भारतीय स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील आणि स्वातंत्र्य भारताच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण राजकारणी, हिंदुत्ववादी नेता…..विनायक दामोदर सावरकर

Veer Savarkar Information in Marathi

भारत देश इंग्रजांच्या गुलामीत असतांना आपल्या देशांत अनेक क्रांतिकांनी चळवळी केल्या होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता देशाच्या अनेक भागातून क्रांतिकारकांनी उठाव केले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी क्रांतिकारक दामोदर सावरकर यांनी लोकमान्य टिळक यांच्याकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात चळवळी केल्या होत्या. या लेखात आपण याच महान क्रांतिकारका बद्दल जाणून घेणार आहोत..  

भारतीय स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील आणि स्वातंत्र्य भारताच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण राजकारणी, हिंदुत्ववादी नेता…..विनायक दामोदर सावरकर – Vinayak Damodar Savarkar Information in Marathi

Vinayak Damodar Savarkar

विनायक दामोदर सावरकर बद्दल माहिती – Vinayak Damodar Savarkar Mahiti

नाव विनायक दामोदर सावरकर
जन्म २८ मे १८८३
जन्मस्थान भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
आई राधाबाई दामोदर सावरकर
वडील दामोदर विनायक सावरकर
पत्नी यमुनाबाई विनायक सावरकर
अपत्ये प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास
मृत्यु २६ फेब्रुवारी १९६६
मृत्यूस्थान दादर, मुंबई, महाराष्ट्र,भारत
चळवळ भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना अभिनव भारत, अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान

विनायक दामोदर सावरकर यांचा जीवन परिचय – Vinayak Damodar Savarkar Biography in Marathi

वीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली महाराष्ट्राच्या नाशिक जिल्हातील भगूर या गावी झाला होता. त्यांचे वडील दामोदर पंत व आई राधाबाई हे भगूर या गावी वास्तव करीत असतं. सावरकरांना दोन भाऊ व एक बहिण होती. सावरकर हे भावंडांमध्ये दोन नंबर चे संतान होते. त्यापैकी बाबाराव हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते, आणि नारायण हे धाकटे भाऊ होते. शिवाय त्यांना नैना नावाची एक बहीण सुद्धा होती.

सावरकर नऊ वर्षाचे असतांना त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या आई राधाबाई सावरकर याचं निधन झालं. तसचं, सन १८९९ साली प्लेगच्या महामारीमुळे त्यांचे वडील दामोदर सावरकर याचं सुद्धा निधन झालं होत. अश्या परिस्थितीत त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनी घरच्या लोकांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

सन १९०१ साली विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक मधील शिवाजी विद्यालया मधून मैट्रिक ची परीक्षा उतीर्ण केली. शालेय जीवनात विनायक सावरकर यांचा खूप हट्टी स्वभाव होता. सावरकर अकरा वर्षाचे असतांना त्यांनी लहान मुलांना एकत्रित करून एक “वानर सेना” तयार केली होती, आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत करून दिली होती.

सावरकर यांची शिक्षणा प्रती खूप रुची होती. म्हणून त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनी आपल्या बेताच्या परिस्थितीचा विचार न करता विनायक सावरकरांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. सावरकर अभ्यासात हुशार तर होतेच, शिवाय ते उत्तम कवी देखील होते. त्यांनी आपल्या शालेय जीवनात काही कवितांचे लेखन सुद्धा केलं होत.

विनायक दामोदर सावरकर हे “लोकमान्य टिळक” यांना आपले गुरु मानत असतं. विद्यालयीन काळादरम्यान ते लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले “शिवाजी महाराज जयंती” आणि “गणपती उत्सव” यासारख्या उत्सवांचे आयोजन करीत असतं. सन १९०१ साली त्यांचा विवाह रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची कन्या यमुनाबाई यांच्या सोबत करण्यात आला होता.

यानंतर सन १९०२ साली त्यांनी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. सावरकरांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांचे सासरे रामचंद्र चिपळूणकर यांनी त्यांचा शैक्षणिक खर्च भागवला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आपले बी.ए. चे शिक्षण घेत असतांना त्यांनी “अभिनव भारत सोसायटी” ची स्थापना केली. तसेच त्यांनी स्वदेशी आंदोलनात देखील भाग घेतला होता.

विनायक दामोदर सावरकर यांच्या कडून होत असलेल्या इंग्रजांन विरोधी चळवळी आणि त्याच्या विरोधात करीत असलेल्या भाषणांमुळे इंग्रज सरकारने त्यांची मानद पदवी बळकावली. विनायक दामोदर सावरकर यांची क्रांतिकारी सुरवात:- विनायक दामोदर सावरकर यांची क्रांतिकारी सुरुवात सन १९०४ साली “अभिनव भारत” संघटना स्थापन करून झाली होती. सन १९०५ साली बंगालच्या फाळणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करून जनजागृती केली होती.

सन १९०६ साली लोकमान्य टिळकांचा मान्यतेने त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली. लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.  लंडनला गेल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी राहत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना एकजूट केलं व देशात इंग्रज सरकार कडून होत असलेल्या अत्याचार विरुद्ध लढा देण्यास सांगितल. लंडनमध्ये राष्ट्रभक्तसमूह नावाची गुप्त संघटना त्यांनी पांगे आणि म्हसकर यांच्या साथीने तयार केली.

“मित्रमेळा” ही या संघटनेची गुप्त शाखा होय. समोर जावून याच संघटनेचे रुपांतर “अभिनव भारत” या संघटनेत करण्यात आले. लंडनमध्ये “इंडिया हाऊस” येथे राहत असतांना सावरकरांनी ‘जोसेफ मॅझिनीच्या” यांच्या आत्मचरित्राचे रुपांतर मराठीत केलं होत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सावरकरांनी ‘सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान’ विषद केलं होत.

तसचं, सावरकरानी लिहिलेले लेख ‘इंडियन सोशालिस्ट’ आणि ‘तलवार’ नावाच्या पत्रिकेत प्रकाशित होत असत. विनायक सावरकर हे एकमेव असे लेखक होते की, त्यांचे लेख प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांच्या लेखावर बंदी लावली जात असे. “द इंडियन वार ऑफ इंडिपेंडेंस १८५७” या पुस्तकाचे लेखन सावरकरानी केलं परंतु,  इंग्रज सरकार कडून त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी लावण्यात आली होती.

काही काळानंतर ‘मॅडम भिकाजी कामा’ यांच्या साह्याने या पुस्तकाचे प्रकाशन हॉलंड या ठिकाणी गुप्त पणे करण्यात आलं होत. यानंतर या पुस्तकाच्या काही प्रती फ्रांस देशातून भारतात पोहचवण्यात आल्या. सावरकरानी या पुस्तकात ‘१८५७ च्या’ उठावाचा’ उल्लेख “स्वातंत्र्य पूर्व भारतातील पहिले क्रांतिकारक उठाव” म्हणून केला आहे.

सन १९०९ साली सावरकरांचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांना लंडनमध्ये वकिली करण्यास मनाई करण्यात आली होती. कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा गोळ्या घालून वध  केल्यामुळे सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य “मदनलाल धिंग्रा” यांना पकडून फाशीवर लटकविण्यात आलं होत. लंडन मधील इंडिया हाउस या ठिकाणी वास्तव्यास असतांना त्यांनी इतर देशातील क्रांतीकारक गटाशी संपर्कात राहून त्यांच्याकडून बॉंम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केलं.

सावरकरांनी हे तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुलं भारतात पाठवली. नाशिक येथील कलेक्टर जॅक्सन हा तेथील जनतेवर खूप अत्याचार करीत होता. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना तुरुंगात पाठवण्यास देखील तोच कारणीभूत होता. म्हणून त्याला ठार मारण्याच्या उदेशाने सावरकरांनी पाठवलेल्या ब्राउनिंग पिस्तुलच्या साह्याने अनंत कान्हेरे या १६ वर्षीय तरुणाने नाशिक येथील कलेक्टर जॅक्सन याला ठार मारले.

त्यामुळे अनंत कान्हेरे, याच्या सोबतच त्यांचे दोन साथीदार कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या अभिनव भारत संघटनेच्या तीन क्रांतीकारकांना पकडून फाशी देण्यात आली. सन १९१० साली नाशिक चे कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्ये प्रकरणी सावरकर यांना लंडनमध्ये असतांना कैद करण्यात आलं होत. कारण, त अभिनव भारत संघटनेशी जोडले होते.

शिवाय त्यांनी पाठविलेल्या पिस्तुलच्या मदतीने अनंत कान्हेरे यांनी त्याची हत्या केली होती. सावरकरांना पकडून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे लावण्यात आले व त्यांना 50 वर्षाची सजा देण्यात आली. पॅरिस वरून लंडनला येतांना मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा धाडसी प्रयत्न त्यांनी केला होता.

त्यामुळे त्यांना दोन जन्मठेप व काळापाण्याची शिक्षा देण्यात आली. तसेच, त्यांचे बंधू बाबाराव यांना सुद्धा काळापाण्याची शिक्षा देण्यात आली होती. अंदमानला  कैदेत असतांना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. अमानुष हाल होत असतांना आणि लिहिण्यास कुठल्याच प्रकारचे साधन नसतांना सुद्धा त्यांनी भिंतीवर कोळशाच्या साह्याने महाकाव्य लिहिले.

सन १९२० साली महात्मा गांधी, विठ्ठलभाई पटेल आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी इंग्रज सरकारकडे विनंती केली. यानंतर सन १९२१ साली सावरकरांना रत्नागिरी येथील तुरुंगात पाठवण्यात आलं, आणि तेथून येरवडा तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. रत्नागिरी येथील तुरुंगात असतांना त्यांनी ‘हिदुत्ववादी’ पुस्तकाची रचना केली.

सन १९२४ साली त्यांना सोडण्यात आलं परंतु, त्यांना काही अटी देण्यात आल्या रत्नागिरीच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. शिवाय त्यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी करण्यात आली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी १९२४ साली ‘रत्नागिरी हिंदू सभेची’ स्थापना केली. तसेच, भारतीय संस्कृती आणि समाजकार्य करण्यास सुरवात केली.

लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य पार्टी’ त सहभाग घेतल्यानंतर त्यांनी हिंदू महासभा नावाची वेगळी पार्टी सुरु केली. सन १९३७ साली हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि पुढे जावून ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. विनायक दामोदर सावरकर यांनी पाकिस्तान निर्माण करण्यास विरोध केला होता.या करिता त्यांनी महात्मा गांधी यांना निवेदन पाठविले होते. यानंतर नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना ठार मारले परंतु,  या घटनेसाठी सावरकर यांना कारणीभूत ठरविण्यात आल होत. यामुळे सावरकरांना पुन्हा एकवेळ तुरुंगात जाव लागल. परुंतु साक्षीदाराच्या साक्षीमुळे त्यांना सोडून देण्यात आल.

सन १९५१ साली पुणे येथील विश्वविद्यालया कडून त्यांना डी.लिट ची उपाधी देण्यात आली होती. १ फेब्रुवारी १९६६ साली मृत्यू पूर्वी त्यांनी उपवास करण्याचा निर्णय घेतला. सन २६ फेब्रुवारी १९६६ साली विनायक दामोदर सावरकरांनी आपले पार्थिव शरीर सोडले आणि गाढ झोपेत विलीन झाले.

या थोर क्रांतीकारकाने लहान वयापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक क्रांतिकारक म्हणून महान कार्य केले, अश्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला आपण सतत स्मरणात ठेवायला पाहिजे. आज त्यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांना माझी मराठीच्या संपूर्ण टीम कडून शत शत प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here