Pune Jilha Mahiti
पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण फार पुर्वीपासुन प्रचलीत आहे तसं पाहायला गेलं तर ही म्हण अगदी चपखल बसावी अशीच!
सुसंस्कृत, देखणे, दैदिप्यमान, संस्कृतीरक्षक पुणे!
मुळा मुठा नदीच्या किना.यावर वसलेले पुणे शहर भारतातील आठव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुस.या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Pune District Information in Marathi
प्राचीन इतिहासात या शहराची पाळंमुळं जवळजवळ 2000 वर्षांपुर्वीची तारीख दाखवतात, जुन्नर तालुक्यातील कार्ला गुफांमध्ये आपल्याला ही तारीख आढळते.
त्यानंतर 13 व्या शतकापासुन ते 17 व्या शतकापर्यंत इस्लाम शासनकर्ते झाले.
17 व्या शतकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेर्तृत्वात मराठयांनी स्वतंत्र राज्याची पायाभरणी केली. पेशव्यांनी मराठा साम्राज्यावर राज्य केले, आपले साम्राज्य पुण्यासारख्या शहरात प्रस्थापीत केले आणि शहराचा कायापालट झाला.
पुढे 19 व्या शतकात इंग्रजांनी सत्ता काबीज केली आणि पुणे ब्रिटीश राजवटीचा भाग झाले….
अनेक राष्ट्रवादी आणि मराठी समाज सुधारकांनी आपापल्या कार्यकाळात अनेक समाज सुधारणेची कामे पुण्यापासुन सुरू केलीत.
फार प्राचीन इतिहास या शहराला लाभला असल्याने या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील मानले जाते.
पुण्यात आजही दिमाखात उभ्या असलेल्या प्राचीन ईमारतींच्या आठवणी आपल्या समृध्द आणि गौरवशाली भुतकाळाशी जोडल्या गेल्या आहेत.
Pune Jilha Mahiti
शास्त्रीय संगीताच्या मैफिली, नाटक, साहित्य, क्रिडा, आध्यात्मिक सोहळे अश्या निरंतर चालत राहाणा.या हालचालींमुळे हे शहर ओळखलं जातं.
अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आज देखील दिमाखात या पुणे शहरात उभ्या आहेत आणि त्यामुळेच तर या शहराला विद्येचे माहेरघर देखील म्हंटले जाते.
लाखो युवकांचा लोंढा रोज शिक्षणाच्या निमीत्ताने, नौकरीच्या निमीत्ताने या पुण्याकडे येतो आणि त्यामुळे पाहाता पाहाता आज पुणं फार प्रचंड वेगानं विस्तारलयं!
संपुर्ण जगात प्रसिध्द असलेले पुणे विदयापीठ या शहरात आहे आणि अनेक नामांकित शिक्षणसंस्था येथे असल्याने या शहराला पुर्वेकडचे ऑक्सफोर्ड असे देखील म्हंटल्या जाते.
येथील पुणे फिल्म इन्स्टिटयुट फार प्रसिध्द आणि लोकप्रीय असल्याने देशभरातुन विदयार्थी या ठिकाणी चित्रपट माध्यमातील शिक्षण घेण्याकरता येथे येतात.
सार्वजनिक सुखसुविधांमुळे आणि विकासाचा चढता आलेख पाहाता मुंबई पाठोपाठ पुणे शहर अग्रेसर आहे.
या जिल्हयाच्या पश्चिमेला रायगड जिल्हा असुन दक्षिणेला सातारा जिल्हा आहे वायव्येला ठाणे आग्नेयेला सोलापुर आणि नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे.
पुणे जिल्हयातील तालुके – Pune District Taluka List
या जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत
- पुणे (शहर)
- आंबेगाव
- खेड
- जुन्नर
- इंदापुर
- भोर
- बारामती
- मावळ
- पुरंदर
- मुळशी
- हवेली
- दौंड
- वेल्हे
- शिरूर
पुणे जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Pune Zilla Chi Mahiti
- लोकसंख्या 94,26,959
- क्षेत्रफळ 15,643 वर्ग कि.मी.
- एकुण तालुके 14
- साक्षरतेचे प्रमाण 2%
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 919
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, क्र. 9 आणि क्र. 50 या जिल्हयातुन गेले आहेत.
- पुण्यनगरी या नावावरून या शहराचे पुणे हे नामकरण झाले असावे असे मानले जाते तसच पुण्यक देखील या शहराला म्हणत असावे असे कित्येकांचे म्हणणे आहे.
- समस्त विश्वाकरता ज्या विभुतीने पसायदान मागीतले अश्या संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी या पुणे जिल्हयात आळंदीला आहे.
- संत तुकाराम महाराजांचा जन्म आणि त्यांची साधना त्यांचे जीवनकार्य या पुणे जिल्हयात संपन्न झाले.
- संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांमुळे जणु एक पवित्र आणि सात्विक उर्जा या जिल्हयाच्या कणाकणात आणि नसानसांत सामावल्याचे जाणवते.
- दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री.विठ्ठलाच्या दर्शनाकरता संत तुकारामांची आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी याच पुणे जिल्हयातील देहु.आळंदी येथुन लाखो वारक.यांसमवेत प्रस्थान करते.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच जिल्हयातील शिवनेरी गडावरचा. याच पुण्यनगरीत बालपणी महाराजांना संस्कारांचे आणि पराक्रमाचे बाळकडु मिळाले.
Pune District Mahiti
- पुणे जिल्हयात आणि आसपास छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आणि त्यांचा पराक्रम जवळुन पाहाणारे गड किल्ले आजही पहायला मिळतात.
- पेशवाईमधे या पुण्याला राजधानीचा बहुमान मिळाला…. पेशवाईचे कर्तुत्व देखील या पुण्याने पाहीले.
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची कर्मभुमी आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या समाजपरीवर्तनाच्या कार्याला सुरूवात देखील येथुनच केली.
- महर्षी धोंडो केशव कर्वे, रा.गो.भांडारकर, गोपाळ कृष्ण गोखले, सुधाकर आगरकर यांसारख्या थोर पुरूषांचे कर्तुत्व देखील या पुण्याने पाहिले.
- पुणे जिल्हयातील भीमा ही मुख्य नदी आहे ही नदी आंबेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या पवर्तरांगांमधे भीमाशंकर येथुन उगम पावते.
- तांदुळ आणि बाजरी या जिल्हयातील खरीपाची मुख्य पिकं म्हणुन ओळखली जातात, रबी पिकांमधे गहु आणि हरभरा महत्वाची पिकं आहेत दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी पिक होय.
- भोर तालुक्यात आंबेमोहोर हा सुवासिक तांदुळ विशेष करून घेतला जातो त्याशिवाय मुळशी तालुका कमोद जातीच्या तांदळाकरता आणि जुन्नर जिरेसाळ तांदळाच्या जातीकरता फार प्रसिध्द आहे.
- पुणे महाराष्ट्र आणि भारताचे एक महत्वपुर्ण औद्योगिक केंद्र देखील आहे, अनेक मोठमोठया आणि प्रसिध्द कंपन्यांनी आपले साम्राज्य या शहरात आणि आसपासच्या परिसरात पसरवले आहे.
- पुणे निवासी नागरिकांना पुणेकर म्हणुन देखील संबोधण्याची प्रथा आहे येथे मुख्यतः मराठी हीच भाषा बोलली जाते त्याखालोखाल हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलणारे देखील आढळतात.
- पुण्यातील आप्पा बळवंत चैक शैक्षणिक साहित्याकरता प्रसिध्द आहे,सर्व प्रकारची पुस्तकं मिळण्याकरता हा परिसर पुण्यात नावाजल्या गेला आहे.
पुण्यातील महत्वाचे हॉस्पीटल्स – Hospital in Pune
- केईएम हॉस्पीटल, रास्ता पेठ
- दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल एण्ड रिसर्च सेंटर एरंडवणे
- जहांगिर हॉस्पीटल ससुन रोड
- ससुन हॉस्पीटल पुणे रेल्वे स्टेशन
- रूबी हॉल क्लिनीक ससुन रोड
- सहयाद्रि स्पेशालिटी हॉस्पीटल एरंडवणे
- आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल (ABMH) चिंचवड
पुण्यातील पर्यटनस्थळे – Places To Visit in Pune
गड किल्ले – Forts in Pune
- शिवनेरी किल्ला – Shivneri Fort
पुणे जिल्हयात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला (Shivneri Killa) असुन या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
असे हे ऐतिहासीक ठिकाण फार उंचावर असुन या ठिकाणी शिवाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे या किल्ल्याला शिवनेरी असे नाव पडले.
येथे आज देखील भेट दिली असता ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी पाळणा आणि तत्सम गोष्टी ठेवलेल्या आढळतात.
येथे जिजाबाई आणि बाल शिवाजी राजे यांच्या प्रतिमांचे देखील दर्शन घडते.
26 मे 1909 रोजी या किल्ल्याला महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.
शिवनेरी किल्ल्याचा आकार शिवाच्या पिंडीसारखा आहे.
सिंहगड किल्ला – Sinhagad Fort
पुण्यापासुन जवळ म्हणजे साधारण 25 कि.मी. अंतरावर हवेली तालुक्यात सिंहगड हा किल्ला असुन पुर्वी याला कोंढाणा असे म्हणायचे.
हा किल्ला ज्यावेळी जिंकला तेव्हां महाराजांच्या अगदी निकटचे तानाजी मालुसरे लढतांना धारातिर्थी पडले.
“गड आला पण सिंह गेला” हे इतिहासाच्या पानांवर कोरले गेलेले वाक्य आज देखील महाराजांना त्यावेळी झालेल्या दुःखाची जाणीव करून देणारे आहे.
सिंहपराक्रम करतांना प्राणांची बाजी लावल्याने तानाजी मालुसरेंच्या स्मृती इतिहासात अजरामर व्हाव्यात म्हणुन या गडाला सिंहगड (Sinhagad Killa) असे नाव ठेवण्यात आले.
दोन पाय.यांसारखा वाटणारा खंदकाचा भाग व दुरदर्शन चा उंच मनोरा त्यामुळे पुणे शहरात तुम्ही कोठेही असा हा किल्ला आपले लक्ष वेधतो.
तोरणा, राजगड, लोहगड, तुंग, पुरंदर, विसापुर असा दुरवरचा प्रचंड मुलुख या सिंहगडावरून आपल्याला दिसतो.
तोरणागड – Torna Fort
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात जे काही गड किल्ले काबीज केले त्यांच्यापैकीच एक तोरणा किल्ला (Torna Killa).
या किल्ल्यावर तोरण जातीची बरीचशी झाडी आहेत त्यामुळे या गडाला तोरणा हे नाव पडले.
हा गड जिंकुन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले तो हा तोरणगड किल्ला पुणे शहरापासुन अगदी जवळ वेल्हे तालुक्यात आहे
या वेल्हे तालुक्यापासुन थोडया अंतरावर राजगड हा किल्ला आहे. महाराजांची बरीच कारकीर्द या राजगडावरून पार पडली.
या किल्ल्याच्या प्रचंड विस्तारामुळे महाराजांनी या गडाची पाहाणी करतांना याला प्रचंडगड असे नाव ठेवले होते.
रस्त्याने पुण्यापासुन तोरणागडापर्यंतचे अंतर 60 कि.मी. एवढे आहे.
या व्यतिरीक्त पुरंदरगड (पुरंदर तालुका), वज्रगड, लोहगड, विसापुर, चाकणचा भुईकोट किल्ला असे बरेच गड किल्ले पुणे जिल्हयात आजही अस्तित्वात आहेत.
ऐतिहासीक शनिवारवाडा – Shaniwar Wada
पेशव्यांचा वाडा विशेषतः बाजीराव पेशव्यांचा शनिवार वाडा संपुर्ण पुण्यात ऐतिहासीक वास्तु म्हणुन फार प्रसिध्द आहे.
या महालाची मुहूर्तमेढ शनिवारी 10 जानेवारी 1730 ला ठेवण्यात आली त्यावेळेस या महालात 1000 हुन जास्त लोक एकावेळस राहु शकतील अशी या वाडयाची खासीयत!
22 जानेवारी 1732 ला या शनिवार वाडयाची वास्तुशांत करण्यात आली.
वाडयाच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत काळातील अनेक चित्र कोरलेले आपल्याला पहायला मिळतात.
महालाच्या पहिल्या मजल्यावर 17 व्या 18 व्या शतकातील काही ऐतिहासीक वस्तु आणि मुत्र्या आजही ठेवलेल्या आहेत.
या महालाला अनेकवेळा आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
महालाला एकुण पाच दारं आहेत ही दारं दिल्ली दरवाजा, नारायण दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा आणि गणेश दरवाजा या नावानं ओळखली जातात.
शनिवार वाडया बद्दल अनेक घटना दुर्घटना आजही मोठया चवीने सांगितल्या जातात.
या वाडयामधे अनेक वीर व लढवय्ये, मुत्सद्दी येत असत.
पेशव्यांच्या या वाडयात एकाच वेळी 100 नर्तकी नाचु शकतील अशीदेखील सोय होती,
सुगंधी अत्तरांचा घमघमाट, फुलांचा सुगंध आणि उडणारे कारंजे यामुळे शनिवार वाडयात बसुन नृत्याचा आनंद घेणे हा एक सुखद अनुभव असावा.
पर्वती:
पुणे शहरात अनेक प्राचीन, धार्मीक, ऐतिहासीक अशी ठिकाणं आहेत त्यातले पर्वती हे ठिकाण पेशव्यांनी बांधले असुन येथे अनेक मंदिर देखील आहेत.
पुण्यात आग्नेय कोप.याला उंच उभी असलेली टेकडी आपल्याला दिसते ती पर्वती नावाने ओळखली जाते.
या पर्वतीच्या 103 पाय.या चढुन जेव्हां आपण वर जातो तेव्हा वरच्या अंगाला नानासाहेब पेशव्यांनी बांधलेली मंदिरं आपल्या दृष्टीस पडतात.
पर्वतीच्या पाय.या चढणे हा देखील एक सुखद अनुभव आहे.
आज तर पुण्यातील अनेक नागरिक मॉर्निंग वाक करायला देखील या पाय.या चढुन येणे पसंत करतात.
पर्वती चढुन ज्यावेळेस आपण वर येतो तेव्हां या माथ्यावर आपल्याला पाच मंदिर दिसतात. त्यापैकी एक देवदेवेश्वराचे मंदिर मुख्य असुन हे मंदिर साधारण अठराव्या शतकात नानासाहेब पेशव्यांनी बांधले.
या मंदिरा व्यतिरीक्त इतर चार मंदिरात कार्तिकेय, विठ्ठल रूक्मिणी आणि विष्णुं देवतांच्या मुर्ती विराजमान आहेत.
आगा खान पॅलेस – Aga Khan Palace
पुण्यात येरवडा परिसरात साडे सहा हेक्टर अश्या विशाल परिसरात असलेले आगा खान पॅलेस या पुणे शहराची एक आगळी वेगळी ओळख आहे.
सुल्तान मोहम्मद शाह आगा खान व्दितीय यांनी 1892 मधे हा विशाल पॅलेस बनवला.
महात्मा गांधी ना त्यांच्या साथीदारां सोबत या पॅलेस मधे 1940 साला बंदिस्त करून ठेवण्यात आले होते त्या दरम्यान त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे निधन याच ठिकाणी झाले या ठिकाणीच कस्तुरबा गांधी यांची समाधी देखील आहे.
1956 हा पॅलेस एक महल म्हणुन परिचीत होता त्यानंतर मात्र 1969 ला आगा खान चतुर्थ यांनी या पॅलेस ला भारत सरकार ला दान केले
हा आगा खान पॅलेस आता एक संग्रहालय देखील आहे.
या ठिकाणी महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत फोटो प्रदर्शनी देखील आपल्याला पहाता येते आणि गांधीजींच्या चपला, चश्मा यांसारख्या व्यक्तिगत वस्तु देखील या ठिकाणी संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती – Dagdusheth Halwai Ganpati Temple
दगडुशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील नागरिकांचे अढळ श्रध्दास्थान!
या गणपतीच्या दर्शनाकरता फार लांबुन लांबुन भाविक येत असतात.
अनेक सेलिब्रीटी देखील या गणेशाचे भक्त आहेत.
नवसाला पावणारा गणेश अशी या गणरायाची ख्याती दुरवर पसरली आहे.
1893 साली श्रीमंत दगडु शेठ हलवाई या मिठाईच्या व्यापा.यांनी या मुर्ती ची स्थापना केली होती.
पुण्यातील बुधवार पेठेत या गणपतीचे भव्यदिव्य मंदिर असुन अगदी विदेशातुन देखील या गणरायाचे दर्शन घेण्याकरता भाविक येतात.
12 ही महिने या ठिकाणी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसुन येतात.
प्रत्येक गणेशोत्सवात या ठिकाणी भव्यदिव्य देखावे साकार केले जातात.
गणेशोत्सवात पुण्यातील हजारो महिला एकत्र येउन याठिकाणी गणपती अथर्वशिर्षाचे पठण करतात तो सोहळा पाहाण्यासारखा असतो.
लोणावळा, खंडाळा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, वेताळ टेकडी, जेजुरी गड, लवासा, पाताळेश्वर मंदिर, खडकवासला धरण अशी अनेक ठिकाणं पुणे जिल्हयात फिरण्यासारखी आणि पाहाण्यासारखी आहेत.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ पुणे जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया पुणे जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Pune District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.