मुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास

Jahangir Information

जहांगीर हा एक अत्यंत मनमौजी रंगीन आणि खूप शौकीन व्यक्तिमत्वाचा मुगल बादशहा म्हणून प्रसिद्ध होता, त्याच्या राजेशाही थाटमाटाचे किस्से खूप प्रसिद्ध होते. तसे पहाता मुगल सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर त्याने आपल्या कित्येक वाईट सवयी सोडल्या होत्या. जहांगीर चे खरे नाव सलीम होते त्याला पुढे जहांगीर हि पदवी बहाल करण्यात आली होती.

जहांगीर म्हणजे …. जग जिंकणारा जहांगीर हा प्रख्यात मुगल शासकांमधील एक होता, त्याने अनेक वर्षांपर्यंत मुगल साम्राज्य सांभाळले आणि एक जवाबदार व चांगल्या मुगल सम्राटा प्रमाणे मोगल साम्राज्याचा विस्तार केला. जहांगीर ने किश्वर आणि कांगडा व्यतिरिक्त बंगाल पर्यंत आपल्या साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला.

तसे पहाता जहांगीर च्या शासनकाळात कोणत्याही मोठ्या युद्धाचा व मोठ्या उपलब्धीचा उल्लेख सापडत नाही. मोगल सम्राट जहांगीर ला आग्रा येथे बनविलेल्या “न्याय की जंजीर” (न्यायाचा साखळदंड) करता सुद्धा ओळखले जाते. मोगल सम्राट जहांगीर च्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटनांवर या लेखातून प्रकाश टाकूया. Jahangir History in Marathi 

मुगल सम्राट … जहांगीर चा इतिहास – Jahangir History in Marathi

पूर्ण नाव (Name) : मिर्जा नूर-उद-दीन बेग मोहम्मद खान सलीम
जन्म (Birthday): ३१ ऑगस्ट १५६९, फतेहपुर सिक्री, मुगल साम्राज्य
वडील (Father Name): अकबर
आईचे नाव (Mother Name): मरियम
पत्नी (Wife Name):
 • नूर जहां,
 • साहिब जमाल,
 • जगत गोसेन,
 • मलिक जहां,
 • शाह बेगम,
 • खास महल,
 • करमसी,
 • सलिहा बानू बेगम,
 • नूर-अन-निसा बेगम,
पुत्र (Children Name):
 • खुसरो मिर्जा,
 • खुर्रम मिर्जा (शाहजहां),
 • परविन मिर्जा,
 • शाहरियर मिर्जा,
 • जहांदर मिर्जा,
 • इफत बानू बेगम,
 • बहार बानू बेगम,
 • बेगम सुल्तान बेगम,
 • सुल्तान-अन-निसा बेगम,
 • दौलत-अन-निसा बेगम,
मृत्यू (Death): २८ ऑक्टोबर १६२७ राजोरी, कश्मीर

जहांगीर चा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Jahangir Biography in Marathi

मोगल सम्राट जहांगीर चा जन्म 31 ऑगस्ट 1569 ला मुगल सम्राट अकबर च्या मुलाच्या रुपात फतेहपुर सिक्री येथे शेख सलीम चिश्ती यांच्या झोपडीत झाला. जहांगीर च्या आईचे नाव मरियम उज्जमानी होते. जहांगीर च्या जन्मापूर्वी अकबर चे एकही अपत्य जीवित राहात नव्हते, त्यामुळे सम्राट अकबर ने अनेक नवस-सायास केले.

त्यानंतर जहांगीर सलीम चा जन्म झाला होता. बालपणी जहांगीर ला सगळे सुल्तान मुहम्मद सलीम म्हणून हाक मारीत असत. मोगल सम्राट अकबर ने आपल्या मुलाचे नाव फतेहपुर सिक्री येथील शेख सलीम चिश्ती यांच्या नावावर ठेवले होते. मोगल सम्राट अकबर ने आपल्या मुलाला अगदी लहानपणातच सैन्य आणि साहित्यात निपुण बनविण्याचे प्रयत्न सुरु केले होते.

जेंव्हा जहांगीर केवळ 4 वर्षांचा होता त्यावेळी अकबर ने त्याच्याकरता बैरम खां चे पुत्र अब्दुल रहीम खान-ए-खाना सारख्या विद्वान शिक्षकाची नियुक्ती केली. त्यांच्याकडून जहांगीर ने इतिहास, अंकगणित, भूगोल, अरबी, फारसी, आणि विज्ञान आदि विषयांचे ज्ञान प्राप्त केले. त्यामुळे जहांगीर अरबी आणि फारसीत विद्वान झाला होता.

इतिहासकारांच्या मते सम्राट अकबर आणि जहांगीर यांचे संबंध चांगले नव्हते. जहांगीरने सत्ता आणि इतर बऱ्याच कारणानंसाठी आपल्या वडिलां विरुद्ध षड्यंत्र रचले आणि विद्रोह करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु पुढे दोघांनीही सामंजस्य दाखवीत तडजोड केली. अकबर च्या मृत्यू नंतर जहांगीर ला मुगल सिंहासन आणि सत्ता बहाल करण्यात आली.

जहांगीर चा विवाह आणि अपत्य – Jahangir Marriage and Children

अकबर चा एकमेव वारस असल्याने शिवाय वैभव-विलासात मोठा झाल्याने जहांगीर अत्यंत शौकीन आणि मनमौजी रंगीन व्यक्तिमत्वाचा शासक होता. त्याने 20 लग्न केलीत, पण त्याची सगळ्यात आवडती बेगम ही नूरजहांच होती. त्याने बरेच विवाह हे राजनीतीतील हितसंबंधाकरता करता सुद्धा केले होते.

वयाच्या १६ व्या वर्षी जहांगीरचा पहिला विवाह आमेरचे राजा भगवान राज यांची कन्या मानबाई यांच्यासमवेत झाला होता. मानबाईंना 2 मुलं झाली. जहांगीरने आपल्या मोठा मुलगा खुसरो मिर्जा च्या जन्मानंतर आपल्या मानबाई या बेगम ला शाही बेगम या उपाधीने गौरविले होते. त्या नंतर जहांगीरने वेगवेगळ्या राजकुमारींच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्यांच्याशी विवाह केला.

1586 ला जहांगीर उदय सिंहाची कन्या जगत गोसन च्या सौंदर्यावर मोहित झाला आणि तिच्याशी विवाह केला. तिच्यापासून जहांगीर ला दोन मुलं आणि दोन मुली झाल्या. परंतु यातील केवळ एक पुत्र खुर्रम जीवित राहिला, अन्य अपत्यांचा लहानपणीच मृत्यू झाला. पुढे त्याचा हाच मुलगा सम्राट शाहजहां च्या रुपात मोगल सिंहासनावर बसला आणि मुगल साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला.

लोक आज देखील शहाजहांचे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाच्या निर्मितीकरता स्मरण करतात. जहांगीर ला आपल्या सगळ्या पत्नींपासून पाच मुलं खुसरो मिर्जा (शाहजहां), परविज मिर्जा, शाहरियर मिर्जा, जहांदर मिर्जा, व इफत बानू बेगम, बहार बानू बेगम, बेगम सुल्तान बेगम, सुल्तान-अन-निसा बेगम, दौलत-अन-निसा बेगम नावाच्या मुली होत्या.

जहांगीर आणि त्याची आवडती बेगम नूरजहाँ यांचे नाते – Jahangir and Nur Jahan

असे म्हणतात जेंव्हा मुगल सम्राट जहांगीर ने पहिल्यांदा मिर्जा ग्यास बेद ची कन्या मेहरुन्निसा उर्फ नूरजहाँ ला पाहीले त्यावेळी तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्याक्षणी तिच्याशी निकाह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मेहरुन्निसाला तिचा पती अलीकुली बेग च्या निधनानंतर अकबर ची विधवा सलीमा बेगम यांच्या सेवेकरता नियुक्त करण्यात आले होते.

इसविसन 1611 ला जहांगीर ने मेहरुन्निसा च्या सौंदर्यावर मोहित होऊन विधवा मेहरुन्निसाशी विवाह केला. लग्नानंतर सम्राट जहांगीरने तिला नुरमहल आणि नूरजहाँ ही उपाधी दिली होती. या व्यतिरिक्त जहांगीर ने आपल्या राज्यातील सर्व अधिकार देखील नूरजहाँ बेगम च्या हाती सुपूर्द केले होते.

नूरजहाँ ला इतिहासातील एक धाडसी महिला म्हणून देखील ओळखले जाते, कारण जहांगीर समवेत ती बरोबरीने राज्यकारभारात लक्ष घालीत असे, आणि जहांगीर देखील आपल्या कार्यकाळात महत्वपूर्ण निर्णयांमध्ये नूरजहाँ चा सल्ला घेत असे. इसविसन 1626 मध्ये बेगम नूरजहाँ यांनी इतमाद-उद-दौला हा मकबरा बांधला. मुगलकालीन वास्तुकलेने बांधण्यात आलेली हि पहिली अशी वास्तू होती जी संगमरवरात बांधण्यात आली होती.

मोगल शासक जहांगीर – Jahangir Mughal Emperor

1605 ला अकबर च्या मृत्युनंतर सुल्तान सलीम ला मुगल ‘बादशहा’ चा ताज घालण्यात आला आणि त्याला जहांगीर ही उपाधी देण्यात आली. मोगल शासक जहांगीर ने वयाच्या 36 व्या वर्षी साम्राज्याची जवाबदारी एक आदर्श शासकाच्या रूपात सांभाळली आणि कित्येक वर्ष मोगल सिंहासनावर राज्य केले.

जहांगीर ने आपल्या शासनकाळात मोगल साम्राज्याचा जोमाने विस्तार केला आणि विजय अभियान चालवले. शिवाय अकबर या आपल्या वडिलांच्या कार्यकाळात जी क्षेत्र प्राप्त करता आली नाहीत अश्या क्षेत्रांना मिळविण्याचा प्रयत्न केला. मोगल सम्राट जहांगीर ने आपले सर्वात पहिले सैन्य अभियान मेवाड शासक अमर सिंह यांच्या विरुद्ध चालविले. त्या नंतर अमर सिंहाला जहांगीर पुढे आत्मसमर्पण करण्याकरता बाध्य व्हावे लागले.

नंतर या दोन्हीही शासकांमध्ये इसविसन1615 ला शांतता करार झाला. मेवाडला मुगल साम्राज्याचा विस्तार केल्यानंतर आपले विजयी अभियान चालवत जहांगीरने दक्षिण भारतात मोगलांचे आधिपत्य स्थापित करण्याच्या हेतूने दक्षिणेवर लक्ष केंद्रित केले. जहांगीर दक्षिणेवर पूर्णतः ताबा मिळवू शकला नाही परंतु त्याच्या सफल प्रयत्नांमुळे बिजापूर चे शासक अहमद आणि मोगल साम्राज्यामध्ये शांतता करार करण्यात आला त्यानंतर काही किल्ले व बालाघाट क्षेत्र मोगलांना देण्यात आले.

जहांगीर ने आपला मुलगा खुर्रम उर्फ शाहजहांच्या नेतृत्वात १६१५ साली उत्तर भारतात मुगल साम्राज्याचा विस्तार केला. या दरम्यान त्यांच्या सैन्याने कांगडा च्या राजाला युद्धात हरविले आणि आपल्या विजयी अभियानाला दक्खन पर्यंत पुढे नेले. अश्या तऱ्हेने मोगल साम्राज्याचा विस्तार होत गेला.

जहांगीर ला चित्रकला अत्यंत प्रिय होती – Jahangir Painter

मोगल सम्राट जहांगीर ला चित्रकलेची अत्यंत आवड होती, तो नेहमी आपल्या महालात वेग-वेगळ्या तऱ्हेची चित्र गोळा करीत असे. आपल्या शासनकाळात त्याने चित्रकलेला खूप प्रोत्साहन दिले होते.

इतकेच नव्हे तर जहांगीर स्वतः देखील एक उत्तम चित्रकार होता. मनोहर आणि मंसूर बिशनदास हे जहांगीर च्या शासनकाळातील प्रसिद्ध चित्रकार होते. जहांगीर च्या शासनकाळाला चित्रकलेचा सुवर्णकाळ देखील म्हंटल्या जाते. मोगल सम्राट जहांगीर ने आपल्या आत्मचरित्रात असं लिहून ठेवलंय की “कुठलही चित्र, ते कोणत्याही जीवित अगर मृत चित्रकाराने काढलेले असो” मी क्षणार्धात सांगू शकतो कि ती कोणत्या चित्रकाराची कलाकृती आहे”.

आपल्याच मुलाविरुद्ध (खुसरो) विद्रोह आणि पाचव्या शीख गुरूंची हत्या- Jahangir and Khusrau Mirza

ज्या सुमारास जहांगीर मोगल सिंहासनाची जवाबदारी सांभाळत होते त्याच दरम्यान त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाने खुसरो याने सत्तेच्या हव्यासापायी आपल्या वडिलांवरच 1606 ला षड्यंत्र रचून आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. परिणामी जहांगीर च्या सैन्यात आणि खुसरो मिर्झा यांच्यात जालंधर नजीक युद्ध झाले.

या युद्धात जहांगीर च्या सैन्याने खुसरो ला धूळ चारली आणि त्यांना कैद करून बंदिवासात टाकण्यात आले. याच्या काही काळानंतरच खुसरोचा मृत्यू झाला. जेंव्हा जहांगीर ला समजले की खुसरो ने केलेल्या विद्रोहात शिखांचे 5 वे गुरु अर्जुन देव यांनी मदत केली होती तेंव्हा जहांगीर ने त्यांची हत्या करविली.

“न्याय कि जंजीर” करता केले जाते जहांगीर चे स्मरण – Nyay ki Zanjeer

जहांगीर ने आपल्या शासनकाळात आदर्श शासकाच्या रुपात आपली प्रतिमा उत्तम ठेवण्याकरता न्याय व्यवस्थेला योग्य राखण्यासाठी चांगली पाऊलं उचलली. जनतेच्या समस्यांना आणि प्रकरणांना तो स्वतः देखील ऐकत असे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न देखील करीत असे आणि त्यांना न्याय मिळवून देत असे.

याकरता जहांगीर ने आग्र्यातील शाहबुर्ज किल्ल्यानाजिक यमुना नदीच्या तीरावर असलेल्या दगडी खांबावर सोन्याची साखळी बांधली होती त्यात ६० घंट्या सुद्धा लावण्यात आल्या होत्या, “न्याय कि जंजीर” च्या रुपात त्या प्रसिद्ध झाल्या. अडचणीच्या काळात कोणीही गरजवंत त्या घंट्या वाजवून जहांगीर कडे न्यायाची मागणी करू शकत होता.

जवळजवळ ४० फूट लांब या “न्याय की जंजीर” ला बनविण्याकरता खूप खर्च करण्यात आला होता. त्याच ‘न्याय कि जंजीर’ करता जहांगीर ला आजदेखील लक्षात ठेवले जाते.

मोगल सम्राट जहांगीर चा मृत्यू – Jahangir Death

1627 साली जेंव्हा मुगल सम्राट जहांगीर कश्मीर येथून परत येत होता तेंव्हा रस्त्यात लाहौर (पाकिस्तान) ला प्रकृती बिघडल्याने त्याचे निधन झाले. त्यानंतर जहांगीर च्या पार्थिवाला अस्थायी रूपाने लाहौर ला रावी नदीच्या किनारी असलेल्या बागसर किल्ल्यात दफन करण्यात आले. पुढे त्या ठिकाणी जहांगीर ची बेगम नूरजहाँ द्वारा जहांगीर चा भव्य मकबरा बनविण्यात आला.

हा मकबरा आज देखील लाहौर येथे पर्यटकांकरता आकर्षणाचे केंद्र बनला आहे. जहांगीर च्या मृत्यूपश्चात त्याचा मुलगा खुर्रम (शाहजहां) मोगल सिंहासनाचा उत्तराधिकारी झाला.

जहांगीर ची आत्मकथा – Jahangir Book

जहांगीर ला लिखाणाची देखील फार आवड होती, त्याच्याद्वारे सुरु करण्यात आलेली “तुजुक-ए-जहांगीर” (Tuzk-e-Jahangiri) नावाची त्याची स्वतःची आत्मकथा पुढे मौतबिंद खान यांनी पूर्ण केली. जहांगीरने संपूर्ण आयुष्य अत्यंत ऐषोआरामात व्यतीत केले. दारूच्या अति सेवनाने त्याचे शरीर जर्जर झाले होते.

त्याच्या संपूर्ण जीवनात त्याने महत्वाच्या लढाया तर लढल्या नाहीत परंतु आपल्या पित्याने रचलेला मोगल साम्राज्याचा पाया कमकुवत देखील होऊ दिला नाही. मोगल सम्राट जहांगीर चे त्याच्यातील दानशूरता, उदारता याकरीता आजही स्मरण केले जाते.

Please : आम्हाला आशा आहे की हा जहांगीर यांचा इतिहास  –  Jahangir History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top