Home / History / जलाल उद्दीन अकबर चा इतिहास | Akbar History In Marathi

जलाल उद्दीन अकबर चा इतिहास | Akbar History In Marathi

जलाल उद्दीन अकबर / Akbar जो साधारणतः अकबर और नंतर अकबर एक महान ओळखल्या जातो, ते 1556 पासून त्यांच्या मृत्यु पर्यंत मुगल साम्राज्याचे शासक होते. अकबर भारताचे तिसरे आणि मुगलांचे पहिले सम्राट होते.

Akbar History

जलाल उद्दीन अकबर चा इतिहास / Akbar History In Marathi

अकबर हुमायुचा पुत्र होता, ज्यांनी सुरवातीलाच मुगल साम्राज्याचा भारतात विस्तार केलेला होता. 1539-40 में चौसा आणि कन्नौज मध्ये होणाऱ्या शेर शाह सूरी शी युद्धामध्ये पराजित झाल्यानंतर मुगल सम्राट हुमायु पश्चिमकडे गेले. जिथे सिंध मध्ये त्यांची भेट 14 वर्षाची हमीदा बानू बेगमशी झाली. जी शेख़ अली अकबर याची मुलगी होती , त्यांनी तिच्याशी लग्न केले आणि पुढच्याच वर्षी जलाल उद्दीन मुहम्मद याचा जन्म 15 आक्टोबर 1542 को राजपूत घराण्यात सिंधच्या उमरकोटमध्ये झाला ( जे आता पकिस्तान मध्ये आहे ) जिथे त्यांच्या माता-पित्यास तेथील स्थानिक हिंदु राना प्रसाद यांनी आश्रय दिला होता.

आणि मुगल शासक हुमायु च्या लांब वनवासानंतर , अकबर आपल्या पूर्ण परिवारासोबत काबुल येथे राहू लागले. जिथे त्यांचे काका कामरान मिर्ज़ा आणि अस्करी मिर्ज़ा राहत होते. त्यांनी आपले जुने तारुण्यातील आयुष्य शिकार करन्यामध्ये , युद्ध कला शिकण्यामध्ये, लडाईमध्ये ,धावण्यामध्ये घालविले. ज्यांनी त्यास एक शक्तिशाली, निडर आणि बहादुर योद्धा बनविले.

परंतु आपले पूर्ण जीवनात त्यांनी कधी लिहने वा वाचणे शिकले नाही. असे म्हटले जाते कि जेव्हा त्यांना काही वाचायची आवश्यकता असल्यास ते आपल्या सोबत कुणाला तरी ठेवायचे ज्यांना लिहने आणि वाचणे येत असे.

1551 च्या नोव्हेंबर मध्ये अकबर ने काबुलच्या रुकैया सोबत लग्न केले. महारानी रुकैया त्यांचेच काका हिंदल मिर्ज़ा यांची मुलगी होते. जी त्यांची पहिली आणि मुख्य पत्नी होती. त्यांचे हे पहिले लग्न अकबर वडील आणि रुकैया चे काका यांनी ठरविले. आणि हिंदल मिर्ज़ा की मृत्यु नंतर हुमायु ने त्यांची जागा घेतली.

शेर शाह सूरी शी पहिल्यांदा पराजित झाल्यानंतर, हुमायु ने दिल्लीला 1555 मध्ये पुनर्स्थापित केले आणि तिथे त्यांनी एक विशाल सेना तयार केली. आणि याच्या काही महीन्यानंतर हुमायुचे निधन झाले. अकबरास एक यशस्वी शक्तिशाली राजा बनविण्यासाठी अकबराचे रक्षकानी त्यांच्या मृत्युची बातमी लपवून ठेवली. आणि शेवटी 14 फेब्रुवारी 1556 ला सिकंदर शाह ला पराजित करून अकबर युद्धामध्ये यशस्वी झाले.

आणि तेथूनच त्यांनी मुगल साम्राज्याचा विस्तार सुरु केला. कलानौर, पंजाब मध्ये बैरम खान द्वारे 13 वर्षाच्या अकबराला गादी सोपविण्यात आली. जेणेकरून ते आपल्यासाठी एक नविन विशाल साम्राज्य स्थापन करू शकतील. जिथे त्यांना “शहंशाह” चे नाव दिल्या गेले. बैरम खानने नेहमी अकबरची साथ दिली.

अकबर एक बहादुर और शक्तिशाली शासक होते. त्यांनी गोदावरी नदीच्या आजू –बाजूचे सर्व क्षेत्र हस्तगत केले होते. आणि त्यांनाही मुगल साम्राज्यात समाविष्ट केले. त्यांचे अनंत सैन्यबल, अपार शक्ति और आर्थिक प्रबळता या आधारावर ते हळू – हळू भारताच्या अनेक राज्यावर राज्य करत जात होते. अकबराला आपल्या साम्राज्यास सर्वात विशाल आणि सुखी साम्राज्य बनविन्याची इच्छा होती. यासाठी त्याने खूप प्रकारच्या नितीचा वापर केला. ज्यामुळे त्यांच्या राज्यातील जनता सुखी राहू शकेन.

त्यांचे साम्राज्य विशाल असल्यामुळे त्यामध्ये काही हिंदु धर्माचेसुद्धा होते , त्यांच्या हितासाठी त्यांनी हिंदु सम्राटांच्या नीतीलासुद्धा वापरले आणि मुगल साम्राज्यात लागू केले. त्यांना विविध धर्मोमध्ये होत असलेला भेदभाव दूर करायाचा होता. त्यांच्या या नम्र स्वभावामुळे त्यांना लोक एक श्रेष्ट राजा मानत होते आणि आनंदाने त्यांच्या साम्राज्यात राहत होते.

हिन्दुच्या बद्दल आपल्या धार्मिक सहिष्णुतेच परिचय देत त्यांनी त्यांच्यावर लावलेला ‘जजिया’ नावाचा कर हटविला. अकबराने आपल्या जीवनात जो सर्वात महान कार्य करण्याचा प्रयत्न केला. तो होता ‘दिन – ए – इलाही’ नामक धर्माची स्थापना. याला त्यांनी सर्वधर्माच्या रूपात स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. 1575 मध्ये त्यांनी एक अशा इबादतखाण्याची (प्रार्थनाघर) स्थापना केली होती , जो सर्व धर्मांसाठी खुला होता, ते इतर धर्मांच्या प्रमुखासोबत चर्चासुद्धा करत असे.

साहित्य आणि कला यांनी त्यांना खूप अधिक प्रोत्साहन दिले. अनेक ग्रंथ, चित्र आणि वाडा यांची निर्मिती त्यांच्या शासनकाळातच झाली होते. त्यांच्या दरबारामध्ये विविध विषयासाठी विशेषज्ञ नऊ विद्वान् होते, ज्यांना ‘नवरत्न’ म्हटल्या जाते.

अकबराची गणना भारताच्या उदार शासनकार्त्यांमध्ये केली जाते. संपूर्ण मध्यकालीन इतिहास मध्ये तो एक मात्र असा मुस्लीम शासक झाला होता ज्याने हिन्दू मुस्लीम एकतेचे महत्त्व को समजून एक अखण्ड भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या प्रसिद्ध शासनकार्त्यांमध्ये मुग़ल सम्राट अकबर अग्रगण्य आहे , तो एकमात्र असा मुग़ल शासक सम्राट होता, ज्याने हिंदू बहुसंख्यांकांप्रती काही उदारतेच परिचय दिला.

हळू–हळू भारतात मुग़ल साम्राज्याचा विस्तार होऊ लागला आणि राज्यामध्ये स्थिर आर्थिक परिस्थिती येत होते. अकबर कला आणि संस्कृति चे खूप मोठे चाहते होते. यासाठी त्यांनी आपल्या शासन काळात या दोन्हीच्या विकासावर जास्तीत जास्त लक्ष्य दिले. त्यांना साहित्याचा हि खूप छंद होता. यासाठी त्यांनी 2400 खंड लिहून घेतले आणि त्यांना ग्रंथालयात प्रकाशित सुद्धा केले. त्यांच्या साम्राज्यात अनेक भाषेचे सैनिक होते जसे कि हिंदु, संस्कृत, ग्रीक, पर्शियन इत्यादि। अकबरानी हिंदु-मुस्लिम सम्प्रदायाच्या मधील दुरावा कमी करण्यासाठी दिन-ए-इलाही नामक धर्माची स्थापना केली.

त्यांचा दरबार सर्वांसाठी नेहमीसाठी खुला राहत असे. अकबराने अनेक पारशी संस्कृतिच्या संबधित चित्रांना आपल्या भिंतीवर तयार केले. आपल्या सुरवातीच्या शासन काळात अकबराची हिन्दुच्या प्रति सहिष्णुता नव्हती , वेळेच्या सोबत त्यांनी स्वतःच स्वतःला बदलले आणि हिन्दुच्या सहित इतर धर्मोतही आवड दाखविली.

अकबराने हिंदु राजपूत राजकुमारीशी विवाह केला. त्यांची एक राणी जोधाबाई राजपूत होती. अकबराच्या दरबारात अनेक हिंदु दरबारी, सैन्य अधिकारी व सामंत होते. त्याने धार्मिक चर्चा आणि वाद-विवाद कार्यक्रमांची वेगळीच श्रुंखला सुरु केली, ज्यामध्ये मुस्लिम आलिम लोकांची जैन, सीख, हिंदु, नास्तिक, पुर्तगाली आणि कैथोलिक इसाई धर्मशास्त्रींशी चर्चा होत असे.

मुग़ल साम्राज्यांने निश्चितच भारतीय इतिहासा ला प्रभावित केले होते. त्यांची ताकत आणि आर्थिक स्थिति सतत वेगाने वाढत होती. अकबराने आपल्या आर्थिक बळाने जगातील एक सर्वात शक्तिशाली सेना तयार केली होती, ज्यास कुणालाही पराजित करने अशक्य होते. अकबने जे लोक मुस्लिम नव्हते. त्यांचा कर वसूल करने सुद्धा सोडून दिले. आणि ते असे करणारे पहिले सम्राट होते, आणि सोबतच जे मुस्लीम नाहीत त्यांचा विश्वास जिंकणारे ते पहिले सम्राट होते. अकबराच्या नंतर, त्यांचे साम्राज्य त्यांचा मुलगा जहागीर यशस्वीपणे चालवीत असे.

मृत्यु –

3 आक्टोबर 1605 अकबरास पेचिश चा आजार झाला, जो कधीच ठीक होऊ शकला नाही. त्यांचा मृत्यु 27 आक्टोबर 1605 झाला, त्यानंतर त्यांची समाधी आग्रा येथे बनविण्यात आली.

King Akbar :

अकबर मुग़ल साम्राज्यातील महान आणि बहादुर सम्राटामध्ये एक होते. त्यांनी कधी मुस्लिम आणि हिंदु या दोन धर्मो मध्ये भेदभाव केला नाही. आणि आपल्या साम्राज्यात सर्वाना एक सारखे समजून सर्वांना समान सुविधा दिल्या. इतिहासामध्ये बघितल्यास आम्हाला जोधा-अकबर यांची प्रेम कहानी विश्व प्रसिद्द दिसते.

जलाल उद्दीन मुहम्मद अकबर आपल्या प्रजेसाठी कुण्या देवापेक्षा कमी नव्हते. त्यांची प्रजा त्यांच्यावर खूप प्रेम करीत होती. आणि ते सुद्धा सदैव आपल्या जनतेस होणाऱ्या त्रासाची माहिती ठेवत आणि तो त्रास लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करीत असत. म्हणून इतिहासात शहंशाह जलाल उद्दीन मुहम्मद अकबराला एक बहादुर, बुद्धिमान और शक्तिशाली शहंशाह मानल्या जाते.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी जलाल उद्दीन अकबर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा जलाल उद्दीन अकबर चा इतिहास – Akbar History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Qutubuddin Aibak History – जलाल उद्दीन अकबर यांचा इतिहास या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Shaniwar Wada Information in Marathi

पुण्यातील शनिवारवाडयाची रहस्यमय कहाणी

Shaniwar Wada Information in Marathi गड, किल्ले, वाडे, राजपाट मिळवणं आणि मिळाल्यानंतर त्या आपल्या ताब्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *