नवनाथ महाराजांची आरती

Navnath Aarti Marathi

नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नवनाथ महाराज यांचे मूळ गुरु गुरु आदिनाथ महाराज असून, त्यांचा दत्त संप्रदायाशी निकटचा संबंध आहे. गुरु नवनाथ महाराज यांच्याप्रमाणे अनेक भाविकांना नाथ संप्रदायाची दीक्षा दत्त संप्रदायाकडून मिळाली असल्याचे निष्पन होते. दोन्ही संप्रदायामध्ये भिन्नता आढळून येत असली तरी, भगवान दत्त हे दोन्ही संप्रदायाकरिता अत्यंत पूजनीय आहेत.

म्हणून नाथ आणि दत्त संप्रदायांमध्ये सलोख्याचे बंधन असल्याचे दिसून येते.  त्यामुळे हा नाथ संप्रदाय नाथमत, अवधुमत, अवधू संप्रदाय, आणि सिद्धमत इत्यादी नावांनी संबोधला गेला आहे. तसचं, भगवान नवनाथ यांच्या जन्माबाबत नाथ संप्रदायामध्ये अनेक धार्मिक कथा सुद्धा प्रचलित आहेत.

मित्रांनो, आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून नवनाथ महाराज यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या नवनाथ आरतीचे लिखाण करणार आहोत तसचं, नवनाथ महाराज यांच्याबाबत थोडक्यात माहिती जणून घेणार आहोत.

नवनाथ महाराजांची आरती – Navnath Aarti

Navnath Aarti
Navnath Aarti

मच्छिंद्र,गोरक्ष,जालिंदरनाथ,कानिफा,चीरंगी,आडबंगीनाथ l

रेवण,चरपटी,गहिनी नि वटसिद्धी l भर्तरि आणि मीनानाथ ll १ ll

जय देव जय देव जय ‘नवनाथा ‘l

आरती स्वीकारावी प्राज्ञीकवंता ll धृ.ll

जन्म आपुला अयोनिसंभव ‘ l

त्यांत ‘ श्रीदत्तात्रेय अनुग्रह ‘ l

तेणें प्रसन्न केली देवतें l

संपादिली सर्व विद्याअस्त्रांतें ll जय.ll २ ll

त्या महान विद्याअस्त्रांतें l

केले हो सुखी सकल जनांसी l

चौर्र्याएंशी सिद्ध करुनी l

दत्त पंथाचा हा नाथ पंथाचा हो वाढविला महिमा ll जय.ll ३ ll

चरणांसी एकचि नम्र विनंती, ‘बाळांवरी ठेवा कृपादृष्टी’ l

‘नवनाथ ! नवनाथ ! ‘करिता धावा ’ l

तारूनि न्यावे ‘या बालकांन ‘ ll जय.ll ४ ll

नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून, गुरु मच्छिद्रनाथ आणि शिष्य गौरक्षनाथ यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येतो. तसचं, गुरु मच्छिद्रनाथ यांच्याबाबत नाथ संप्रदायात एक दंतकथा सुद्धा प्रचलित आहे, त्यानुसार गुरु मच्छिद्रनाथ यांचा जन्म मासळीच्या पोटी झाला असून, आपल्या आईच्या पोटात असतांना गुरु मच्छिद्रनाथ यांच्या कानी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा संवाद कानी पडला होता.

त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते अशी आख्यायिका आहे. याचप्रमाणे शिष्य गौरक्षनाथ यांच्या उत्पत्ती बाबतीत अशी आख्यायिका आहे की, शिष्य गौरक्षनाथ यांचा जन्म गाईच्या शेणाच्या ढिगातून झाला आहे.

अश्या प्रकारची आख्यायिका नाथ संप्रदायात गुरु मच्छिद्रनाथ आणि शिष्य गौरक्षनाथ यांच्याबाबतीत प्रसिद्ध आहे. शिष्य गौरक्षनाथ यांनी आपली गुरुभक्ती सार्थ करतांना गुरु मच्छिद्रनाथ यांची वडा खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला डोळा काढून दिला होता.

गुरु मच्छिद्रनाथ यांनी स्थापन केलेला नाथ संप्रदाय हा महान संप्रदाय असून,  या संप्रदायाच्या माध्यमातून नाथ संप्रदायात गुरु शिष्य प्रथेचा उगम झाला आहे. याचप्रमाणे भक्तिमार्गात सुद्धा नाथ परंपरा रुजली असून अनेक भक्त मंडळी गुरूपदिष्ट मार्गाने नामसंकीर्तन, गुरुपूजन आदी मार्गाने मोक्ष प्राप्त करण्याची आश्या आपल्या मनी बाळगून नित्य नियमाने गुरु भक्ती करीत असतात.

नाथ संप्रदाय हा प्रामुख्याने भारतातील शैव संप्रदाय असून नाथ या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता किंवा स्वामी असा होतो. तसचं, नाथ सांप्रदायिक बांधव दीक्षा घेतल्यानंतर आपल्या नावाच्या पाठीमागे नाथ हा शब्द जोडतात.

महाराष्ट्र राज्यांत सर्ववत प्रचलित असलेला पंथ असून अनेक ठिकाणी भगवान मच्छिद्रनाथ यांची मंदिरे आपणास पाहायला मिळतात.

नाथ संप्रदायाची स्थापना गुरु मच्छिद्रनाथ यांनी केली असून, शिष्य गौरखनाथ उर्फ गौरक्षनाथ यांनी या संप्रदायाचा विकास केला आहे.

मित्रांनो, भगवान मच्छिद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे महान संत होवून गेले असून नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेश्वर हे स्थळ गुरु मच्छिद्रनाथ यांचे उगमस्थान मानलं जाते. याचं ठिकाणी गुरु मच्छिद्रनाथ यांनी आपल्या नऊ अनुयायांसोबत ८४ सिद्धांना उपदेश दिला होता.

नाथ संप्रदायाची भगवान नवनाथ यांची आराधना करण्यामागे अशी आख्यायिका आहे की, त्यांची आराधना केल्याने आणि आरतीचे नियमित पठन केल्याने आपले मन प्रसन्न होते. तसचं, मानवी जीवनाशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण होते. म्हणून आपण सुद्धा भगवान नवनाथ महाराज यांची आराधना करून नवनाथ आरतीचे पठन केले पाहिजे.

वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून आपणास सुद्धा नवनाथ आरतीचे पठन करता यावे याकरिता आम्ही या आरतीचे लिखाण केलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top