• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, August 15, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History Forts

भुईकोट किल्ला माहिती

Bhuikot Fort Solapur Information

इतिहास कालीन माहितीनुसार आपल्या देशाला अनेक शासकीय सत्तांचा वारसा हक्क लाभला आहे. त्यानुसार, पंधराव्या शतकादरम्यान दक्षिणेकडील भागात बहामनी शासकांचे राज्य होते. १५ व्या शतकाच्या शेवटी इ.स. १४८६ साली या बहामनी राज्याचे पाच राज्यात विभागणी करण्यात आली. त्यामुळे गोलकोंडा, विजापूर, बिदर, बेरार आणि अहमदनगर या नवीन पाच राज्यांची निर्मिती झाली. या पाच राज्याच्या एकत्रित समूहाला दक्षिणसल्तनत म्हणून ओळखलं जात असे. आज आपण या लेखात अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्याबाबत माहिती  जाणून घेणार आहोत,

अहमदनगर येथील भुईकोट किल्ला – Bhuikot Fort Information in Marathi

Bhuikot Fort Information in Marathi
Bhuikot Fort Information in Marathi

बहामनी राज्यातून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने इ.स. १४९० साली सीना नदीच्याकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. निजाम शासक मलिक अहमदशहा यांच्या नावावरून या शहराचे नाव अहमदनगर असे पडले.

इ.स. १४९४ साली अहमदनगर शहराची स्थापना पूर्ण झाल्यानंतर या शहराला निजामशहाणे आपली राजधानी बनवले. त्यावेळेस या शहराची तुलना कैरो, बगदाद यासारख्या समृद्ध शहरांसोबत केली जात असे.

निजामशाहीची राजधानी असलेल्या अहमदनगर या शहरात अहमदशहा, बुहार्णशहा आणि सुलतान चांदबीबी यासारख्या निजाम शासकांनी इ.स. १६३६ पर्यंत शासन केले. यानंतर दिल्ली येथील मुघल शासक बादशाहा शहाजहान यांनी इ.स. १६३६ साली दक्षिणेवर स्वारी करून निजामांची राजधानी असलेले अहमदनगर शहराला आपल्या ताब्यात घेतले.

यानंतर इ.स. १७५९ साली पेशव्यांनी या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. यानंतर देशांत व्यापाराच्या उद्देशाने आलेल्या इंग्रज सरकारने हे शहर इ.स. १८०३ साली आपल्या ताब्यात घेतले. अश्या प्रकारे या किल्ल्याला अनेक सत्तांचा वारसा लाभला आहे.

याचप्रमाणे, सन १९४२ साली महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारविरुद्ध पुकारलेल्या भारत छोडो आंदोल नाच्या वेळी आंदोलनातील सहभागी नेते पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, व डॉ. पी. सी. घोष यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना इंग्रज सरकारने या भुईकोट किल्ल्यात बंधिस्त ठेवले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांची रचना असलेल्या “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लिखाण नेहरूंनी याच किल्ल्यात पूर्ण केले होते. त्यांच्या या  ग्रंथाची काही हस्तलिखिते आज सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणे डॉ. प्रफुलचंद्र घोष यांनी “हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन” हा ग्रंथ याठिकाणी शब्दबद्ध केला.

किल्ल्याबाबत माहिती – Bhuikot Killa Information in Marathi

अहमदनगर शहराची स्थापना करण्याच्या उद्देशाने बादशाहा निजामशाहा यांनी याठिकाणी बांधलेला भुईकोट किल्ला हा आशिया खंडात असलेल्या मोठ्या किल्ल्यांपैकी एक असून सुमारे ८० मैल यार्ड परीघ या वर्तुळ आकारात किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलं आहे.

किल्ल्याच्या सर्वबाजूंनी खोल खंदक असून, खंदकाबाहेर उंच मातीच्या टेकड्या आहेत. यामुळे किल्ल्या बाहेरील शत्रूंच्या दृष्टीस सहजासहजी न पडण्याजोगे या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलं आहे.

किल्ल्याबाबत विशेषबाब सांगायची म्हणजे,  किल्ल्यावर असलेली बुरुज.  किल्ल्याला एकूण २२ बुरुज असून या बुरुजांचा वापर शत्रूंवर तोफा डागण्यासाठी केला जात असतं. याउलट किल्ल्या बाहेरील शत्रूंना बुरुजामध्ये असलेल्या शिपायांवर तोफा डागण अश्यक्य होत असे.

अहमद निजामशहा यांनी आपले कर्तबगार, व मुत्सद्दी प्रधान आणि सेनापती यांची नावे त्या बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केला असल्याचे दिसून येते. किल्ला वर्तुळाकार असण्यामुळे  किल्ल्याभोवती गोलाकार तटबंदी करण्यात आली आहे.

किल्ल्याला असलेल्या तटबंदीच्या आतील बाजूस ‘सोनमहल’, ‘मुल्क आबाद’, ‘गगन महल’, ‘मीना महल’, ‘बगदाद महल’  नाव असलेल्या एकूण सहा राजमहालांचे बांधकाम करण्यात आलं आहे.  तसचं, या इमारतींच्या मध्यभागी एका मदरसा देखील बांधण्यात आला होते. ज्यात राजघराण्यातील मुलांना शिक्षण दिल जात असे.

भुईकोट किल्ल्याच्या आत जणू छोटेखानी नाव असलेलं एक गावचं वासल होत. किल्ल्यात राहत असलेल्या लोकांना पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता किल्ल्याच्या आत ‘गंगा’, ‘यमुना’, ‘मछलीबाई’, ‘शक्करबाई’ नावाच्या चार विहिरी खोदण्यात आल्या होत्या.

निजामशाहीत बांधल्या गेलेल्या या किल्ल्याच्या आत मानवी जीवनावश्यक सर्व सुविधा उपलब्ध होत्या. त्याकाळातील हा एकमेव असा किल्ला होता ज्याचे बांधकाम जमिनीवर करण्यात आले होते.

भुईकोट किल्ला जरी जमिनीवर बांधला असला तरी तो जिंकण्यास खूप कठीण होता. त्यामुळे दगाबाजी करूनच काही जणांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.

किल्ल्यावर कसे जाल – How To Reach Bhuikot Fort

मनमाड- दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर हे शहर पडत असून या शहरात मध्य रेल्वेचे स्टेशन आहे.  शहराच्या पूर्व दिशेला गेल्यास आपल्या दृष्टीस भुईकोट हा किल्ला पडतो.

अहमदनगरहून भिंगारला जाणाऱ्या अहमदनगर पालिका परिवहनच्या बसने किंवा शहर रिक्षा करून आपण या ठिकाणी पोहचू शकता. अहमदनगर या शहरात भुईकोट किल्ल्या खेरीज रेणुकामाता मंदिर (केडगाव) व चांदबीबी महल अशी काही ऐतिहासिक स्थळे आहेत.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved