“राजगड” किल्ल्याची संपूर्ण माहिती

Rajgad Fort Information in Marathi

अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. आणि या स्वराज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला तो राजगडाला. स्वराज्यात तोरणा किल्ला, पन्हाळगड, सिंहगड इ. किल्ले असताना राजगडाला हा मान का मिळाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर शोधुयात.

राजगडाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती Rajgad Fort Information in Marathi

Rajgad Fort Information in Marathi
Rajgad Fort Information in Marathi

राजगडाचा इतिहास – Rajgad Fort History in Marathi

राजगडाला अगोदर मुरुंबदेवाचे डोंगर म्हणून संबोधिले जायचे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला असल्याचे समजते. राजगडाने स्वराज्य स्थापन होताना बघितलं. एवढेच काय तर स्वराज्याची प्रथम राजधानी होण्याचा बहुमान राजगडाने मिळवला. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म आणि महाराणी सईबाई यांचे निधन देखील या गडावरच झाले.

सुखात तसेच दुःखामध्ये महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या राजगडाला इतिहासाचा प्रगल्भ वारसा लाभलेला आहे. महाराजांनी सुमारे २६ वर्षे राजगडाहून स्वराज्याचा कारभार सांभाळला. यानंतर स्वराज्याची राजधानी रायगडावर हलविण्यात आली.

राजगडाचे स्थान आणि उंची : Where is Rajgad Fort & Rajgad Fort Height

पुण्याहून ५० ते ६० किमी अंतरावर, सह्याद्रीच्या डोंगररांगात राजगड स्थित आहे. राजगडाची एकूण उंची सुमारे ४ हजार ५१४ फूट आहे. राजगडाचा व्यास जवळपास ४० किमी असून क्षेत्रफळ खूप मोठे आहे. गडाला पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची अशा तीन माची आहेत.

स्वराज्यातील कितीतरी मोहीम महाराजांनी राजगडावरून आखलेल्या आहेत. गडावरून तोरणा, रायगड, लिंगाणा इ. किल्ल्यांवर सहज लक्ष ठेवता येते. राजगडाचा आकार, स्थान आणि किल्ल्याचा परिसर, कदाचित हेच कारण असेल कि राजगडाला स्वराज्याची राजधानी होण्याचा बहुमान मिळाला होता.

राजगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : Places to visit on Rajgad Fort

  • बालेकिल्ला: हा राजगडाचा सर्वात उंच भाग आहे. याच्या प्रवेश द्वाराला महादरवाजा म्हटल्या जाते. हा दरवाजा आजही भक्कम आणि सुव्यवस्थित आहे.
  • पद्मावती माची: ही माची म्हणजे एक भव्य आणि सर्वात मोठी माची होय. हे एक लष्करी केंद्र होते. येथील पद्मावती देवीचे मंदिर तसेच महाराणी सईबाई यांची समाधी आहे.
  • सुवेळा माची: हि माची गडाच्या पूर्वेला आहे. येथे हत्तीप्रस्तर, गुप्त दरवाजा आणि वाघजाईचे शिल्प पाहण्यासारखे आहे.
  • पद्मावती देवीचे मंदिर: मुरुंबदेवाचा नामकरण राजगड केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले होते असा उल्लेख इतिहासकारांनी केलेला आहे.
  • संजीवनी माची: ही माची गडाच्या पश्चिमेला असून या माचीवरील बुरुज, घरे, आणि पाण्याच्या टाक्या आजही पहायला मिळतात.
  • आळु दरवाजा: तोरणा गडावरून राजगडाला येण्यासाठीच हा दरवाजा होय.

राजगडाशेजारील इतर पर्यटन स्थळे : Near places to visit Rajgad Fort

खरे पाहता एक दिवसात राजगड पाहणे जवळपास अशक्यचं. त्यामुळे पर्यटक येथे २-३ दिवस सुटी काढून येतात. राजगड दर्शन झाल्यानंतर येथून जवळच असलेले तोरणागड, सिंहगड तसेच रायगडाला भेट दिल्याशिवाय पाऊल घराकडे निघतच नाही. यांशिवाय पुणे जिल्हा, लोणावळा-खंडाळा या ठिकाणी देखील पर्यटक आवर्जून भेट देतात.

राजगडाला कसे जावे : How to reach Rajgad Fort

राजगडाला जाण्यासाठी आपल्याला पुणे गाठावे लागेल. पुण्यापर्यंत आपण हवाई किंवा रेल्वे मार्गाने येऊ शकतो. येथून एस. टी. बस किंवा खाजगी वाहनाने आपण राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावापर्यंत प्रवास करावा लागेल. मात्र त्यानंतर आपल्याला पायी प्रवास करावा लागेल.

राजगडकिल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी : Best Time to visit Rajgad Fort

खरं तर वर्षभर पर्यटक आणि गिर्यारोहकांची गर्दी येथे पाहायला मिळते. परंतु सर्वाधिक गर्दी असते ती म्हणजे ऑक्टोबर ते मार्च महिन्या दरम्यान.

जर आपण निसर्गप्रेमी असाल, तर तुम्ही राजगड बघितलाच पाहिजे. निसर्गाच्या सौंदर्याने खुललेल्या आणि महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या राजगडाला आपण एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे. मग कधी जाताय राजगडाला?

राजगडाबद्दल काही महत्वाचे प्रश्न : Rajgad Fort Quiz in Marathi

१. राजगड कुठल्या जिल्ह्यात आहे? (Where is Rajgad Fort?)

उत्तर: पुणे जिल्ह्यात.

२. राजगडाचे पुर्विचे नाव काय?

उत्तर: मुरुंब देवाचे डोंगर.

३. स्वराज्याची पहिली राजधानी कुठली?

उत्तर: राजगड.

४. राजगड कुणी बांधला? (Who Built Rajgad Fort?)

उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड बांधला.

५. राजगडावरून स्वराज्याचा कारभार किती बघितल्या गेला?

उत्तर: सुमारे २६ वर्षे. (इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार).

६. राजगडाची उंची किती आहे? (Rajgad Fort Height)

उत्तर: सुमारे ४ हजार ५१४ फूट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here