भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक…दादासाहेब फाळके

  Dadasaheb Phalke Marathi Mahiti 

मंडळी भारतीय चित्रपटांना मानवी मनाचा आरसा म्हंटल्या गेलं आहे. सुख-दुःख, आनंद, रहस्य, सूड, प्रेम, भय, या मानवीय भावना चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात येतात आणि त्यामुळे माणसाला चित्रपटाचं माध्यम अधिक जवळचं वाटतं.

भारतीय चित्रपट आपल्यापर्यंत कसा आला हे तुम्हाला माहितीये का? जो चित्रपट आज सिनेमा गृहात जाऊन सहजतेने आणि आनंदाने हौस म्हणून आपण पाहतो आहोत तो आपल्यापर्यंत आणण्याचे श्रेय जाते ते चित्रमहर्षी दादासाहेब फाळके. यांना भारतीय चित्रपट बनविण्याचे स्वप्नं उघड्या डोळ्यांनी पाहून ते सत्यात उतरविण्याची धडपड त्यांनी केली नसती तर आज निखळ आनंद देणाऱ्या या माध्यमाला आपण मुकलो असतो.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक…दादासाहेब फाळके – Dadasaheb Phalke Information in Marathi

Dadasaheb Phalke Information in Marathi 
Dadasaheb Phalke Information in Marathi

दादासाहेब फाळके यांच्याविषयी संक्षिप्त माहिती – Dadasaheb Phalke Biography in Marathi

नाव (Name)  धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके
जन्म (Birthday) 30 एप्रिल 1870 त्र्यंबकेश्वर (नाशिक) महाराष्ट्र
मृत्यू (Death) 16 फेब्रुवारी 1944 नाशिक, महाराष्ट्र
वडील (Father) दाजीशास्त्री
आई (Mother) द्वारकाबाई
पत्नी (Wife) सरस्वतीबाई
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रमुख चित्रपट   राजा हरिश्चंद्र

दादासाहेब फाळके यांचे योगदान – Dadasaheb Phalke Career

भारतीय चित्रपट कलेला वैभव मिळवून देणाऱ्या दादासाहेब फाळकेंना भारतीय चित्रपटांचा जनक मानल्या जातं. 1913 साली त्यांनी तयार केलेला पहिला मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे. आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी 95 चित्रपटांची आणि 26 लघुपटांची निर्मिती केली.

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील योगदानाबद्दल बहाल करण्यात येतो.

दादासाहेब फाळके यांचे प्रारंभिक जीवन – Dadasaheb Phalke History in Marathi

दादासाहेब फाळकेंचा जन्म 30 एप्रिल 1870 ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं झाला. वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते. दादासाहेबांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे 1885 साली प्रवेश घेतला. 1890 मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर बडोदा गाठले आणि शिल्पकला, चित्रकला, तंत्रज्ञान, रेखाटन, छायाचित्रण या कला आत्मसात केल्या.

काही काळ गोध्रा इथं छायाचित्रकार म्हणून व्यवसाय केला परंतु त्याठिकाणी आलेल्या भयंकर अश्या प्लेग च्या साथीनं त्यांच्या पत्नी आणि लहान बाळाचा जीव गेल्यानं त्यांना गोध्रा सोडावं लागलं. काही काळ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यात त्यांनी नौकरी देखील केली. परंतु मूळ स्वभाव धडपड्या असल्यानं त्याचं मन जास्त काळ नौकरीत रमलं नाही.

पुढे त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरु केला. छपाई तंत्रज्ञानात त्यांना चांगली गती होती. राजा रविवर्मांसोबत देखील दादासाहेबांनी काम केलं. पुढे या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याकरता ते जर्मनीला जाऊन आले. छपाई व्यवसायात जम बसविण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचे आपल्या इतर सहकाऱ्यांशी वाद झाले आणि त्यांनी छपाई व्यवसाय सोडला.

पुढे एकदा लाईफ ऑफ ख्रिस्त हा चित्रपट त्यांच्या पाहण्यात आला. आणि तेथून त्यांच्या जगण्याची दिशाच बदलली. दादासाहेबांनी चल चित्रपट बनविण्याचा ध्यास घेतला आणि अथक प्रयत्नांनी 1912 साली पहिला भारतीय  मूक चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ काढला. हा चित्रपट मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपट गृहात पहिल्यांदा प्रदर्शित झाला.

दादासाहेबांना लाभली पत्नीची मोलाची साथ – Dadasaheb’s Wife Information  

दादासाहेबांच्या या धडपडीमागे त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई (दुसरी पत्नी) यांची मोलाची साथ होती. आपल्या पतीचे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी सरस्वतीबाईंनी आपले दागिने देखील विकले. चित्रपटाशी संबंधित लोकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, शिवाय हे करून चित्रपटाशी संबंधित एडिटिंग, मिक्सिंग, फिल्म डेव्हलपिंग, कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या.

रात्री सर्व मंडळी झोपल्यानंतर त्या चित्रपटाशी संबंधित समस्यांवर आपल्या पती आणि इतर सहकाऱ्यांसमवेत होणाऱ्या चर्चेत देखील सहभागी होत. सरस्वती बाईंच्या सहकार्याशिवाय हा चित्रपट तयारच होऊ शकला नसता.

दादासाहेब फाळके यांनी तयार केलेले चित्रपट – Dadasaheb Phalke Movies

  • राजा हरिश्चंद्र (ई.स. 1913)
  • मोहिनी भस्मासुर (ई.स. 1913)
  • सावित्री सत्यवान (ई.स. 1914)
  • श्रीकृष्णजन्म (ई.स. 1918)
  • कालिया मर्दन (ई.स. 1919)
  • सेतुबंधन (ई.स. 1932)
  • गंगावतरण (ई.स. 1937)

दादासाहेब फाळके यांना मिळालेला सन्मान – Honor received by Dadasaheb Phalke

दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ मुंबईतील फिल्मसिटी ला दादासाहेब फाळके चित्रनगरी असे नाव देण्यात आले आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार – Dadasaheb Phalke Award

“दादासाहेब फाळके पुरस्कार” हा भारतीय चित्रपट सृष्टीत असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत आणि तंत्रज्ञांना भारत सरकारच्या वतीनं दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1969 या दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिल्या जात आहे. भारत सरकारच्या माहिती आणि नभोवाणी खात्यातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येतो.

दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर चित्रपट – Dadasaheb Phalke Movie Harishchandrachi Factory

दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर हरिश्चंद्राची फैक्ट्री’ हा चित्रपट बनविण्यात आलाय.

दादासाहेब फाळके स्मारक – Dadasaheb Phalke Memorial

नाशिक येथे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पांडवलेणी च्या पायथ्याशी फार मोठे स्मारक उभारण्यात आले असून या ठिकाणी गाण्यांच्या तालावर नाचणारी कारंजी असून चित्रपट सृष्टीशी संबंधित मोठे संग्रहालय देखील आहे आणि खुला रंगमंच देखील तयार करण्यात आला आहे.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here