• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information City Information

सातारा जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Satara Jilha Mahiti

महाराष्ट्रातील 36 जिल्हयांपैकी एक जिल्हा! सातारा. इतिहासाची अनेक पानं ज्या ठिकाणानं भरली! अनेक ऐतिहासीक घटनांचा साक्षीदार!

इ.स. 1663 मधे परळीवर विजय प्राप्त केल्यानंतर शिवाजी महाराजांनी सातारा किल्ला जिंकला. 1708 मधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातवाचा छत्रपती शाहुमहाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असा सातारा जिल्हा!!!

Satara District Information In Marathi

सातारा जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Satara District Information in Marathi

सातारा पुर्वी शाहुमहाराजांच्या वंशजांची राजधानी होते, मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या हाती जाईपर्यंत त्यांचीच सत्ता या भागात होती पुढे मात्र इ.स. 1818 मधे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पराजयानंतर इंग्रजांनी या ठिकाणी सत्ता काबीत केली.

आजही येथील जुन्या वास्तु त्या काळातील आठवणी ताज्या करतात.

सातारा जिल्हयाच्या उत्तरेला पुणे जिल्हा, पश्चिमेला रायगड, पुर्वेला सोलापुर आणि दक्षिणेला सांगली जिल्हा वसलेला आहे.

पाचगणी, महाबळेश्वर सारखी थंड हवेची आणि पर्यटनाकरता महत्वाची ठिकाणं याच जिल्हयात आहेत.

कोयना आणि कृष्णा या साता.यातील मुख्य नद्या.

सातारा जिल्हयातील तालुके – Satara District Taluka List

सातारा जिल्हयात एकुण 11 तालुके आहेत

  1. सातारा
  2. कराड
  3. वाई
  4. महाबळेश्वर
  5. फलटन
  6. माण
  7. खटव
  8. कोरेगांव
  9. पाटण
  10. जाओळी
  11. खंडाळा

सातारा जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती –  Satara Jilha Chi Mahiti

  • लोकसंख्या 30,03,741
  • क्षेत्रफळ 10480 वर्ग कि.मी.
  • तालुके 11
  • एकुण गावे 1719
  • साक्षरता 52%
  • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 988
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 या जिल्हयातुन गेला आहे.
  • पावसाचे प्रमाण या ठिकाणी चांगले असुन सरासरी 1426 मि.मी. पाउस पडतो.
  • सातारा येथील सैनिकी प्रशिक्षण केंद्र सैनिकांचे फार जुने प्रशिक्षण केंद्र आहे.
  • मांढरदेवी ची यात्रा आणि वाई नजिक काळुबाईचे देवस्थान अत्यंत प्रसिध्द असुन लाखो भाविकांचे हे श्रध्दास्थान आहे.
  • कोयना धरण हे महाराष्ट्रातील मोठे धरण याच जिल्हयात आहे.
  • शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी प्रतापगड किल्ला या जिल्हयात आजही दिमाखात उभा असुन महाराजांची आठवण करून देतो.
  • थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या जिल्हयात असुन या ठिकाणी मोठया प्रमाणात पाउस पडतो.
  • सातारा जिल्हयातील वाई, कराड, कोयनानगर, रहमतपुर, फलटण, महाबळेश्वर आणि पाचगणी ही महत्वाची गावं आहेत.
  • 1663 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी परळी आणि सातारा किल्ला जिंकल्यानंतर आपले गुरू श्री समर्थ रामदास स्वामी यांना परळी किल्ल्यावर राहण्याची विनंती केली, पुढे याच किल्ल्याला सज्जनगड असे नाव देण्यात आले.
  • सज्जनगड साता.यापासुन अवघ्या 12 कि.मी. अंतरावर आहे.

पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit In Satara District

  • प्रतापगड –  Pratapgad                                                                        

सातारा शहरापासुन 20 कि.मी. अंतरावर असलेला प्रतापगड हा किल्ला छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात बनविला होता.

या किल्ल्याच्या निर्मीती करता महाराजांनी आपले प्रधान मंत्री मोरोपंत पिंगळे यांची नियुक्ती केली होती.

इ.स 1656 ला या किल्ल्याचे निर्माणकार्य पुर्ण झाले त्याच सुमारास महाराजांचे आणि अफझलखानाचे या ठिकाणी मोठे युध्द झाले आणि यात महाराजांनी विजय प्राप्त केला त्यामुळे मराठयांचे मनोधैर्य वाढले.

नीरा आणि कोयना नदी कडुन साता.याला संरक्षण मिळावे म्हणुन हा किल्ला बांधण्यात आला होता.

किल्ल्याचे प्रवेशव्दार अतिशय सुंदर असुन आजही सुस्थितीत आहे.  या किल्ल्यावर आई भवानीचे आणि शिवाचे मंदिर देखील आहे, आई भवानीच्या मंदिरात हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आपल्याला पहायला मिळते.

प्रतापगड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला असुन या किल्ल्याला पाहाण्याकरता पर्यटक आणि इतिहासप्रेमी गर्दी करतात.

  • महाबळेश्वर – Mahabaleshwar                                                                      

सहयांद्री पर्वतरांगांमधे वसलेले महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर 12 ही महिने पर्यटकांचे आवडते आणि लोकप्रीय ठिकाण आहे.

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकरता हे आवडते ठिकाण असुन नैसर्गिक सौंदर्यामुळे शहरी वातावरणाला कंटाळलेले नागरिक या ठिकाणी वेळ घालवणे पसंत करतात.

प्रतापगड, वेणा तलाव, लिंगमाला धबधबा, माउंटटाॅप लुकआउट पाॅईंट, इको पाॅईंट, फाॅकलॅंड पाॅईंट, बाॅंबे पाॅईंट ही ठिकाणं पाहाण्यासारखी आहेत.

पावसाच्या दिवसांमधे मोठया प्रमाणात पाउस पडतो आणि थंडी देखील खुप असते.

येथे येण्याकरता मार्च ते जुन हा पर्यटनाकरता चांगला काळ आहे.

  • भांबवली वजराई धबधबा – Vajrai Waterfall

हा धबधबा भारतातला सर्वात उंचीवरचा धबधबा आहे. पावसाळयात तर याचे रूप अक्षरशः डोळयाचे पारणे फेडते

या धबधब्याची उंची तब्बल 1840 फुट (560 मिटर) असुन उरमोडी नदीतील पाणी या धबधब्यात येते.

सर्व वयोगटातल्या पर्यटकांकरता हे आकर्षणाचे ठिकाण आहे.

हा धबधबा 12 ही महिने कोसळत असुन आजुबाजुचे हिरवे डोंगर आणि फुलं मनाला प्रसन्नता देतात.

हा धबधबा पाहाण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ठेवली आहे.

जास्त पावसात येथे फिरण्याकरता येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सातारा जिल्हयात असलेला हा धबधबा फ्लाॅवर व्हॅली या ठिकाणापासुन 5 कि.मी. आणि भांबवली फ्लाॅवर व्हॅली पासुन अवघ्या 2 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

  • पाचगणी –  Panchgani                                                                      

पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण चांगले पर्यटन क्षेत्र तर आहेच पण त्याशिवाय या भागात निवासी विद्यालयांची संख्या देखील अमाप आहे.

पाचगणीच्या हिरव्यागार टेकडया, पारशी पाॅइंट, सिडनी पाॅइंट, टेबल लॅंड, आॅन व्हील अॅम्युझमेंट पार्क, ही ठिकाणं पुन्हा पुन्हा पाहावीत अशीच!

टेबललॅंड ला तुम्ही घोडयावर रपेट मारण्याचा आनंद घेउ शकता. येथील खोल दऱ्या आणि हिरवेगार डोंगर पाहाण्यासारखे आहेत.

माप्रो गार्डन ला बरीच रंगीबेरंगी फुलं आणि स्ट्राॅबेरी आपल्याला पहायला मिळते, फळांचे अनेक स्क्वाॅश देखील या ठिकाणी विक्रिला उपलब्ध आहे.

राजपुरी गुफा तलावाने घेरल्या असुन हिंदु देवता कार्तिकेय स्वामींचे मंदिर या ठिकाणी आहे.

  • तापोळा तलाव – Tapola Lake

नौका विहाराचा आनंद घ्यायचा असेल तर तापोळा तलावाला भेट द्यायलाच हवी !

शिवसागर या कोयना धरणाच्या बॅकवाॅटर ने तयार झालेला हा तलाव निसर्गाच्या सान्न्ध्यिात शांत आणि निवांत वातावरणात वेळ घालवण्याकरता एक चांगले पर्यटनस्थळ आहे.

महाबळेश्वर पासुन साधारण 30 कि.मी. अंतरावर हे ठिकाण भेट द्यावी असेच आहे.

महाबळेश्वर पासुन या ठिकाणी येण्याकरता आपण खाजगी वाहनांचा उपयोग करू शकता

निवासाकरता पाचगणी, सातारा, आणि महाबळेश्वरला शानदार हाॅटेल्स उपलब्ध आहेत.

  • मांढरदेवी – Mandhardevi                                                                   

सातारा जिल्हयातील वाई जवळ असलेला मांढरदेवीचा गड संपुर्ण महाराष्ट्रात पुजनीय असुन येथील काळुबाई साक्षात पार्वतीचे रूप आहे.

पौष पौर्णिमेला या देविची यात्रा भरते त्या दरम्यान भाविक देव्हारे घेउन गडावर येतात, तेथे चुली पेटवुन देवीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात.

यात्रेच्या दरम्यान लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात शिवाय या ठिकाणी यात्रे दरम्यान राहुटया करून राहतात देखील!

पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन अनेक वादयांच्या निनादात देवीचा छबीना काढला जातो आणि हे येथील मुख्य आकर्षण देखील असते.

या मंदिराचा इतिहास फारसा कुणाला ठाउक नसला तरी हेमाडपंथी बांधकामावरून हे मंदिर फार प्राचीन असल्याचे लक्षात येते.

मंदिराच्या गर्भगृहात काळुबाईची स्वयंभु मुर्ती विराजमान असुन देवी राक्षसावर उभी असुन देवीच्या हातात त्रिशुल तलवार, ढाल अशी आयुधं आणि एका हातात राक्षसाची मान पकडली आहे तर एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवला आहे.

संपुर्ण मुर्ती शेंदुर लिंपीत असुन या देवीचे वाहन सिंह आहे.

आणखी वाचा:

  • Akola District Information
  • Ahmednagar History Information
  • Amravati District Information

लक्ष्य दया: तुमच्या जवळ सातारा जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
May 10, 2022
ग्रहांचे नावे मराठीत
Information

ग्रहांचे नावे मराठीत

Name of Planets in Marathi आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला...

by Editorial team
May 11, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved