Home / Marathi Biography / शास्त्रीय गायक भीमसेन जोशी | Pandit Bhimsen Joshi Biography in Marathi

शास्त्रीय गायक भीमसेन जोशी | Pandit Bhimsen Joshi Biography in Marathi

Pandit Bhimsen Joshi – भीमसेन गुरुराज जोशी हे कर्नाटक चे भारतीय शास्त्रीय संगीताचे एक महान गायक होते. ते गायनाच्या खयाल या प्रकारासाठी प्रसिद्ध होते. सोबतच ते आपल्या प्रसिद्ध भक्तिमय भजनांसाठी हि फार पसंत केले जायचे. त्यांचे अभंगाचे गायन फार गाजले होते.

Pandit Bhimsen Joshi Biography

 

शास्त्रीय गायक भीमसेन जोशी – Pandit Bhimsen Joshi Biography in Marathi

1998 मध्ये त्यांना संगीत नृत्य व नाटकांच्या क्षेत्रात अतुल्य योगादानांसाठी भारतीय राष्ट्रीय अकॅडमी च्या संगीत नाटक अकॅडमी ने संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार व संगीत नाटक अकॅडमी शिष्यवृत्ती देवून सन्मानीत केले होते.

2009 मध्ये त्यांना भारतीय नागरिक सर्वोच्च पुरस्कार “भारतरत्न” प्रदान करण्यात आला.

पंडित भीमसेन जोशी यांचे आरंभिक जीवन – Pandit Bhimsen Joshi Early Life

भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी कर्नाटक मधील धारवाड ( गडग ) जिल्ह्यातील रोन या गावी झाला. त्यांचे पिता गुरुराज जोशी जे कन्नड – इंग्लिश शब्दकोशाचे लेखक होते. त्यांच्या आईचे नाव गोदावरी देवी होते त्या एक गृहिणी होत्या. आपल्या 10 भावंडात भीमसेन जोशी सर्वात मोठे होते. युवावस्थेतच त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांना त्यांच्या सावत्र आईने सांभाळले.

लहान पासूनच भीमसेन यांच्यात संगीता विषयी फार रुची होती. त्यांना बालपणीच हार्मोनियम व तानपुरा वाजवता येत होते. त्यांनी रात्र – दिवस संगीताची तालीम सुरु केली. त्यामुळे त्यांचे वडील फारच गोंधळले होते परंतु त्यांचे संगीता प्रती प्रेम पाहून त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

पंडित भीमसेन जोशी यांचे व्यक्तिगत जीवन – Pandit Bhimsen Joshi Personal Life

पंडित भीमसेन यांच्या दोन पत्नी होत्या. एक त्यांच्या मामाची मुलगी सुनंदा कट्टी हिच्याशी त्यांचा विवाह 1944 साली झाला होता. त्यांची चार मुल आहेत राघवेंद्र, उषा, सुमंगला, आनंदा. 1951 मध्ये त्यांनी कन्नड नाटक भाग्यश्री मधील सहकलाकार वत्सला मुधोळकर यांच्याशी दुसरा विवाह केला. वत्सला पासून त्यांना तीन अपत्ये झालीत. जयंत, शुभदा आणि श्रीनिवास. दुसऱ्या लग्नास कायद्याने मान्यता नव्हती तरीही त्यांनी आपल्या प्रथम पत्नीस सोडले नाही. कालांतराने दोन्हो पत्नी सोबत राहू लागल्या परंतु काही वर्षांनी समाजाच्या बोचामुळे सुनंदा वेगळ्या राहू लागल्या.

पंडित भीमसेन जोशी यांचे पुरस्कार व सन्मान – Pandit Bhimsen Joshi Award List

 • 1972 – पद्मश्री
 • 1976 – संगीत नाटक अकादमी अवार्ड
 • 1985 – पद्मभूषण
 • 1985 – बेस्ट मेल प्लेबैक सिंगर साठी “नेशनल फिल्म अवार्ड”
 • 1986 – “प्रथम प्लेटिनियम डिक्स”
 • 1999 – पद्म विभूषण
 • 2000 – आदित्य विक्रम बिरला कलाशिखर पुरस्कार
 • 2002 – महाराष्ट्र भूषण
 • 2003 – केरल सरकार द्वारा “स्वामी संगीता पुरस्कारम”
 • 2005 – कर्नाटक सरकार द्वारा “कर्नाटक रत्न पुरस्कार”
 • 2009 – भारत रत्न
 • 2008 – स्वामी हरिदास पुरस्कार
 • 2009 – दिल्ली सरकार द्वारा “लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड”
 • 2010 – रमा सेवा मंडली बंगलोर द्वारा “एस. व्ही. नारायणस्वामी राव नेशनल अवार्ड”

पंडित भीमसेन जोशी यांच्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या गीतासाठी फार पसंत केले गेले. या गीतात बालमुरली कृष्णन आणि लता मंगेशकर यांनी साथ दिली. त्यांचे हे गीत देशाच्या प्रत्येक मनात भिडले आहे. आजही हे गाणे फार लोकप्रिय व देशभक्ती भरलेलं आहे. त्यांचे गायन सर्वांसाठी फारच प्रेरणादायक ठरले आहे.

हे पण नक्की वाचा –

 1. Udit Narayan Biography

लक्ष्य दया: तुमच्या जवळ पंडित भीमसेन जोशी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा शास्त्रीय गायक भीमसेन जोशी – Pandit Bhimsen Joshi Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट: Pandit Bhimsen Joshi Biography – पंडित भीमसेन जोशी यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Kareena Kapoor Biography

करीना कपूर यांचे जीवनचरित्र – Kareena Kapoor Biography in Marathi

Kareena Kapoor Biography in Marathi करीना कपूर हया एक नामवंत चित्रपट नायीका आहेत. भारतीय चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *