औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Aurangabad Jilha Mahiti

महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा असुन चारही बाजुंनी ऐतिहासीक स्मारकांनी वेढलेला आहे.

या शहरात जगभरात प्रसिध्द असलेल्या अजिंठा ऐलोरा गुफा देखील आहेत,  या गुफा युनेस्कोच्या दृष्टीकोनातुन वैश्विक ठेवा आहे.

Aurangabad Information in Marathi

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Aurangabad Information in Marathi

या शहराचे मुळ नाव खडकी असे होते, पुर्वी अहमदनगरचे ’शहा मुर्तजा निजाम’ चे प्रधानमंत्री ’मलिक अंबर’ यांनी या खडकी ला आपली राजधानी बनवले दशकभरात खडकी लोकसंख्येच्या दृष्टीने आकर्षक शहर बनले.

मलीक अंबर च्या मृत्युपश्चात त्यांच्या उत्तराधिकारी असलेल्या फतेह खान ने खडकी चे नाव बदलुन फतेहनगर केले पण त्यानंतर काही काळातच हा भाग मोगलांच्या ताब्यात चालला गेला

त्यानंतर 1653 मधे औरंगजेबांना दुस.यांदा दख्खन चे व्हाईसरॉय म्हणुन नियुक्त केले गेले तेव्हा औरंगजेबांनी फतेहनगर ला आपली राजधानी बनवले आणि त्याचे नाव बदलुन ’औरंगाबाद’ केले.

औरंगाबाद जिल्हयाच्या पश्चिम दिशेला नाशिक उत्तरेला जळगांव पुर्वेकडे जालना आणि दक्षिणेकडे अहमदनगर जिल्हा आहे. हा मराठवाडयातील एक महत्वाचा जिल्हा आहे.

औरंगाबाद जिल्हयातील तालुके – Aurangabad Taluka List

या जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत

 1. औरंगाबाद
 2. सिल्लोड
 3. गंगापुर
 4. पैठण
 5. कन्नड
 6. वैजापुर
 7. फुलंब्री
 8. खुलताबाद
 9. सोयेगांव

औरंगाबाद जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Aurangabad Zilla Chi Mahiti

 • लोकसंख्या (Aurangabad Population) 37,01,282
 • क्षेत्रफळ 10,100 वर्ग कि.मी.
 • साक्षरता 15%
 • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 924
 • राष्ट्रीय महामार्ग 211 या जिल्हयातुन गेला आहे.
 • औरंगाबाद जिल्हयातील मुख्य नदी ’गोदावरी’ ही आहे.
 • सर्वात मोठे धरण नाथसागर असुन हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले विशाल जलाशय आहे, नाशिक ला पाऊस पडल्यास औरंगाबाद करांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघतो.
 • जिल्हयात बजाज ऑटो लिमीटेड, व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीज, स्कोडा ऑटो, सीमेंस लिमीटेड, क्रोम्पटन ग्रीव्हज लिमीटेड, धुत ट्रांसमिशन प्रा. लिमीटेड, यांसारखे मोठे उद्योग या ठिकाणी आहेत.
 • या औरंगाबाद ला औद्योगिक क्षेत्र मोठया प्रमाणात विस्तारले असल्याने देखील या जिल्हयाचा विकास चांगल्या त.हेने होतो आहे.
 • येथील मराठी ही मुख्य बोलीभाषा असुन हिंदी, इंग्रजी, आणि उर्दु देखील बोलल्या जाते
 • औरंगाबाद हे रस्त्याने, रेल्वेने आणि विमानाने देखील सर्वदुर जोडल्या गेले आहे. औरंगाबाद येथील विमानतळ मोठे असुन त्यामुळे उद्योगांची देखील भरभराट झाली.
 • औरंगाबाद जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्वपुर्ण असुन दौलताबाद चा किल्ला, बीबी का मकबरा, वेरूळ अजिंठा येथील लेण्या, पैठण, घृष्णेश्वर ज्यार्तिलिंग, खुलताबाद येथील भद्रा मारोती, ही तिर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळं चांगलीच प्रसिध्द आहेत
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे शिक्षण क्षेत्रातील भव्य विद्यापीठ याच जिल्हयात आहे.

पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit in Aurangabad

दौलताबाद किल्ला – Daulatabad Fort

महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांमधे देवगिरीच्या किल्ल्याचा समावेश असुन अभेद्य असा हा किल्ला निश्चीत भेट दयावा असाच! ऐतिहासीक असा हा यादवकालीन किल्ला पाहाण्याकरता दुरून दुरून पर्यटक येत असतात,

देवगिरी किल्ल्याला 28 नोव्हेंबर 1951 ला राष्ट्रीय संरक्षीत स्मारक म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला (Devgiri Fort) हे एक आश्चर्य ठरले आहे!

महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जुन 2013 मधे घोषणा करण्यात आली.

शांती.सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन,मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्य ठरलीत !

जगभरातुन मिळालेल्या 22 लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेलीत.

या गडावरील मेंढातोफ विशेष असुन अद्भुत देखील आहे. या तोफेची खासीयत म्हणजे ही तोफ एका मा.यात एखादा गड किंवा किल्ला उध्वस्त करू शकते. ही तोफ पंचधातुंनी तयार करण्यात आली आहे.

हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिध्द किल्ला असुन नक्की भेट द्यायलाच हवी!

अजिंठा लेणी – Ajanta Caves

अजिंठा लेणी (Ajanta Leni) स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेकरता जगप्रसिध्द लेण्या आहेत. इ.स. पुर्व 2.या शतकापासुन ते इ.स पुर्व 4 थे शतक अश्या प्रदीर्घ कालखंडात तयार करण्यात आलेल्या या 29 बौध्द लेणी आहेत.

औरंगाबाद शहरापासुन साधारण 100 कि.मी. अंतरावर वाघुर नदीच्या परिसरात या लेणी आपल्याला पहायला मिळतात.

बौध्द धर्माचा वारसा जतन करणा.या या लेण्यांना बनण्याकरता प्रदिर्घ कालखंड लागला असुन जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाकरता यांनी ओळख निर्माण केलीये.

औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे.

भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आपल्या प्रतिष्ठीत पर्यटन स्थळ प्रकल्पात 12 स्थळांची निवड केली त्यात महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेण्यांचा समावेश आहे.

या लेण्यांमधे गौतम बुध्दांच्या विविध भावमुद्रा आणि बौध्द तत्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त केलेला आविष्कार पहायला मिळतो.  या लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधुन भगवान बुध्दांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौध्द विभुतींचे चित्रण आढळते.

देशी पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांकरता देखील हे सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे.

बिबी का मकबरा – Bibi Ka Maqbara

औरंगाबाद शहरातील बिबी का मकबरा आगऱ्यातील ताजमहालाची हुबेहुब प्रतिमा असुन औरंगजेबाची पत्नी रबिया.उद.दुर्रानी ची दफन भुमी आहे. सारख्या प्रतिमांमुळे या मकब.याला मिनी ताज देखील संबोधण्यात येते.

मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आजम शाह याने आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा मकबरा बनवला.

बीबी का मकबरा औरंगाबाद मधले ऐतिहासिक मुख्य स्मारक म्हणुन सुपरीचीत आहे.

मुख्य प्रवेशव्दारावर एक शिलालेख आढळतो त्यावर उल्लेख केल्याप्रमाणे इंजिनियर हंसपत राय आणि अता.उल्ला यांनी हा मकबरा बनवला आहे.

अता-उल्ला ताजमहल चे मुख्य डिझायनर उस्ताद अहमद लाहौरी यांचा मुलगा होता.

बीबी का मकबरा 1668 ते 1669 या दरम्यान बनवण्यात आल्याचे उल्लेख आढळतात मकब.याला बनवण्यासाठी संगमरवर जयपुर जवळुन आणण्यात आले.

आज हे ऐतिहासीक पर्यटन स्थळ अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र असुन चित्रपटसृष्टी तरी यापासुन कशी दुर राहाणार ? त्यामुळे येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

वेरूळ लेण्या –  Ellora Caves

इसवीसन 5 ते 10 दरम्यान वेरूळच्या लेण्या (Verul Caves) बनवल्या गेल्या असाव्यात असे संशोधनादरम्यान लक्षात आले. वेरूळच्या लेण्या (Verul Leni) औरंगाबाद पासुन 30 कि.मी. अंतरावर आहेत या अजिंठा लेण्यासमानच जगप्रसिध्द असुन येथे 34 गुफांमधे बौध्द, हिंदु, जैनांच्या संस्कृतिचे दर्शन घडते.

विविध कॉलेजेस, महाविद्यालयांच्या सहली या ठिकाणी येत असतात. शिवाय देशी पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकांची गर्दी देखील या ठिकाणी लेण्या पहाण्याकरता नेहमीच होतांना दिसते.

घृष्णेश्वर ज्योर्तिलिंग – Ghushmeshwar Jyotirlinga

वेरूळच्या लेण्यांपासुन जवळ असलेले 12 ज्योर्तिलिंगापैकी शेवटचे म्हणजे 12 वे ज्योर्तिलिंग औरंगाबाद जिल्हयात असुन भक्तांची नेहमीच या ठिकाणी गर्दी पहावयास मिळते.

शिवाच्या दर्शनाकरता या ठिकाणी स्त्रियांना दुरून दर्शन घ्यावे लागते तर पुरूषांना शर्ट काढुन दर्शनाला जावे लागते.

शिवपुराणात वर्णन केलेल्या 12 ज्योर्तिलिंगापैकी शेवटचे घृष्णेश्वर ज्योर्तिलिंग आहे. घृष्णेश्वर म्हणजे करूणेचा स्वामी ! हे मंदीर औरंगाबाद शहरापासुन साधारण 30 कि.मी. अंतरावर असुन मुंबई शहरापासुन 300 कि.मी. अंतरावर आहे.

13 व्या 14 व्या शतकात हिंदु.मुस्लीमांच्या युध्दात दिल्ली च्या सुलतानांनी हे मंदीर उध्वस्त केले होते, त्यानंतर 18 व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी या मंदीराचा जिर्णोध्दार केला आणि सोबतच मंदीर परिसरात काशी विश्वनाथ, विष्णु मंदीर, सोमनाथ ज्योर्तिलिंगाची देखील त्यांनी स्थापना केली.

मंदिराच्या भिंतींवर अनेक देवीदेवतांच्या चित्राकृती चितारण्यात आल्या आहेत. मंदीरातील सभामंडपातील 24 खांबांवर अनेक शिलालेख आणि हस्तलिखीत आजही आपल्याला आढळुन येतात.

खुलताबाद – Khultabad

औरंगाबाद जवळ असलेले खुलताबाद हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक पंरपरा असलेले गाव आहे.

या ठिकाणी भद्रा मारोती हे देवस्थान असुन या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मुर्ती विराजमान आहे.

अश्या निद्रीस्त अवस्थेतील हनुमानाच्या मुत्र्या भारतात फक्त तीन ठिकाणी आहेत, उत्तर प्रदेशात अलाहाबाद ला, दुसरी खुलताबाद आणि तिसरी मुर्ती मध्यप्रदेशातील जामसावळी येथे आहे.

खुलताबाद ला दरवर्षी हनुमान जयंतीला भव्य यात्रा भरत असते यावेळी येथे हजारो भाविक औरंगाबाद आणि जवळपासच्या गावांमधुन दर्शनाला पायी येतात.

भद्रा मारोती या पवित्र स्थळासोबत या ठिकाणी सुफी संत आणि इतिहासकालीन राजघराण्यातील आणि सरदार घराण्यातील व्यक्तींच्या कबरी आहेत.

खुलताबाद हे तालुक्याचे ठिकाण असुन या गावाला पुर्वी ’रत्नापुर’ म्हणुन ओळख होती, येथे दरसाल ऊरूस भरतो याठिकाणी जर्जरीबक्ष नावाची दर्गा देखील आहे.

पैठण – Paithan

औरंगाबाद पासुन 50 कि.मी. अंतरावर असलेले तालुक्याचे ठिकाण ’पैठण’ गोदावरी काठी वसले असुन संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान, आणि पैठणी साडी करता प्रसिध्द असलेले हे ठिकाण!

16 व्या शतकात होउन गेलेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभुमी आणि कर्मभुमी देखील! या पैठण मधे एकनाथ महाराजांचा वाडा होता आज या वाडयाचेच रूपांतर मंदीरात करण्यात आले आहे.

संत एकनाथ महाराजांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंडयाच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी भाविकांमधे श्रध्दा आहे, तो पाण्याचा हौद आजही या ठिकाणी आपल्याला पहायला मिळतो.

फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी असे म्हणतात त्यावेळी या ठिकाणी श्री एकनाथ महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

गोदावरी तिरी नागघाट आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखातुन वेद वदवले ते हे ठिकाण! या ठिकाणी रेडयाची मोठी मुर्ती देखील आहे.

साडीप्रकारातील पैठणी हे नाव याच गावावरून पडले, हे गांव इतिहासात गेली 2500 वर्षे आपले वेगळेपण राखुन आहे.

महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते.

जायकवाडी धरण आणि ज्ञानेश्वर उद्यान ही देखील येथील उत्तम पर्यटन स्थळ आवर्जुन पाहावी अशीच!

लक्ष्य दया: तुमच्या जवळ औरंगाबाद जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Aurangabad District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच….

जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here