सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास

Aurangzeb – Alamgir

मोगल बादशाहांमध्ये औरंगजेब असा एकमेव शासक होऊन गेलाय ज्याने भारतावर १६५८ ते इसविसन १७०७ अश्या जवळपास अर्ध्या शतकापर्यंत राज्य  केलं. शहाजहा चा मुलगा औरंगजेब याने आपल्या चातुर्यपूर्ण रणनितीनी मोगल साम्राज्याचा विस्तार भारतातील अधिकतर उपमहाद्वीपांमध्ये केला.

अकबर या मोगल सम्राटा नंतर औरंगजेब मोगल वंशाचे सर्वाधिक यशस्वी आणि योग्य प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवते झाले. आपल्या प्रतिभेने त्यांनी मोगल साम्राज्याला नव्या उंचीपर्यंत पोहोचविले. त्याच्या मृत्युपश्चात मोगलांच्या साम्राज्याला हळूहळू उतरती कळा लागली. 

त्यानंतर मात्र एकही मोगल बादशाह मोगल साम्राज्याला मजबूत करू शकला नाही. त्यामुळे पुढे मोगल साम्राज्य फार काळ टिकाव धरू शकले नाही आणि त्याचा अंत झाला. या लेखात मोगल शहंशहा औरंगजेब याच्या जीवनातील महत्वपूर्ण  घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आलाय. Aurangzeb

सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या भारतीय इतिहासातील औरंगजेब शासकाचा इतिहास – Aurangzeb History in Marathi

पूर्ण नाव (Name) : अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहोम्मद औरंगजेब आलमगीर
जन्म (Birthday): १४ ऑक्टोबर, १६१८, दाहोद गुजरात
वडील (Father Name): शहाजहा (मोगल वंशातील पाचवे शासक)
आईचे नाव (Mother Name): मुमताज महल (हिच्या स्मृतीत शहाजहाने ताजमहलाची निर्मिती केली)
पत्नी (Wife Name):
 • दिलरास बानो,
 • रबिया दुर्रानी,
 • औरंगाबादी महल,
 • बेगम नबाव बाई,
 • उदेपुरी महल,
 • झैनाबादी महल
पुत्र (Children Name):
 • आजम शाह,
 • मोहोम्मद सुलतान,
 • बहादूर शाह,
 • सुलतान मोहोम्मद अकबर,
 • मोहोम्मद काम बख्श
मृत्यू (Death): मार्च इसवी १७०७

औरंगजेबाचा जन्म, परिवार आणि प्रारंभीचे जीवन – Aurangjeb Biography

मोगल बादशहा औरंगजेबाचा जन्म गुजरात मधील दाहोद येथे २१ ऑक्टोबर १६१८ ला मुगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांच्या कुटुंबात झाला. तो मुमताज महल आणि मुगल सम्राट शहाजहा यांचा तिसरा मुलगा होता.

औरंगजेबाचा विवाह आणि अपत्य – Aurangjeb Spouse And Personal Life

सर्वात योग्य आणि बहादूर मोगल बाद्शाहानपैकी एक औरंगजेबाचा निकाह १८ मे १६३७ ला फारस राजघराण्यातील अत्यंत सुंदर अश्या ‘दिलरास बानो बेगम’ समवेत झाला. या व्यतिरिक्त देखील त्यांच्या अनेक बेगम होत्या. औरंगजेबाला एकूण ६ अपत्य होती, त्यात ५ मुलं आणि एक मुलगी.

एक कुशल प्रशासक म्हणून औरंगजेबाने स्वतःला सिद्ध केले:

इसविसन १६४५ ला औरंगजेबाला मुगल साम्राज्यातील सर्वाधीक समृद्ध आणि आनंदी अश्या गुजरात राज्याचा सुभेदार बनविण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या कौशल्यपूर्ण रणनितींच्या आणि सैन्य शक्तीच्या बळावर गुजरात येथे  चांगले कार्य केले आणि त्या भागाचा विकास केला.

त्याने केलेल्या कामाने प्रभावित होत शहजहा ने औरंगजेबाला उज्बेकिस्तान आणि अफगाणिस्तान चा सुभेदार बनविले आणि तेथील जवाबदारी त्याच्यावर  सोपविली, जेणेकरून औरंगजेबासारख्या कुशल प्रशासकाच्या देखरेखीखाली त्या राज्यांची प्रगती व्हावी. पुढे औरंगजेबाच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे आणि कौशल्यपूर्ण रणनितींमुळे त्याच्या पद आणि प्रतिष्ठेत सतत प्रगती होत गेली.

या दरम्यान त्याला सिंध आणि मुल्तान चा गवर्नर देखील बनविण्यात आले. आतापर्यंत औरंगजेबाची गणना एक योग्य आणि कुशल प्रशासक म्हणून होऊ लागली होती.

उत्तराधिकारी होण्याकरता भावांमध्ये संघर्ष :

इसविसन १६५२ मध्ये शाह्जाहाची प्रकृती अत्यंत खालावली होती आणि त्याच्या वाचण्याची काहीच चिन्ह दिसेनात तेंव्हा मुगल वंशाचा उत्तराधिकारी होण्याकरता त्याच्या तीनही मुलांमध्ये स्पर्धा पेटली आणि पुढे तर मुगल सिंहासन मिळवण्याकरता तिघांमध्ये युद्ध पेटले, शहाजहा मात्र आपल्या सर्वात मोठ्या, समंजस आणि योग्य अश्या दाराशिकोह ला आपला उत्तराधिकारी बनविण्यास इच्छुक होते.

औरंगजेब बनला आपल्या भावांचा हत्यारा:

तीनही भावंडांमध्ये औरंगजेब हा सर्वाधिक शक्तिशाली आणि बलाढ्य होता शिवाय मोगल सिंहासनावर विराजमान होण्यासाठी तो अत्यंत अधीर झाला होता, याकरता तो इतक्या खालच्या पातळीवर उतरला कि त्याने आपला सख्खा भाऊ दाराशिकोह ला फाशीवर लटकवले व बंगाल चा गवर्नर असलेला दुसरा भाऊ शाहशुजा ला पराजित करून त्याची देखील हत्या केली. आपल्या वृद्ध आणि आजारी पित्याला जवळजवळ ७ वर्ष कैदी बनवून आग्रा येथील लाल किल्ल्यात ठेवले.

आपल्या पित्याला शहाजहाला बंधक बनवून ठेवण्यामागे औरंगजेबाच्या भूमिकेविषयी इतिहासकारांचे मत असे आहे की शहाजहाने आपली बेगम मुमताज च्या आठवणीत आग्रा येथे बनविलेल्या ताजमहालावर प्रचंड पैसा खर्च केला होता त्याचा विपरीत परिणाम मोगल साम्राज्याच्या वित्तीय व्यवस्थेवर पडला होता. त्यामुळे औरंगजेब फार नाराज होता, याचा परिणाम म्हणून त्याने आपल्या पित्याला बंदिस्त केले होते.

औरंगजेबाचा शासनकाल – Aurangzeb Reign

अश्या पद्धतीने साम-दाम-दंड-भेद नीती वापरून क्रूर औरंगजेब हा १६५८ ला मुगल सिंहासनावर विराजमान झाला आणि आपला राज्याभिषेक “अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मुजफ्फर औरंगजेब बहादूर आलमगीर ” या उपाधीने करविला.

त्याच्या प्रजेला मात्र तो मुगल शासक झाल्याचा आनंद नव्हता कारण आपल्या दोनही भावांची हत्या करून आणि पित्याला बंदिवासात टाकल्याने प्रजेच्या मनात त्याच्याविषयी असंतोष खदखदत होता. औरंगजेबाने मात्र आपली क्रूर आणि दृष्टं वागणूक पुढेही कायम ठेवली त्यामुळे त्याचा परिणाम त्याला पुढे भोगावा लागला.

कट्टर मुस्लीम शासक होता औरंगजेब :

औरंगजेब हा क्रूर आणि अत्याचारी मुगल शासक तर होताच शिवाय तो जातीय स्तरावर कट्टर मुस्लीम देखील होता, संपूर्ण भारताला मुस्लीम देश बनविण्याची त्याची इच्छा होती, पण त्याचे हे मनसुबे कधीही पूर्ण झाले नाहीत. पण आपली ही इच्छा पूर्ण करण्याकरता हिंदू धर्मीयांसोबत त्याने अत्यंत क्रूर आणि द्वेषपूर्ण व्यवहार केला.

 • आपल्या शासनकाळात औरंगजेबाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अनेक मंदिरांना उध्वस्त करीत त्याठिकाणी मशिदी बांधल्या.
 • औरंगजेबाने हिंदू धर्मियांच्या सर्व सण उत्सवांवर पूर्णपणे बंदी केली. धार्मिक उत्सवांवर, यज्ञ, आणि अनुष्ठानांमध्ये जाण्यास हिंदुना पूर्णतः बंदी घालण्यात आली. त्याने तसा फतवाच काढला होता.
 • हे कमी कि काय म्हणून त्याने हिंदुना घोड्यांची, हत्तीची, सवारी करण्यावर देखील बंदी आणली
 • निर्दयी आणि क्रूर मुगल सम्राट औरंगजेबाने आपल्या शासन काळात ब्रजसंस्कृती संपविण्याचे देखील प्रयत्न केलेत, इतकेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णाची नगरी मथुराचे इस्लामाबाद, वृंदावनचे मेमिनाबाद, आणि गोवर्धनचे नाव बदलून मुहम्मद्पूर केले होते.
 • नौकरी करणाऱ्या हिंदूंची नौकरी हिरावून त्यांना बेरोजगार करून दोन वेळेच्या जेवणासाठी देखील त्यांना वणवण भटकायला लावले.
 • अत्यंत क्रूर आणि अत्याचारी शासक असलेल्या औरंगजेबाच्या शासनकाळात दारूचे सेवन, वेशावृत्ती, महिलांवर आणि गैर मुस्लिमांवर होणारे अत्याचार फार वाढले होते.
 • आपल्या शासनकाळात सरकारी नौकरी करणाऱ्या हिंदुना कामावरून काढून त्यांच्या जागी मुस्लीम कर्मचार्यांची भारती करण्याचे फर्मान जरी केले.
 • या व्यतिरिक्त घमंडी आणि निर्दयी औरंगजेबाने हिंदू धर्मियांवर अतिरिक्त कर लावला आणि मुस्लिमांना करात सवलत दिली आणि जो हिंदू कर भरण्यास सक्षम नसेल त्याला नाईलाजाने मुस्लीम धर्म स्वीकारावा लागत असे.

शिखांचे गुरु तेगबहादूर सिंह यांनी धर्म परिवर्तनास विरोध केल्याने त्यांना फासावर चढवले – Aurangzeb And Guru Tegh Bahadur

अत्याचारी आणि क्रूरवृत्तीच्या औरंगजेबाच्या मनात हिंदू च्या प्रती इतका राग आणि व्द्वेष खदखदत होता की त्याला सगळ्या हिंदू आणि शिखांना मुस्लीम बनविण्याची इच्छा होती. त्याच्या या इच्छेला न जुमानणाऱ्या गैर मुस्लिमांना त्याने बळजबरीने मुस्लीम बनविणे सुरु केले. त्याने हे फर्मान काश्मीर मध्ये देखील लागू केले आणि तेथील काश्मिरी ब्राम्हणांना जबरदस्तीने इस्लाम कबुल करण्यास भाग पाडले.

शीख समुदायाचे नववे गुरु तेगबहादूर सिंह यांनी औरंगजेबाच्या या क्रूरते विरुद्ध आपला आवाज  उठविला. त्यामुळे औरंगजेब खवळला, त्याने आपल्या शक्तीच्या आणि बळाच्या जोरावर शीख गुरु तेगबहादूर सिंह ला सुळावर लटकविले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्दयी औरंगजेबाच्या उत्साहावर फेरले होते पाणी – Aurangzeb And Shivaji Maharaj

महाराष्ट्रातील वीरयोद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी कट्टर मुस्लीम शासक औरंगजेबाला त्याच्या वाईट विचारांमध्ये यशस्वी होण्यापासून केवळ रोखलेच असे नाही तर अत्यंत साहसाने त्याच्याशी युद्ध करून औरंगजेबाच्या कित्येक सैनिकांना संपविले आणि त्याच्या इराद्यांना परास्त केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहसाला आणि शक्तीला पाहून औरंगजेबाच्या मनात देखील महाराजांविषयी दहशत पसरली होती.

औरंगजेबाच्या क्रूरता आणि निर्दयतेने मुगल साम्राज्याचा केला अंत – End Of The Mughal Empire

आपल्या शासनकाळात औरंगजेबाने आपल्या प्रजेसमवेत इतकी निर्दयी आणि क्रूर वागणूक ठेवली की छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत अनेक हिंदू शासक त्याचे शत्रू झाले होते आणि प्रजेच्या मनात देखील औरंजेबाविरुद्ध द्वेष आणि असंतोष खदखदत होता. एकीकडे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबा विरुद्ध विद्रोह पुकारल्यानंतर जाट, शीख, राजपूत, आणि सतनामी शासकांनी औरंगजेबाविरुद्ध विद्रोहाची ठिणगी पेटवली.

शिवाय इसवीसन १६८६ मध्ये इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी ने देखील भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने औरंगजेबावर हल्ला केला होता. या दरम्यान मग्रूर आणि क्रूर अश्या औरंगजेबाने अनेक लढाया जिंकल्या परंतु  छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शक्तिशाली शासकाशी युद्ध करताना त्याला पराजय पत्करावा लागला. या सोबतच एका मागून एक विरोधकांचा आणि विद्रोहाचा सामना करावा लागल्याने मुगल साम्राज्याला हादरे बसू लागले, मोगल साम्राज्याचा पाया कमकुवत होऊ लागला आणि मुगल साम्राज्य लयास जाऊ लागले.

दुसरीकडे मराठा शासकांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आणि हिंदुस्थानात मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. मात्र पुढे इंग्रजांनी मराठा साम्राज्याला हरवून भारतावर कब्जा केला होता.

असा झाला औरंगजेबाचा शेवट (मृत्यू) – Aurangzeb Death

काही इतिहासकारांच्या मते जवळजवळ ४९ वर्षांपर्यंत दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्या औरंगजेबाचा मृत्यू हा सामान्य होता. त्यांच्या मते इसविसन १७०७ मध्ये औरंगजेबाने आपले प्राण त्यागले.

तर दुसरीकडे काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की वीर छत्रसाल यांनी आपले गुरु प्राणनाथ यांनी दिलेल्या खंजिराने औरंगजेबावर हल्ला केला आणि त्याला सोडून दिले, त्या खंजिराला काही विषारी द्रव लावण्यात आल्याने औरंगजेबाच्या जखमा पुढे कधी भरल्याच नाहीत आणि वेदनांनी तडफडत त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यू पश्चात मोगल साम्राज्याचा देखील अंत झाला. औरंगजेबाला दौलताबाद येथील फकीर बुरुहानुद्दिन यांच्या कबर जवळ दफन करण्यात आले.

औरंगजेबाच्या शासनकाळात झालेले निर्माणकार्य – Aurangzeb Architecture

 • औरंगजेबाने आपल्या शासनकाळात नेलाहौर येथील बादशाही मशिदीची निर्मिती केली शिवाय दिल्लीतल्या लाल किल्ल्यात मोदी मशिदीचे देखील निर्माण कार्य पूर्ण केले.
 • औरंगजेबाने आपली बेगम रुबिया दुर्रानी हिच्या स्मरणार्थ १६७८ ला बीबी का मकबरा बनविला.
 • औरंगजेब हा सर्वाधिक काळापर्यंत सत्ता उपभोगणारा एक शक्तिशाली आणि कुशल प्रशासक होता. परंतु भारतीय इतिहासात तो आपल्यातील क्रूरतेमुळे आणि निर्दयतेमुळे ओळखला जातो. धर्माच्या पातळीवर अत्यंत कट्टरवादी असल्याने औरंगजेबाने हिंदू धर्मियांवर मोठ्याप्रमाणात अन्याय केला, त्यांचे हाल केलेत.
“जसं पेराल तसं उगवेल”

या म्हणीप्रमाणे त्याच्या अत्यंत क्रूर स्वभावामुळे मोगल साम्राज्य देखील नामशेष झाले. लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी औरंगजेब बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please : आम्हाला आशा आहे की हा औरंगजेब यांचा इतिहास  –  Aurangzeb History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here