• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Essay

स्वातंत्र्य दिनाविषयी निबंध – Independence day Essay in Marathi

Swatantrata Diwas Nibandh in Marathi

१५ ऑगस्ट हा दिवस आपण सर्व भारतीयांना परिचित आहे. कारण, या दिवशी आपल्या देशाला इंग्रजाच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं होत. इंग्रज सरकारने सुमारे १५० वर्ष शासन केल्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य दिल होत. त्यामुळे आपल्या देशाला बराच काळ गुलामगिरीत रहाव लागलं. या काळादरम्यान इंग्रज सरकारने देशांतील नागरिकांवर अनेक प्रकारचे अन्याय केले.

देशातील नागरिकांना विनाकारण त्रास देत त्यांना तुरुंगात डांबले. देशांतील नागरिकांना विदेशातून आणलेल्या मालाचा वापर करण्याची सक्ती केली. त्यामुळे देशांतील कारागीर बेकार झाले. अश्या प्रकारचे अनेक अन्याय त्यांनी आपल्या देशांतील नागरिकांवर केले  होते.

मंगल पांडे या महान क्रांतीकारकानी देशाला इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त करण्याच्या उद्देश्याने पुकारलेल्या स्वातंत्र्य लढ्यामुळे देशांतील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. यानंतर देशांत अनेक महान क्रांतिकारक घडले ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते. या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता दिलेल्या बलिदानामुळेच आपला देश इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त होवू शकला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य खूपच महान आहे. आज आपण या देशांत मुक्त संचार करू शकतो ते केवळ आपल्या देशांतील स्वातंत्र्य सैनिकांमुळे.  त्यांच्यामुळेच आज आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत असतो. या दिवसानिमित्ताने देशांतील सर्व शासकीय व निमशासकीय स्थळी झेंडावंदन करून झेंड्याला मानवंदना दिली जाते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या कार्याला उजाळा दिला जातो. ज्यामुळे  देशांतील नवयुवकांना प्रेरणा मिळते.

शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी झेंडावंदन करून भाषण व गीतांचे आयोजन करण्यात येते. तसचं, या दिवशी निबंध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते. आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून “स्वातंत्र्य दिन” या विषयावर आधारित निबंधाचे लिखाण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांना त्यांच्या शालेय परीक्षेत बऱ्याच वेळा या विषयावर निबंध लिहायला सांगत असतात.

“स्वातंत्र्य दिन’ या विषयावर निबंध लिहणे जरी सोपे असले तरी सुद्धा, निबंध लिहितांना त्यांत ठळक मुद्द्यांचा उच्चार करणे खूप महत्वाचे असते. ज्यामुळे आपल्या निबंधाचा भाव समोरच्या व्यक्तीला स्पष्ट दिसतो.

बरेच विद्यार्थी निबंध लिहायला सुरुवात करतांना विषयाला अनुसरून निबंध लिहायला सुरुवात करतात. परंतु निबंध लिहायला सुरुवात करण्याआधी जर आपण एखादी देशभक्ती घोषणा लिहून निबंधाला सुरुवात केली तर निबंध उठून दिसेल. शिवाय, आपल्या निबंधाला उत्तम गुण देखील मिळतील.

तसचं, आपण निबंधाच्या मध्ये मध्ये देशभक्ती कवितांच्या चारोळ्यांचा सुद्धा वापर करू शकतो. मित्रांनो, या निबंधात लिखाण करण्यात येत असलेल्या ठराविक मुद्द्यांचा वापर तुम्ही तुमच्या निबंधात करून स्वत:च्या शब्दांत निबंधाचे लिखाण करू शकता.

स्वातंत्र्य दिनाविषयी निबंध – Independence day Essay in Marathi

Independence-Day
Independence day Essay in Marathi

स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी सर्व भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करतात. आपल्या भारत देशाचा एक प्राचीन गौरवशाली इतिहास आहे. अत्यंत कठोर संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लाल किल्ल्यावर प्रथमच आपल्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रध्वज फडकविला.

सर्व जाती, धर्म आणि पंथांचे लोक हा दिवस मोठ्या आनंदाने साजरे करतात. स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक सभा घेतात. तिरंगा फडकविला जातो आणि राष्ट्रगीत (जन गण मन) गायले जाते. भारताच्या राजधानीत, लाल किल्ल्यासमोरील परेड मैदानावर लोक मोठ्या संख्येने जमा होतात. परराष्ट्रदूत व मान्यवरही या सोहळ्यात सहभागी होतात.

भारताचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात. 21 तोफांचा सलाम देण्यात येते. या वेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते. पंतप्रधानांच्या भाषणानंतर हे कार्य आपल्या राष्ट्रगीताने संपते.

भारताच्या स्वातंत्र्य दिनी आपण सर्व महान व्यक्तींची आठवण करतो ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शाळा व महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. जिथे बर्‍याच उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांद्वारे केले जातात. भारताचा स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर स्मरण आणि उपासना करण्याचा दिवस आहे.

देशाच्या सेवेसाठी आपले प्राण सोडणाऱ्या आपल्या हुतात्म्यांना आठवण ठेवण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा दिवस आहे.  आम्ही आमच्या आनंद, कल्याण आणि सुरक्षिततेच्या किंमतीवर आमचे रक्षण करणार्‍या सशस्त्र दलाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि स्वातंत्र्य दिन अशा प्रकारे साजरा करतो.

आपला हा देश भरभराट व्हावा ही आम्ही मनापासून प्रार्थना करतो.

।।“जय हिन्द वंदेमातरम्” ।।

Editorial team

Editorial team

Related Posts

Holi Essay in Marathi
Marathi Essay

“होळी” या सणावर निबंध

  Essay on Holi in Marathi होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या...

by Editorial team
March 16, 2022
Essay on Cricket in Marathi
Marathi Essay

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in...

by Editorial team
June 1, 2021
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved