दलितांचे कैवारी – छत्रपती शाहू महाराज

Shahu Maharaj Information in Marathi

छत्रपती शाहू महाराज हे एक असे शासक होते ज्यांनी दलितांना समाजाच्या प्रवाहात आणण्यात…त्यांना आरक्षण मिळावे याकरता तसच समाजात त्यांना अधिकार प्राप्त व्हावे यासाठी आपलं अवघं जीवन वेचलं. आपल्या जीवनात शाहू महाराजांना जातीयवादी समस्यांना सामोरे जावे लागले होते. परंतु तरीदेखील सगळ्या जातीयवादी समस्यांशी संघर्ष करीत बहुजनांचे हित जपणारा राजा म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं.

शाहू महाराजांनी दलितांना त्या काळात समाजात योग्य स्थान मिळवून दिले त्यांना मान-सन्मान मिळवून दिला. आणि हे सगळं अश्या काळात त्यांनी घडवून आणलं जेंव्हा जातीयभेदाची मूळं फार मोठ्या प्रमाणात तत्कालीन समाजात खोलवर रुजली होती.

त्याकाळी उच्चवर्णीय लोकांनी दलिताला स्पर्श करणे धर्म-बाटवणारे कृत्य समजल्या जात असे. शाहू महाराजांविषयी या लेखातून अधिक महत्वपूर्ण माहिती करून घेऊया.

दलितांचे कैवारी – छत्रपती शाहू महाराज – Shahu Maharaj Information in Marathi

Shahu Maharaj

पूर्ण नाव (Name)  छत्रपती शाहू महाराज (यशवंतराव)
जन्म (Birthday) 26 जून 1874, कोल्हापूर(Shahu maharaj Jayanti)
मृत्यू (Death) 10 मे 1922 मुंबई
वडिलांचे नाव (Father Name) श्रीमंत जयसिंह राव आबासाहब घाटगे
आईचे नांव (Mother Name) राधाबाई साहिबा
पत्नी (Wife Name) लक्ष्मीबाई

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म आणि परिवार – Shahu Maharaj information in Marathi 

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरात 26 जून 1874 साली श्रीमंत जयसिंहराव आबा साहेब घाटगे आणि राधाबाई यांच्या कुटुंबात झाला. बालपणी त्यांना सगळे यशवंतराव म्हणून हाक मारीत असत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (प्रथम) दुसऱ्या मुलाचे वंशज शिवाजी चौथे कोल्हापूरची राजगादी सांभाळत असत. ब्रिटीशांच्या षड्यंत्राने चौथ्या शिवाजीच्या हत्येनंतर 1884 साली शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी आनंदीबाईंनी आपले जहागीरदार जयसिंह राव यांचे पुत्र यशवंत राव ला दत्तक घेतले. त्यानंतर त्यांचे नाव बदलून छत्रपती शाहू असे ठेवण्यात आले.

आणि अगदी बालवयातच कोल्हापूर राजघराण्याची सत्ता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. पुढे २ एप्रिल 1894 ला कोल्हापूर शासनाचा संपूर्ण अधिकार त्यांना मिळाला. समाजातील दलितांच्या उत्थानासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

शाहू महाराजांचे शिक्षण – Shahu Maharaj Education in Marathi

छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट येथील राजकुमार कॉलेज येथून झाले. त्यापुढील शिक्षण 1890 ते 1894 दरम्यान धाराबाड येथे राहून त्यांनी संपूर्ण केले. या दरम्यान इतिहास, इंग्रजी, व राज्यकारभार चालवण्यासाठीच्या शिक्षणात ते पारंगत झाले.

छत्रपती शाहू महाराजांचा विवाह – Shahu Maharaj Family Tree

1897 साली छत्रपती शाहू महाराजांचा विवाह बडौदाचे मराठा सरदार खानवीकर यांची कन्या श्रीमंत लक्ष्मीबाई यांच्याशी संपन्न झाला.

छत्रपती शाहू महाराजांनी केलेले सामाजिक कार्य- Shahu Maharaj Social Work

‘बहुजन प्रतिपालक’ छत्रपती शाहू महाराज – 1894 साली ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी सत्ता सांभाळली त्या सुमारास सामान्य प्रशासनात एकूण 71 पदांपैकी 60 पदांवर ब्राम्हण अधिकारी होते आणि उर्वरित 11 पदांवर दलित लोक होते.

वास्तविक त्या काळात दलित आणि मागासलेल्या समाजासमवेत अमानवीय व्यवहार केला जात असे, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जाई, अनेक सार्वजनिक स्थळांमध्ये जाण्याची परवानगी नसे, दलिताच्या स्पर्शाने धर्मभ्रष्ट होतो असा समज ब्राम्हण आणि उच्चजातीच्या समाजाने रूढ केला होता. हा अनाचार पाहून छत्रपती शाहू महाराजांनी समाजात पसरलेली हि असमानता दूर करण्याचा विडा उचलला.

राज्याच्या सर्वांगीण विकासाकरता सगळ्याच वर्गांचा सहभाग असणं आवश्यक असल्याचं मत शाहू महाराजांचं होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या शासनातील सर्व ब्राम्हणांना हटवून समाजाला मुक्त करण्याच्या हेतूने ऐतिहासिक पाऊल उचललं, आणि पूर्ण निष्ठेने ब्राम्हणवादाला समाप्त केले.

आरक्षणाचे अग्रदूत छत्रपती शाहूजी महाराज –

जातीयवादाला मुळापासून संपवण्याकरता आणि समाजातील सगळ्या वर्गाना समानतेचा अधिकार मिळावा यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षणाचा कायदा केला. महाराजांचा हेतू होता की यामुळे दलितांच्या आणि मागासलेल्या समाजातील लोकांचा उद्धार होईल आणि त्यांना मानसन्मान मिळेल.

या क्रांतिकारी कायद्या अंतर्गत 1902 साली बहुजनांचे प्रतिपालक शाहू महाराजांनी बहुजन समाजाकरता 50 % आरक्षणाचा कायदा केला. यामुळे शासकीय सेवांमध्ये मागासलेल्या समाजाकरता 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

छत्रपती शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे पुढे संविधानात आरक्षणाची व्यवस्था करण्याचा नवा मार्ग गवसला दलित आणि मागासवर्गाकरता शाळा सुरु केल्या… बहुजनांच्या हितासाठी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाची दारं खुली करून त्यांना मुक्ततेचा नवा मार्ग दाखवला. दलितांच्या मुलांना शिक्षणाप्रती प्रेरित करून त्यांच्यासाठी वसतिगृह स्थापित केले आणि निशुल्क शिक्षणाचा कायदा केला.

बालविवाहाला विरोध आणि विधवा पुनर्विवाहाचा केला पुरस्कार – छत्रपती शाहू महाराजांना आधुनिक भारताचा प्रणेता म्हणणे देखील अतिशयोक्ती होणार नाही कारण बालविवाहा पासून होणाऱ्या दुष्परिणामांना त्यांनी ओळखले आणि आपल्या राज्यात बालविवाहावर बंदी आणली.

ब्राम्हण पुरोहितांची जातीय व्यवस्था तोडण्यासाठी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह आणि विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले व 1917 ला पुनर्विवाहाचा कायदा देखील समंत केला. महान विचारक आणि समाजसेवी ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शाहू महाराजांवर फार प्रभाव होता.

बराच काळ शाहू महाराजांनी सत्य शोधक समाजाची जोपासना देखील केली आणि ठिक-ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखा देखील स्थापन केल्या. या व्यतिरिक्त छत्रपती शाहू महाराजांनी भारतीय संविधानाचे जनक डॉ. भीमराव आंबेडकर यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्याकरता विदेशात पाठवण्यात मोलाची भूमिका बजावली व बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ वृत्तपत्राच्या प्रकाशनात बरीच मदत देखील केली होती.

शाहू महाराजांचा मृत्यू – Shahu Maharaj Death

6 मे 1922 रोजी समाजाच्या हिताकरता कार्य करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले. समाजातले क्रांतिकारी बदल आणि आरक्षणाची सुरुवात करणारे छत्रपती शाहू महाराज कायम स्मरणात राहतील.

भारताच्या महान समाजसेवी छत्रपती शाहू महाराजांना माझी मराठी च्या संपूर्ण टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्रिवार अभिवादन!!!!!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top