Home / History / पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिराची संपूर्ण माहिती – Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur

पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिराची संपूर्ण माहिती – Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur

Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur

“अवघे गरजे पंढरपुर . . . अवघे गरजे पंढरपुर . . . चालला नामाचा गजर” आणि “माझे माहेर पंढरी . . . आहे भिवरेच्या तिरी” हे अभंग ऐकले नाहीत असा मराठी माणुस सापडणं तसं कठीण!

महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत पंढरपुरी वसले असुन या विठोबा रूख्माईच्या दर्शनाकरता महाराष्ट्रातुन आणि कर्नाटकातुन भाविक मोठया संख्येने पंढरपुरी दाखल होतात आषाढी वारीत गर्दी होते ती महाराष्ट्रातील भाविकांची! आणि कार्तिकी एकादशीला कर्नाटकातील भाविक पंढरीत दाखल होतात! असा हा विठुराया दोन राज्यांनी आपापसात जणु वाटुन घेतलाय . . . . .

Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur

पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिराची संपूर्ण माहिती – Shri Vitthal Rukmini Mandir Pandharp

“आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधुजन येती
चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती
दिंडया पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा . . . व्दारकेचा महिमा वर्णावा किती”

पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिराचा इतिहास – Pandharpur Temple History in Marathi

पंढरी . . . पंढरपुर . . . पंुडरिकपुर . . . पौंड्रीकपूर . . .पंडरिगे . . . पंडरगे अशी कितीतरी नांवं या पंढरपुर ला पुर्वी दिल्या गेली आहेत.

फार पुर्वी म्हणजे ई.स 596 च्या आसपास काही ताम्रपट सापडले त्यात या पंढरपुरचा आणि आसपासच्या गावांचा उल्लेख आढळुन आला. पुढच्या काही शिलालेखांमधे विठ्ठलाच्या मंदिराचा देखील उल्लेख सापडतो त्यावरून हे मंदिर फार पुरातन असल्याचे दाखले मिळतात.

विशेष उल्लेख करावा लागेल तो बाराव्या शतकात जो शिलालेख आढळुन आला त्याचा. हा लेख सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या उत्तरदिशेला भिंतीवर आपल्याला दिसतो.

पुर्वीच्या मंदीरा नंतर तब्बल 84 वर्षांनंतर आताच्या मंदिराचा जिर्णोध्दार झाला अशी भाविकांची समजुत आहे म्हणुन भाविक या लेखाला आपली पाठ घासतात आणि 84 लक्ष योनीतुन सुटका व्हावी अशी कामना करतात व मंदिरात प्रवेश घेतात.

भाविकांच्या सतत पाठ घासल्याने हा लेख देखील पुसट झाला म्हणुन आता त्याला तारेचे कुंपण घालण्यात आले आहे.

सभामंडप, गाभारा व अंतराळ हे या मंदिराचे मुख्य भाग असुन सभामंडपात एकुण 16 खांब आहेत त्यातील एका खांबाला पुर्ण चांदिचे आवरण घालण्यात आले असुन त्याला गरूडस्तंभ असे म्हंटल्या जाते.

मंदिराच्या बाहेर आल्यानंतर दक्षिणेला खंडोबाचे मंदिर असुन व्यंकटेश व छोटी छोटी अनेक मंदिर देखील आहेत.

जाणकारांच्या मते जिर्णोध्दार जिर्णोध्दार करण्यात आलेले हे मंदिर 16 व्या 17 व्या किंवा 18 व्या शतकातील असेल.

परंतु पुर्वीच्या म्हणजे मुळ मंदिरातील 12 व्या शतकातले अवशेष आजदेखील या ठिकाणी आपल्याला दिसुन येतात. त्यावरून मंदिर फार पुरातन असल्याची खात्री पटते.

या मंदिराला एकुण 8 प्रवेशव्दार आहेत. पुर्व दिशेला असलेल्या प्रवेशव्दाराला संत नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.

वारक.यांचे तिर्थस्थान अशी या पांडुरंगाची आणि पंढरपुरची ओळख आहे. आषाढी वारीचा अनुपम सोहळा पाहाण्याकरता आणि अनुभवण्याकरता लाखोंच्या संख्येने भाविक या पंढरपुरात दाखल होतात.

संपुर्ण जगात ही वारी अश्याप्रकारे फक्त आणि फक्त भाविक या पंढरपुरच्या विठ्ठलाकरताच पायी पायी करतात.

म्हणुन केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातुन देखील विदेशी पर्यटक हा सोहळा पाहाण्याकरता महाराष्ट्रात त्या काळात दाखल होतात आणि या पांडुरंगाप्रती भाविकांची भक्ती पाहुन आश्चर्य व्यक्त करतात.

धार्मिक महत्व – Pandharpur Festival

चैत्र, आषाढ, माघ आणि कार्तिक या महिन्यांमधे चार एकादशींना येथे यात्रा भरते त्यात आषाढी एकादशीला भरणा.या यात्रेत जवळपास 15 ते 20 लाख भाविक या पंढरीत दाखल होतात.

येथील क्षेत्रमहात्म्य असल्याने पंढरपुर ला दक्षीण काशी देखील संबोधतात व विठ्ठलाला कुलदैवत मानल्या जाते.

चंद्रभागा नदी – Chandrabhaga River

चंद्रभागेतीरी मुर्ती सावळी साजिरी . . . . पांडुरंगाच्या मंदिराजवळुन खाली उतरल्यानंतर चंद्रभागेचे वाळवंट आणि नदिकाठ आपल्या नजरेस पडतो.

संत जनाबाईंनी आपल्या अभंगात भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असा उल्लेख केलेला आपल्याला सापडतो

मुळ भीमा नावाची असलेली ही नदी पंढरपुरला येतांना मात्र चंद्रभागा होते . . . पंढरपुरात या नदिचा आकार चंद्राच्या कोरीप्रमाणे असल्याने या ठिकाणी तीला चंद्रभागा असे नाव पडले असावे.

पंढरपुर कोठे आहे? – Pandharpur Darshan

पंढरपुर सोलापुर जिल्हयात असुन सोलापुर पासुन साधारण 50.55 कि.मी. अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासुन साडे चारशे मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण भीमा नदीच्या उजव्या तिरावर आहे.

पंढरपुर ला कसे जाल? – How to Reach Pandharpur

पंढरपुर रेल्वे, बस सेवा, खाजगी वाहने यांने चांगल्या रितीने जोडले गेले असल्याने येण्या जाण्याची काहीही अडचण नाही. शिवाय सोलापुर मोठे जंक्शन असुन सर्वदुर रेल्वेचे जाळे पसरले आहे.

जवळचे विमानतळ पुणे असुन साधारण 250 कि.मी. अंतरावर आहे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ पंढरपुर च्या श्री विठ्ठल मंदिरा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा विठ्ठल  रुक्मिणी मंदिर – Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: विठ्ठल  मंदिर – Shri Vitthal Rukmini Pandharpur Temple History  या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Shaniwar Wada Information in Marathi

पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी

Shaniwar Wada Information in Marathi गड, किल्ले, वाडे, राजपाट मिळवणं आणि मिळाल्यानंतर त्या आपल्या ताब्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *