• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Ratnagiri District Information In Marathi

रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

June 7, 2020
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
22 January History Information in Marathi

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 22, 2021
What to Know Before Investing

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

January 21, 2021
21 January History Information in Marathi

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 21, 2021
Ramacha Palna

प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह

January 20, 2021
20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 20, 2021
Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

January 19, 2021
19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 19, 2021
Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

January 18, 2021
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

January 18, 2021
18 January History Information in Marathi

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 18, 2021
Balapur Fort Information in Marathi

इतिहासाचा वारसा लाभलेला वऱ्हाड प्रांतातील बाळापुर किल्ला

January 18, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, January 22, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Ratnagiri Jilha Mahiti

येवा कोकण आपुलाच असा…… अश्या गोड कोकणातला एक मोठा जिल्हा रत्नागिरी!

समुद्र लाभलेल्या जिल्हयाची शानच काही न्यारी असते…

थकलेले भागलेले जीव रोजच्या राहाटगाडग्याला कंटाळुन समुद्राच्या ओढीने काही क्षण निवांत व्हायला येतात आणि समुद्राला आपल्या हृदयात साठवुन माघारी वळतात…

असे हे समुद्र प्रेम! ते ज्याला कळले तो खरा भाग्यवंत!

आणि असं समुद्राचं वैभव अनंत हस्तानं कोकणाला लाभलंय! आणि म्हणुनच पर्यटक फार मोठया संख्येने नित्य नियमाने कोकणात येतातच येतात….

रत्नागिरीला काय काय आहे? अहो काय नाही विचारा… समुद्र, निसर्ग, मासे, जहाजातली सफर, आंबे, विशेषतः कोकणचा हापुस, काजु बदाम, सुकामेवा, येथील मुर्तीकला, आकर्षक मुत्र्या, असं बरच काही अनुभवायचं असेल बघायचं असेल तर कोकण सफर करायलाच हवी.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जन्मभुमी….. रत्नागिरी

रत्नागिरीच्या पश्चिमेला सहयाद्रीच्या पर्वतरांगा पहायला मिळतात.

Ratnagiri District Information In Marathi

रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Ratnagiri District Information in Marathi

मराठयांच्या इतिहासात रत्नागिरीचे आगळेवेगळे महत्व पहायला मिळते, रत्नागिरी साता.यातील राजांच्या ताब्यात सुमारे 1731 ते 1818 पर्यंत होते पण पुढे 1818 पासुन इंग्रजांनी यावर ताबा मिळवला.

येथे एक किल्ला देखील आहे जो वीजापुरातील राजपरिवाराने बनविला ई.स. 1670 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याची डागडुजी करवीली होती.

रत्नागिरीत म्यानमार चे शेवटचे राजा थिबु आणि स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकरांना कैद करून ठेवले होते असे इतिहास सांगतो.

रत्नागिरीच्या उत्तरेला रायगड जिल्हा, उत्तर पुर्वेला सातारा, पुर्वेला सांगली, दक्षिण पुर्वेला कोल्हापुर, दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि दक्षिण पश्चिमेकडुन उत्तर पश्चिमे पर्यंत अरबी समुद्र पसरलेला आहे.

रत्नागिरी जिल्हयातील तालुके – Ratnagiri District Taluka List

रत्नागिरी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत

  1. रत्नागिरी
  2. खेड
  3. गुहागर
  4. चिपळुण
  5. दापोली
  6. मंडणगड
  7. राजापुर
  8. लांजा
  9. संगमेश्वर

रत्नागिरी जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Ratnagiri Zilla Chi Mahiti

  • लोकसंख्या (Population) 16,15,069
  • क्षेत्रफळ 8208 वर्ग कि.मी.
  • एकुण तालुके 9
  • साक्षरतेचे प्रमाण 82.18%
  • 1000 पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण 1123
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 आणि क्र. 204 या जिल्हयातुन गेले आहेत.
  • सावित्री आणि वैष्णवी या जिल्हयातील महत्वाच्या नद्या.
  • समुद्राशी संबंधीत व्यवसाय रत्नागिरीत मोठया प्रमाणात असुन येथील अर्थव्यवस्था ब.याच प्रमाणात समुद्राशी निगडीत आहे.
  • या ठिकाणचा हापुस आंबा फार प्रसिध्द असुन विदेशात देखील निर्यात केला जातो.
  • नारळ, काजु, फणस, आमसुल (रातांबा) सूध्दा मुबलक प्रमाणात होतात.
  • या ठिकाणी प्रामुख्याने तांदळाची शेती केली जाते.
  • दापोलीचे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ प्रसिध्द असुन नवनवीन संशोधनं या ठिकाणी होत असतात.
  • बरेच गड आणि किल्ले या जिल्हयात आजही आपल्याला पहायला मिळतात त्यातले काही महत्वाचे म्हणजे जयगड, पालगड, पूर्णगड, प्रचितगड, भवानीगड, महिपतगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, विजयगड, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, गोविंदगड, जयगड हे सांगता येतील.
  • रत्नागिरीचा महत्वाचा व्यवसाय मासेमारी आहे.
  • रत्नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसलेले शहर असुन भारतातील एक महत्वाचे बंदर आहे.
  • स्वातंत्र्य लढयात ज्यांचे योगदान महत्वाचे होते असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे, शिक्षणतज्ञ समाजसेवक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरीचाच.
  • भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे मुळात रत्नागिरी जिल्हयातलेच!
  • प्तित पावन मंदिर, थिबा पॅलेस, दिपस्तंभ, काळया आणि पांढ.या वाळुचे समुद्रकिनारे, भाट्ये चैपाटी, टिळक स्मारक, काळा समुद्र, भगवती बंदर ही पर्यटन स्थळं भेट देण्यासारखी आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit In Ratnagiri

  • गणपतीपुळे – Ganpatipule                                                                 

परमेश्वराचा वरदहस्त लाभलेला रत्नागिरी जिल्हा! गणपतीपुळे, कसबा, आडिवरे, पावस, मार्लेश्वर अशी बरीच तिर्थक्षेत्र या जिल्हयात आपल्याला पहायला मिळतात.

हा जिल्हा चारी बाजुंनी समृध्द असा जिल्हा आहे, तिथल्या निसर्गापासुन ते माणसांपर्यंत सगळच आपल्याला आपलसं करतात.

रत्नागिरी पासुन साधारण 40 कि.मी. अंतरावर गणपतीपुळे हे स्वयंभु गणेशाचे मंदिर असुन साधारण 400 वर्षांपुर्वी पासुन हे मंदिर असल्याचे येथील भावीक सांगतात.

स्वयंभु गणेशाचे हे मंदिर मनाला शांतता देणारे आणि नयनरम्य परिसरात असल्यामुळे येथे पर्यटकांची आणि भाविकांची बरीच गर्दी नेहमीच पहायला मिळते.  समुद्र किनारा आणि मंदिर अगदी जवळ असुन मंदिरातुन बाहेर पडल्यानंतर आपण थेट समुद्र किना.यावर  पोहोचतो.

मंदिर स्वयंभु असुन या मंदिराला प्रदक्षिणा घालायची झाल्यास संपुर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते, ते अंतर साधारण 1 कि.मी. एवढे असुन समुद्र, हिरवागार परिसर, नारळी पोफळीच्या बागा यामुळे मनाला प्रसन्नता लाभते.

MTDC ने राहाण्याची सोय केली असल्याने येथे मुक्काम देखील होउ शकतो, नाशिक, कोल्हापुर, मुंबई आणि पुणे येथुन थेट बसेस उपलब्ध आहेत शिवाय रेल्वेने रत्नागिरीला आणि तेथुन गणपतीपुळयाला पोहोचता येते.

डेरवण, परशुराम मंदिर, मालगुंड, मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा, पावस, आरेवारे येथील समुद्र किनारा, जयगड किल्ला ही पर्यटन स्थळं येथुन जवळच असुन जाण्याची सोय देखील आहे.

  • थिबा पॅलेस – Thiba Palace

म्यानमार चे शेवटचे थीबा राजा यांचे वास्तव्य रत्नागिरी त होते आणि त्यांचे निधन याच ठिकाणी झाले. ज्ञानी आणि जाणता राजा म्हणुन आजही त्यांचा परिचय करून दिला जातो.

म्यानमारमधे राजाने ब्रिटीशांच्या मनमानीला कडवा विरोध केला, गरिबांकरता राजाच्या मनात कणव होती आणि सामाजिक समतोल अबाधीत ठेवण्याकरता राजाने आपलं आयुष्य झिजवलं ब्रिटीशांनी राजाला नजरकैदेत ठेवलं होतं

थिबा पॅलेस स्थापत्य कलेचं एक अव्दितीय असं उदाहरण आहे. या ठिकाणी थिबा राजाची समाधी देखील आहे. या पॅलेस मधे थिबा राजाच्या वस्तु काळजीपुर्वक जतन करून ठेवलेल्या आपल्याला पहायला मिळतात.

युरोपीयन स्थापत्यासोबतच येथे ब्रम्हदेशाचे वास्तुघटक पहायला मिळतात.

थीबा राजांनी ब्रिटीशांना शेवटपर्यंत कडवा विरोध केला, इंग्रजांच्या काळात कैदेत ठेवलेल्या थिबा राजाच्या आठवणी जाग्या करणारे हे थिबा पॅलेस अवश्य पाहावे असेच या पॅलेस ला भेट देणे म्हणजे थिबा राजाच्या आठवणींना उजाळा देणे असल्याने पर्यटक या ठिकाणाला पाहाण्याकरता गर्दी करतात.

  • मत्स्यालय – Ratnagiri Marine Fish Museum Ratnagiri Maharashtra                                  

डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोध केंद्राने मत्स्यालयाचा नवीन उपक्रम झाडगाव येथील नयनरम्य परिसरात सुरू केला असुन आजतागायत लाखो पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे

गोड पाण्यातील आणि खा.या पाण्यातील असंख्य वैविध्यपुर्ण मासे या ठिकाणी पहायला मिळतात शोभिवंत मासे आणि पान वनस्पती देखील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत

गोड पाण्यात सिल्व्हर शार्क, डिस्कस, अरोवाना, कॅट फिश, फ्लाॅवर, टेट्रा आणि खा.या पाण्यात लायन, निमो, मोनोअॅंजल, गोबरा, बटरफ्लाय, केंड या मास्यांच्या जाती पहायला मिळतात.

50 वर्ष जुनी दोन कासवं देखील या मत्स्यालयाच्या आकर्षणाचा केंद्र बिंदु आहे,

55 फुट लांब आणि सुमारे 5 टन वजनाचा देवमाश्याचा सांगाडा या ठिकाणी ठेवला आहे तो पाहुन सागरी जीव किती मोठे असुन शकतात याची पाहाणा.यांना कल्पना येते.

शास्त्रीय पध्दतीने जवळपास 350 वेगवेगळया जातींचे मासे येथे रसायनांमधे संग्रहीत करून ठेवले आहे जेणेकरून विद्याथ्र्यांना आणि पर्यटकांना त्यांच्या बद्दल माहिती व्हावी.

  • रत्नदुर्ग किल्ला – Ratnagiri Fort (Ratnadurg Fort)

रत्नागिरी पासुन अवघ्या 2 ते 3 कि.मी. अंतरावरचा हा किल्ला येथे आलेल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदु आहे.

देवी भगवतीचा किल्ला या नावाने देखील हा किल्ला ओळखला जातो.

भगवतीचे फार सुंदर मंदिर या ठिकाणी असुन या किल्ल्यावर चढुन आल्यानंतर अथांग समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते जे डोळयात काही केल्या मावत नाही.

येथे आल्यानंतर काय पाहु आणि काय नाही असे होउन जाते. या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग देखील आपल्याला दिसतो जो थेट समुद्रापर्यंत जातो.  आज जरी तेथपर्यंत जाण्यास मनाई असली तरी देखील दुरून आपल्याला तो पाहाता येतो

1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडुन जिंकला पुढे साधारण 1790 साली धोंडु भास्कर यांनी या किल्ल्याची दुरूस्ती करून त्याला अधिक मजबुती आणली.

किल्ल्याच्या आत एक खोल विहीर आणि लहान तळे देखील आहे.

या किल्ल्यावर जाण्याकरता थेटपर्यंत डांबरी रस्ता असुन किल्ल्याच्या पायथ्याला महादेवाचे श्री भागेश्वर मंदिर आहे

मंदिराच्या अवतीभवती नारळी पोफळीची आणि फुलांनी बहरलेली बाग दृष्टीस पडते.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ रत्नागिरी जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

How Astronauts Live In Space
Information

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

Living in Space मित्रहो, अवकाश म्हटल म्हणजे आपल्या समोर बरेच प्रश्न येतात. जसे, कसे असेल तिथले वातावरण?  पृथ्वीच्या बाहेर जीवन...

by Editorial team
January 22, 2021
What to Know Before Investing
Information

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

What to Know Before Investing एक सुंदर प्रकारचे जीवन जगण्याची इच्छा ही सर्वाचीच असते, परंतु त्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे...

by Editorial team
January 21, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com