• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सविस्तर माहिती

Lokmanya Tilak And Chi Mahiti

        ’’ स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ’’

अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतिय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम आहेत. बाळ गंगाधर टिळक भारतिय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतिय स्वातंत्र्य सेनानी देखील होते.

भारतिय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता लोकमान्य टिळक ! ब्रिटीश अधिकारी त्यांना ’’भारतीय अशांततेचे जनक म्हणत’’ यामुळेच त्यांना ’लोकमान्य’’ ही पदवी देण्यात आली. (लोकमान्य…लोकांनी मान्य केलेला)

Lokmanya Tilak Information In Marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सविस्तर माहिती –  Lokmanya Tilak Information in Marathi

पुर्ण नाव (Name):बाळ ( केशव ) गंगाधर टिळक
जन्म (Birthday):23 जुलै 1856
जन्मस्थान (Birthplace):चिखलगांव ता. दापोली जि. रत्नागिरी
वडिल (Father Name):गंगाधरपंत
आई (Mother Name):पार्वतीबाई
शिक्षण (Education):1876 मध्ये बी.ए. (गणित) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि 1879 रोजी एल.एल.बी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
पत्नीचे नाव (Wife Name):सत्यभामाबाई
मृत्यु (Death):1 आॅगस्ट 1920

लोकमान्य टिळकांची जीवन परिचय – Lokmanya Bal Gangadhar Tilak Biography in Marathi

बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै ला 1856 साली रत्नागिरीत एका चित्पावन ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे मुळगांव कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडिल एका शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते व संस्कृताचे चांगले ज्ञानी होते. टिळक अवघे 16 वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातुन त्यांनी पदवी मिळवली. फार नगण्य लोक त्या काळी महाविद्यालयीन शिक्षण घेउ शकत होते, लोकमान्य टिळक त्यातुन एक होते ज्यांनी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली.

1871 साली त्यांचा विवाह तापीबाईंसोबत (सत्यभामाबाई) झाला. विवाह झाला त्यावेळी टिळक अवघे 16 वर्षांचे होते आणि तापीबाई त्याहुनही पुष्कळ लहान.

1877 साली टिळकांनी डेक्कन महाविद्यालयातुन पदवी प्राप्त केली व 1879 साली गव्र्हमेंट लाॅ काॅलेज मधुन वकिलीची पदवी मिळवीली. दोन वेळा प्रयत्न करून देखील ते एम.ए पुर्ण करू शकले नाहीत.

एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणुन कार्य सुरू केले. पुढे पत्रकार म्हणुन कार्य करते झाले. पत्रकार म्हणुन कार्य करत असतांना सगळयाच सामाजिक चळवळींमधे ते सहभागी होत.

टिळक म्हणायचे ’’ धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त सन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतु नसावा, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजुन त्याकरता कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पुजा करण्यास शिकायला हवे तेव्हांच परमेश्वराची पुजा करण्यालायक बनु शकु.

महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नामजोशी, गोपाल गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासमवेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणाशक्ती देणे हा होता.

पुढे टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणाकरता न्यु इंग्लिश हायस्कुल व महाविद्यालयीन शिक्षणाकरता फग्र्युसन काॅलेज ची स्थापना केली.

लोकमान्य टिळकांचे महत्वपुर्ण कार्य – Lokmanya Tilak Work

  • 1880 साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुल ची स्थापना
  • 1881 साली जनजागृतीकरता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू केली. आगरकर केसरीचे तर टिळक मराठा चे संपादक झालेत
  • 1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली
  • 1885 साली पुणे येथेच फग्र्युसन काॅलेज सुरू केले
  • लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या हेतुने ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिव जयंती’ उत्सवाला सुरूवात केली
  • 1895 ला टिळकांची मुंबई प्रांत विनियमन बोर्ड चे सभासद म्हणुन निवड झाली
  • 1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद झाली त्यावेळेस टिळकांनी आपल्या बचावात जे भाषण दिले ते तब्बल 4 दिवस आणि 21 तास चालले.
  • 1903 मधे ’दि आकर््िटक होम इन द वेदाज’ या पुस्तकाचे प्रकाशन
  • 1907 साली भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस चे सुरत येथे अधिवेशन झाले त्यात जहाल आणि मवाळ या दोन समुहांचा संघर्ष फार वाढला. परिणामी मवाळ समुहाने जहाल समुहाला काॅंग्रेस संघटनेमधुन काढुन टाकले. जहाल समुहाचे नेर्तृत्व लोकमान्य टिळकांकडे होते
  • 1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली टिळकांना ब्रम्हदेशात मंडालेच्या कारागृहात पाठविले तेथे टिळकांनी ’गितारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहीला
  • 1916 साली त्यांनी डाॅ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करावयाचे यालाच ’स्वशासन’ देखील म्हणतात.
  • हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार टिळकांनीच घेतला होता.
  • टिळकांना भारतिय असंतोषाचे जनक म्हंटले गेले आहे
  • टिळक ’लाल बाल पाल’ या त्रैमुर्ती मधील एक होते

लोकमान्य टिळकांचा मृत्यू – Bal Gangadhar Tilak Death

1 आॅगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यु झाला.

Read More:

  • लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण
  • महर्षी धोंडो केशव कर्वे यांची संपूर्ण माहिती

लक्ष्य दया: तुमच्या जवळ लोकमान्य टिळकांबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र  / Lokmanya Tilak Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Lokmanya Tilak Information in Marathi – लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

वि.स. खांडेकर – मराठी साहित्यिक

V.S. Khandekar Mahiti मराठी कथा, कादंबरीकार म्हणून सर्वांनाच परिचित असणारं नाव वि.स. खांडेकर. भारतात साहित्य क्षेत्रात सर्वोच्च असा समजला जाणारा...

by Editorial team
May 19, 2022
Marathi Biography

बहिणाबाई चौधरी माहिती

Bahinabai Chaudhari Biography in Marathi अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी हाताले चटके तवा मियते भाकर. बहिणाबाई चौधरी यांच्या या...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved