अहमदनगर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Ahmednagar History Information

महाराष्ट्रातील उन्नत जिल्हयांमधला एक जिल्हा अहमदनगर! पश्चिम भारतात महाराष्ट्रातील मोठया जिल्हयांमधे गणला जाणारा!

अहमदनगर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Ahmednagar History Information in Marathi

Ahmednagar History Information in Marathi

साखर कारखान्यांमुळे अहमदनगर जिल्हयाला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील प्रगतीशील शेतकरी उस उत्पादनात यशस्वीतेच्या शिखरावर असल्याने देखील साखर कारखान्यांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे.

शिर्डी के साईबाबा या जिल्हयात असुन संपुर्ण जगातुन या ठिकाणी दर्शनाकरता भाविक प्रचंड मोठया संख्येने गर्दी करतात.

शनी शिंगणापुर हे शनिदेवाचे प्रसीध्द तिर्थस्थळ याच जिल्हयात असल्याने शिर्डीप्रमाणेच या ठिकाणी देखील भाविक शनिदेवाच्या दर्शनाकरता या ठिकाणी येतात.

संत ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहीली ते नेवासे गांव याच जिल्हयात असुन संतांच्या पायधुळीने पुनीत झाल्याने या ठिकाणी संतांचा आशिर्वाद लाभलेला आहे.

राळेगण सिध्दी हे थोर समाजसेवक अण्णा हजारेंचे गांव जल संरक्षणाच्या कामामुळे आणि आदर्श गांव असल्याने प्रकाशझोतात आले.

पोपटराव पवार या व्यक्तिमत्वाने कायापालट घडवुन आणलेले हिवरेबाजार हे आदर्श गांव देखील याच जिल्हयात असुन आपसुकच या जिल्हयाचा मान वाढतो.

आज त्यांच्याच पाउलावर पाउल ठेवत कितीतरी गावं आदर्श गावं म्हणुन नावलौकिक मिळवतायेत.

अहमदनगर जिल्हयातील तालुके – Ahmednagar District Taluka List

या जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत

 • अहमदनगर
 • अकोले
 • जामखेड
 • कर्जत
 • कोपरगांव
 • नेवासा
 • श्रीरामपुर
 • पारनेर
 • पाथर्डी
 • राहाता
 • संगमनेर
 • शेवगांव
 • राहुरी
 • श्रीगोंदा

अहमदनगर जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Ahmednagar District Information

 • लोकसंख्या 45,43,159
 • क्षेत्रफळ 17,048 वर्ग कि.मी.
 • मुख्य भाषा मराठी
 • साक्षरतेचे प्रमाण 90.22ः
 • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 934
 • राष्ट्रीय महामार्ग क्र. 50, क्र. 222 आणि राज्य महामार्ग 10 या जिल्हयातुन गेले आहेत.
 • अहमदनगर जिल्हयात मोठया प्रमाणात साखर कारखाने असल्याने जिल्हयातला उस या साखरकारखान्यात पाठवला जातो.
 • हा जिल्हा तिर्थस्थळांच्या दृष्टीकोनातुन देखील महत्वाचा जिल्हा असुन शिर्डी, शनिशिंगणापुर, नेवासे, श्री क्षेत्र देवगड, सिध्दटेक ( अष्टविनायकांपैकी एक ), प्रसिध्द कानिफनाथ मंदीर यां सारखी तिर्थस्थळं या जिल्हयात असल्याने 12 ही महिने या ठिकाणी भाविकांची गर्दी पहायला मिळते.
 • चांदबीबी चा महल, भंडारदरा, माळढोक आणि रेहकुरी अभयारण्य ही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र आहेत.
 • थोर समाजसेवक अण्णा हजारेंचे राळेगण सिध्दी हे आदर्श गांव या जिल्हयात असुन पारनेर तालुक्यात आहे, पुणे शहरापासुन 87 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव जलसाक्षर सुध्दा झाले आहे . गावात सौर उर्जेचा मोठया प्रमाणात वापर होत असुन सार्वजनिक ठिकाणी लागणारे दिवे हे सौर उर्जेमुळेच लागतात शिवाय बायोगॅस चा देखील या ठिकाणी वापर होत आहे, हे गांव पर्यावरण संरक्षणामुळे देखील ओळखले जाते.
 • 1992 साली दुस.या गावांकरता आपल्या गावाचा आदर्श ठेवल्यामुळे भारत सरकार तर्फे अण्णा हजारेंना पùभुषण या तिस.या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे.
 • एके काळी भिषण दुष्काळाचा सामना करणारे हिवरे बाजार हे गाव आज आदर्श गांव म्हणुन नावारूपाला आले ते येथील पोपटराव पवार यांच्या अथक परिश्रमाने हे गांव याच अहमदनगर जिल्हयात असुन आज सिंचन प्रणाली, जलसाक्षरता, दारूबंदी, परिवार नियोजन, श्रमदानाकरता ओळखले जात आहे.
 • 11 सप्टेंबर 2007 ला दिल्लीत या हिवरे बाजार ला ’’राष्ट्रीय जल पुरस्कार’’ प्राप्त झाला.

पर्यटन आणि तिर्थस्थळं – Ahmednagar Tourism

 • शिर्डी – shirdi

साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेली शिर्डीची भुमी! या ठिकाणी जगभरातुन लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाकरता येत असतात.

शिर्डी च्या साईबाबांचे चमत्कार, त्यांचे साक्षात्कार याचा भाविकांना अनुभव येत असतो त्यामुळे देखील येथे संपुर्ण भारतातुनच नव्हे तर जगभरातले भाविक दर्शनाला येत असावेत.

मंदिर परिसरात साईबाबांची संगमरवरी मुर्ती, व्दारकामाई, एक मशिद, असुन भाविक या सर्व ठिकाणाचे दर्शन घेउ शकतात.

या ठिकाणी भाविकांकरता मोठया प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आल्या असुन भक्तनिवास देखील बांधण्यात आले आहेत.

अहमदनगर ते शिर्डी हे 86 कि.मी. चे अंतर असुन  शिर्डी ला रेल्वेस्थानक असल्याने या ठिकाणी रेल्वेची, बसेसची आणि खाजगी वाहनांची देखील सोय उपलब्ध आहे.

 • शनि शिंगणापुर – Shani Shingnapur

आपल्याला तर माहिती च आहे शनिदेवतेची सर्व भाविकांना भिती वाटते त्यामुळे त्याचा कोप होउ नये, साडेसाती असतांना त्रास होउ नये म्हणुन भाविक हरत.हेने शनिदेवाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

शनिदेवाचे मोठे तिर्थस्थान शनिशिंगणापुर अहमदनगर जिल्हयात नेवासे तालुक्यात असुन शिर्डी पासुन शनि शिंगणापुरचे अंतर साधारण 73 कि.मी. एवढे आहे, अहमदनगर पासुन शनि शिंगणापुरचे अंतर 40 कि.मी. एवढे आहे.

Shani Shingnapur ला एका मोठया चैथ.यावर शनिची काळया पाषाणातली प्रतिमा विराजमान असुन याचे महात्म्य सर्वदुर मानल्या जाते. ही प्रतिमा स्वयंभु असुन कलियुगाच्या सुरूवातीपासुन येथे जमिनीतुन प्रगट झाल्याचे सांगितले जाते.

पुरूषांना उघडया अंगाने शनिदेवाचे दर्शन घ्यावे लागते तर स्त्रियांना हे दर्शन दुरून घ्यावे लागते.

Shani Shingnapurला कोणाच्याही घराला दरवाजे नाहीत.

शनिदेवाचे एवढे महात्म्य या ठिकाणी आहे की या गावात कधीही चोरी होत नाही.

चोरी करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला शनिदेवाच्या कोपाला सामोरे जावे लागते या भितीने या ठिकाणी कोणीही चोरी करण्याचा प्रयत्न देखील करीत नाही.

 • सिध्दटेक – siddhatek

अष्टविनायकापैकी तिसरा गणपती सिध्दटेकचा सिध्दीविनायक याच जिल्हयात असुन यामुळे या जिल्हयाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

या स्वयंभु गणेशाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की दैत्य मधु कैटभ या राक्षसांमुळे सगळीकडे त्राही त्राही माजली होती, त्यांच्या विध्वंसक कृत्यांमुळे जनतेचे हाल होत असतांना भगवान विष्णु आणि इतर देवतांनी श्री गणेशाला साकडे घातले त्यांचा विनाश करण्याकरता सिध्दीविनायकाला या ठिकाणी यावे लागले.

सिध्दीविनायकाची ही मुर्ती स्वयंभु असुन भव्य असे मंदीर या ठिकाणी उभारण्यात आले आहे.

गाभारा लांब रूंद असुन सभोवताली पितळयाचे मखर आहे त्यावर चंद्र सुर्य आणि गरूडाची कलाकुसर केलेली आढळते, मंदीरात मोठया दगडी दिपमाळा असुन सणासुदीला त्यात दिवे लावले जातात.

दर महिन्याच्या गणेश चतुर्थीला आणि प्रतिवर्षी गणेशाच्या आगमनानंतर 10 दिवस या ठिकाणी भाविकांची खुप गर्दी होते.

भिमा नदीच्या तिरावर वसलेले हे मंदीर अहमदनगर जिल्हयात कर्जत तालुक्यात आहे. या ठिकाणी येण्याकरता चांगला रस्ता असल्याने महामंडळाच्या बसेस ने आणि खाजगी वाहनाने पोहोचता येते.

 • Nevase

नेवासे हे अहमदनगर जिल्हयातील गांव मोहिनीराज मंदीराकरता आणि संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाकरता ओळखले जाते.

भगवान विष्णु चा एकमेव स्त्रिवेश म्हणजे ’मोहिनीराज’ असुन समुद्र मंथनातुन निघालेले अमृत देवतांना वाटण्याकरता आणि राक्षसांपासुन हे अमृत सुरक्षीत ठेवण्याकरता विष्णुंनी मोहिनीवेश धारण केला आणि राहु केतु चा शिरच्छेद केला,

राक्षसांपासुन अमृत वाचवले आणि देवतांना पाजले म्हणुन त्या मोहिनी वेशाचे या नेवासे गावी मोहिनीराज मंदीर उभारण्यात आले असुन भगवान विष्णुंचे स्त्रिवेशातील हे एकमेव मंदीर असल्याचे सांगितल्या जाते.

या मंदीरात दरवर्षी तिन यात्रा आयोजित केल्या जातात.

नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला. ज्या खांबाला टेकुन हा गं्रथ त्यांनी लिहीला तो खांब आजही या ठिकाणी असुन त्याचे पुजन केल्या जाते.

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अतिशय पुजनिय असुन हिंदु धर्मात आजही त्याचे वाचन आणि पुजन केल्या जाते.

 • देवगड येथील श्री दत्तमंदीर – Datta Maharaj Temple, Devgad

श्री किशनगिरी महाराजांनी स्थापीत केलेले देवगड येथील श्री दत्त मंदीर शनि शिंगणापुर येथुन 41 कि.मी. आणि नेवासे येथुन अवघ्या 9 कि.मी. अंतरावर असुन अतिशय शांत आणि आपल्या स्वच्छतेकरता प्रसिध्द असे हे स्थान आहे.

तिन मुखी श्री दत्तात्रयाची अतिशय विलोभनिय मुर्ती या ठिकाणी असुन दर्शनाने देहभान विसरायला होते.

संपुर्ण महाराष्ट्रातुन या ठिकाणी भाविक दर्शनाकरता येत असतात, भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वात आषाढी एकादशीच्या निमीत्ताने पंढरपुरला दरवर्षी येथुन पालखी निघते, ही पालखी आपल्या स्वच्छतेकरता आणि शिस्तीकरता पंचक्रोशीत प्रसीध्द आहे.

 •  भंडारदरा – Bhandardara

महाराष्ट्रातील सहयांद्री पर्वतरांगांमधे नैसर्गिक आणि प्राकृतिक सौंदर्याने नटलेला भंडारदरा हे पर्यटनाकरता एक उत्तम ठिकाण आहे.

या ठिकाणी मोठा धबधबा, तलाव, ट्रेकिंग ची आवड असणा.यांकरता उंच टेकडया, सर्वदुर हिरवळ, असे निसर्गप्रेमींना आकर्षीत करणारे  सर्व वातावरण असल्याने भंडारदरा हे एक उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे.

अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील भंडारदरा नाशिकपासुन 71 कि.मी. अंतरावर असुन मुंबईपासुन 117 कि.मी अंतरावर आहे.

रतनगढ आणि हरिश्चंद्रगढ ट्रेकिंग करता उत्तम ठिकाणं आहेत, याशिवाय मदनगढ आणि कुलंगगढ देखील उत्तम पर्याय ठरू शकतात.

अगस्ती ऋषींचा आश्रम, अमृतेश्वर मंदीर ही ठिकाणं देखील भेट देण्यासारखीच!

या ठिकाणी पाउस मोठया प्रमाणात पडत असल्याने धरणं आणि जलाशय तुडुंब भरलेले असतात त्यामुळे परवानगी असल्यासच नौका विहाराचा आनंद घेता येतो.

डोळयाचे पारणे फेडणारा भव्य असा धबधबा पाहाणे देखील एक वेगळा आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव ठरतो.

नाशिक पासुन भंडारदरा येण्याकरता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असुन खाजगी वाहनाने येथे येणे अधिक सोयीचे ठरते.

आणखी वाचा:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ अहमदनगर जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

1 COMMENT

 1. श्रीरामपूर तालुक्यामध्ये केशव गोविंद बन
  श्रीरामपूर तालुक्यात जोर्वे दायमाबाद सिंधू संस्कृती अवशेष आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here