• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Beed District Information In Marathi

बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

June 7, 2020
23 January History Information in Marathi

जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 23, 2021
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
22 January History Information in Marathi

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 22, 2021
What to Know Before Investing

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

January 21, 2021
21 January History Information in Marathi

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 21, 2021
Ramacha Palna

प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह

January 20, 2021
20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 20, 2021
Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

January 19, 2021
19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 19, 2021
Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

January 18, 2021
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

January 18, 2021
18 January History Information in Marathi

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 18, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, January 23, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Beed Jilha Mahiti

मराठवाडयातील एक जिल्हयाचे ठिकाण बीड !

फार पुर्वीचे ’चंपावती नगरी’ असलेले आजचे बीड म्हणुन प्रचलीत आहे.

बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Beed District Information In Marathi

Beed District Information In Marathi

बीड जिल्ह्याचा इतिहास – Beed District History

जिल्हयाला फार पुरातन असा इतिहास असुन अनेक शासकांचा आणि त्यांच्या साम्राज्याचा फार मोठा वारसा या शहराने पाहिला आहे आणि आजही बराचसा जतन सुध्दा करून ठेवला आहे.

या शहराच्या चैफेर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन उभारण्यात आलेल्या भक्कम भिंती आजही प्राचीन इतिहासाचे स्मरण करून देतात.

बीड शहर आजही अनेक प्राचीन वास्तु अभिमानाने जतन करून आहे. जसे या शहराचे प्रवेशव्दार ज्याला आपण वेस असे देखील म्हणतो ते या शहरात आपल्याला पहायला मिळतं.

19 व्या शतकापर्यंत मराठवाडयातील हा भाग निजामाच्या आधिन होता पण पुढे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि निजामांमधे झालेल्या युध्दानंतर हा भाग भारतीय गणराज्यात समाविष्ट झाला.

बीड हे नाव मोहम्मद तुगलकाने दिल्याचे सांगितले जाते.

बीड मध्ययुगीन काळातील ऐतिहासीक शहर आहे परंतु याचा प्रारंभिक इतिहास अस्पष्ट आहे. येथे आढळणा.या पुरातत्व वास्तुंवरून इतिहासकारांच्या मते या शहराला यादव शासकांनी वसवले असावे.

बीड जिल्हयातील तालुके – Beed District Taluka List

बीड जिल्हयात एकुण 11 तालुके आहेत

1) बीड

2) आष्टी

3) गेवराई

4) अंबेजोगाई

5) कैज

6) परळी (वैजनाथ)

7) माजलगांव

8) पातोडा

9) शिरूर (कासार)

10) वाडवणी

11) धारूर

बीड जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Beed Zilla Chi Mahiti

  • लोकसंख्या (Population) 25,85,962
  • क्षेत्रफळ 10,693 वर्ग कि.मी.
  • साक्षरतेचे प्रमाण 88.56%
  • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 933
  • मुख्य भाषा मराठी
  • जिल्हयाची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबुन आहे आणि येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे.
  • संपुर्ण भारतात उसतोड कामगार मोठया संख्येने हाच जिल्हा पुरवतो.
  • लोकप्रशासनात उत्कृष्टतेकरता या जिल्हयाला प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • बीड महाराष्ट्रातील गरीब जिल्हयातील एक जिल्हा गणला जातो.
  • बीड जिल्हयात फक्त 2.47% वनक्षेलिंग याच जिल्हयात असल्याने या जिल्हयाला आध्यात्मिक महत्व देखील आहे.
  • बीड बेंसुरा (बिंदुसारा) नदिच्या तिरावर डेक्कन पठारावर वसले आहे.  बेंसुरा ही गोदावरी नदीची सहायक नदी आहे.
  • दसरा सणाच्या वेळी भरणारी खंडेश्वरी यात्रा फार प्रसीध्द आहे.
  • स्व. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मंुडे हे बीड जिल्हयातलेच.

पर्यटन आणि धार्मिक स्थळं – Tourist Places In Beed District

  • परळी वैजनाथ – Parli Vaijnath Temple

बारा ज्योर्तिलिंगा पैकी एक ज्योर्तिलिंग या जिल्हयात असुन त्यामुळे या जिल्हयाला आध्यात्मिक महत्व प्राप्त झालं आहे.

या ठिकाणची एक पौराणिक कथा सांगितली जाते की रावणाने शिवाची आराधना करून त्याचे आत्मलिंग मिळवण्याकरता घोर तपश्चर्या केली शिवाने प्रसन्न होउन रावणाला आत्मलिंग दिले ते आत्मलिंग घेउन रावण लंकेकडे निघाला असतांना सर्व देवतांनी शिवाला त्यांचे वरदान परत घेण्याकरता विनंती केली त्यावेळी रावणाला फसवण्याकरता श्री गणेशाची नेमणुक करण्यात आली.

रावणाला आत्मलिंग देतांना शिवाने एक अट अशी घातली होती की हे आत्मलिंग घरी जाईपर्यंत खाली ठेवायचे नाही, सायंकाळ होत असतांना रावणाला संध्या करायची होती त्यावेळी श्रीगणेशाने बालकाचे रूप घेतले होते, रावणाने त्याला विनंती केली की संध्या होईपर्यंत त्याने आत्मलिंग धरावे, त्याच्या हाती आत्मलिंग सोपवुन रावण संध्या करण्याकरता बसला.

काही वेळानंतर बालगणेशाने त्याला तिनदा आवाज दिला आणि रावण यायच्या आत ते शिवलिंग खाली ठेवले त्यामुळे त्याची त्याठिकाणीच स्थापना झाली आणि रावणाला रिकाम्या हाती परतावे लागले तेच हे ज्योर्तिलिंग परळी वैजनाथ.

आणखीन एका हिंदु मान्यतेनुसार राजा रावणाने वरदान प्राप्त करण्याकरता याच मंदिरात शिवाची आराधना केली होती आणि एक एक करून आपले दहा शिर शिवाला अर्पण केले. भगवान शिवाने प्रसन्न होउन जखमी रावणावर उपचार केले त्यामुळे भगवान शिवाने वैदयाचे काम केल्याने या मंदीराला परळी वैदयनाथ असे नाव पडले.

श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला तसच 12 ही महिने या ठिकाणी भाविकांची दर्शनाकरता गर्दी होते.

परळी वैजनाथ मंदिराचा इतिहास सांगतो की 1700 व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला.

या गावाला अनेक ठिकाणांनी रेल्वेने जोडले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बस ने आणि खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येईल.

अंबाजोगाई च्या योगेश्वरी देवीचे मंदीर येथुन 40 कि.मी. अंतरावर असुन नांदेड चे हुजूर साहेब गुरूव्दारा साधारण 110 कि.मी. अंतरावर आहे.

  • योगेश्वरी देवी अंबाजोगाई – Yogeshwari

साडे तीन शक्तीपिठांपैकी अर्ध शक्तीपीठ म्हणुन वणी ची सप्तश्रृंगी देवी आहे परंतु अंबेजोगाई च्या योगेश्वरी देवीला ही काही जण अर्ध शक्तीपीठ मानतात.

लातुर रेल्वे स्थानकापासुन साधारण 6 कोस अंतरावर असलेली बीड जिल्हयातील अंबेजोगाईची योगेश्वरी देवी म्हणजे दंतासुराचा वध करण्याकरता पार्वतीने घेतलेले रूप आहे अशी आख्यायिका सांगितली जाते.

कोकणातल्या लोकांची ही कुलस्वामिनी आहे.

मार्गशिर्ष पोर्णिमेला या देविचा नवरात्र उत्सव अतिशय भक्तीभावाने आणि थाटामाटात साजरा होतो.  देविच्या नवरात्रात देखील उत्सव होतो पण या देवीचा खरा नवरात्रौत्सव हा दत्त जयंती च्या वेळेस संपन्न होतो.

मंदीरातील सभागृहात असंख्य नक्षीदार खांब पहायला मिळतात शिवाय हे खांब मोजु नये असे देखील सांगितल्या जाते.

देवी पुर्णाकृती नसुन फक्त मुखवटा आहे.

योगेश्वरी हे संस्कृत नाव असुन याचा अर्थ देवी दुर्गा असा होतो. अतिशय प्राचीन असे हे मंदीर आज भाविकांचे श्रध्दास्थान म्हणुन चांगलेच नावारूपाला आले आहे.

जुन्या पध्दतीच्या बांधकामाने हे मंदिर सुशोभीत असुन इतरही देवतांच्या मुत्र्या या ठिकाणी विराजमान आहेत.  मंदिर परिसरात संस्थानने राहाण्याची सोय केली आहे.

अंबाजोगाई या ठिकाणी पहिले कवि मुकुंदराज महाराज यांची समाधी आहे. योगेश्वरी देवीच्या मंदीरापासुन साधारण 5 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

नुकत्याच झालेल्या उत्खननात अंबाजोगाईत इतिहासाच्या पाउलखुणा सापडल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रकुट काळातल्या मुर्ती आणि शिलालेखांचा खजिनाच सापडल्याचे गावकरी सांगतायेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिम राबवत असतांना या मुर्तींचा शोध लागल्याचे गावकरी सांगतात.

  • हजरत शहंशाहवली दर्गा – Hazarat Shahenshahwali Dargah 

हजरत शहंशाहवली दर्गा बीड तसच आसपासच्या मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान असुन हे सुफी संत 14 व्या शतकात होउन गेलेत. या दग्र्याचे बांधकाम 1385 पासुन 1840 या वेगवेगळया काळात बनवण्यात आले आहे. या ठिकाणी दरवर्षी उर्स मेला भरत असुन हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव या ठिकाणी एकत्र येतात शिवाय हिंदु भाविक देखील या सुफी संतांवर विश्वास ठेउन उर्स मेळयाला हजेरी लावतात.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस ने या ठिकाणी येता येतं.

  • कंकालेश्वर मंदीर – Kankaleshwar Temple

चारी बाजुने पाण्याने वेढलेले बीडचे कंकालेश्वर मंदीर पुरातन आणि निसर्गाच्या सान्निध्यातले मंदीर असुन या ठिकाणी भाविकांना शांत वातारणात वेळ घालवायला फार आवडतं.

मंदीरातल्या सभामंडपात असंख्य दगडी खांब आहेत, प्राचीन हेमाडपंथी आणि अनेक पुरातन मुर्ती या ठिकाणी पहायला मिळतात.

गंगादेवी मंदीर, भवानी मंदीर, श्रीराम मंदिर, विठ्ठ्ल मंदिर, श्री दत्त मंदिर, श्रीकृष्ण मंदिर हनुमान मंदिर अश्या सर्व देवतांचे दर्शन या ठिकाणी भाविकांना घेता येतं.

अतिशय शांत रमणिय आणि चोहोबाजंुनी पाण्याने वेढलेल्या या निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला, दर्शनाकरता भाविक येत असतात.

आणखी वाचा:

  • Akola District Information
  • Ahmednagar History Information
  • Amravati District Information

लक्ष्य दया: तुमच्या जवळ बीड जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

How Astronauts Live In Space
Information

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

Living in Space मित्रहो, अवकाश म्हटल म्हणजे आपल्या समोर बरेच प्रश्न येतात. जसे, कसे असेल तिथले वातावरण?  पृथ्वीच्या बाहेर जीवन...

by Editorial team
January 22, 2021
What to Know Before Investing
Information

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

What to Know Before Investing एक सुंदर प्रकारचे जीवन जगण्याची इच्छा ही सर्वाचीच असते, परंतु त्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे...

by Editorial team
January 21, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com