लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi

Lokmanya Tilak Speech

लोकमान्य टिळकांनी सन् 1917 मधे नाशिक मधील होम रूल लीग स्थापनेच्या पहिल्या स्थापना दिवसा निमीत्त भाषण दिले होते. त्याच भाषणास आम्ही घेउन आलो आहोत.

Lokmanya tilak speech

लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण – Lokmanya Tilak Speech in Marathi

मी स्वभावाने तरूण आहे. जरी माझे शरीर वृध्द झाले असले तरी आत एक तरूण अजूनही जगतो आहे. जे काही मी आज बोलत आहे ते माझ्यातील तरूणास वाटत आले आहे. शरीर जरी क्षीण आणि कमजोर आणि नाशवंत असू शकते परंतू शरीरात वास करणारा आत्मा नेहमी तरूण असतो याच प्रकारे आपले स्वराज्यामधील क्रियाकरणात नक्कीच गती मंद होईल तेव्हा आपल्या अंतरआत्म्याची स्वतंत्रता शाश्वत आणि अविनाशी न राहता तीचे दमन होईल आणि आपण स्वतःस गुलाम समजू.

स्वतंत्रता आपला जन्मसिध्द अधिकार आहे जेव्हा पर्यंत ही माझ्यात जिवंत आहे मी म्हातारा होणार नाही. स्वतंत्रता हया भावनेस कोणी हत्याराने कापू शकत नाही अग्नीने जाळू शकत नाही तर पाण्यात बूडवूही शकत नाही. कोणी हवेत उडवू शकत नाही. आपण आपले स्वराज्य मागतो आहे आणि आपण यास नक्कीच प्राप्त करू.

राजकारणाचे विज्ञान हेच आहे की जे स्वराज्याने प्राप्त होते ते गुलामगिरीने प्राप्त होत नाही. राजकारणाचा उत्कर्ष हा देशाचा आधार आहे. मला तुमच्यातील आत्मा जागृत करायचा आहे. जो या देशाच्या राजकारणाच्या उत्कर्षातून निर्माण होईल.

मला या अंधविश्वासाला नष्ट करायचे आहे. जो गुलामगिरीमूळे तुमच्या आत्म्यावर बसला आहे हा अंधविश्वास तुम्हाला अज्ञानी धूर्त आणि स्वार्थी लोकांकडून पिडा आणि कष्ट देत आहे. राजकारणाच्या विज्ञानाचे दोन भाग आहेत एक ईश्वरीय आहे आणि दुसरा असूरी निर्मीत आहे. कोणत्याही राष्ट्राची गुलामगिरी असूरी निर्मीत असते. या दृष्ट भागाचा सद्कार्याशी कोणताच संबंध नसतो.

जे राष्ट्र यास योग्य ठरवतो तो ईश्वराच्या कोपाचा भाग ठरतो. जे असुरी निर्मीत राजकारणास साहसाने अमान्य करतात तर काही यासाठी साहसही करू शकत नाहीत त्यांना आपल्यासाठी हानिकारक गोष्टीची घोषणा ही करता येत नाही.

राजनैतिक आणि धार्मिक शिक्षण याच सिध्दांताचे ज्ञान देण्यास सक्षम आहेत परंतू तरीही याबाबत योग्य शिक्षण सामान्यांना देत नाहीत.

स्वराज्याचा अर्थ कोण नाही जाणत कोणास ते हवे हवेसे वाटत नाही. जर मी तुमच्या घरी पाहुणा म्हणून येउ आणि तुमच्या घरी कायमचा राहण्यास अडून बसू आणि तूम्ही विरोध केल्यास त्यास न जुमानता मी ठाम राहीलो तर काय परिस्थिती होईल? काहींच्या मते आपणा सर्वांना स्वराज्याचा अधिकार नाही एका शतकाच्या कालावधी नंतर ही आपल्यावर राज काध्ससो इंग्रज म्हणतात आजही तूम्ही स्वराज्याच्या लाईकीचे नाहीत.

ठीक आहे, मग आपण त्याच लाईकीसाठी स्वतःला प्रबळ बनवूया. आपल्या देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे त्यांना लाजीरवाणे वाटते. इंग्लंड सरकार भारतीय जवानांच्या मदतीने बेल्जीयम सारख्या छोटया राज्यास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मग हा काय लाजीरवाणा प्रकार नाही? जे लोक आपल्या मागण्यांमागे निरर्थक बोलतात त्यात त्यांचा कोणता तरी स्वार्थ असावा असे लोक ईश्वरातही दोष शोधतात.

आपण सर्वांनी देशाच्या आत्म्यास पारतंत्र्यापासून वाचवायला हवे, आपणा सर्वांना कठीण परिश्रम करावे लागतील आपल्या देशाची रक्षा करणे हा आपला जन्मसिध्द अधिकार आहे काॅंग्रेस पक्षाने स्वराज्य प्राप्तीचा प्रस्ताव पारित केला आहे.

व्यवहारीक राजकारणात स्वराज्याचा अधिकार मागण्याच्या ईच्छेचा प्रतिकार करणारे काही स्वार्थी भारताच्या काही समस्यांचा दाखला देणारे समस्यांना पुढे करून त्यांचा स्वार्थ साधत आहेत. निरक्षरता ही एक अशीच समस्या आहे परंतू आपण सर्वांनी मिळून ती दूर करता येते. ध्यानात ठेवा की या समस्या सर्वांना सोबत मिळूनच दूर करता येतात आपल्यासाठी याचे समाधान आहे की निरक्षरांच्या मनात ही स्वराज्यासाठी उत्कट ईच्छा आहे जी आपण सर्वांची ताकद बनू दया. जे लोक आपले काम सहजतेने निपटून पूर्ण करतात ते निरक्षर असू शकतात परंतु मुर्ख नाही. ते तितकेच बुध्दिजीवी असू शकतात जितके शिक्षित लोक.

स्वराज्य मिळविणे हा इतका कठीण मामला नाही त्यामुळे स्वराज्यासाठी निरक्षरता कधीच समस्या बनू शकत नाही. अशिक्षीत देशवासी या देशाच्या स्वराज्यासाठी नक्कीच हितकारी आहेच. त्यांना इतकाच अधिकार आहे जितका इतर जे स्वतःस सभ्य समजतात.

परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही आज सर्वत्र एकच आवाज गंुजतो आहे. आता नाहि तर कधीच नाही. त्यामुळे या ईश्वराने दिलेल्या संधीचा आपण नक्कीच फायदा घेणार आहोत आपण आपले सर्व प्रयत्न त्याच्या उच्चांकास नेउ. आत्मविश्वास हा आपल्या सर्वांचा एक महत्वाचा आधार आहे त्यामुळे आपण सर्व प्रयत्न करू या . . . . .

जरूर वाचा: 

Please: आम्हाला आशा आहे की हा लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण – Lokmanya Tilak Speech in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट: Lokmanya Tilak Speech – लोकमान्य टिळकांचे भाषण  या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

2 thoughts on “लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top