थोर स्वातंत्र्य सैनिक गोपाल कृष्ण गोखले यांचे जीवनचरित्र

Gopal Krishna Gokhale Information in Marathi

नमस्कार मित्रांनो. कसे आहात आपण सर्व. मला विश्वास आहे कि आमचे सर्व लेख तुम्हाला आवडले असतील. असाच एक महत्वाचा विषय घेऊन आज परत मी आपल्या सोबत हजर आहे. आज आपण थोर स्वातंत्र्य सैनिक गोपाल कृष्ण गोखले यांच्या जीवनचरीत्राबद्दल माहिती बघणार आहोत.

गोखले हे एकोणविसाव्या शतकातील उदारमतवादी विचारवंत होते. राजकीय व सामाजिक परिवर्तन घडवून आणतांना हिंसात्मक मार्गाला केलेला विरोध हे गोखलेंचे वैशिष्ट्य. महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून गोखले यांचा उल्लेख होतो. चला तर मग सुरु करूयात.

गोपाल कृष्ण गोखले यांचे जीवनचरित्र – Gopal Krishna Gokhale Information in Marathi

Gopal Krishna Gokhale Information in Marathi
Gopal Krishna Gokhale Information in Marathi

गोपाल कृष्ण गोखले यांच्याबद्दल – Gopal Krishna Gokhale Biography

नाव (Name) गोपाल कृष्ण गोखले
जन्म (Birthday) ९ मे १८६६
जन्मस्थान (Birthplace) कोथळूक, रत्नागिरी (बॉम्बे प्रेसिडेंसी)
वडील (Father Name) कृष्ण राव गोखले
आई (Mother Name) वालूबाई
शिक्षण (Education) १८८४ राजाराम उच्चविद्यालय, कोल्हापूर; एलफिस्टन महाविद्यालय, मुंबई
स्थापना भारत सेवक समाज (१९०५)
मृत्यु (Death) १९ फेब्रुवारी, १९१५

गोपाल कृष्ण गोखले यांचा इतिहास – Gopal Krishna Gokhale History

गोपाल कृष्ण गोखले (९ मे १८६६ – १९ फेब्रुवारी १९१५), हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक अतिशय महत्वाचे नेते होते. यांचा जन्म ९ में १८६६ साली कोथळूक, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण राव गोखले तर आईचे नाव वालूबाई होते. वडील एक साधारण शेतकरी होते. तसेच ते एका ठिकाणी नोकरी सुद्धा करत होते. तर आई हि सामान्य घरकाम करून आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी प्रेतीत करत होती.

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेले गोखले हे लहानपणापासूनच अगदी हुशार होते. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर, मोठे बंधू गोविंदराव यांनी गोखले यांच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण केली. आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी कागल येथे पूर्ण केले.

शिक्षण : Gopal Krishna Gokhale Education

उच्च शिक्षण राजाराम उच्चविद्यालय कोल्हापूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते मुंबई येथे गेले. १८८४ मध्ये बी. ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली. इतिहास विषयातील त्यांची रुची आणि त्यांचे शिकविण्याचे कौशल्य पाहून बाळ गंगाधर टिळक व गोपाल गणेश आगरकर यांनी गोखले यांना मुंबई स्थित डेक्कन एजुकेशन सोसायटी सोबत येण्याचे निमंत्रण दिले.

याच दरम्यान त्यांचा संपर्क न्या. म. गो. रानडे यांच्यासोबत झाला. रानडे हे न्यायाधीश तर होतेच सोबत ते विद्वान व समाजसुधारक सुद्धा होते. न्या. रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. गोखले यांनी त्यांना आपले गुरु मानले.

राजकीय कारकीर्द : Political Career

१८८९ मध्ये काँग्रेस च्या अलाहाबाद येथील अधिवेशनात त गोखले यांचा राजकीय प्रवेश झाला व येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. पुढे १९०२ मध्ये त्यांना इम्पिरियल लेजीस्लेटीव कौन्सिल चे सदस्य म्हणून निवडण्यात आले. १९०७ मधील काँग्रेस च्या सुरत अधिवेशनात काँग्रेस मध्ये फुट पडून जहाल आणि मवाळ असे दोन गट तयार झाले. यातील मवाळ गटाचे नेते म्हणून गोखलेंना ओळखल्या जाते.

भारतात इंग्रजांनी प्रस्थापीत केलेले कायद्याचे व सुव्यवस्थेचे राज्य, देशात केलेल्या अनेक सुधारणा व आधुनिक विचारांचे बीजारोपण या कारणांमुळे इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांचे धोरण मवाळ होते. सोबतच पाश्चिमात्य शिक्षणाला ते भारतासाठीचे वरदान मानत होते. ते भारताला जुन्या विचारांतून मुक्त करू पाहत होते. ६ वर्ष ते १० वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षण देण्याचा प्रस्ताव त्यांनी ब्रिटीश सरकारकडून पारित करून घेतला होता.

गोखले व टिळक याच्या राजकीय जीवनाची सुरुवात साधारणतः सोबतच झाली होती. त्यांच्या मध्ये खूप चांगले संबंध होते परंतु याच दरम्यान ब्रिटीश सरकारने ‘बाल विवाह’ विरुद्ध कायदा संमत केला. ज्यामुळे दोघांच्या विचारांत मतभेद झाले. एकीकडे भारतीय जनतेवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश सरकारला आपल्या क्रांतिकारी विचारांनी हाकलून लावण्याचा प्रयत्न टिळक करत होते.

तेच दुसरीकडे शांतता पूर्वक मार्गांनी स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न गोखले करत होते. दोघांचे लक्ष्य एकच होते फरक होता तो फक्त विचारांचा. नंतर १९१६ मधील कॉंग्रेसच्या लखनौ येथील अधिवेशनात जहाल आणि मवाळ गटात एकमत होऊन दोघेही एकत्र आले. १३ जून १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.

सोबतच केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद, भारताचे उच्चकोटीचे अर्थतज्ञ होते, थोर राजनैतिक अशी कितीतरी पदे गोखले यांनी भूषविली आहेत.

गोपाल कृष्ण गोखले व महात्मा गांधी : Gopal Krishna Gokhale and Mahatma Gandhi

Gopal Krishna Gokhale Images
Gopal Krishna Gokhale Images

महात्मा गांधी यांचे राजकीय मार्गदर्शक म्हणजे गोखले. गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतून भारतात येण्यासाठी गोखले यांनी प्रेरित केले. नवीनच बॅरिस्टर झालेल्या गांधीजींनी भारत आणि भारतीयांचे विचार समजून घेण्यासाठी गोखले यांचे मार्गदर्शन घेतले. परंतु असे असतांना सुद्धा गोखलेंद्वारा स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाज’ चे सदस्य होण्यासाठी गांधीजी तयार नव्हते.

वेस्टर्न इन्स्टीट्युशन च्या विचारावरून दोघांमध्ये मतभेद होते. ब्रिटीशांच्या सामाजिक सुधारणेच्या कार्यांतून स्वातंत्र्य मिळवणे हे गांधीजींना मान्य नव्हते. भारताचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी काही सूत्रे सांगितली होती ती खालीलप्रमाणे :

  • इंडियन फायनांस
  • डिसेन्ट्रालायजेशन ऑफ पॉवर
  • लँड रेवेन्यु
  • पब्लिक एक्सपंडीचार
  • एजुकेशन
  • ट्रेड

भारताचा हिरा म्हणून प्रसिद्ध असणारे गोखले हे आयुष्याच्या शेवटच्या काळात मधुमेह, दमा अशा अनेक आजारांनी ग्रस्त झाले होते. शेवटी १९ फेब्रुवारी १९१५ साली त्यांचा मृत्यु झाला. संपूर्ण आयुष्य राजकारणात व्यतीत करूनही कधीच राजकारण न करता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी आणि देशाच्या सेवेसाठी वेचले. आयुष्य संपल्या नंतरही स्मरणात राहणारे लोक खूप कमी असतात. त्यातीलच एक म्हणजे गोखले. त्यांनी केलेल्या कामांसाठी ते आजही आपल्याला माहित आहेत.

नेहमी विचारल्या जाणारे महत्वाचे प्रश्न :

१. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते?

उत्तर : गोपाल कृष्ण गोखले.

२. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी व कधी केली?

उत्तर : भारत सेवक समाजाची स्थापना गोपाल कृष्ण गोखले यांनी १९०५ मध्ये केली.

३. भारताचा हिरा म्हणून कोणाला संबोधण्यात येते?

उत्तर : गोपाल कृष्ण गोखले.

४. जहाल मतवादी नेते कोण होते?

उत्तर : बाळ गंगाधर टिळक, लाल लजपत राय व बिपीन चंद्र पाल यांना जहालमतवादी नेते म्हणून ओळखण्यात येते.

५. गोपाल कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या साली होते?

उत्तर : १९०५ सालच्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोखले होते.

६. लाल, बाल, पाल म्हणून कोणाला ओळखले जाते ?

उत्तर : लाल लजपत राय, बाळ गंगाधर टिळक व बिपीन चंद्र पाल.

७. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर : गोपाल कृष्ण गोखले.

८. गोपाल कृष्ण गोखले यांनी कोणाचे सल्लागार म्हणून भूमिका बजावली ?

उत्तर : महात्मा गांधी व मोहम्मद अली जिन्ना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here