• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत एकनाथ

Sant Eknath in Marathi 

महाराष्ट्र या संतांच्या भूमीतले वारकरी संप्रदायातील एक अग्रगण्य नाव म्हणजे संत एकनाथ. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साधारण 250 वर्षानंतर संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला.  भारुड, गोंधळ, जोगवा, गवळण यांसारख्या गीत-प्रकारांनी नाथांनी समाजात जनजागृतीचे कार्य केले. अंधश्रद्धा रूढी-परंपराचे समाजावर पसरलेले गारुड या लोक रचनांमधून कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत एकनाथ – Sant Eknath Information in Marathi

Sant Eknath Information in Marathi
Sant Eknath Information in Marathi

संत एकनाथ यांचा संक्षिप्त परिचय – Sant Eknath Biography in Marathi

नाव:एकनाथ
जन्म:ई.स. 1533 औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण (महाराष्ट्र)
वडील:सुर्यनारायण
आई :रुख्मिणी
पत्नी:गिरीजा
अपत्य: गोदावरी, गंगा आणि हरी
निधन:फाल्गुन वद्य षष्ठी (26 फेब्रुवारी ई.स. 1599)
संप्रदाय:वारकरी
गुरु:जनार्दनस्वामी
वाड:मय:
  • एकनाथी भागवत,
  • भावार्थ रामायण,
  • रुख्मिणी- स्वयंवर,
  • ज्ञानेश्वरी शुद्धीकर (असंख्य भारुड, जोगवा, गोंधळ, गवळणी)

संत एकनाथ यांचे जीवन – Sant Eknath History in Marathi

नाथांचा जन्म ई.स. 1533 मधे पैठण इथं झाला. त्यांचे वडील सुर्यनारायण आणि आई रुख्मिणी, आई वडिलांचा सहवास नाथांना फार काळ लाभला नाही. चक्रपाणी आणि सरस्वती या नाथांच्या आजी-आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. अवघे 12 वर्षांचे असतांना एकनाथांनी देवगिरीच्या जनार्दनस्वामींना आपलं गुरु  केलं. सहा वर्ष आपल्या गुरूंकडे राहून नाथांनी संस्कृत शास्त्रपुराण आणि ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्म ग्रंथांचे अध्ययन केले. गुरुआज्ञा झाल्यावर नाथांनी सात वर्ष तीर्थयात्रा केली.

या तीर्थयात्रेत सुरुवातीला जनार्दन स्वामी त्यांच्या समवेत होते. तीर्थयात्रे वरून परतल्यानंतर नाथांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. एकनाथांचा विवाह वैजापूर गावातील देशस्थ ब्राम्हण कुटुंबातील सावकाराची कन्या  गिरीजा या मुलीशी झाला होता. गिरिजाबाई देखील नाथांप्रमाणे शांत आणि परोपकारी वृत्तीच्या होत्या. त्या उभयतांना गोदावरी, गंगा या मुली आणि हरी नावाचा मुलगा झाला. पुढे नाथांच्या या मुलाने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले तो पुढे हरीपंडीत म्हणून नावारूपाला आला.

संत एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर दरवर्षी हरीपंडीताने त्यांच्या पादुका आषाढीवारी दरम्यान पंढरपुरी नेण्यास सुरुवात केली. संत एकनाथांनी सुमारे 1583 ला आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला व त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची संहिता शुद्ध केली. संत एकनाथांनी तत्कालीन समाजातील रूढी परंपरांना हादरे बसवणारे वर्तन केल्याचे ऐकिवात आहे, जसे…

  • अस्पृश्य समाजाचा मुलगा वाट चुकला असतांना त्याला नाथांनी कडेवर घेऊन स्वतः महारवाड्यात पोहोचविले.
  • श्राद्धाला येण्यास ब्राम्हणांनी विरोध केल्यावर नाथांनी ते अन्न अस्पृश्यांना खाऊ घातलं.
  • तीर्थास्थानाला जातांना वाटेत तहानेने व्याकूळ झालेले गाढव दिसल्यावर त्याला गंगाजल पाजलं आणि खऱ्या भक्तीची प्रचीती दिली.

नाथांच्या या वर्तणुकीने त्यांना वेदांताचा व्यापक अर्थ उमगलेला होता हे लक्षात येतं. सनातनी आणि कर्मठ समाजाला नाथांनी आपल्या या वर्तणुकीतून  चांगलेच हादरे दिले होते. संत एकनाथ त्यांच्या कीर्तनातून देखील समाज प्रबोधन करीत असत. पैठण या तीर्थक्षेत्री आणि पंढरपूर ला देखील त्यांच्या कीर्तनाला अफाट जनसागर लोटत असे. वारकरी पंथात नाथांची कीर्तनं अत्यंत लोकप्रिय ठरली.

संत एकनाथांची गुरुपरंपरा: आदीनारायण(विष्णू) > ब्रम्हदेव > अत्री ऋषी > दत्तात्रय > जनार्दन स्वामी > एकनाथ महाराज

नाथांच्या रचना – Sant Eknath Marathi literature 

  • चतु:श्लोकी भागवत ही नाथांची पहिली रचना, भागवत पुराणावर आधारीत या रचनेत 1036 ओव्या आढळतात. नारायणाचं आणि भागवत धर्माचं निरुपण त्यात केलेलं आहे.
  • नाथांनी काही आध्यात्मिक स्फुट प्रकरण देखील रचली आहेत.
  • रुख्मिणी स्वयंवर ही नाथांची रचना श्रीकृष्ण-रुख्मिणीच्या विवाहावर आधारीत असून या दोघांचा विवाह म्हणजे जीवाशिवाचे मिलन. अश्या रूपकावर आधारीत हे काव्य नाथांनी रचलेले आढळते.
  • एकनाथी भागवत ही नाथांची सर्वश्रेष्ठ रचना मानली जाते. भागवत पुराणामधील अकराव्या स्कंधावरील ती व्यापक टीका होय.
  • भावार्थ रामायण ही संत एकनाथांची शेवटची रचना या रचनेचे काही भाग लिहून झाल्यावर नाथांनी देह त्यागला. भावार्थ रामायणातील उर्वरित भाग नाथांचे शिष्य गावबा यांनी पूर्ण केल्याचे सांगण्यात येतं.
  • या रचनां व्यतिरिक्त एकनाथांनी बहुजन समाजाकरता रचलेल्या कथा देखील लक्षणीय अश्याच आहेत.
  • “त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा” या दत्तप्रभूंच्या आरतीचे रचीयते संत एकनाथ आहेत.

संत एकनाथ मृत्यु  – Sant Eknath Death

संत एकनाथ हे महावैष्णव होते ते देवीभक्त आणि दत्तभक्त असल्याचे देखील दाखले मिळतात. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, जातीभेद, स्पृश्य-अस्पृश्य ही दरी दूर करण्याकरता त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेत. शके 1521 , फाल्गुन वद्य षष्ठी (26 फेब्रुवारी ई.स. 1599) ला संत एकनाथांनी देह ठेवला. आज एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी घेतल्यावर सुमारे अडीच शतकं संतसाहित्याची परंपरा खंडित झाली होती.

संत एकनाथांनी पूर्वपरंपरेचे भान ठेवून संत साहित्याला नव संजीवनी देण्याचं कार्य केलं. समाजाच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन तश्या रचना नाथांनी तयार केल्याचे आपल्या लक्षात येते. भागवत पंथाला संत एकनाथांनी अधिकाधिक लोकाभिमुख बनविले आहे. नाथांनी विचार, वर्तन, वाड:मय, मराठी भाषा या सर्वच क्षेत्रात समाज प्रबोधनाचं  आणि समाजाला एकत्र आणण्याचं महत्वाचं काम केलं त्यामुळे पुढे स्वराज्याच्या चळवळीला सतराव्या शतकात अनुकूल पार्श्वभूमी तयार होऊ शकली.

पिडा हारूनी दाविला दिव्य मार्ग

जनांसाठी भूमीवरी आणी स्वर्ग

 सदा सर्व लोकां गमे एक नाथ

 सुरां पूज्य जो धन्य तो एकनाथ 

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
May 10, 2022
महाराणी ताराबाई माहिती
Marathi History

महाराणी ताराबाई माहिती

Maharani Tarabai Marathi Mahiti छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी माणसाला दाखवले आणि ते...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved