• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi

कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण.

हे धरण  कोयना नदीवर बांधलेले खूप मोठे धरण आहे.

कोयना नदीची माहिती – Koyna River Information in Marathi

Koyna River Information in Marathi
Koyna River Information in Marathi
नदीचे नाव कोयना
उगमस्थानसहयाद्री पर्वतरांगा, महाबळेश्वर, जि. सातारा (महाराष्ट्र राज्य)
उपनद्यासोळशी, केरा, कांदाटी, मोर्ण आणि वांग
लांबी130 कि.मी.
कोयना नदीवरील प्रकल्पशिवसागर जलाशय (जलविद्युत प्रकल्प), हेळवाक, ता. पाटण, जि. सातारा (महाराष्ट्र). /td>

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये, निसर्गरम्य महाबळेश्वर येथे पर्वताच्या पश्चिम उतारावर सुमारे चार हजार फुट उंचीवर कोयना नदीचा उगम आहे.

पश्चिम बाजूला वासोटा किल्ल्याचा रम्य परिसर आणि पूर्व बाजूला बामणोली डोंगर यांच्या दरम्यान कोयना नदीचे खोरे आहे.

दक्षिणेला वाहत जाऊन हेळवाक या गावाजवळ ती पूर्व बाजूला आपला मोहरा वळवून पूर्ववाहिनी होते.

कराडजवळ कोयना  कृष्णा नदीला मिळते. या संगमाचे वर्णन कवींनी कृष्णा- कोयनेचा ‘प्रीतिसंगम’ अशा शब्दांत केले आहे. कोयना नदी कृष्णा नदीची मोठी उपनदी आहे.

उगमापासून कृष्णेला मिळेपर्यंत कोयना नदीची लांबी सुमारे शंभर किलोमीटरच्या वर आहे. कोयनेला पाच प्रमुख उपनद्या येऊन मिळतात. सोळशी, कांदाटी, केरा, मोरणा आणि वांग अशी त्या नद्यांची नावे आहेत.

कोयनेच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात तिचे पात्र अरुंद; परंतु खोल आहे. महाबळेश्वरला उगम पावून जावळी आणि पाटण तालुक्यांतील जमिनीला पाणी पाजून कराडमध्ये ती कृष्णमय झाली आहे.

About Koyna Nadi

कोयना नदी प्रसिद्धीच्या झोतात आली, लोकप्रिय झाली, ती तिच्यावर बांधलेल्या धरणामुळे, तिच्या पाण्यावर निर्माण झालेल्या आधुनिक प्रकारच्या जलविद्युत् प्रकल्पामुळे  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हेळवाक या ठिकाणी मोठे धरण बांधून निर्माण झालेल्या प्रचंड शिवसागर जलाशयाचे पाणी पश्चिम दिशेला वळविले आहे.

सह्याद्री पर्वताच्या पोटात मोठे बोगदे खोदून यातून पाणी वेगाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळच्या पोफळी येथे येते. या ठिकाणी बसविलेल्या जनित्रावर पाणी आदळते आणि त्यापासून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होते.

या जलविद्युत् केंद्रामुळे कोयनेचे नाव आणि महत्त्व देशभर पसरले; आणि कोयना भाग्यवान ठरली. आणि म्हणूनच कोयना प्रकल्पाला ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ असे म्हणतात.

कोयनेच्या खोऱ्यात अनेक किल्ले आहेत. या खोऱ्यातील प्रदेशात कारवी या वनस्पतीची जंगले आहेत. तसेच, अनेक प्रकारच्या सुंदर आणि औषधी वनस्पतींनी हे खोरे समृद्ध बनले आहे.

साग, बाभूळ, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांनी कोयना खोरे निसर्गरम्य बनविले आहे. कोयनेच्या खोऱ्याने सातारा जिल्ह्याच्या भूगोलात मानाचे आणि महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.

कोयना नदीमुळे महाराष्ट्राचे भाग्य उजळले आहे, हे निश्चित !

कोयना नदीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Koyna River

प्रश्न. कोयना नदीचा उगम कोठे आहे?

उत्तर: महाबळेश्वर, जि. सातारा.

प्रश्न. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणास म्हटले जाते?

उत्तर: कोयना जलविद्युत प्रकल्प (शिवसागर जलाशय).

प्रश्न. कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे.

उत्तर: कृष्णा नदी.

प्रश्न. कृष्णा-कोयना नदीचा संगम कोठे होते?

उत्तर: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात (प्रीतीसंगम).

प्रश्न. कोयनेला किती नद्या येऊन मिळतात?

उत्तर: पाच.

Editorial team

Editorial team

Related Posts

Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
June 28, 2022
Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
June 21, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved