मुंबई उपनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Mumbai Upnagar Mahiti

क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर!मुंबई हे शहर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा असे तयार झाले आहे.

शहराचे मर्यादित क्षेत्रफळ आणि औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टया मुंबई महत्वाचे असल्याने कालांतराने मंबई शहर आणि मुंबई उपनगर हे स्वतंत्र दोन जिल्हे आज अस्तित्वात आलेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Mumbai Suburban District Information in Marathi

Mumbai Suburban District

 

मुंबई उपनगर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Mumbai Upnagar Zilla Chi Mahiti

 • लोकसंख्या ९३,५६,९६२ (मिळालेल्या माहितीनुसार)
 • क्षेत्रफळ ३८६.५६ वर्ग कि.मी.
 • साक्षरता दर ८०.९६%
 • एकुण तालुके ३
 • एकुण गावं ८७
 • महत्वाच्या भाषा एकुण ४ ( मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी)
 • राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ या जिल्हयातुन गेले आहेत.
 • १ ऑक्टोबर १९९० ला मुंबई उपनगर या जिल्हयाची निर्मीती करण्यात आली.
 • या जिल्हयाचे अधिकार क्षेत्र बांद्रा ते बोरीवली, कुर्ला ते मुलुंड, व कुर्ला ते ट्रोम्बे पर्यंत मर्यादित आहे.
 • वाढत्या लोकसंख्येमुळे हा जिल्हा आता भारतातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधीक लोकसंख्येचा जिल्हा गणल्या जातो आहे.
 • मिठी नदी या शहरातील प्रमुख नदी आहे.

मुंबई उपनगर जिल्यातील पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit in Mumbai Upnagar

 • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान – Sanjay Gandhi National Park

आज सगळीकडे सिमेंटची जंगलं मानवानं त्याच्या गरजेकरता उभी केली आणि माणुसच त्यापासुन वैतागुन हिरवळ शोधायला निघतो तेव्हा परमेश्वराला म्हणावेसे वाटते अजब तुझी दुनिया!

हे सांगण्याचं तात्पर्य की मुंबईत जिकडे तिकडे सिमेंटची जंगलं उभी राहीली आहेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता माणुस निवांत जागा शोधतोय.

तर अशी निवांत जागा आणि निसर्ग तुम्हाला भेटतो तो बोरीवली मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात.

सुट्ठीच्या दिवशी मुंबईकर आणि पर्यटक या ठिकाणी वेळ घालवणे पसंत करतात

व्याघ्र सफारी, नौकाविहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान फिरवणारी ट्रेन, असं बरचं काही येथे आहे जे मोठयांसोबत लहानांना देखील आकर्षीत करतं.

व्याघ्र दर्शनाकरता येथे बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

येथे कान्हेरी लेण्या असुन त्या देखील पाहाण्यासारख्या आहेत, पुर्वी कान्हेरी लेण्यांमुळे याला काळा पहाड देखील म्हणत, कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशी ब.याचवेळा या उद्यानाची नावं बदलण्यात आली आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जवळजवळ ४० प्रकारचे सस्तन प्राणी असुन जमिनीवर आणि पाण्यात वावरणारे प्राणी देखील आहेत.

साधारण २५० प्रकारचे विविध रंगीबेरंगी पक्षी देखील येथे आपल्या दृष्टीस पडतात.

अनेक प्रकारची झाडे देखील येथे असुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाहाण्याची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० अशी आहे.

वननिवासाची देखील व्यवस्था येथे असुन विश्रामगृह देखील उपलब्ध आहेत.

 • जुहु बीच – Juhu Beach

जुहू हा परिसर श्रीमंतांचा परिसर म्हणुन मुंबईत ओळखला जातो.

अनेक मोठमोठया कलाकारांचे आणि निर्मात्यांचे या परिसरात बंगले पहायला मिळतात.

जुहु बीच हे फेमस पर्यटनस्थळ असुन दिवसभर हा बीच लोकांनी अगदी गच्च भरलेला पहायला मिळतो.

संध्याकाळी तर याला काही औरच रंग चढतो.

विशाल अरबी समुद्र आणि जुहु चैपाटी त्यामुळे येथे येणारे फार प्रसन्न आणि आनंदी वातावरणात आल्याचा अनुभव घेतात.

जुहु बीच वरची चौपाटी देखील चाट करता खुप प्रसिध्द आहे.

या सागरी किनाऱ्याला आपण अनेक चित्रपटांमधे देखील पाहिले आहे.

निर्माता दिग्दर्शकांकरता सुध्दा हा परिसर आवडीचा असुन चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रीकरण अनेकदा या ठिकाणी सुरू असल्याचे पहायला मिळते.

सकाळी सकाळी अनेक चित्रपट कलावंत या ठिकाणी मॉर्निंग वॉल्क करता देखील येत असतात.

मुंबई दर्शनाकरता आलेले पर्यटक आवर्जुन जुहु बीच वर येऊन या परिसराचा आनंद घेतल्याशिवाय माघारी परतत नाहीत.

 • महाकाली गुफा – Mahakali Caves

मुंबई सारख्या शहरात चोहोदुर आपल्याला सिमंेटच्या मोठमोठया ईमारती दिसतात आणि या इमारतींमधेच जवळजवळ २००० वर्षापुर्वीच्या गुफा देखील आहेत, असे जर मी तुम्हाला म्हंटले तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत होणार. पण हे खरे आहे येथे अंधेरी पुर्व भागात महाकाली गुफा म्हणुन आजही पाहाता येतात.

प्रसिध्द गितकार जावेद अख्तर असं म्हणतात की त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी बराच काळ या गुफामधेच काढला.

अनेक बौध्द भिक्खु या ठिकाणी वास्तव्याला होते, फार पुर्वी हा बौध्द बांधवांचा मठ होता.

अजिंठा वेरूळ सारख्या या गुफा फार विशाल नाहीत तरी देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र आहे.

अनेक पौराणिक बौध्द कथा या ठिकाणी कोरण्यात आल्या आहेत, आत मधे प्रार्थना घर आणि कक्ष आहेत जेथे बौध्द भिक्षुंचे वास्तव्य होते, १९ गुफा मिळुन या गुफा बनविण्यात आल्या आहेत.

साधारण १ ल्या शतकापासुन ते सहाव्या शतकापर्यंत या गुफांची निर्मीती करण्यात आली आहे.

मधल्या गुफेत एक मोठे शिवलिंग बनविण्यात आले आहे या शिवलिंगावर नाणं चिटकवण्याची देखील प्रथा आहे ज्याचे नाणे चिटकले त्याच्या ईच्छा पुर्ण होतात अशी येथील मान्यता आहे.

येथील भिंतींवर अनेक देवीदेवतांचे चित्र देखील काढण्यात आले आहे. ९ वी महाकाली गुफा सर्वात मोठी आहे, या ठिकाणी बौध्द पौराणिक कथा देखील कोरलेल्या आपल्याला दिसतात आणि बुध्दाचे ७ चित्र देखील काढण्यात आले आहे.

सिमेंट च्या जंगलात जर कधी श्वास घुसमटलाच तर नक्की या महाकाली गुफा पाहाण्याकरता वेळ काढा,या गुफांवरून शहराचे विहंगम चित्र नजरेत मावत नाही.

 • मुंबई फिल्म सिटी – Mumbai Film City 

भारतीय चित्रपट उद्योग जगातला सर्वात मोठा उद्योग असुन मुंबई फिल्म सिटी मुंबईतील गोरेगाव भागात दिमाखात उभी आहे.

या ठिकाणी अनेक चित्रपटांचे, मालिकांचे चित्रीकरण सुरू असते.

मुख्यत्वे करून या ठिकाणी मराठी आणि हिंदी भाषेतील मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण होते.

भारतीय चित्रपटांची मागणी विशेषतः दक्षिण पुर्व आणि दक्षिण आशिया येथील देशांमधे अधिक प्रमाणात होत असते.

फार लोकप्रीय माध्यम असल्यामुळे सर्वच भाषा मिळुन जवळजवळ १००० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मीती होत असते.

या फिल्म सिटी ला दादासाहेब फाळके चित्रनगरी असे नाव देण्यात आले असुन दादासाहेबांनी पहिला चल चित्रपट तयार केला होता त्याचे नाव राजा हरिश्ंचद्र.

त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या फिल्म सिटी चे नाव दादासाहेब फाळके चित्रनगरी असे ठेवण्यात आले आहे.

मुळात भारतीय असुन आता कामामुळे विदेशात स्थायिक झालेल्यांमुळे भारतीय सिनेमाला विदेशात मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे.

या चित्रनगरीने अनेक कलाकार जन्माला घातले असुन हजारो हातांना या फिल्म सिटी मुळे काम मिळाले आहे.

 • छोटा कश्मीर गोरेगांव – Chota Kashmir Goregaon 

गोरेगाव पश्चिम ला आरे कॉलनी येथील छोटा कश्मीर गार्डन फार लोकप्रीय असुन येथे निवांत वेळ घालवण्याकरता मुंबईकर आणि पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात.

सर्वदुर हिरवळ येथे आपल्याला पहायला मिळते,कुटुंबासोबत एक दिवसाची सहल या ठिकाणी नक्कीच होऊ  शकते, हा परिसर पिकनीक स्पॉट असुन त्या दृष्टीकोनातुन येथे सुरक्षीतता देखील ठेवण्यात आली आहे अनेक शाळा देखील विध्यार्थ्यांना या ठिकाणी सहलीकरता आणत असतात.

येथील हा रंगीबेरंगी फुलांचा बगीचा कश्मीरची आठवण करून देतो म्हणुनच या ठिकाणाला छोटा कश्मीर देखील म्हंटल्या जातं.

गार्डन मधे वेगवेगळया आकारात कापलेली झाडं आपल्या दृष्टीस पडतात, मोठमोठी नारळाची झाडे देखील या ठिकाणी आहेत.

संपुर्ण परिसर हिरवाईने नटला असुन या गार्डनची व्यवस्था देखील चांगली ठेवण्यात आली आहे.

या गार्डन च्या बाहेर मोठा तलाव असुन येथे बोटींग ची व्यवस्था आहे त्यामुळे पर्यटक मोठया प्रमाणात येथे नौकाविहाराचा आनंद घेतांना आपल्याला दिसतात.

 • बांद्रा वरळी सी लिंक – Bandra–Worli Sea Link

बांद्रा आणि वरळीला जोडणारा समुद्रातला रस्ता असे जरी याला आपण म्हणत असु तरी देखील हा रस्ता बनणं म्हणजे भारताकरता एक इतिहास रचण्यासारखंच आहे.

बांद्रा वरळी सी लिंक म्हणजे शिवधनुष्य पेलण्याएवढंच कठिण काम पण ते इंजिनियर्स लोकांनी आणि दृढ ईच्छाशक्ती असलेल्या नेतेमंडळींनी प्रत्यक्षात उतरवलं.

जो रस्ता पार करण्याकरता ८ कि.मी. प्रवास करावा लागायचा तो आता अवघ्या ४ कि.मी. मधे पुर्ण होऊ  लागला आहे.

दोन चाकी वाहनाकरता मात्र या ठिकाणी बंदी असुन केवळ चार चाकी वाहनं या रस्त्यावरून धावु शकतात आणि त्यांना देखील ५० कि.मी. वेगापेक्षा कमी स्पीडने वाहन चालवण्यास या ठिकाणी बंदी आहे.

बांद्र वरळी सी लिंक म्हणजे एक अजुब्यापेक्षा कमी नाही. अनंत अडचणींवर मात करत हा समुद्रातील महामार्ग बनविण्यात आला आहे.

तर हि होती मुंबई उपनगराची संपूर्ण माहिती आशा करतो आपल्याला आवडली असेल आवडल्यास या माहिती ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

relevant tag: Mumbai Upnagar Zilla Chi Mahiti, Mumbai Upnagar District Information In Marathi, Mumbai Upnagar Mahiti.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here