सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Sangli Jilha Mahiti

कृष्णेच्या तिरावर वसलेला पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा सांगली!पुर्वी दक्षिण सातारा म्हणुन ओळख असलेला हा जिल्हा आता सांगली म्हणुन परिचीत झालाय! नाटक परंपरेला जन्माला घालणारा हा जिल्हा ’’नाटयपंढरी’’ म्हणुन देखील ओळखला जातो. पं. विष्णुदास भावेंनी पहिले मराठी नाटक ’’सिता स्वयंवर’’ हे नाटक या ठिकाणीच सादर केले त्यांचा जन्म देखील या सांगलीतलाच!

आज त्यांच्या नावाने अनेक नाटयगृह या ठिकाणी असुन त्यामुळे कलाकारांची सारखी मांदियाळी हा जिल्हा अनुभवत असतो.नारायण श्रीपाद राजहंस अर्थात ज्यांना आपण बालगंधर्व म्हणुन उत्तम रितीने ओळखतो त्यांचा जन्म देखील याच जिल्हयातला. त्यांना बालगंधर्व ही पदवी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी बहाल केली, स्त्री भुमिकांकरता बालगंधर्व विशेष गाजले.

साखर कारखान्यांकरता देखील सांगली जिल्हा ओळखला जातो वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना या क्षेत्रातील आशियातला नं. १ चा सहकारी साखर कारखाना आहे.आशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ देखील या जिल्हयात आहे आणि आता तर द्राक्षांच्या उत्पादनाकरता देखील हा जिल्हा ओळखल्या जाऊ लागला आहे.

चांगल्या गुणवत्तेचे फायबर या जिल्हयात तयार होते.सुती कापड, तेलाच्या मिल्स, पीतळ आणि तांब्याच्या वस्तु बनवणारे कारखाने या जिल्हयात मोठया प्रमाणात पहायला मिळतात. सांगली हे शहर पहेलवानांकरता आणि कुस्तीगिरांकरता देखील चांगलेच सुपरीचीत आहे त्यामुळे कुस्तीगिरांचे शहर अशी देखील सांगलीची ओळखी आपल्याला सांगता येईल.

सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Sangli District Information in Marathi

Sangli District Information in Marathi

सांगली जिल्हयातील तालुके – Sangli District Taluka List

या जिल्हयात एकुण ११ तालुके आहेत.

 • मिरज
 • वाळवा
 • जाठ
 • तासगांव
 • खानपुर (वीटा)
 • पलूस
 • शिराळा
 • कवठे महाकाळ
 • कडेगांव
 • अटपडी

सांगली जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Sangli District Information

 • लोकसंख्या २८,२०,५७५
 • क्षेत्रफळ ८५७८ वर्ग कि.मी.
 • एकुण गावं ७३५
 • तलुके १०
 • साक्षरतेचे प्रमाण ८२.४१%
 • १००० पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९७३
 • राष्ट्रीय महामार्ग क्र.४, २०४, रत्नागिरी नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ या जिल्हयातुन जातात.
 • सांगलीच्या उत्तरेला सातारा सोलापुर जिल्हे, पुर्वेला कर्नाटकातला विजापुर जिल्हा, दक्षिणेला कोल्हापुर आणि बेळगांव तर पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा आहे.
 • ज्वारी,  बाजरी,  गहु,  हळद,  उस,  बेदाणे आणि आता द्राक्षांचे देखील उत्पादन या ठिकाणी मोठया प्रमाणात घेतले जाते.
 • कुस्ती आणि कुस्तीगिरांसाठी सांगली प्रसिध्द आहे.
 • या ठिकाणचे मिसळपाव,  वडापाव आणि भडंग चांगलेच प्रसिध्द आहे.
 • बुध्दीबळाचे माहेरघर म्हणुन देखील सांगली ओळखले जाते.
 • सांगलीचा गणपती फार लोकप्रिय असुन प्रसिध्द देखील आहे.
 • सांगली हे शहर पुण्यापासुन २३१, औरंगाबाद पासुन ४५७,  नागपुर ७६३,  मुंबई ३९१ आणि रत्नागिरी पासुन १७९ अंतरावर आहे.
 • मराठी रंगभुमी चे पहिले नाटककार पं विष्णुदास भावे सांगलीचेच! त्यांनी या क्षेत्राला नावारूपाला आणत चांगला चेहरा दिला.
 • रेल्वे,  बससेवा आणि खाजगी वाहनांनी सांगली चांगल्या तऱ्हेने जोडल्या गेले आहे.
 • पुर्वी या शहराचे नाव सहगल्ली असल्याचे देखील ऐकिवात आहे.
 • उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्करांनी आपला पहिला कारखाना या ठिकाणीच सुरू केला.
 • गोपाळ गणेश आगरकर, बालगंधर्व, आशा भोसले यांचा जन्म सांगली जिल्हयातलाच तसच बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री मुलतः सांगलीचीच!

सांगली जिल्हयातील पर्यटन आणि तिर्थस्थळं – Tourist Places in Sangli

 • सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिर.साधारणपणे २०० वर्षांची परंपरा लाभलेले हे गणपती मंदिर प्राचीन असुन सांगलीकरांचे आराध्यदैवत आहे.
 • या मंदिरात दर्शनाकरता येताच प्रथमतः दृष्टीस पडते ते भव्य महाव्दार! हे महाव्दार कुरूंदाच्या दगडात बांधण्यात आले असुन त्याचे विशाल स्वरूप डोळयाचे पारणे फेडते,  मंदिराचे बांधकाम काळया दगडातील असुन या मंदिराचे बांधकाम पुर्ण होण्याकरता तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागला आहे.
 • श्री गणेश मंदिरासोबतच या ठिकाणी शिवाचे, सुर्याचे, चिंतामणेश्वरी आणि लक्ष्मीनारायणाचे देखील मंदिर आहे.
 • सांगली संस्थानचे थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी या देवालयाची स्थापना केली त्याकाळी सांगली शहर बरेच लहान होते.
 • आज या मंदिराला इतकी वर्ष होऊन देखील याचे बांधकाम नवीनच भासते, हे मंदिर पटवर्धन घराण्याचे दैवत असुन पटवर्धन कुटुंब सांगलीत आल्यानंतर त्यांनी या मंदिरा करता बराच खर्च करून त्याला गतवैभव प्राप्त करून दिले.
 • गणेशोत्सवात तर या मंदिराची शोभा आणि विसर्जनाची मिरवणुक पाहाण्यासारखी असते.  संपुर्ण १० दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते आणि शेवटच्या दिवशी हत्ती घोडे, उंट, भालदार आणि चोपदारांसह जी मिरवणुक निघते ती पाहाण्याकरता संपुर्ण सांगलीकर एकच गर्दी करतात.
 • कृष्णेच्या किनारी वसलेले हे मंदिर पाहण्यासारखे आहे.

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य – Sagareshwar Abhayaranya

 • सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य मानवनीर्मीत असुन १०.८७ वर्ग कि.मी. विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे.
 • कडेगांव वाळवा आणि पळुस या तिन तालुक्यांच्या सीमा या ठिकाणी एकत्र येतात, कायम स्वरूपी पाण्याची उपलब्धता नसुनही या अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी हे एक असुन कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात  वसलेले आहे.
 • फार पुर्वी बांधलेली जवळपास ५१ मंदिरं याठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मुख्य मंदिर शंकराचे आहे या मंदिरात दर्शन घेऊन थोडे पुढे गेलो की या अभयारण्याला सुरूवात होते हे अभयारण्य मानवनिर्मीत असुन प्रयत्नपुर्वक हिरवेगार करण्यात आले आहे.
 • जंगली प्राण्यांची संख्या फार नसली तरी देखील हरीण, सांबर, काळवीट, भेर यांशिवाय तरस,  लांडगे,  कोल्हे,  ससे आणि मोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.अनेक वनस्पती सुध्दा या ठिकाणी आहेत.
 • स्वातंत्र्यसैनिक श्री धो.म. मोहिते यांचा या अभयारण्याच्या निर्मीतीत सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच या उजाड माळरानावर अभयारण्य तयार झाले.
 • आज माणुस आपल्या स्वार्थाकरता सर्व हिरवाई नष्ट करत सिमेंटची जंगलं उभारत चालला आहे त्यात हे मानवनिर्मीत अभयारण्य खरच कौतुकास्पद ठरते.

मीरसाहब दर्गा मिरज – Mirsahab Durga Mirage

 • हिंदु मुस्लीमांचे ऐक्य पहावयाचे झाल्यास या ठिकाणी आवर्जुन भेट द्यावी कारण मुस्लीम बांधवांचे हे पवित्र ठिकाण सामाजिक सलोख्याचे उत्तम प्रतिक आहे.
 • मिरज रेल्वेस्थानका नजीक ही मीरसाहब दर्गा असुन दर गुरूवारी सकाळी हजारो भाविक या ठिकाणी हजरत मिरसाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमसुद्दीन हुसैन यांच्या दर्शनाकरता गर्दी करतात.
 • फार पुर्वी हजरत मिरसाहेब म्हणुन थोर सुफी संत होउन गेले दरवर्षी त्यांच्या स्मृतीपित्यार्थ या ठिकाणी मोठा उर्स भरतो, त्यावेळेस लाखोंच्या संख्येने येथे भाविक येत असतात.

भोसे येथील दांडोबा टेकडया – Dandoba Hills in Bhose

 • सांगली पासुन अवघ्या २५ मिनीटांच्या अंतरावर दांडोबा टेकडया असुन यावर अनेक जुनी मंदिर आपलं लक्ष वेधतात शिवाय पावसाळयात या टेकडया हिरवाईने नटल्याने अत्यंत सुंदर आणि पर्यटनाकरता एक उत्तम ठिकाण ठरतात.
 • ट्रेकिंग प्रेमिंकरता या टेकडया म्हणजे आवडती जागा, कारण या ठिकाणी ट्रेकिंग ची आवड असणारे पर्यटक मोठया प्रमाणात दिसुन येतात.  या ठिकाणी लहान मॅरेथॉन चे देखील आयोजन करण्यात येते आणि हे आयोजन फार प्रसिध्द आणि लोकप्रिय देखील आहे.

तर हि होती सांगली जिल्ह्याविषयी माहिती आजचा लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top