत्रफळात विस्तारलेले आहे जैव विविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने याचे आगळे वेगळे महत्व आहे शिवाय प्रकृती संरक्षणाच्या दृष्टीने देखील ते आवश्यक आहे.

या ठिकाणी विभीन्न प्रकारच्या वनस्पती असुन पक्ष्यांच्या 209 प्रजाती इथे वास्तव्याला आहेत. सापांच्या 9 प्रजाती आणि प्राण्यांच्या 26 प्रजाती इथे राहातात ज्यात वाघ, चित्ता, जंगली मांजरी, पाम, लघु भारत सिवेट, कॅवेट, कोल्हा, आणि जॅकल यां सारखे प्राणी आहेत. या नॅशनल पार्क मधे छोटे संग्रहालय, आणि वाचनालय देखील आहे

इथे नवेगाव तलाव जवळजवळ 11 वर्ग कि.मी. क्षेत्रात विस्तीर्ण पसरलेला आहे.

नवेगाव ला येण्याकरता भंडारा, नागपुर आणि देवळगांव येथुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असुन खाजगी वाहनाने देखील इथे पोहोचता येते. राहाण्याकरता हाॅटेल्स आणि शासकिय विश्रामगृह उपलब्ध आहेत. जवळचे विमानतळ नागपुर आहे.

 • सुर्यदेव आणि मंडोदेवी मंदीर – Suryadev Mandodevi

एका पहाडावर वसलेले सुर्यदेवाचे आणि मंडोदेवीचे मंदीर गोंदियाचे ग्रामदैवत मानल्या जाते. सुर्यदेवाचे आणि दुर्गादेवीचा अवतार असलेल्या मंडोदेवीचे मंदीर अतिशय पवित्रस्थळ मानल्या गेले आहे. हे जागृत देवस्थान असुन ईच्छा पुर्ण करणारी देवी अशी या मंदीराची ख्याती सर्व पंचक्रोशीत पसरलेली आहे.

या मंदीर परिसरात एक गुफा असुन त्यात हनुमानाचे आणि अन्नपुर्णा मातेचे मंदीर आहे. हे मंदीर उंचावर स्थापीत असुन काळया दगडांनी बनलेले आहे लोकांच्या मान्यतेनुसार रोज रात्री एक वाघ या देवीच्या दर्शनाला इथे येत असुन कोणालाही इजा पोहोचवत नाही

या मंदीरात दर्शन घेतल्याने असाध्य आजार बरे होत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे, गोंदीया जिल्हयाची ही ग्रामदेवता असुन इथे दर्शनाकरता येण्याकरता बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ गोंदिया जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया गोंदिया जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Gondia District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: Gondia District – गोंदिया जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here