• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

निंबाळकर घराण्याची कन्या – सईबाई  भोसले

Saibai Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण पत्नींपैकी सईबाई या महाराजांच्या अतिशय निकट आणि ज्यांना महाराजांचं स्फूर्तीस्थान समजल्या गेलं अश्या ! निंबाळकर घराण्यातील माधोजीराव निंबाळकर यांची कन्या सईबाई वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी महाराजांच्या पत्नी बनून भोसले घराण्यात आल्या.

सईबाईंचा आणि शिवरायांचा विवाह पुणे येथे 16 मे 1641 साली लालमहालात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्या वेळी महाराज अवघे 11 वर्षांचे होते. बालवयात विवाह झाल्याने आपसूकच दोघांच्यात घट्ट ऋणानुबंध निर्माण झाले. सोबत खेळणे…गप्पा…गोष्टी…यामुळे महाराजांचा सईबाईंवर अधिकच स्नेह होता.

निंबाळकर घराण्याची कन्या – सईबाई  भोसले – Saibai Information in Marathi

Sayeebai

नाव (Name): सई निंबाळकर
जन्म (Birthday):  1633 फलटण, महाराष्ट्र
वडील (Father Name):मुधोजीराजे निंबाळकर
आई (Mother Name):रेऊबाई निंबाळकर
पती (Husband Name): छत्रपती शिवाजी महाराज
मृत्यू (Death): 5 सप्टेंबर 1659 (26 वर्ष) राजगड, पुणे

सावळ्या गव्हाळी रंगाच्या सईबाई देखण्या, करारी,  रुबाबदार,  तलवार चालविण्यात पारंगत,  महाराजांना शोभणाऱ्या अश्याच होत्या. जिजाबाईंच्या लाडक्या आणि सर्वाधिक मायेच्या सईबाई संभाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. धर्मवीर संभाजी महाराजांच्या आई…संभाजी महाराजांपूर्वी सईबाईंना तीन मुली होत्या.

सईबाईंच्या अकाली निधनानंतर महाराजांना त्यांची खूप उणीव भासायची… सईबाई या छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्यवान पत्नी होत्यां…असं म्हणतात अखेरचे श्वास घेतांना महाराजांच्या मुखातून ”सई” हा शेवटचा शब्द निघाला होता.

संभाजी महाराजांचा जन्म आणि सईबाईंचे प्रकृती अस्वास्थ्य

सईबाईंनी वयाच्या 24 व्या वर्षी 14मे 1657 साली संभाजी महाराजांना जन्म दिला. आणि त्यांना बाळांतव्याधी ने ग्रासले त्या अंथरुणाला खिळल्या, कुठलीही औषधी लागू पडत नव्हती…दूरदूरचे वैद्य बोलाविले…देवाला नवस-सायास बोलले गेले…कौल लावला…देव पाण्यात ठेवले. परंतु काहीच उपाय चालेना! प्रकृती ढासळतच गेली.

महाराजांची द्विधा मनस्थिती झाली होती…एकीकडे खान स्वराज्य गिळंकृत करण्याकरता आ वासून उभा होता आणि दुसरीकडे सईबाईंच्या प्रकृतीत कश्यानेही फरक पडत नव्हता.  अश्या प्रतिकूल परिस्थितीतही महाराज हवा-पालटा साठी सईबाईंना घेऊन प्रतापगडावर गेले…समवेत जिजाबाई देखील होत्या.

सईबाईंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराज चिंतीत असायचे परंतु सतत रयतेचा विचार करणाऱ्या शिवाजी महाराजांना उसंत तरी कुठे? खानाशी झुंज देण्याचा विचार स्वस्थ बसू देत नव्हतां. कोणावर काय जवाबदारी सोपवायची…असे सगळे मनसुबे मनात सुरु असतांना मधातच सईबाईंचा विचार महाराजांच्या मनात अस्वस्थता निर्माण करी. हवा-पालटाचा देखील काहीही परिणाम झाला नाही सईबाईंच्या प्रकृतीत कणभर देखील फरक पडला नाही.

आईसाहेब आणि सईबाई राजगडावर परत आल्या. महाराजांचा आणि सईबाईंचा स्नेहबंध हा अनोखा होता लहानपणीची निरागस मैत्री, त्या वयात जुळलेले रेशीमबंध, रुसवे-फुगवे, भांडणे अश्या अनेक घटना महाराजांच्या मनात पिंगा घालीत असत.

राजगडावरून सईबाईंच्या प्रकृतीच्या बातम्या प्रतापगडावर येत असत…येणारी प्रत्येक बातमी महाराजांचा काळजाचा ठोका चुकवीत असे… एकदा महाराजांकरता संदेश आला…त्यांना राजगडावर बोलाविले होते…महाराज सईबाईंना भेटायला गेले. सईबाईंना राजगडावरची हवा सहन होत नसल्याने राजांनी त्यांच्याकरता शिवापटण येथे वाडा बांधला होता.

सईबाई या ठिकाणी राहात असत. राजे आणि सईबाई यांच्यात संवाद झाला आणि राजे माघारी गेले… खानाला तोंड देण्याची जय्यत तयारी प्रतापगडावर सुरु होती… मावळखोरी महाराजांकडून लढणार हे ऐकून सगळ्यांचा उत्साह दुणावला होता. आई जगदंबा पाठीशी आहे असा विश्वास सर्वांच्या मनात वाढू लागला.

सईबाईंचे निधन – Saibai Death

परंतु काळाने डाव साधला, सईबाईंची प्रकृती आणखीन खालावली. अनेक प्रयत्न करून देखील नियती नमली नाही. 5 सप्टेंबर 1659…भाद्रपद वद्य चतुर्दशीला सईबाई गेल्या…

डाव अर्ध्यावरती मोडला…मनाप्रमाणे जमलेला डाव नियतीला पहावला नाही…दोन-सव्वा दोन वर्षांचे लहानगे संभाजीराजे मातृसुखाला पारखे झाले. कधीही परत न येणाऱ्या वाटेवर सईबाई कायमच्या निघून गेल्या.

सईबाईंनंतर संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी जिजाबाईंनी केला !!!

अशेच माझी मराठी सोबत जुडून रहा.

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
June 8, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
June 1, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved