महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती

Mahatma Jyotiba Phule in Marathi

पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची सत्ता भारतामधे आपली पाळंमुळं रोवु लागली. ब्रिटिशांच्या या सत्तेला 1840 मध्ये मुर्त स्वरूप मिळाले. हिंदु समाजाच्या रूढी परंपरांविरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठविला. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर सुधारक समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न करू लागले.

19व्या शतकातील हे समाज सुधारक ’हिंदु परंपरांच्या’ दृष्टीकोनातुन आपली भुमिका मांडत आणि समाजसुधारणेचा प्रयत्न करीत असत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी भारताच्या या सामाजिक आंदोलनाने महाराष्ट्राला नवी दिशा दिली.

वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था या शोषण व्यवस्था असुन जोपर्यंत या पुर्णपणे नामशेष होत नाहीत तोवर एक समाजाची निर्मीती असंभव आहे अशी आपली रोखठोक भुमिका ठेवली. अशी भुमिका मांडणारे ते पहिले भारतिय होते आणि म्हणुनच जातिव्यवस्था निर्मृलनाची कल्पना आणि आंदोलनाचे ते प्रणेते ठरले.

महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती – Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांची थोडक्यात माहिती – Mahatma Jyotiba Phule Biography in Marathi

पुर्ण नाव (Name): महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले
जन्म (Birthday): 11 एप्रील 1827, पुणे
वडिल (Father Name): गोविंदराव फुले
आई (Mother Name): विमलाबाई
विवाह (Wife Name): सावित्रीबाई फुले
मृत्यु (Death) : 28 नोव्हेंबर 1890

कामगार स्त्रियांचा आणि अस्पृश्य समाजाच्या अनेक शतकांपासुन होत असलेल्या शोषणाचा व सामाजिक गुलामगिरीचा त्यांनी कडाडुन विरोध केला.

सावकारांविरोधात आणि नौकरशाही विरूध्द त्यांनी युध्द पुकारले.

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी महात्मा फुलेंनी मुलींकरता शाळा सुरू केली.

मुलींनी आणि अस्पृश्यांनी शिक्षण घेणे म्हणजे धर्म भ्रष्ट करणे असा समज असतांना महात्मा फुलेंनी 1851 साली मुलींकरता उघडलेली शाळा म्हणजे सुमारे 5 हजार वर्षांच्या इतिहासातील पहिली मुलींची शाळा होती.

त्यानंतर लगोलग महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरता शाळा सुरू केली, पुण्यात ज्योतिबांनी अस्पृश्य स्त्रियांकरता सहा शाळा चालविल्या.

त्यांच्या या प्रयत्नांचा सनातनी लोकांकडुन फार विरोध झाला पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या प्रयत्नाना कधीही सोडलेही नाही व थांबवले देखील नाही.

आपल्या अंगणातील विहीर अस्पृश्यांकरता खुली केली त्यांना पाणी भरू दिले, बालविवाहाच्या प्रथेला प्रखर विरोध केला,

विधवा विवाहाचे समर्थन केले, अश्या अनेक परंपरांना त्यांनी प्राधान्य देउन सुरूवात केली.

ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, संसार, शेतक.यांचा आसुड, शिवाजीचा पोवाडा, सार्वजनिक, सत्यधर्म पुस्तिका, असे ग्रंथ ज्योतिबांनी लिहीले.

ज्योतिबा फुलेंनी शोषण व्यवस्थेविरूध्द व जातीव्यवस्थेविरूध्द युध्द पुकारले असतांना देखील समाजातील समतेला कुठेही धक्का लागु दिला नाही.

Mahatma Jyotiba Phule Story in Marathi

कदाचित म्हणुनच महात्मा गांधीजींनी ज्योतिबांना ’खरा महात्मा ’ असे म्हंटले असावे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंना आपले गुरू मानले आहे. अस्पृश्य स्त्रियांकरता आणि श्रमीक लोकांकरता महात्मा फुलेंनी आयुष्यभर जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केलेत. सामाजिक परिवर्तन, ब्राम्हणांविरूध्द आंदोलन, बहुजन समाजाला आत्मसन्मान देण्याकरता, शेतक.यांच्या अधिकाराकरता अश्या अनेक आंदोलनांची सुरूवात ज्योतिबा फुलेंनीच केली.

सत्यशोधक समाज भारतिय सामाजिक क्रांतीकरीता प्रयत्न करणारी एक अग्रणी संस्था ठरली.

ज्योतिबांनी लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, न्या.रानडे, दयानंद सरस्वती यांच्या समवेत देशातील राजकारणाला व समाजकारणाला पुढे घेऊन जाण्याकरता देखील प्रयत्न केलेत परंतु जेव्हां त्यांना या मंडळींची भुमिका अस्पृश्यांना न्याय देणारी वाटली नाही तेव्हां त्यांच्यावर टिका देखील केली.

त्यांची अशीच भुमिका ब्रिटिश सरकार, राष्ट्रीय सभा व काॅंग्रेस विरोधात देखील आपल्याला दिसुन येते.

बहुजनांच्या व शेतक.यांच्या हिताची भुमिका घेण्याकरता काॅंग्रेस ला बाध्य करण्याचे श्रेय ज्योतिबांनाच जाते.

ज्योतिबांचे संपुर्ण आयुष्य प्रयत्न आणि संघर्षांनी भरलेले आपल्याला पहावयास मिळते.

त्यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 ला झाले.

Note: आपल्या जवळ About Mahatma Jyotiba Phule in Marathi मधे अधिक Information असेल किंवा दिलेल्या माहितीत काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये लिहा आम्ही या लेखाला अपडेट करीत राहु.

जर आपणांस आमची Life History of Mahatma Jyotiba Phule in Marathi Language आवडली तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top