“रायगड किल्ला” माहिती

Shivaji Maharaj Fort Raigad chi Mahiti

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. महाराजांचे कर्तुत्व त्यांचा पराक्रम, त्यांची गौरवगाथा ऐकूनच या महाराष्ट्रात मुलं लहानाची मोठी होतांना आपण पहातो. महाराजांच्या किल्ल्यांची देखील माहिती आपल्याला असायला हवी, त्या किल्ल्याचा इतिहास, स्वराज्यात त्याचे असलेले महत्वं, किल्ल्याचे स्वरूप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आज या लेखात महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

https://www.youtube.com/watch?v=FP3WeYl3W7A

रायगड किल्ल्याची माहिती – Raigad Fort Information in Marathi

Raigad Fort Information in Marathi
Raigad Fort Information in Marathi

रायगड किल्ल्याचा इतिहास – Raigad Fort History in Marathi

रायगड हा शिवरायांचा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण 820 मीटर म्हणजे अंदाजे 2700 फुट उंचीवर आहे. मित्रांनो या रायगडाचे पूर्वीचे नाव तुम्हाला ठाऊक आहे? रायगडाला पूर्वी ‘रायरी’ म्हणून ओळखले जायचे. या किल्ल्यावर पोहोचण्या साठी आपल्याला जवळ-जवळ 1400 ते 1450 पायऱ्या चढून जाव्या लागतात.

महाराजांची राजधानी ठरलेला किल्ला रायगड – Raigad Killa chi Mahiti Marathi

यशवंतराव मोरे हा जावळीचा प्रमुख पळून रायगडा वर जाऊन राहीला होता, त्यावेळी 6 एप्रिल 1656 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला वेढा घातला. पुढे साधारण मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला. मुल्ला अहमद या कल्याणच्या सुभेदाराकडून जो खजिना लुटण्यात आला होता त्याचा उपयोग रायगडाच्या बांधकामाकरता करण्यात आला. आणि याचे मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर होते.

शत्रूला हल्ला करण्याकरता रायगड ही तशी अवघड आणि अडचणीची जागा असल्याने आणि समुद्रातून दळणवळणाच्या दृष्टीकोनातून रायगड सोयीचा असल्याने शिवरायांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड केली.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील याच रायगडावर झाला. रायगडाने अनुभवलेला हा सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच व्हावी अशी संस्मरणीय घटना होय.

रायगड किल्ल्याचे कौतुक करतांना महाराज त्यावेळी बोलले होते –

“दीड गाव उंच-देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा. पावसाळ्यात कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच, उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास देखील जागा नाही हे पाहून महाराज आनंदाने बोलले- तख्तास जागा हाच गड करावा.”

महाराजांचे निधन झाल्यावर पुढे साधारण सहा वर्ष रायगड हा स्वराज्याची राजधानी होता. महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील 16 फेब्रुवारी 1681 ला या रायगडावर झाला. 12 फेब्रुवारी 1689 ला राजाराम महाराजांचा देखील राज्याभिषेक रायगडाने पाहीला. सूर्याजी पिसाळ या फितूर झालेल्या किल्लेदारामुळे 3 नोव्हेंबर 1689 ला हा गड मोगलांच्या ताब्यात गेला.

पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत 5 जून 1733 ला रायगड पुन्हा एकवेळ मराठ्यांच्या ताब्यात आला. मात्र त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांच्या ताब्यातून हा गड हिसकावून हा गड लुटला. किल्ल्याची प्रचंड नासधूस केली, आग लावली परिणामी आज हा रायगड पडझडीच्या अवस्थेत उभा आहे.

Shivaji Maharaj Fort Raigad chi Mahiti

रायगडावर दोन मार्गांनी जातं येतं, खूबलढा बुरुज आणि दुसरा मार्ग म्हणजे नाना दरवाजा. रायगडाचा कठीण असा हिरकणी कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीची कथा देखील आपल्याला ठाऊक आहेच. रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज (Hirkani Buruj) असून उत्तरेकडे टकमक टोक आहे. श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी शिवछत्रपतींचा पुतळा हे इथलं सर्वात मुख्य आकर्षण.

रायगडाला आणखीन विविध नावांनी संबोधलं गेलं आहे…रायगड, रायरी, नंदादीप, तणस, इस्लामगड, जंबूद्वीप, राशिवटा, रायगिरी, भिवगड, शिवलंका, राहीर, पूर्वेकडील जिब्राल्टर, बदेनूर, राजगिरी, रेड्डी, शिवलंका.

रायगड बघण्याची इच्छा असणाऱ्यांकरता एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता 1500 पायऱ्या चढून गडावर जाण्याची गरज उरली नाही. या गडावर आता “रोप वे” ची सुविधा उपलब्ध आहे.

रायगडावर पहावी अशी ठिकाणं – Tourist Places near Raigad Fort

 • पाचाड येथील जिजाबाईंचा वाडा
 • खूबलढा बुरुज
 • नाना दरवाजा
 • मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा
 • चोरदिंडी
 • हत्ती तलाव
 • महादरवाजा
 • स्तंभ
 • गंगासागर तलाव
 • राजभवन
 • मेणा दरवाजा
 • राजसभा
 • राजभवन
 • श्री शिरकाईदेवी मंदिर
 • नगारखाना
 • बाजारपेठ
 • जगदीश्वर मंदिर
 • छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी
 • वाघदरवाजा
 • कुशावर्त तलाव
 • हिरकणी तलाव
 • टकमक टोक
 • वाघ्या कुत्र्याची समाधी

रायगडावर असलेली वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा नक्की पहावी अशीच आहे. नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड” असे म्हणतात. ही गुहा इतर ठिकाणी आढळणाऱ्या गुहांपैकी वेगळी असून पाचाड खिंडीतून इथवर चढून आलो की गुहेचे तोंड दिसते, या तोंडातून आत शिरलं समोरचे दृश्य आश्चर्य वाटावे असे असते.

दोन मोठ्या आकाराचे भोकं आपल्या नजरेस पडतात तेथपर्यंत गेलं की पाचाड येथील भुईकोट किल्ला, पाचाड गाव, आणि पाचाड ते पाचाड खिंडीकडे जाणारा घाटरस्ता आपल्या नजरेस पडतो. या गुहेत निरंतर येणारी थंड हवा आपला थकवा दूर करते. शाळा महाविद्यालायचे विद्यार्थी आणि हौशी पर्यटकांची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी विशेष गर्दी पहायला मिळते.

गडावर राहण्याची सोय – Hotels on Raigad Fort

रायगडावर रहाण्याची चांगली सोय असून या गडावर एक धर्मशाळा देखील आहे.

एक मोठा हॉल असून 7 ते 8 लहान खोल्या देखील आहेत. येथे राहण्याकरता कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

रायगड ला कसे जावे – How to reach Raigad Fort

मुंबई – गोवा मार्गावर महाड या बसस्थानकावरून रायगडाला जाण्याकरता बसेस असतात. बस स्थानकाबाहेर खाजगी जीप गाड्या असतात किंवा आपल्या वाहनाने देखील रायगडाला जाता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top