गोपाळ गणेश आगरकर यांच्या विषयी माहिती

Gopal Ganesh Agarkar in Marathi

आपल्या सामाजिक जीवनाच्या 15 वर्षांत गोपाळ गणेश आगरकरांनी समाजात शिक्षणाचा विस्तार, व सामाजिक जीवनाचा विकास करण्याकरता आपले महत्वाचे योगदान दिले.

Gopal Ganesh Agarkar

गोपाळ गणेश आगरकर यांच्या विषयी माहिती – Gopal Ganesh Agarkar Information in Marathi

पुर्ण नाव (Name): गोपाळ गणेश आगरकर
जन्म (Birthday): 14 जुलै 1856 टेंभू (क.हाड जि. सातारा)
आईचे नाव (Mother Name): सरस्वती आगरकर
वडिल (Father Name): गणेशराव आगरकर
मृत्यु (Death): 17 जुन 1895
शिक्षण (Education):
  • 1875 साली मॅट्रिक परिक्षा उत्तिर्ण,
  • 878 साली बी.ए. परिक्षा उत्तिर्ण,
  • 1880 साली एम.ए पुर्ण केले
विवाह (Wife Name): यशोदाबाईं सोबत 1877 साली
आगरकरांची पुस्तके (Books): विकार विलसीत, डोंगरी च्या कारागृहात 101 दिवस

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi

आगरकरांचा जन्म एका कोकणस्थ ब्राम्हण परिवारात झाला सुरूवातीचे शिक्षण क.हाड येथे झाले. काही काळ आगरकरांनी कोर्टात क्लर्क म्हणुन देखील कार्य केले.

1878 साली पदवी प्राप्त केल्यानंतर 1880 साली एम.ए परिक्षा उत्तिर्ण केली आणि आपले पुढचे जिवन सामाजिक कार्याकरता स्वतःला वाहुन घेतले.

आगरकर ब्रिटीश राज्यातील एक चित्पावन ब्राम्हण समाज सुधारक, शिक्षाविशारद, आणि  महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ विचारक होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे ते सहकारी होते, अनेक शिक्षण संस्थांची उदा. न्यु इंग्लिश हायस्कुल, द डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फग्र्युसन काॅलेज ची स्थापना करण्यात टिळक, विष्णुशास्त्री चिपळुणकर, महादेव बल्लाळ नामजोशी, व्ही.एस. आपटे, व्ही.बी. केळकर, एम.एस. गोळे, एन.के. धारप यांची त्यांनी फार मदत केली.

त्या काळी प्रकाशित ’केसरी’ या वर्तमानपत्राचे ते संपादक व संस्थापक होते. फग्र्युसन महाविद्यालयाचे ते दुसरे प्रधानाचार्य होते व आॅगस्ट 1892 आपल्या मृत्युपर्यंत ते त्या पदावर राहिले व सेवा केली.

गोपाळ गणेश आगरकर उणेपुरे 39 वर्षांचे आयुष्य जगले पण त्यांच्या या अल्पायुष्यात त्यांच्या अंगी असलेली उच्च प्रतीची नैतिकता, ध्येय प्राप्त करण्याचा दृढ निश्चय, बलिदान, अपार साहस, आणि कणभर देखील हव्यास लालसा अंगी नसल्याचे ते एक उत्तम उदाहरण आहे.

गोपाळ गणेश आगरकरांची महत्वपुर्ण माहिती – Gopal Ganesh Agarkar Mahiti

  • 1880 साली विष्णुशास्त्री चिपळुणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुल ची स्थापना केली.
  • 1881 ला टिळक व आगरकरांनी मराठी भाषेत ’केसरी’ आणि इंग्रजी भाषेत ’मराठा’ ही साप्ताहिकं सुरू केली. केसरी च्या संपादनाची धुरा आगरकरांनी सांभाळली.
  • दिवसेंदिवस दोन्ही वृत्तपत्रांची लोकप्रियता वाढली. कोल्हापुरचे दिवाण बर्वे यांच्या चुकीच्या कारभाराबद्दल वृत्तपत्रात लिहील्यामुळे बर्वे यांनी या दोघांवर मानहानिचा दावा ठोकला. बर्वे हा खटला जिंकल्याने टिळकांना व आगरकरांना 1882 साली 101 दिवसांची कैद झाली. मुंबईतील डोंगरी कारागृहात त्यांना ठेवण्यात आले. तिथे आगरकरांनी शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’ या नाटकाचा मराठी अनुवाद ’विकार विलसित’ या रूपाने केला आणि कैदेतुन सुटल्यानंतर आलेल्या अनुभवांवर डोंगरी कारागृहातील आमचे 101 दिवस नावाचे एक छोटे पुस्तक लिहीले.
  • 1884 साली टिळक व आगरकरांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली पुढे 1885 ला या संस्थेच्या माध्यमातुन फग्र्यृसन काॅलेज स्थापन करण्यात आले.
  • केसरी आणि मराठा या साप्ताहिकांमधुन टिळक समाज जागृतीला जास्त महत्व देत तर आगरकर सामाजिक सुधारणांना महत्व दयायचे. दोघांच्या विचारसरणीतील मतभेदामुळे आगरकरांनी 1887 साली केसरी या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजिनामा दिला.

Gopal Ganesh Agarkar in Marathi

  • 1888 साली आगरकरांनी ’सुधारक’ नावाचे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले. हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषांमधुन प्रकाशित व्हायचे. मराठी आवृत्तीची जवाबदारी आगरकरांनी आपल्या खांद्यावर घेतली तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक झाले गोपाळ कृष्ण गोखले. ’सुधारक’ या साप्ताहिकात आगरकरांनी समाज सुधारणेचे आपले विचार बरेच ज्वलंत भाषेत मांडले.
  • पुढे फग्र्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य वा.शि आपटे यांचा 1892 साली अचानक मृत्यु झाल्यानंतर आगरकरांची प्राचार्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
  • आगरकरांनी भारतीय समाजातील बालविवाह, केशवपन, भेदभाव, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट परंपरा आणि चालिरीतींचा प्रखर विरोध केला.
  • चुकिचे होत असेल तर बोलणारच व जे पुर्ण होईल ते करणारच हे आगरकरांचे वाक्य होते.

Read More:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ गोपाळ गणेश आगरकरबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा गोपाळ गणेश आगरकर यांचे जीवन चरित्र  / Gopal Ganesh Agarkar Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top