Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

संत तुकाराम महाराजांचे चरित्र

Sant Tukaram Maharaj Mahiti

अभंगाच्या अथांग सागराचा एक अवलिया म्हणजे संत तुकाराम महाराज.

तुकाराम महाराज यांचा जन्म १ फेब्रुवारी १६०७ रोजी पुणे जिल्हातील देहू या गावी झाला.

देहू हे गाव तुकारामांचे तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते.

पंढरपूरच्या विठ्ठलाला त्यांनी त्यांचे आराध्य दैवत मानले. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये ते विलीन होऊन जायचे. त्यांनी त्यांच्या अभंगांतून आणि दोह्यांतून ईश्वर भक्तीचा मार्ग जनसामान्यांना दाखवला.

तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य होते. त्यांना केशवचैतन्य म्हणून सुद्धा संबोधले जाते. त्यांचा महापरिनिर्वाण १५७१ मध्ये झाला असून त्यांची समाधी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर या गावात आहे. तुकाराम महाराजांचे गुरु म्हणजे केशवचैतन्य यांचे महाराजांना प्रत्यक्ष दर्शन घडले नाही. तर त्यांना ते त्यांच्या स्वप्नात दिसले. असे महाराजांनी त्यांच्या एका अभंगातून सांगितले आहे.

संत तुकाराम महाराजांचे चरित्र – Sant Tukaram Information in Marathi

Sant Tukaram Maharaj

तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले आणि आईचे नाव कनकाई बोल्होबा अंबिले.  त्यांना तीन मुले होती सावजी, तुकाराम, आणि कान्होबा.

सावजीने तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी घर सोडले व तो निघून गेला.

तुकाराम महाराज हे बोल्होबा आणि कनकाई यांचे मधले चिरंजीव.

पहिली पत्नी मरण पावल्यामुळे त्यांच्या जीवनात उदासीनता आली. महाराजांना एकूण चार मुले होती.

भागीरती, काशी, नारायण आणि महादेव या मधील दोन मुले आजारामुळे मरण पावली.

कालांतराने पुणे जिल्ह्यातील अप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाईसोबत तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह झाला. महाराजांचा थोरला भाऊ सावजी हा विरक्त स्वभावाचा होता. आणि धाकटा भाऊ लहान असल्यामुळे त्यांच्या घराची सर्व जवाबदारी ही तुकाराम महाराजांवरच आली.

तुकाराम महाराजांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे थोर विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करणे ही रीत होती.

तुकाराम महाराज १५-१६ वर्षाचे असतांना त्यांचे आई वडिलांचे निधन झाले. मोठा भाऊ पण मरण पावला.

त्यांना अनेक दुख:चा सामना करावा लागला. अतिशय वाईट परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागले.

मुले मरण पावल्यामुळे त्यांच्या संसारात उदासीनता आली. त्यांचे मन उदास झाले, गुरे ढोरे मरण पावली. एवढे सारे संकट येऊनही त्यांनी आपली विठ्ठलावरती भक्ती कायम ठेवली. व गावातच असलेल्या भंडारा नावाच्या डोंगरावर जाऊन त्यांनी विठ्ठलाची उपासना चालू केली.

विठ्ठलाची उपासना करतांना त्यांना “श्री. विठ्ठल” भेटले असे मानले जाते.

Sant Tukaram Maharaj Mahiti

तुकाराम महाराजांचा मूळ व्यवसाय हा सावकारी करणे होता. सर्व आरामदाई जीवनाचा त्याग करून त्यांनी विठ्ठलभक्ती मध्ये स्वतःला विलीन केले.

परंतु त्या काळात सतत दुष्काळ पडत असल्यामुळे त्यांच्या सावकारीत असलेल्या सर्व कुटुंबांना त्यांनी सावकारीतून मुक्त केले. व जमिनीची सर्व कागदपत्रे ही इंद्रायणी नदीमध्ये टाकून देऊन अभंगांची रचना करायला सुरुवात केली.

पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुकामध्ये असलेल्या सुदुंबरे गावातील संताजी जगनाडे  हा महाराजांचा लहानपणी चा मित्र.

संताजी याने तुकारामांनी रचलेल्या अभंगांना कागदावर लिहिले. जस-जसे महाराज अभंग रचत तस-तसे त्यांचा मित्र संताजी ते अभंग लिहित असे.

त्यांच्याच देहू गावातील असलेल्या मंबाजी या व्यक्तीने महाराजांना त्रास दयायला सुरुवात केली.

हे व्रीत्य महाराजांच्या पत्नी म्हणजेच जिजाइंना समजले, जिजाइंनी मंबाजीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर मंबाजी पडून गेला.

कालांतराने मंबाजीला त्याची चूक समजली व तो परत येउन महाराजांचा शिष्य झाला.

वारकरी संप्रदायातील महान संत तुकाराम महाराज – Warkari Sant Tukaram Maharaj Information in Marathi

तुकारामांना “जगतगुरु“ म्हणून देखिल ओळखतात. अभंग म्हंटले की लोकांना तुकाराम महाराज आठवत असत.

त्यांची असणारी विठ्ठलावरची भक्ती, हे पाहून जनसामान्यांना पण ईश्वराच्या भक्तीचे वेड लागले.

 जे का रंजले गांजले,  त्यासी म्हणे जो अपुले,  तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा.  अश्या अभंगांना रचून महाराजांनी संतांच्या नगरीत आपले नाव प्रथम उंचावले.  त्यांचे शिष्य संत निळोबा हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव मधील रहिवासी होते.

तसेच संत बहिणाबाई औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यातील शिरुर या गावातील होत्या. आणि आबाजी सानप उर्फ भगवानबाबा या अश्या महाराजांच्या शिष्यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला.

तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहून संतांच्या यादी मध्ये आपले नाव मोठे केले. त्यांनी पाच हजार अभंग रचून “तुकारामाची गाथा” ही काव्यरचना लिहिली.

एक विचारवंत, कवी, समाजसुधारणा असे त्यांचे कार्य होते.

Sant Tukaram Charitra

समाजमध्ये चालत असलेल्या घडामोडी, अत्याचार या सर्व अभंगाद्वारे महाराज निर्भीडपणे सांगत असत.

त्यामुळे त्यांना सर्व निर्भीड कवि म्हणून देखील ओळखत असत.

एकदम समोरच्याला घायाळ करणारे शब्द महाराज अभंगाद्वारे रचत होते.

भगवान गौतम बुद्धांनी घर संसार तसेच राजऐश्वार्याचा त्याग केला, व जगात असलेल्या दुःखाचे समाधान कसे मिळेल हे जाणण्यासाठी त्यांनी ज्ञान प्राप्त केले.

तसेच तुकाराम महाराजांनी संसार सुखाचा करण्यापेक्षा जनसामन्यांचे कल्याण कश्याने होईल, या उद्देशाने अभंगाची रचना केली.

पुणे जिल्ह्यातील वाघोली गावातील रामेश्वर भट्ट वेद पुराण जाणते होते.

तुकाराम महाराजांनी संस्कृत वेदांचा अर्थ हा त्यांच्या मूळ भाषेत सांगितला म्हणून, रामेश्वर भट्टांनी त्यांच्या अभंगाच्या सर्व गाथा इंद्रायणी नदी मध्ये बुडूवून टाकण्याची महाराजांना शिक्षा दिली.

पण प्रकृतीला पण हे मान्य नव्हते. अगदी तेरा दिवसांनी बुडालेल्या गाथा नदीच्या पात्रावर आल्या.

रामेश्वर भट्ट यांना त्यांची चूक समजली व त्यांनी त्यांच्या चुकीची माफी मागीतली त्यानंतर ते संत तुकाराम महाराजांचे शिष्य झाले.

संत तुकाराम महाराज नंतर खूप अभंग रचिते होऊन गेले. त्यानंतर खूप संतांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. तुकारामांची साहित्य म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर.या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत रुजलेली मुक्तीची ज्ञानगंगा ही तुकारामांनी रचलेल्या गाथेच्या रूपाने वाहत आहे.

“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय“.

असा जयघोष वारकरी संप्रदाय प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी करतात.

संत तुकोरायांचे काही अभंग – Sant Tukaram Abhang in Marathi

अभंग १ :-

समचरणदृष्टी विटेवरी साजरी | तेथे माझी हरी वृत्ती राहो ||१||

आणीक न लगे मायिक पदार्थ | तेथे माझे आर्त्त नको देवा ||ध्रु.||

ब्रम्हदिक पर्दे दु:खाची शिराणी | तेथे दुश्चित झणी जडो देसी ||२||

तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म | जे जे कर्मधर्म नाशवंत ||३||

अर्थ:-

विटेवरती उभा असलेला माझा देव म्हणजेच “विठ्ठल” त्यांच्या चरणी माझे मन सदैव लागू दे, व कुठल्याही मोह-माये मध्ये मला अडकू देऊ नको.

सर्व मोह-माया ह्या जीवघेण्या आणि मानवी जीवनाचा विनाश करणाऱ्या नाशवंत आहेत.

कितीही मोठ-मोठी पदे मिळत असली तरी माझे मन त्या मध्ये जाऊ देऊ नको.

ह्या मोहक गोष्टी सर्व नाशवंत आहेत. हे आम्हला संतांच्या आचरणाने कळाले आहे.

अभंग २ :-

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेउनिया ||१||

तुळसीचे हार गळा कासे पितांबर | आवडे निरंतर ते ची रूप ||ध्रु||

मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणी विराजित ||२||

तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने ||३|| 

अर्थ:-

कमरेवर हात ठेउन आणि विटेवर तो पंढरीचा विठूराया उभा आहे त्याचे स्वरूप अतिशय सुंदर आहे.

त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मला असे या विठ्ठलाचे रूम नेहमी आवडते.

त्याच्या कानात जी कुंडले आहेत त्याचा आकार हा मासोळीच्या आकाराचा दिसत आहे.

भगवान विष्णूने जे कौस्तुभमणी गळ्यात धारण केले होते ते विठ्ठलाने सुद्धा आपल्या गळ्यात घातले आहे.

तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व सुख हे विठ्ठलभक्ती आहे त्यांचे आचरण करणे च आहे. आणि हे असे सुंदर विठ्ठलाचे रूप मी आवडीने पाहिलं.

Previous Post

सौंदर्यवाढविण्यासाठीचे घरगुती सोपे उपाय

Next Post

एकतेचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Next Post
Indian Flag Information in Marathi

एकतेचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती

Anti Alcohol Slogans Marathi

"मद्यपान विरोधी काही घोषवाक्ये"

Soyarabai

छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी: सोयराबाई

“रीझ्युम (Resume) बनवायचा मग वाचा ह्या टिप्स!”

"रीझ्युम (Resume) बनवायचा मग वाचा ह्या टिप्स!”

Funny Railway Station Name in India

विचित्र नावांची रेल्वे स्थानके!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved