दक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबरा” चा इतिहास

Bibi Ka Maqbara 

ताजमहल ही वास्तू निश्चितच भारतातील सर्वात सुंदर ऐतिहासिक स्मारक आहे. परंतु अस असल तरी, आपल्या पैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल की! या वास्तूची एक प्रतिकृती भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात अस्तित्वात आहे.

आपल्या पैकी बऱ्याच लोकांना आग्र्याचा ताजमहल आणि औरंगाबाद येथील बीबी का मकबरा यांच्यात असणाऱ्या फरकांन बद्दल माहिती नसेल. त्यांच्या मते दोन्ही वास्तू या एकच आहेत.

Bibi ka Maqbara History in Marathi

दक्षिणचा ताज असणाऱ्या “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास – Bibi ka Maqbara Information in Marathi

महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात अस्तित्वात असणाऱ्या बीबी का मकबऱ्याला “दखणी ताज” किंवा भारताचे दुसरे ताजमहल म्हणून देखील ओळखले जाते.

या मकबऱ्याची निर्मिती मुगल सम्राट शाहजहां यांचा नातू म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा मुहम्मद आजमशाह याने आपली प्रिय आई “रबिया-उल-दौरानी” (दिलरास बानो बेगम) ची आठवण म्हणून बांधले होते.

“बीबी का मकबरा” हा आग्रा या ठिकाणी अस्तिवात असलेल्या आश्चर्य वास्तू ‘ताजमहल’ समान बनवण्यात आला आहे.

सण १६५१ ते १६६१ च्या दरम्यान बांधण्यात आलेला ‘बीबी का मकबरा’ हा आपल्याला, मुगल सम्राट अकबर आणि शाहजहां यांच्या शासनकाली करण्यात आलेल्या शाही स्वरूपातील मुगलांच्या वास्तुकालेपासून ते शेवटच्या मुगल शासकांच्या काळात झालेल्या वास्तुकले मधील बदलावांचे दर्शन घडवून आणतो.

त्याच प्रमाणे बीबी का मकबरा हा औरंगजेबाच्या शासनकाळात बांधण्यात आलेला सर्वात सुंदर ऐतिहासिक वास्तू आहे. या मकबऱ्याच्या मुख्य दरवाज्यावर बनवण्यात आलेली समाधी ही, या मकबऱ्याच्या प्रमुख आकर्षणा पैकी एक आहे. अशा या मकबऱ्याची निर्मिती प्रसिद्ध वास्तुकार उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा “अत्ता-उल-अल्ला” यांच्या द्वारे करण्यात आली होती.

त्याच प्रमाणे जगात आश्चर्यीत असणाऱ्या वास्तूंपैकी सर्वात प्रसिद्ध असलेली वास्तू “ताजमहल” ची रचना सुद्धा यांनीच केली होती.

“बीबी का मकबऱ्याचा इतिहास”- Bibi ka Maqbara Aurangabad History in Marathi

मुगल सम्राट औरंगजेब यांची पहिली पत्नी “दिलरास बानो बेगम” ही त्यांची सर्वात प्रिय पत्नी होती. औरंगजेब आणि दिलरास बानो बेगम यांच्या पाच संतान होत्या. त्यांच्यापैकी मोहम्मद आजम शाह असे होते की, ज्यांना आपली आई ‘दिलरास बानो बेगम’ च्या बद्दल जास्त आपुलकी होती.

सण १६५७ साली दिलरास बानो बेगम यांची तब्येत खूप बिघडली होती, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मोहम्मद आजम शाह याने आपल्या आजोबांची प्रेरणा घेऊन आपली प्रिय आई ‘रबिया-उल-दौरानी'(दिलरास बानो बेगम) च्या स्मुर्ती प्रीत्यर्थ स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला.

अहमदशाहने औरंगाबाद मध्ये मकबरा बांधण्याचा निर्णय घेतला आणि मकबऱ्याला ताजमहालाच्या स्वरुपात बनवण्याचा प्रयत्न केला, ज्याप्रमाणे आपले आजोबा शाहजहां यांनी आपली पत्नी बेगम मुमताजच्या स्मुर्तीत ताजमहल ची निर्मिती केली होती. यानंतर हा मकबरा ‘भारताचे दुसरे ताजमहल’ आणि “बीबी का मकबरा” (टॉम्ब ऑफ द लेडी) च्या नावाने ओळखला जाऊ लागला.

“बीबी का मकबऱ्या” करता लागलेला खर्च – Cost of Construction of Bibi Ka Maqbara

मुगल वंशाचा शासक राजपुत्र आजमशाह याने आपले आजोबा शाहजहांशी प्रेरित होऊन बीबी का मकबऱ्याची निर्मिती केली होती.

या मकबऱ्याच्या निर्मितीत केवळ सात लाख रुपये इतका खर्च लागला होता, जो ताजमहालच्या निर्मितीत लागलेल्या जवळपास ३.२० करोड रुपयांन पेक्षा खूप कमी होता. अस म्हंटल जाते की, शाही खजाना आणि कुशल कारागीरांच्या कमतरतेमुळे हा मकबरा मूळ ताजमहालच्या वास्तूचे एक खराब प्रतिबिंब आहे.

इतकेच नाही तर काही इतिहासकार या बीबी का मकबऱ्या बद्दल अस अनुमान देतात की, या मकबऱ्याच्या निर्मितीत मुगल सम्राट औरंगजेबाची काहीच विशेष रुची नव्हती.

औरंगजेब यांना अस वाटत होत की, या मकबऱ्याच्या निर्मिती करता आपल्या शाही खजिन्यातील पैसा कमी खर्च झाला पाहिजे. याच करणामुळे महाराष्ट्राच्या औरंगाबाद  जिल्हात बांधण्यात आलेल्या मकबऱ्याला “गरीबांचे ताजमहल” म्हणून ओळखले जाते.

याशिवाय आग्रा येथील ताजमहल संपूर्णपणे उत्कृष्ट प्रकारच्या पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून बनविले आहे. तसचं औरंगाबादच्या बीबी का मकबऱ्याचे  घुमटच फक्त संगमरवरी दगडांनी बनविलेल आहे.

घुमट सोडून या मकबऱ्याचा खालील सर्व भागात फक्त प्लास्टर केलेलं आहे. यामामागील उद्देश इतकाच होता की पाहणाऱ्याला ते संगमरवरी दिसलं पाहिजे.

बीबी का मकबऱ्याची रचना आणि वास्तुकला – Bibi Ka Maqbara Architecture

महाराष्ट्राच्या औरंगाबाद मध्ये अस्तित्वात असलेला ‘दक्षिणी ताज’ हा  ‘बीबी का मकबरा’ म्हणून प्रसिद्ध आहे,  हा जगातील सर्वात सुंदर रचना असणाऱ्या “ताजमहल” वर करण्यात आलेल्या मुगल वास्तुशैलींच प्रतिक आणि त्या ताजमहल च प्रतिबिंब आहे.

हा मकबरा प्रचंड मोठा आहे. त्याच्या चाऱ्ही बाजून्ही भितींचे आवरण असून तो केंद्र स्थानी बांधलेला आहे. त्या मकबऱ्याचे क्षेत्रफळ सुमारे उत्तर-दक्षिण भागात ४५८ मीटर आणि पूर्व-पश्चिम २७५ मीटर आहे.

बीबी का मकबऱ्या बद्दल सांगायचं म्हणजे या मकबऱ्याच्या आत फारशी शैलीत बनविण्यात आलेली फुलांचे बगीचे आहेत. या बागीच्यांमुळे बीबी का मकबऱ्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे. त्याचप्रमाणे हा मकबरा चौकोनी आकारात बांधण्यात आला असल्याने या उद्यानाला चार लहान-लहान भागात विभागण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त मकबऱ्याच्या आत तलाव, कारंजे आणि धबधबे सुद्धा बांधण्यात आली आहेत. मुगल काळात बांधण्यात आलेल्या बीबी का मकबऱ्याच्या चारही बाजूंच्या भिंतींवर अणकुचीदार भाल्यांची टोक लावण्यात आली आहेत.

एका चौरसाकृती जागेत बांधण्यात आलेला हा बीबी का मकबरा मोठ्या प्रांगणाच्या मध्यभागी उभा आहे. शिवाय मकबऱ्याच्या चारही बाजूंनी ताजमहल सारखी सुंदर मानोरे बांधलेली आहेत.

या मकबऱ्या वर जाण्यास पायऱ्यांच्या स्वरुपात तीन मार्ग आहेत, तसचं मुख्य मार्गाच्या दरवाज्यातील रस्त्यात असलेल्या बागीच्यांच्या चारीबाजूने पाण्यांचे कारंजे लावलेले असून ती या मकबऱ्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत.

मुगल कालीन शैलीत बांधल्या असलेल्या या मकबऱ्याच्या वरील गोल घुमटच फक्त संगमरवरी दगडांचा वापर करून बांधण्यात आलं आहे.

या खलील संपूर्ण भागांचे चांगल्या प्रकारे प्लास्टर करण्यात आलेलं आहे. जेणेकरून लोकांना ते संगमरवरी दगडांनी बनविलेलं वाटल पाहिजे. या मकबऱ्याच्या निर्मितीकरिता लागणारे दगड हे जयपूर च्या खादानीतून आणले गेले होते.

मुगल बादशहा आजमशाह याला या मकबऱ्याला आपले आजोबा शाहजहां यांनी बांधलेल्या मुमताज महल च्या मकबरा “ताजमहल” पेक्षा खूप विशाल बनवायचं होत.

परंतु औरंगजेबाने आपल्या शाही खजिन्यातील मोजकीच रक्कम दिली होती. इतक्या कमी रकमेत मकबरा विशाल बनविण शक्य नव्हतं. म्हणून या बीबी का मकबऱ्याला गरीबांचा ताज म्हटलं जाते.

औरंगजेबची पत्नी आणि मुगल सम्राट आजमशाह यांच्या द्वारे निर्मित या मकबऱ्याच्या आत दक्षिण दिशेकडे एक लाकडी दरवाजा बनवण्यात आला आहे. या दरवाज्यामधून मकबऱ्याच्या आत जाण्याचा मार्ग आहे. या प्रवेश द्वाराच्या  बाहेरील बाजूस पितळी धातूत बेल-बुत्यांचे नक्षीकाम करण्यात आले आहे.

या मकबऱ्याच्या प्रवेश द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर जवळच एक छोटासा कुंड बनवण्यात आलेला आपल्या निर्दशणात येतो. मकबऱ्याच्या मूळ ठिकाणाच्या पश्चिम दिशेला एक मस्जिद सुद्धा बांधण्यात आलेली आहे. त्या मशिदीचे नंतर हैदराबादच्या निजामांनी निर्मिती केली होती, त्यामुळेच पश्चिमे कडील प्रवेश द्वार बंद झाला आहे.

मुगल सम्राट आजमशाह यांची आई ‘रबिया-उल-दौरानी’ यांचा देह अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या संगमरवरी दालनांत ठेवण्यात आला आहे. पायऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहजच पोहचता येते.

बीबी का मकबरा पाहण्यास कसे जाल? – How to Reach Bibi Ka Maqbara

मुगल सम्राट आजमशाह द्वारा निर्मित हा बीबी का मकबरा औरंगाबाद मध्ये अस्तिवात आहे. याठिकाणी जाण्याकरिता सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी जाण्याकरिता महामार्ग, रेल, विमान तिन्ही परिवहनाच्या सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध आहेत.

बीबी का मकबऱ्या संबंधित काही रहस्यमय आणि आश्चर्य कारक तथ्य – Facts About Bibi ka Maqbara

 • महाराष्ट्राच्या औरंगाबाद मध्ये अस्तित्वात असलेला बीबी का मकबरा चारबागेच्या मधोमध बनविण्यात आलेला आहे.
 • या मकबऱ्यालाच ताजमहल चे प्रतिबिंब म्हणून ओळखले जाते.
 • यालाच भारताचे दुसर ताज किंवा दक्षिणी ताज सुद्धा म्हटलं जाते.
 • औरंगाबाद येथील बीबी का मकबऱ्याची निर्मिती प्रख्यात वास्तुकार उस्ताद लाहोरी यांचा मुलगा अत-उल्लाह आणि हंसपत राय यांनी त्या मकबऱ्याची उत्कृष्ट पणे रचना केली होती.
 • आग्रा येथील जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहल ची रचना करून त्याला एक भव्य रूप देण्यात आले होते.
 • बीबी का मकबऱ्याच्या निर्मिती करिता ज्या संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला होता ती सर्व दगड, गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर शहरातून आणले होते.
 • मुगल शासक आजमशाह द्वारा निर्मित हा मकबरा मुगल शैलीत बांधण्यात आला आहे.
 • या मकबऱ्या वरून आपल्या मुगल सम्राट अकबर आणि शाहजहां यांच्या काळातील शाही मुगल वास्तुशैली पासून साधारण वास्तुशैलीत झालेल्या बदलांचे दर्शन होते.
 • मकबऱ्याच्या भिंतीवर केले असलेलं बारीक नक्षीकाम पर्यटकांना खूपच आकर्षित करत असते.
 • जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहल च्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मकबऱ्याच्या चारही बाजूने मनोरे बांधण्यात आली आहेत. ज्यांची उंची जवळपास २७५ मीटर आहे.
 • आजमशाह यांची आई दिलरास बानो बेगम यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या बीबी का मकबरा निर्मितीत जवळपास साथ लाख रुपये इतका खर्च आला होता.

भारताचे दुसरे ताज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बीबी का मकबऱ्याच्या आत औरंगजेबच्या पहिली पत्नी दिलरास बानो बेगम यांची सुदंर समाधी बनविण्यात आलेली आहे. या मकबऱ्याच्या वर ताजमहल समान एक सुंदर अर्धगोलाकार घुमट बनवलेलं आहे. हे घुमट संगमरवरी दगडांच्या सह्याने बांधण्यात आलं आहे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी बीबी का मकबरा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “बीबी का मकबऱ्या” चा इतिहास / Bibi ka Maqbara Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook Page लाइक करायला सुध्दा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here