लोहगड किल्ल्याची माहिती

Lohagad Fort Information in Marathi

पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेत वसलेला लोहगड हा किल्ला अति प्राचीन असून, इतिहासकारांच्या मतानुसार या किल्ल्याची निर्मिती किल्ल्याजवळ असणाऱ्या भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेण्यांची निर्मिती ज्यावेळी झाली त्यांच्या पूर्वी म्हणजेच इ.स. पू. सातव्या शतकाच्या पूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असल्याचे अनुमान निघते. आजच्या या लेखात आपण या किल्ल्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

लोहगड किल्ल्याची माहिती – Lohagad Fort Information in Marathi

Lohagad Fort Information in Mmarathi
Lohagad Fort Information in Marathi

या किल्याला अनेक वर्षाचा इतिहास लाभला आहे. या कालावधीत सत्त्येवर असलेल्या सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, आणि यादव यासारख्या अनेक शासकांच्या राजवटी या किल्ल्याने पहिल्या आहेत.

इ.स. १४८९ साली मलिक अहमद यांनी निजामशाहीची स्थापना केल्यानंतर त्यांनी आसपासच्या मुलकातील सर्व किल्ले जिंकून घेतले. त्यांपैकी एक लोहगड हा एक किल्ला होता. इ.स. १५६४ साली या किल्ल्यात अहमदनगरचे सातवा राजा दुसरे बुऱ्हाण निजाम कैदीत होते. यानंतर इ.स. १६३० साली हा किल्ला आदिलशाहीत समाविष्ट करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी इ.स. १६५७ साली कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला. तसचं, लोहगड पासून विसापूर पर्यंतचा सर्व परिसर आपल्या स्वराज्यात समाविष्ट करून घेतला.

परंतु, इ.स. १६६५ साली राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या तहामुळे हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढे इ.स. १३ मे १६७० साली हा मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. अश्या प्रकारे वर्षानुवर्षे या किल्ल्याला इतिहास लाभतच गेला तो इंग्रज सरकारच्या सत्तेपर्यंत.

त्यामुळे या किल्ल्याचे विशेष महत्व समजून, भारत सरकारने सुद्धा या किल्ल्याला सन २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे.

किल्ल्याचे भौगोलिक स्थान – Where is Lohagad Fort

पुणे जिल्ह्यात पर्यटन आणि निसर्गाच्या दृष्टीने लोणावळा हे खूप निसर्गरम्य स्थळ आहे. पुणे लोणावळा या रेल्वेमार्गावरून जाताना आपणास मळवली हे स्टेशन लागते. त्या स्टेशनापासून, सुमारे ८ किमी अंतरावर गेल्यास आपल्या दृष्टीस लोहगड दुर्गाची जोडगोळी पडते.

लोहगड किल्ल्याला बळकटी देण्यासाठी त्याच्या शेजारी विसापूर उर्फ संबळगड दुर्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मळवली स्टेशनाच्या फलाटावर लोहगड- विसापूर या जोड्कील्ल्यांच्या नावाची पाटी लावून त्याची जाहिरातच केली आहे.

लोहगडावरून सर्वदूर पाहिल्यास आपणास निसर्गाचे खरे रूप पाहायला मिळते. पुणे जिल्ह्याची तहान भागवनाऱ्या पवनेच्या धरणाचे दृश्य पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांचे पारणे फिटून जाते. लोहगड किल्ल्याच्या पलीकडे तिकोना उर्फ वितंगड नावाचा किल्ला आहे. तसचं, तुंग उर्फ कठीणगड किल्ला सुद्धा याच ठिकाणी आहे.

गडाचे वैशिष्ट्य – Place of Lohagad Fort

  • गणेश दरवाजा: या दरवाज्याच्या डाव्या-उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नर बळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजाना लोहगड वाडीची पाटीलकी देण्यात आली होती.
  • नारायण दरवाजा: या दरवाजाची निर्मिती नाना फडणवीस यांनी केली आहे. या दरवाजाच्या मागे एक भुयार असून त्यात भात आणि नाचणी साठवून ठेवले जात असत.
  • हनुमान दरवाजा: लोहगड किल्ल्याचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
  • महादरवाजा: गडाचे मुख्य प्रवेश द्वार असून या द्वाराची निर्मिती नाना फडणीसांनी सन १ नोव्हेंबर १७९० ते सन ११ जून १७९४ या कालावधी दरम्यान केले गेले. तसचं, या दरवाजाच्यावर हनुमान मूर्ती कोरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top