पन्हाळगड किल्ला इतिहास

Panhala Fort Information In Marathi

महाराष्ट्र राज्यात आजमितीला टिकून असलेल्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा एक मुख्य किल्ला आहे. मराठ्यांची काही काळ राजधानी असलेला हा पन्हाळगड इतिहासाच्या दृष्टीकोनातून आणि पर्यटकांच्या दृष्टीने देखील महत्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने 2 जानेवारी ई.स. 1954 ला पन्हाळगडाला महाराष्ट्रातील सरंक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. कोल्हापूर पासून 20 की.मी. अंतरावर पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी हा पन्हाळगड असून समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची 977.2 मीटर आहे.

गिरिदुर्ग प्रकारातील या किल्ल्याची उंची 4040 फुट एवढी आहे. चढाईच्या दृष्टीने हा गड सोपा समजला जातो, युद्धकलेच्या दृष्टीने पन्हाळगड महत्वाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव आज देखील या किल्ल्यावर ठायी-ठायी होते. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आहे.

पन्हाळगड किल्ला इतिहास – Panhala Fort Information In Marathi

Panhala Fort Information In Marathi
Panhala Fort Information In Marathi

पन्हाळगडाचा किल्ल्याचा इतिहास – Panhala killyachi Mahiti in Marathi

साधारण 1200 वर्षांचा इतिहास या गडाला असून हा किल्ला भोज राजा नृसिंह  यांच्या कालखंडात बांधला गेला आहे. राजा भोज यांनी 1178-1209 दरम्यान या गडाचे बांधकाम केल्याचे पुरावे आढळतात, दख्खन किल्ल्यांमध्ये पन्हाळगड सर्वात मोठा किल्ला आहे. पन्हाळ्यावर पूर्वी नाग जमातीचे वर्चस्व होते. या किल्ल्याला पूर्वी पन्नग्नालय म्हणून ओळखलं जात असे. (या गडाला पर्णालदुर्ग देखील म्हंटल्या गेलंय)

2 मार्च 1660 साली पन्हाळ्याला सिद्दी जौहरने वेढा दिला. हा वेढा तब्बल चार महिने घातला होता, शिवाजी महाराज या वेढ्यामुळे पन्हाळ्यावर अडकले.एका रात्री जोरदार पाऊस पडत असतांना बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद सारख्या स्वराज्यातील प्रामाणिक आणि शूर लढवय्या सैनिकांमुळे महाराजांची सुटका झाली.

सिद्दी जौहरने ज्यावेळी महाराजांचा पाठलाग केला त्यावेळी शिवा काशीद ने महाराजांचे सोंग घेतल्याने सिद्दी जौहर फसला आणि महाराजांना पळून जाण्याचा अवधी मिळाला, पण यात शिवा काशीद ला प्राणांची आहुती द्यावी लागली.

सिद्दी जौहर ने महाराजांचा पाठलाग केला असता बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत त्याची वाट अडवली आणि प्राणपणाने झुंज दिली त्यामुळे शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचू शकले. या लढाईत बाजीप्रभू धारातीर्थी पडले. त्यामुळे आज ही घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते.

6 मार्च 1673 ला ‘कोंडाजी फर्जंद’ या शिवरायांच्या शिलेदाराने केवळ 60 मावळ्यांच्या सोबतीने पन्हाळगड हा महाराजांचा आवडता किल्ला त्यांना मिळवून दिल्याची प्रसिद्ध घटना इतिहासात नमूद आहे. कोंडाजी फर्जंद आणि 60 शिलेदारांच्या या पराक्रमामुळे स्वराज्याची शान असणारा आणि शिवरायांचा आवडता असणारा पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात आणला गेला. महाराजांनी स्वतः गडावर जाऊन कोंडाजी फर्जंद आणि शिलेदारांचे कौतुक केले होते.

या गडावर एक इमारत असून तिला सज्जाकोटी म्हंटले जाते. इब्राहीम आदिलशाहने ही इमारत बांधली असून या ठिकाणी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले होते. योग्य संधी मिळताच ते दोघे फरार होण्यात यशस्वी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये पन्हाळगड स्वराज्यात आणला. पुढे अनेक वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, शिवरायांच्या मृत्यू पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्र येथूनच आपल्या हातात घेतली. (असं म्हणतात की ज्यावेळी शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर होते, परंतु त्यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूची वार्ता तब्बल 8 दिवस उशिरा मिळाली होती)

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कालखंडात पन्हाळगडावर काही चांगल्या सुधारणा केल्यात. महाराजांनी संभाजी महाराजांना पन्हाळगडावर राहून कर्नाटकचा राज्यकारभार सांभाळण्याची आज्ञा केली होती. ताराबाईंनी ज्यावेळी कोल्हापूरची सूत्र आपल्या हाती घेतली होती त्या सुमारास पन्हाळा ही आपली राजधानी केली होती. शाहू राजांनी काही काळ पन्हाळ्यावर कब्जा केल्याचे म्हंटले जाते.

1701 मध्ये हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला, पुढे बरीच वर्ष या गडावर मोगलांनी राज्य केलं, पंत अमात्य रामचंद्र ह्या सेनानींनी काही काळ या गडावर राज्य केल्याची नोंद स्वराज्य दंतपुस्तकात नमूद आहे. या किल्ल्याचा राज्यकारभार 1782 ला कोल्हापूर मुख्यालयाकडे सोपविण्यात आला. पुढे ब्रिटीशांनी 1844 ला स्थानिक राज्यकर्त्यांकडून हा किल्ला काबीज केला.

पन्हाळगड किल्ल्यावर काय पहाल? – Tourist Places on Panhala Fort

 • राजवाडा:

ताराबाईंचा हा वाडा पाहण्यासारखा असून यातले देवघर सुरेख आहे. या वाड्यात आता पन्हाळ्याचे नगरपालिका कार्यालय, आणि पन्हाळा हायस्कूल आहे.

 • सज्जाकोठी:

ताराबाईंच्या वाड्यातून पुढे गेल्यावर सज्जाकोठी असून शिवाजी महाराजांनी या ठिकाणी संभाजी महाराजांना प्रांत कारभार बघण्यासाठी ठेवले होते. महाराजांची या ठिकाणी गुप्त खलबते चालत असत.

 • राजदिंडी:

या मार्गावरून जात महाराज सिद्दी जौहर च्या वेढ्यातून निसटले होते. विशाळगडावर नेणारी ही एकमेव वाट आहे.

 • अंबरखाना:

येथे भव्य असे धन्य कोठार असून त्यांना गंगा, यमुना, सरस्वती अशी नाव आहेत. त्या काळी या कोठारांमध्ये नागली आणि भात सुमारे 25 हजार खंडी धान्य मावत असल्याचे सांगण्यात येते.

 • चार दरवाजा:

पूर्व दिशेकडचा हा महत्वाचा दरवाजा ब्रिटीशांनी 1844 ला उध्वस्त केला. त्याचे अवशेष या ठिकाणी पहायला मिळतात, येथे ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा देखील आहे.

 • सोमाळे तलाव:

गडावर हा मोठा तलाव असून त्या शेजारी सोमेश्वराचे देऊळ आहे. या मंदिरातील देवतेला महाराजांनी आणि मावळ्यांनी चाफ्याची लक्ष फुले वाहिली होती.

 • रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी:

तलावापासून पुढे गेल्यावर दोन समाध्या दृष्टीस पडतात त्यातील उजवीकडची रामचंद्र पंत यांची समाधी असून शेजारची त्यांच्या पत्नीची आहे.

 • रेडे महाल:

या इमारतीला महाल म्हणून जरी संबोधल्या गेलं असलं तरीही ही जागा जनावरांना बांधण्यासाठी राखीव होती.

 • धर्मकोठी:

या इमारतीत धान्य कोठारातून धान्य आणून यथायोग्य दानधर्म केल्या जात असे.

 • तीन दरवाजा:

गडावर पश्चिम दिशेला असलेला हा सर्वाधिक महत्वाचा दरवाजा असून यावरील नक्षीकाम खूप सुंदर आहे. कोंडाजी फर्जंदने या ठिकाणावरून 60 मावळ्यांसह हा किल्ला जिंकला होता.

 • महालक्ष्मी मंदिर:

गडावरचे हे फार पुरातन मंदिर असून त्याच्या बांधणीवरून सुमारे 1000 वर्षांपूर्वीचे हे मंदिर असावे. भोज राजांचे हे कुलदैवत होते.

 • बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा:

पन्हाळा येथे चांगल्या ऐसपैस चौकात बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

पन्हाळगड किल्ल्यावर कसे जाल ? – How to Reach on Panhala Fort

कोल्हापूर येथून पन्हाळा येथे एस.टी. ने आणि खाजगी वाहनाने 40 मिनिटात पोहोचता येतं.

पन्हाळगडावर राहण्याची सोय – Hotels on Panhalgad

पन्हाळगडाच्या जवळपास राहण्याकरता हॉटेल्स आहेत.

 • खाण्या-पिण्याची सोय

पन्हाळा येथील झुणका भाकरी प्रसिद्ध असून, जेवणाची सोय हॉटेल्स आणि निवास स्थानांमध्ये होऊ शकते.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ पन्हाळगडा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top