हनुमंताची आरती

Hanuman Aarti in Marathi

राम भक्त हनुमान यांना या भूलोकावर अनेक नावांनी संबोधलं जाते. तसचं, त्यांच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा देखील प्रचलित आहेत. संकट मोचन असल्यामुळे हनुमानजी यांची अनेक भक्त या भूलोकावर पाहायला मिळतात.

तसं पाहल तर आबालवृद्धांपासून सर्वचजण त्यांचे भक्त आहेत. परंतु, युवकांची हनुमानजी यांच्या प्रती विशेष ओढ आहे. आपण पाहत असतो की, दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिराच्या आवारात युवकांची आपणास विशेष गर्दी पाहायला मिळते.

हनुमानजी शारीरिकदृष्ट्या बलवान असल्याने युवक त्यांना आपले गुरु मानतात. त्यांना शक्तीचे देवता देखील म्हटलं जाते. त्यांनी आपल्या शक्तीच्या बळावर अनेक दैत्यांना पराभूत केलं होत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून महाबली हनुमान यांच्या बद्दल आरतीचे लिखाण करणार आहोत.

हनुमंताची आरती – Hanuman Aarti in Marathi

Hanuman Aarti in Marathi
Hanuman Aarti in Marathi

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी।। करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी।।

गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी।।

सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी।।१।।

जय देव जय देव जय हनुमंता।।

तुमचेनी प्रसादें न भी कृतांता।। जय।।धृ।।

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द।।

थरथरिला धरणीधर मानीला खेद।।

कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद।।

रामी रामदासा शक्तपचा शोध।।

जय देव जय देव जय हनुमंता।।२।।

हनुमान जी ची कथा – Hanuman Katha

मित्रांनो, पवन पुत्र हनुमानजी यांच्या बद्दल आरती लिहिणे म्हणजे एकाप्रकारे त्यांच्या संपूर्ण जीवनी लिहिण्यासारखं आहे. या आरतीच्या माध्यमातून आपण हनुमानजी यांना प्रसन्न करू शकतो अशी लोकांची धारणा आहे. म्हणून हनुमानजी यांच्या मंदिरात दररोज आरतीचे पठन केले जाते.

तसचं, अनेक भाविकांना हनुमान जी यांच्या चमत्कारिक शक्तीचा अनुभव देखील आला आहे. हनुमान भक्त आपले अनुभव व्यक्त करतांना स्वत:ला आलेल्या अनुभवाचे वर्णन करतात.

देशांच्या विविध भागात असणाऱ्या हनुमान मंदिरात आज देखील आपणास अनेक चमत्कार ऐकायला मिळतात. या कलयुगात आज देखील हनुमान जी अस्तित्वात आहेत अशी हनुमान भक्तांची मान्यता आहे.

हनुमानजी यांच्या जन्माबद्दल अशी मान्यता आहे की, चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या तिथीवर हनुमानजी यांचा जन्म झाला होता. या तिथीला दरवर्षी आपल्या देशांत मोठ्या जलोषात त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो.

मंदिरात होम हवन करून त्यांची पूजा अर्चना केली जाते. यादिवशी देशांतील अनेक मंदिरांमध्ये खूप गर्दी पाहायला मिळते. हनुमानजी यांच्या जयंतीनिमित्त देशांत महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात येते. हनुमान चालीसा आणि आरतीच्या ध्वनीने सर्व परिसर गुंजून जातो. बच्चे कंपनी तर हनुमान जी यांच्या सारखे मुखवटे घालून मिरवणूक काढतात.

तसचं, मंदिराच्या आवारात अनेक ठिकाणी रामायणातील देखावे देखील रेखाटले जातात. मंदिरावर दिव्यांची रोषणाई केली जाते.

हनुमानजी यांच्या जन्माबद्दल पौराणिक कथा आहे की, राम भक्त हनुमानजी यांचा जन्म वानर राजा केसरीनंदन यांची पत्नी राणी अंजनी यांच्या पोटी अंजनेरी या पर्वतावर झाला होता. वास्तवत: हा पर्वत महाराष्ट्र राज्यातील नशिक जिल्ह्यात स्थित आहे.

हनुमानजी यांच्या जन्माआधी पवन देव यांनी त्यांच्या मातेला वचन दिले होते की, आपणास सूर्य, अग्नी आणि सुवर्णा समान तेजस्वी,  वेद- वेदांगा मध्ये मर्मज्ञ आणि अत्यंत शक्तिशाली पुत्रप्राप्ती होईल.  त्यांचे वाचन खरे होवून माता अंजनी यांना चैत्र शुक्ल पौर्णिमेला पुत्र प्राप्त झाली. त्यांनी आपल्या पुत्राचे नाव हनुमान असे ठेवले. हनुमानजी यांना भगवान शंकर यांचाच अवतार मानलं जाते.

मित्रांनो, हनुमान भक्त संत तुलसीदास महाराज यांनी लिहिलेल्या हनुमान चालीसा किंवा त्यांच्या आरतीचे पठन केल्यास आपणास हनुमान जी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती समजेल. संत तुलसीदास महाराज यांनी आरतीच्या माध्यमातून हनुमानजी यांचे अत्यंत बारकाईने वर्णन केलं आहे. म्हणून हनुमानजी यांना प्रसन्न करण्यासाठी मंदिरात नियमित हनुमान आरतीचे पठन केले जाते. आपण देखील या आरतीचे पठन करावे याकरिता आम्ही या आरतीचे लिखाण केलं आहे. धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here