शिर्डीच्या साईबाबा ची आरती

Sai Baba Aarti

नमस्कार मित्रांनो, आज आपण आरती संग्रह या लेखाच्या माध्यमातून शिर्डी निवासी संत साईबाबा यांच्या आरतीचे लिखाण करणार आहोत.

शिर्डीच्या साईबाबा ची आरती – Sai Baba Aarti Marathi

Sai Baba Aarti Marathi
Sai Baba Aarti Marathi

आरती साईबाबा। सौख्यदातार जीवा।

चरणरजातली। द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा।।आ०।।ध्रु।।

जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग।

मुमुक्षूजनां दावी। निज डोळा श्रीरंग।। आ०।।१।।

जयामनी जैसा भाव। तया तैसा अनुभव।

दाविसी दयाघना। ऐसी तुझीही माव।। आ०।।२।।

तुमचे नाम ध्याता। हरे संस्कृती व्यथा।

अगाध तव करणी। मार्ग दाविसी अनाथा।।आ०।।३।।

कलियुगी अवतार। सगुण परब्रह्मः साचार।

अवतीर्ण झालासे। स्वामी दत्त दिगंबर।। द०।। आ०।।४।।

आठा दिवसा गुरुवारी। भक्त करिती वारी।

प्रभुपद पहावया। भवभय निवारी।। आ०।।५।।

माझा निजद्रव्यठेवा। तव चरणरज सेवा।

मागणे हेचि आता। तुम्हा देवाधिदेवा।। आ०।।६।।

इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख।

पाजावे माधवा या। सांभाळ आपुली भाक।। आ०।।७।।

साईबाबा यांची कथा – Sai Baba Katha (Story)

मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या गावी प्रकट झालेले संत साईबाबा हे खूप महान संत होते. शिर्डी या ठिकाणी त्यांचे भव्यरुपी मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात साईबाबांची भव्य मूर्ती स्थापन केली असून त्यावर चांदीचा वर्क देण्यात आला आहे.

मंदिराचा गाभारा प्रशिस्त मोठा असून भाविकांची या ठिकाणी दर्शनाकरिता विशेष गर्दी पाहायला मिळते.

देशाच्या अनेक भागातून भाविक या ठिकाणी दर्शनाकरिता येत असतात. मंदिरात गुरुवारी भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळते. आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविक मंदिरात दर्शनाला येत असतात.

आज आपण याच संत साईबाबा यांच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तसचं, मंदिरात त्यांच्यासाठी नियमित सकाळ दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही पहारी म्हटल्या जाणाऱ्या आरतीचे लिखाण करणार आहोत.

अहमदनगर जिल्हातील शिर्डी या गावी इतिहास काळात होवून गेलेले महान संत साईबाबा यांच्या जन्माबाबत कुठलाच ठोस पुरावा नसला तरी इतिहासकरांनी त्यांचा कार्यकाळ हा १८३८ – १९१८ असा दर्शविला आहे.

त्याचप्रमाणे त्यांच्या जन्माबद्दल अनेक कथा देखील प्रचलित आहेत. श्री संत साईबाबा हे योगारूढ पुरुष असून निराकार निर्गुण संपन्न साक्षात परमेश्वर रूप आहेत. त्यांच्या परिवाराबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही.

पौराणिक कथेनुसार शिर्डी येथील नाना चोपदार ही एक ईश्वर भक्त होते त्यांच्या आईनी सर्वप्रथम संत साईबाबांना पाहिलं होत. नाना चोपदार यांच्या आईनी बाबांचे वर्णन करतांना सांगतात की,  एक तरुण सोळा वर्षांचा मुलगा लिंब वृक्षाच्या तळाशी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. त्याचे रूप सूर्य प्रकाशासमान तेजस्वी असून शरीर प्रकुर्ती बळकट होती.

त्यांची ती ध्यानस्थ मूर्ती पाहून नानाच्या आईना साक्षात परमेश्वराचा अवतार असल्याचा भास होत होता. शिर्डी गावातील सर्व स्त्री-पुरुष बाबा ध्यानिस्थ असलेल्या लिंब वृक्षाच्या तळाशी दर्शनाकरिता जमली.

बाबांचा तो अवतार पाहून सर्व मंडळी एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागली आणि विचार करू लागली हा तरूण मुलगा कोण आहे?  तसचं, तो कश्यासाठी आपल्या गावी आला आहे? अश्या प्रकारचे अनेक प्रश्न त्यांच्या मनी येवू लागले. गावातील मंडळीने ध्यानस्थ मूर्तीला जागे करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबांनी आपलं मौन काही सोडल नाही.

तेव्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागलं. त्यावेळी शिर्डी येथील ग्रामस्थ असलेल्या खंडोबाच्या भक्ताला साक्षात्कार झाला की, काही काळापूर्वी या परमेश्वर रुपी निद्रिस्त मूर्तीने लिंबाच्या मुळाशी असलेल्या भुयारात तपस्या केली आहे. त्या खंडोबा भक्ताच्या दृष्टांतानुसार लोकांनी लिंबाच्या मुळाशी खोदून पाहल तर त्यांना एक मोठ भुयार त्या ठिकाणी दिसून आलं.

तसचं, त्या भुयाराच्या आतमध्ये एक दिवा प्रज्वलित होता. ते दृश पाहताच लोकांनी एकमुखाने त्या ध्यानिस्थ मूर्तीचा जयजयकार करणे सुरु केले. तेव्हा ध्यानिस्थ असलेल्या तरुणाने आपले ध्यान सोडले व लोकांना विनंती केली की, “कृपा करून हे भुयार बुजवून टाका कारण हे माझ्या गुरूंचे स्थान आहे.”

त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांनी ते भुयार बुजवून टाकल्यानंतर तो तरुण तेथून अचानकपणे अदृश्य झाला. लोकांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते कोठेच दिसून आले नाही. लिंबाच्या तळाशी ध्यानिस्थ असलेला तरुण म्हणजेच साक्षात साईबाबा आज देखील शिर्डी या ठिकाणी त्यांचे गुरूस्थान पवित्र मानले जाते. तसचं, साईबाबांनी प्रथम ज्या लिंबाच्या वृक्षाखाली लोकांना दर्शन दिल होत तो लिंब आज देखील शिर्डी येथील मंदिराच्या परिसरात उभा आहे.

मित्रांनो, साईबाबा यांनी यानंतर शिर्डी येथे राहून आपल्या भक्तांवर कृपा दृष्टी केली. आपल्या भक्तांच्या सर्व दु:खांचे निवारण करून त्यांना श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टीची जाणीव करून दिली.

तसचं, त्याचे महत्व देखील पटवून दिल. बाबांची राहणी साधी असून एका हातात चिमटा आणि दुसऱ्या हातात भिक्षा मागण्यासाठी भिक्षापात्र होत. तसेच गळ्यात एक झोळी ज्यामध्ये ते आपली भिक्षा ठेवत असत. त्यांनी अनेक गरीब, भुकेल्यांना आपल्या हातांनी अन्न शिजवून खावू घातलं.  जेंव्हा लोक त्यांना त्यांच्या बद्दल काही विचारत तेंव्हा ते “सबका मलिक एक” असे म्हणत. त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.

साई चरित्रकार गोविंदराव दाभोळकर आणि हेमाडपंतांना बाबांनी आपल्या आचरणात घेतले. ते बाबांचे निसीम भक्त बनले. यांनी साई बाबांच्या जीवनावर आधारित “साई सच्चरित्र” या सारखे रसाळ साई चरित्र लिहिले.

या ग्रंथाचे वाचन केल्यास आपणास संत साई बाबा यांच्या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. संत साईबाबा यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या भक्ताचा साभाळ केला. भक्तांचा सांभाळ करत सन १९१८ साली विजयालक्ष्मीच्या दिवशी या महापुरुषाने आपला देह सोडला.

आज देखील साई भक्तांची धारणा आहे की साईबाब हे शिर्डी येथील मंदिरात वास्तव्य करीत असून ते आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. भक्त आपल्या बाबांना प्रसन्न करण्यासाठी नियमित आरतीचे पठन करीत असतात. आरती म्हणजे एक प्रकारे साई बाबांची केलेली आराधना होय. मित्रांनो, आपण देखील या आरतीचे महत्व समजून नियमित पठन करावे धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here