• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Shivneri Fort Information in Marathi

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला – शिवनेरी किल्ला

June 5, 2020
Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

February 24, 2021
24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 24, 2021
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 23, 2021
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 23, 2021
Chetan Bhagat Books in Marathi

चेतन भगत यांची पुस्तके

February 22, 2021
22 February History Information in Marathi

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 22, 2021
Aruna Asaf Ali Information in Marathi

अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 21, 2021
21 February History Information in Marathi

जाणून घ्या 21 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 21, 2021
कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

February 20, 2021
20 February History Information in Marathi

जाणून घ्या २० फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 20, 2021
शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

February 19, 2021
19 February History Information in Marathi

जाणून घ्या 19 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 19, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Wednesday, February 24, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला – शिवनेरी किल्ला

Shivneri Fort chi Mahiti         

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला किल्ला शिवनेरी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून या गावात शिरताच शिवनेरी आपल्या दृष्टीस पडतो. या शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला (19 फेब्रुवारी 1630) ला झाला. शिवजन्मस्थान असून देखील शिवनेरी हा गड महाराजांच्या ताब्यात कधी आलाच नाही. मात्र शाहूमहाराजांच्या काळात सुमारे 1716  साली हा किल्ला मराठा सत्तेत आला.

हा किल्ला चारही बाजूंनी चढण्यास अत्यंत कठीण असून जिंकण्याच्या दृष्टीकोनातून कठीण असा बालेकिल्ला होता. शिवनेरी गडावर शिवाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जिजाबाईंनी याच शिवाई देवीला नवस केला होता. गडावर जिजाबाई आणि बाळ शिवाजीच्या प्रतिमा देखील स्थापित करण्यात आल्या आहेत. दुरून पाहिल्यास शिवनेरी किल्ल्याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो.

शिवनेरी किल्ल्याची उंची 3500 फुट असून गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. नाणेघाट डोंगररांगांमध्ये हा किल्ला असून इतर गडकिल्ल्यांच्या तुलनेत आज शिवनेरी किल्ला सर्वात चांगल्या अवस्थेत उभा आहे. पुणे शहरापासून जुन्नर चे अंतर साधारण 105 की.मी. चे आहे. भारत सरकारने 26 मे 1909 साली हा शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.

महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान – Shivneri Fort Information in Marathi

Shivneri Fort Information in Marathi
Shivneri Fort Information in Marathi

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास – Shivneri Fort History in Marathi

‘जीर्णनगर’, जुन्नेर, आणि आता जुन्नर म्हणून परिचित असलेले हे गाव इसविसन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. नहपाना या शक राजाची ही राजधानी होती. पुढच्या काळात सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नायनाट केला आणि जुन्नर परिसरात आपली सत्ता स्थापित केली. पुरातन मार्ग असलेल्या नाणेघाटातून फार मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतूक होत असे  या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी गिरिदुर्गांची बांधणी केल्या गेली. सातवाहनांनी सत्ता स्थिर केल्यानंतर येथे अनेक लेण्या देखील खोदल्या असल्याचं आढळतं.

शिवनेरी गड पुढच्या काळात चालुक्य आणि राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली देखील होता. यादवांनी या ठिकाणी सुमारे 1170 ते 1308  या काळात आपले राज्य स्थापित केले होते. मलिक-उल-तुजार याने 1443 मध्ये यादवांना पराभूत करून येथे आपली सत्ता स्थापन केली. अश्या तऱ्हेने गड बहमनी राजवटीत आला. मलिक महंमद या मलिक-उल-तुजारच्या प्रतिनिधीने 1470 च्या सुमारास गडाला नाकाबंदी करून गड जिंकला. निजामशाहीची स्थापना झाली.

इथली राजधानी 1493 च्या सुमारास अहमदनगरला स्थानांतरीत झाली. सुल्तान मुर्तजा निजामाने ई.स. 1565 साली कासीम या आपल्या भावाला शिवनेरी  किल्ल्यावर कैद करून ठेवलं होतं. पुढे सुमारे 1595 साली जुन्नर प्रांत आणि शिवनेरी गड मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आला. या दरम्यान जिजाबाईंच्या वडिलांची हत्या झाली, शहाजी राजांनी 1629 मध्ये ज्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या तेंव्हा रातोरात 500 घोडेस्वार त्यांच्या समवेत जिजाबाईंना शिवनेरी गडावर नेले.

गडावर शिवाई देवीचे मंदिर होते, या शिवाईला जिजाबाई नवस बोलल्या. ‘आम्हाला पुत्र झाल्यास त्याला तुझे नाव ठेवेल‘. आई शिवाईने जिजाबाईंची प्रार्थना ऐकली आणि (19 फेब्रुवारी 1630) फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी शुक्रवारी सूर्य मावळल्यावर शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला.

जिजाबाईंनी 1632 साली लहानश्या शिवबासह शिवनेरी गड सोडला. 1637 साली हा गड पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला, पुढे 1650 साली महादेव कोळ्यांनी आणि 1678 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांच्या तावडीतून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तब्बल 38 वर्षांच्या कालखंडानंतर हा किल्ला शाहू महाराजांनी 1716 मध्ये मराठेशाहीत आणला आणि त्यानंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित झाला.

शिवनेरी गडावर जाण्याचे मार्ग – Ways to reach Shivneri fort

शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठीचे दोन्ही मार्ग जुन्नर गावातून जातात.आपण पुण्याहून किंवा मुंबई येथून जात असल्यास एक दिवसात शिवनेरी गड पाहून परतता येईल.

साखळीची वाट – Shivneri Fort Trek

या वाटेने आपण जाणार असल्यास नव्या बस स्थानकावर आल्यास शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ आल्यावर चार रस्ते आपल्या दृष्टीस पडतील. डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने चालण्यास सुरुवात केल्यावर साधारण थोड्या अंतरावर आपल्याला एक मंदिर लागेल. मंदिरापासून आपण पायी गेल्यास शिवनेरी गडाच्या कातळ भिंतीजवळ आपण पोहोचतो. तेथे असलेल्या साखळीच्या सहाय्याने आपण गडावर सहज पोहोचू शकतो. चालण्यास ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास साधारण पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट – Shivneri Fort 7 Darwaja

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या जवळून गेल्यास डांबरी सडक आपल्याला किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ घेऊन जाते. या मार्गाने किल्ल्यावर जातांना आपल्याला सात दरवाजे पार करावे लागतात.

  • महादरवाजा
  • पीर दरवाजा
  • परवानगीचा दरवाजा
  • हत्ती दरवाजा
  • शिपाई दरवाजा
  • फाटक दरवाजा
  • कुलाबकर दरवाजा

या मार्गाने गेल्यास शिवनेरी किल्ल्यावर पोहोचायला साधारण एक ते दीड तास लागेल.

शिवनेरी गडावर कसे जाल – How to reach Shivneri Fort

मुंबई वरून जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर साधारण अर्ध्या तासात आपण गणेश खिंडीतून शिवनेरी गडापर्यंत पोहोचतो. पुण्याहून जुन्नर ला नारायणगाव मार्गे यायचे झाल्यास साधारण 75 की.मी. अंतर पार करावे लागेल. आणि पुढे नारायणगाव-जुन्नर या मार्गाने साधारण अंतर 15 की.मी. इतके आहे.

शिवनेरी गडावर काय पहाल – Places near Shivneri Fort  

  • शिवनेरी गडावर शिवाई देवीचे मंदिर
  • अंबरखाना
  • पाण्याची टाकी

शिवकुंज हे महाराजांचे स्मारक आवर्जून पहावे असेच आहे. या ठिकाणी दीड हजार फुट उंचीचा एक कडा असून याचा उपयोग पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान एकदा पहावे असेच असून, एकवार भेट दिल्यास ते कायमचे आपल्या स्मरणात राहील.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ शिवनेरी किल्ल्या बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

24 February History Information in Marathi
History

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

24 February Dinvishesh २४ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
February 24, 2021
23 February History Information in Marathi
History

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

23 February Dinvishesh २३ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
February 23, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved