Sunday, December 10, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

शूरवीर मराठा योद्धा शहाजी राजे भोसले

Shahaji Raje Bhosale Mahiti

शहाजी राजे भोसले यांना आपण सगळे सन्मानार्थ शहाजी महाराज असे म्हणतो. महाराज वेरूळच्या राजांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते.

शूरवीर मराठा योद्धा शहाजी राजे भोसले – Shahaji Raje Bhosale History in Marathi

Shahaji Raje Bhosale

शहाजी राजे भोसले यांची माहिती – Shahaji Raje Bhosale Information in Marathi

शहाजी राजे भोसले हे मराठा योद्धा मालोजी भोसले यांचे पुत्र.

मालोजी राजे हे अत्यंत सक्षम आणि शूर सरदार म्हणून परिचित होते आणि म्हणून त्यांना सेनापती बनविण्यात आले तसेच  पुणे आणि सुपेची जहागिरी देखील बहाल करण्यात आली होती.

तेंव्हा मालोजी भोसले अहमदनगर येथील निजामाच्या दरबारातील सदस्य होते. मालोजी राजेंना बरीच वर्ष मुलबाळ नव्हते. पुढे त्यांना दोन मुलं झाली.

आपल्या मुलांची नावं मालोजीनी शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली.

शहाजी राजे लहान असतांना त्यांचा विवाह जिजाबाईंशी झाला.

जिजाबाई या लखुजी जाधवांची कन्या!

लखुजी जाधव अहमदनगर येथील निजाम शहाचे मराठा सरदार होते.

मोगलांचा ज्यावेळी दक्षिणेवर हल्ला करण्याचा मनसुबा होता त्यावेळी शहाजी राजे काही काळ मोगल सैन्यात कर्तव्यावर होते.

तेंव्हा मोगल साम्राज्यावर बादशहा शहाजहाचे शासन होते.

ज्यावेळी शहाजी राजांकडून त्यांची जहागिरी काढून घेण्यात आली तेंव्हा त्यांनी 1632  साली विजापूर च्या सुलतानाच्या मदतीने पुणे आणि सुपे ची जहांगिरी परत मिळविली.

विजापूर ने ज्यावेळी केम्पे गोडा 3 वर हल्ला केला तेंव्हा शहाजी राजांना 1638 मध्ये बंगलोर ची जहांगिरी देखील मिळाली.

त्यानंतर ते विजापूर चे प्रमुख झाले होते.

महुली किल्ल्यात असतांना एकदा शहाजी राजांना चारी बाजुंनी घेरण्यात आले होते, त्यावेळी मोगलांच्या ताकदीपुढे पोर्तुगीज देखील नमले होते आणि त्यांनी समुद्री मार्गाने शहाजी राजांना सहाय्य केले नाही.

शहाजी राजे पराक्रमी आणि निर्भय योद्धा होते त्याहून अधिक ते एक समंजस व्यक्तिमत्वाचे धनी होते.

शहाजी राजांनी या युद्धात अखेरपर्यंत लढा दीला, त्या युद्धात सर्व मनाप्रमाणे घडत असतांना अचानक मोगलांनी निजामाच्या मोर्तजा या लहान मुलाचे अपहरण केले व त्याला परत करण्याच्या अटीवर संपूर्ण निजामशाही राज्याची मागणी केली.

त्या मुलाकरता शहाजी राजांनी मोघलांना संपूर्ण राज्य देऊ केले आणि निजामाच्या मुलाचे प्राण वाचविले.

Shahaji Raje Bhosale Mahiti

यामुळे संपूर्ण निजामशाही संपुष्टात आली होती.

कुठल्याही परिस्थितीत शहाजी राजांना छोट्याश्या मोर्तजाचे प्राण वाचवायचे होते म्हणून त्यांनी संपूर्ण निजामशाही शहाजहाच्या सुपूर्द केली.

आपल्या करता शहाजी राजे कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न करू नये यासाठी शहाजहाने जाणीवपूर्वक त्यांना दक्षिणेत पाठविले.

परंतु तेथे देखील शहाजी राजांनी आपल्यातील कौशल्याने आदिलशाहीत उच्च पद प्राप्त केले.

शहाजी राजांना बंगळूरूला पाठविण्यात आले, ते त्या ठिकाणची जहांगिरी सांभाळीत होते. शहाजी राजांच्या आयुष्यातील हा देखील एक काळ होता.

1638 साली विजापूर सैन्याचे नेतृत्व करतांना रानादुल्ला खान आणि शहाजी राजांनी केम्पे गोडा 3 ला युद्धात पूर्णता पराजित केले.

त्यानंतर शहाजी राजांना बंगलोर ची जहांगिरी बहाल करण्यात आली.

स्वतःच्या नेतृत्वात शहाजी राजांनी अनेक युद्ध लढली आणि दक्षिणेकडील अनेक राजांना युद्धात मात दिली.

शहाजी राजांनी युद्धात मात दिलेल्या राजांना दंड अथवा देहदंड न देता सर्वांना माफ केले व त्यांच्यासमवेत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून वेळ पडल्यास त्यांच्याकडून  लष्करीसैन्याची मदत घेण्याचे आश्वासन प्राप्त केले.

बंगलोर येथून पुढे शहाजी राजांच्या जीवनाची वेगळी सुरुवात पाहायला मिळते. पत्नी जिजाबाई आणि लहानश्या शिवाजीला त्यांनी पुण्याची जहांगिरी संभाळण्याकरता पुणे येथे पाठविले.

Shahaji Raje Bhosale History

शहाजी राजांवर सुलतानाचा पूर्ण विश्वास होता. शहाजी राजांना ते राज्याचा आधार मानीत असत, परंतु काही काळ लोटल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुण्याच्या आजूबाजूस ज्या प्रदेशावर आदिलशहाचे नियंत्रण होते तो प्रदेश काबीज करण्यास सुरुवात केली.

शिवाजी महाराजांचे कारनामे पाहून आदिलशहाने शहाजी राजांना फसवून बंदिस्त केले.

त्यावेळेस त्याला वाटले कि शिवाजी हे सर्व शहाजी राजांच्या सांगण्यावरूनच करीत आहे.

आदिलशहाने शिवाजी महाराजांना आणि त्यांचे भाऊ संभाजी महाराजांना नियंत्रणात ठेवण्यासाठी दोनदा त्यांच्यासमवेत युद्ध केले पण शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या सैन्याला युद्धात पूर्णपणे हरविले होते.

काही काळानंतर आदिलशहाने शहाजी राजांना बंदिवासातून मुक्त केले.

एका युध्दा दरम्यान अफजल खानाने केलेल्या विश्वासघातामुळे शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी मारल्या गेला.

तेंव्हा स्वतः शिवाजी महाराजांनी अफजल खानास यमसदनी पाठविले.

सुरुवातीच्या काही युद्धांमध्ये शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना सर्वतोपरी मदत केली.

विशेषतः अफजल खाना विरुद्ध झालेल्या युद्धात शहाजी राजांनी स्वतः शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन केले होते.

पुढे 1665 मध्ये घोड्यावरून पडल्याने शहाजी राजांचा मृत्यू झाला.

पराक्रमी…निडर…शूरवीर शहाजी राजांनी भोसले घराण्याचे नांव मोठ्या उंचीवर पोहोचविले  तंजोर, कोल्हापूर, आणि साताऱ्याचा पूर्ण प्रदेश भोसले घराण्याच्या नियंत्रणाखाली होता

मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी केली हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे परंतु हे देखील आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मोठ्या कार्याची सुरुवात ही छोट्या कार्याने होत असते.

अगदी त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्नं पूर्ण करण्यात शहाजी राजांचे योगदान हे बहुमूल्य होते.

बालपणापासून शिवाजी महाराजां समवेत आपल्या सगळ्या मुलांना शहाजी राजांनी उत्तम प्रशिक्षण दीले होते, त्यामुळे त्यांची मुलं उत्कृष्ट प्रशासक आणि योद्धा होऊ शकलीत.

त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आपली सभ्यता आणि संस्कृतीशी देखील त्यांनी अवगत केले, त्यामुळे मजबूत हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली.

जर शहाजी राजे नसते तर छत्रपती शिवाजी महाराज देखील आपल्याला कळले नसते.

अशेच माझी मराठी सोबत जुडून रहा.

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved