भारताची स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे जीवन चरित्र

Lata Mangeshkar in Marathi

स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत. त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतियांवरच नव्हें तर विदेशातील नागरिकांवर देखील आजतागायत पसरलेली आपल्याला दिसते…

हे म्हणणे देखील अतिशयोक्ति होणार नाही की जोवर चंद्र सुर्याचं अस्तित्व या भुतलावर आहे तोवर लता मंगेशकरांच्या आवाजाचे गारूड प्रत्येक कानसेनावर कायम राहाणार आहे. कारण त्यांच्या आवाजाने उंचीचे जे किर्तीमान गाठले आहे तिथपर्यंत पुढच्या काळात बहुतेकच कुणी पोहोचु शकेल.

लता मंगेशकरांच्या आवाजावर संशोधन देखील करण्यात आले त्यांच्या सुमधुर आवाजाला उद्देशुन अमेरिकन वैज्ञानिकांनी इथपर्यंत म्हंटलय की लता मंगेशकरांच्या आवाजाईतका सुरेल आवाज यापुर्वी नव्हता आणि येणाऱ्या काळात देखील असण्याची शक्यता कमीच आहे… यावरून लता मंगेशकर या व्यक्तिमत्वाची महत्ता आपल्या लक्षात येते.

अनेक शतकं आपल्या आवाजामुळे रसिकमनावर राज्य करणाऱ्या लताजी भारताच्या सर्वात प्रसिध्द आणि उत्तम व सन्माननिय पाश्र्वगायिका आणि संगितकार म्हणुन सुपरिचीत आहेत.

भारतरत्नं लता मंगेशकर अनेक दशकांपासुन भारतिय सिनेमाला आपला मधुर आवाज देत आहेत. त्यांच्या प्रतिभेपुढे आज संपुर्ण विश्व नतमस्तक होतं. 1942 साली वयाच्या अवघ्या 13 व्या वर्शीपासुन भारतिय सिनेमा जगताला त्या आपला आवाज देत आहेत.

आपल्या सबंध कारकिर्दीत आजतागायत लतादिदींनी 1000 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये व जवळजवळ 36 पेक्षा जास्त प्रादेशिक भाशामंध्ये गाणी गायली आहेत. या सोबतच लतादिदींनी अनेक विदेशी भाशांमध्ये देखील गायन केलेलं आहे.  संगीताच्या या महानायिकेने सर्वात जास्त गाणी मराठी आणि हिंदी भाशांमध्ये गायिली आहेत.

लताजी सर्वाधिक गाणि रेकाॅर्ड करणाऱ्या म्युझीक आर्टिस्ट म्हणुन देखील ओळखल्या जातात. एका कार्यक्रमादरम्यान ज्यावेळी लताजींनी ‘‘ए मेरे वतन के लोगों जरा आँख मे भरलो पानी ‘‘ गायिले त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळयात अश्रु तरळले होते. महानगायिका

लता मंगेशकर यांच्या व्दारे संगीत क्षेत्रात दिल्या गेलेल्या अभुतपुर्व योगदाना करीता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

1989 साली भारत सरकार व्दारे लतादिदींचा भारतिय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

लता मंगेशकर एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यानंतर दुसऱ्या अश्या गायिका आहेत ज्यांचा भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला….

अनेक चढउतारांचा सामना करत लताजी अनेक संघर्शांना आजवर सामोऱ्या गेल्या आहेत परंतु त्यांनी कधीही हार मानिली नाही निरंतर आपल्या ध्येयाला प्राप्त करण्याकरता पुढे जात राहिल्या जिवनात मिळणाऱ्या सन्मानाचा आदरपुर्वक स्विकार केला. आज लताजी सगळयांकरताच आदर्श आहेत आणि त्यांचे जिवन कित्येक लोकांकरता प्रेरणादायक आहे. चला तर माहिती करून घेउया लताजींचे जीवन, संगीताची कारकिर्द आणि जीवनाशी निगडीत काही विशेष गोष्टी…

भारताची स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे जीवन चरित्र – Lata Mangeshkar Information in Marathi

Lata Mangeshkar Information in Marathi

करियर आणि त्यांच्या जीवनाशी संबंधीत काही विशेष माहिती –  Lata Mangeshkar Biography in Marathi

पुर्ण नाव (Name) लता दिनानाथ मंगेशकर
जन्म (Birthday) 28 सप्टेंबर 1939 इन्दौर
वडिलांचे नाव (Father Name) पंडित दिनानाथ मंगेशकर
आईचे नाव (Mother Name) शेवंती मंगेशकर
बहिणी (Sister Name) आशा भोंसले, उशा मंगेशकर, मीना मंगेशकर
भाऊ (Brother Name) हृदयनाथ मंगेशकर
विवाह (Husband Name) अविवाहित
राष्ट्रीयता  (Nationality) भारतिय
व्यवसाय (Occupation) प्लेबॅक सिंगर, म्युझिक कंपोजर
मृत्यू (Death) ६ फेब्रुवारी २०२२

लता मंगेशकर यांचा जन्म, परिवार आणि प्रारंभिक जीवन – Lata Mangeshkar History in Marathi

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्यप्रदेशातील इंदौर येथे एका गोमंतक ब्राम्हण कुटूंबात झाला… त्यांचे वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि थिएटर कलावंत होते त्यामुळे लतादिदींना संगिताचे बाळकडु कुटुंबातुनच मिळाले होते…

लताजींच्या आईचे नाव शेवंती (शुधामती) होते व त्या महाराश्ट्रातील थालनेर येथील होत्या आणि पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत.  सुर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मुळ आडनाव हर्डीकर असे आहे परंतु त्यांच्या वडिलांनी ते बदलुन आपल्या मुळ गावावरून ते मंगेशकर असे केले त्याचे कारण म्हणजे आपल्या नावाने आपल्या गावाचे मंगेशी, गोव्याचं प्रतिनीधीत्व करावं अशी त्यांची धारणा होती. पुढे लतादिदींच्या जन्मानंतर काही काळातच हा पुर्ण परिवार महाराश्ट्रात स्थानांतरीत झाला.

लताजींना लहानपणी ‘‘हेमा’’ या नावाने हाक मारली जात असे परंतु पुढे त्यांच्या वडिलांनी एका ‘‘भावबंधन’’ या नाटकामुळे प्रभावित होउन त्यांचे नाव बदलुन लता असे केले. आणि त्यानंतर संगिताच्या क्षेत्रात लता नावाने एक किर्तीमान स्थापीत केला हे तर आपण सगळे जाणतोच.  लता या आपल्या आई वडिलांच्या सर्वात मोठया आणि पहिल्या अपत्य होत त्यांची एकुण चार लहान बहिण भावंड आहेत मीना, आशा भोसले, उशा आणि हृदयनाथ….

बालपणापासुनच संगीताची आवड असल्याने सुरांची जादुगार लताजींनी गाण्याचे सुरूवातीचे धडे आपल्या वडिलांसमवेत गिरवीले होते. आपल्या वडिलांकडुन आपल्या भावंडांसमवेत त्या शास्त्रीय संगित शिकत असत. आपल्यापैंकी कित्येकांना हे माहित नसेल की वयाच्या अवघ्या 5 व्या वर्शीपासुन त्या आपल्या वडिलांच्या संगित नाटकांमध्ये अभिनय करत असत. लता ही संगीत क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार आहे याची जाणीव त्यांच्या वडिलांना तिच्या लहानपणीच झाली होती.

वयाच्या अवघ्या 9 व्या वर्शी या स्वरसम्राज्ञीने शास्त्रीय संगिताची मैफिल सजविली होती. लहानपणापासुन संगितात आवड असल्याने लताजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमानत खान, बडे़ गुलाम अली खान,पंडित तुलसीदास शर्मा व अमानत खान देवसल्ले यांच्याकडुन घेतले होते. त्या वेळी लताजी के.एल. सहगल यांच्या संगीताने फार प्रभावित होत्या.

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जवाबदारी त्यांनी आपल्या खांदयावर घेतली:

संगीतातील चमत्कार मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्यावर त्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला ज्यावेळी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराने ग्रासले आणि आपला गोकुळासारखा परिवार सोडुन ते ईहलोकीच्या यात्रेला निघुन गेले.  त्यासुमारास लता केवळ 13 वर्शांच्या होत्या. कुटुंबात त्याच मोठया असल्याने आपल्या बहिण भावंडांची जवाबदारी त्यांच्यावर आली परिणामी लताजींनी बालवयातच आपल्या परिवाराच्या भरण पोेशणाकरता काम करणे सुरू केले.

लता मंगेशकर यांची कारकिर्द – Lata Mangeshkar Career

वयाच्या 13 व्या वर्शी लतादिदींनी आपल्या करियर ला सुरूवात केली आणि तेव्हांपासुन आजतागायत आपला सुमधूर आवाज त्या भारतिय सिनेमाला देत आहेत. लता दिदींनी पहिले गाणे 1942 साली मराठी चित्रपट ‘किती हसाल’ करीता ‘‘ नाचु या ना गडे खेळु सारी… मनी हौस भारी ’’ गायिले होते या गिताला सदाशिवराव नेवरेकर यांनी संगितबध्द केले होते परंतु या चित्रपटाच्या एडिटींग दरम्यान या गिताला चित्रपटातुन काढुन टाकण्यात आले.

पुढे नवयुग फिल्म कंपनी चे मालक आणि लतादिदींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी दिनानाथ मंगेशकरांच्या मृत्युपश्चात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यास आणि लता मंगेशकरांना एक गायिका आणि अभिनेत्री बनवण्यात मदत केली. मास्टर विनायक यांनी लता ला 1942 साली मराठी चित्रपट ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात एक छोटीशी भुमिका देखील दिली होती ज्यात लताजींनी एक गित देखील गायिले होते…

जरी लता ने आपली कारकिर्द मराठी गायिका आणि अभिनेत्री म्हणुन सुरू केली असली तरी त्या काळी असे कुणालाही वाटले नाही की ही लहान मुलगी पुढे एक दिवस हिंदी सिनेसृश्टीत एक प्रसिध्द आणि सुमधुर गायिका होणार आहे.

तसे पाहाता त्यांचे पहिले हिंदी गीत देखील 1943 ला आलेल्या मराठी चित्रपटातीलच होते. ते गीत ‘‘माता एक सपुत की दुनियां बदल दे तू’’ असे होते आणि चित्रपटाचे नाव होते ‘‘गजाभाऊ’’. पुढे लताजी 1945 साली मास्टर विनायक कंपनी सोबत मुंबई ला गेल्या आणि येथुनच त्यांनी आपली संगीत प्रतिभा आणखीन उज्वल होण्याकरीता उस्ताद अमानत अली खान यांच्याकडुन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवीण्यास सुरूवात केली.

या दरम्यान लताला अनेक संगीतकारांनी तिच्या आवाजाची पातळ आणि कर्कशः अशी अवहेलना करीत रिजेक्ट केले कारण तिचा आवाज त्या दरम्यान पसंत केल्या जाणाऱ्या आवाजांपेक्षा अगदी भिन्न होता आणि त्याच सुमारास लता ला त्याकाळच्या प्रसिध्द गायिका नुरजहां करीता देखील गाण्यास सांगीतले जात होते.

1948 ला मास्टर विनायक यांच्या मृत्युमुळे लताजींचा आणखीन एक आधारवड कोसळला आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्या एकाकी पडल्या. यामुळेच त्यांची सुरूवातीची वर्श अत्यंत संघर्शपुर्ण राहीली. मास्टर विनायक यांच्या मृत्युपश्चात गुलाम हैदर यांनी लताला तिच्या कारकिर्दीत बरीच मदत केली.

1948 साली मजदुर चित्रपटातील ‘‘दिल मेरा तोडा मुझे कहीं का ना छोडा’’ गिताने लता मंगेशकरांना ओळख मिळाली यानंतर लगेच 1949 ला आलेल्या ‘महल’साठी लताने आपले पहिले सुपरहिट गीत ‘‘आयेगा… आयेगा…. आयेगा आनेवाला हे गायिले.

या गितानंतर लता ला मोठमोठया संगितकारांच्या नजरेत ओळख मिळाली त्यामुळे तिला एका मागे एक अनेक गितांच्या आॅफर्स मिळत गेल्या.

1950 साली लता मंगेशकरांना अनेक मोठे संगितकार जसे अनिल विश्वास, शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, खय्याम, सलिल चैधरी, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली.

लताजींच्या जीवनाचा टर्निंग पाॅइंट म्हणता येईल असा काळ तेव्हां आला ज्यावेळी संगितकार सलिल चैधरी यांच्या ‘‘मधुमती’’ चित्रपटातील गीत ‘‘आजा रे परदेसी’’ करीता सर्वोत्कृश्ट फिमेल प्लेबॅक सिंगर चा पहिला फिल्म फेयर अवाॅर्ड त्यांना मिळाला.

या दरम्यान गानकोकीळा लता मंगेशकरांनी काही रागांवर आधारीत गितं जसे बैजु बावरा करीता भैरव रागातील ‘‘मोहे भूल गए सावरियां’’ काही भजनं जसे हम दोनो चित्रपटातील ‘‘अल्लाह तेरो नाम’’ सोबतच काही पश्चिीमी चालींवरची जसे ‘‘अजिब दास्तां ’’ गायिली होती.

याच सुमारास आपल्या जादुई आवाजाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लता दिदींनी मराठी आणि तमिल सोबतच प्रादेशिक भाशांमध्ये गीत गायनाला सुरूवात केली होती, तमिल भाशेत त्यांनी ‘‘वानराधम’’ करीता ‘‘एंथन कन्नालन’’ गायिले होते.

या नंतर लतादिदींनी आपल्या लहान भावासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्याकरीता गित गायन केले तो मराठी भाशेतील ‘‘जैत रे जैत ’’ हा चित्रपट होता. या व्यतीरीक्त लता ने बंगाली भाशेतील संगीताला आपल्या मधुर आवाजाने एक वेगळी ओळख मिळवुन दिली.  1967 साली लताजींनी ‘‘क्रांतिवीरा सांगोली’’ चित्रपटात लक्ष्मण वेर्लेकर यांच्याव्दारे संगीतबध्द केलेले गीत ‘‘बेल्लाने बेलागयिथू’’ गात कन्नड भाशेत गित गायनाला सुरूवात केली.

यानंतर लताजींनी मल्याळम भाशेत नेल्लू चित्रपटाकरता सलिल चैधरी यांनी संगितबध्द केलेले ‘‘कदली चेंकाडाली’’ गित गायिले. नंतर कित्येक वेगवेगळया भाशांमध्ये गित गायन करून त्यांनी आपल्या आवाजाने संगीताला एक नवी ओळख मिळवुन दिली.

या दरम्यान लता मंगेशकरांनी अनेक दिग्गज संगीतकारांसमवेत जसे हेमंत कुमार, महेन्द्र कपुर, मोहम्मद रफी, मन्ना डे, सोबत मोठमोठे प्रोजेक्ट्स केलेत. या दरम्यान लताजींची कारकिर्द अत्युच्च शिखरावर होती, त्यांच्या सुमधुर आणि सुरेल आवाजामुळे त्या सिंगींग स्टार झाल्या होत्या, हा तो काळ होता जेव्हां मोठयातला मोठा निर्माता, संगितकार, अभिनेता आणि दिग्दर्शक लता मंगेशकरांसमवेत काम करू इच्छित होता.

1960 चा काळ लताजींकरता यशाने भारलेला होता, या सुमारास त्यांनी ‘‘प्यार किया तो डरना क्या’’ ‘‘अजिब दास्तां है ये ’’ सारखी अनेक सुपरहिट गाणी गायिली. 1960 या वर्शाला सिंगर आणि म्युझीक डायरेक्टर लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि लताजींच्या संबंधांकरीता देखील ओळखले जाते, ज्या नंतर लतादिदींनी जवळजवळ 35 वर्शांच्या आपल्या प्रदिर्घ कारकिर्दीत 700 पेक्षा अधिक गाणी गायिली.

लता दिदींच्या आवाजाची जादु 1970 आणि 1980 च्या दशकांवर देखील कायम राहीली. या काळातील त्यांचे किशोर कुमार यांच्या समवेत गायिलेली ड्यूएट फार लोकप्रीय ठरलीत. काही गितं जसे ‘‘कोरा कागज’’ (1969), ‘‘आंधी’’चित्रपटातील तेरे बिना जिंदगी से (1971), अभिमान चित्रपटातील ‘‘तेरे मेरे मिलन की’’ (1973), घर चित्रपटाकरीता ‘‘आप की आंखों मे कुछ ’’ (1978) ही ती गितं आहेत ज्यांना आजही ऐकल्यानंतर मनाला प्रसन्नता मिळते.

ही गितं लतादिदींची एव्हरग्रिन गाणी आहेत या व्यतिरीक्त लता दिदींनी काही धार्मिक गीतं देखील गायिली आहेत. या काळादरम्यान लताजींनी आपली ओळख संपुर्ण विश्वाला करून दिली होती. 1980 साली महानगायिका लताजींनी सचिन देव बर्मन यांचे चिरंजीव राहुल देव बर्मन अर्थात आर.डी. बर्मन यांच्यासोबत काम केले.

आर.डी.बर्मन लता मंगेशकर यांची लहान बहिण आणि हिंदी मराठी चित्रपटातील प्रसिध्द पाश्र्वगायिका आशा भोसलें यांचे पती आहेत.  त्यांनी लताजीं समवेत अगर तुम ना होते चित्रपटातील ‘‘हमें और जीने की ’’ राॅकी मधील ‘‘क्यां यही प्यार है’’, मासुम मधील ‘‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’’ अशी सुप्रसीध्द गितं बनवलीत.

यानंतरच्या काही वर्शांनपश्चात हळू हळू लताजींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी काही निवडक गितांनाच आवाज देण्यास सुरूवात केली. लतादिदींनी आपल्या करीयर मध्ये केवळ चित्रपटांकरीताच गितं गायिली असे नाही तर अनेक म्युझीक अल्बम देखील बनविलेत. 1990 च्या दशकात अनेक नव्या गायिका उदयाला आल्या परंतु जिच्या गळयात साक्षात सरस्वती विराजमान आहे तिच्याशी स्पर्धा कोण जिंकु शकणार होते.

या काळात देखील लता दिदींच्या आवाजाची जादु कायम राहिली आणि आज देखील लोक तितकेच प्रेम लतांजींवर करतायेत जितके 70, 80, आणि 90 च्या दशकात करत होते.

लता मंगेशकरांनी गायिलेल्या अविस्मरणीय गितांमधील काही चित्रपट प्रसीध्द आणि विशेश उल्लेखनीय आहेत… अनारकली, मुगले आजम, अमरप्रेम, गाईड, आशा, प्रेमरोग, सत्यम शिवम् सुंदरम्… नव्या चित्रपटांमध्ये लताजींचा आवाज पहिल्यासारखाच नव्हें तर त्या आवाजाला आणखील चारचांद लागले आहेत जसे हिना, रामलखन इत्यादी…

एक काळ होता जेव्हां ‘बरसात’, ‘नागिन’, आणि पाकिजा चित्रपटातील गितं अजरामर झालीत… लतादिदींनी 30,000 हुन अधिक गाणी गायिली आहेत शिवाय सर्वभाशांमध्ये गितं गाण्याचा किर्तीमान देखील त्यांच्या नावावर आहे.

लता मंगेशकर पुरस्कार – Lata Mangeshkar Awards

लता दिदींनी केवळ कित्येक गितकारांना आणि संगीतकारांनाच यशस्वी केले असे नाही तर त्यांच्या सुरेल गाण्यांनी कित्येक चित्रपट सजले आणि खुप गाजले देखील ! आपल्या कारकीर्दीत त्यांना अनेक राश्ट्रीय मानसन्मान प्राप्त झाले आहेत ज्यात भारताचा सर्वोच्च पùश्री आणि भारतरत्न चा देखील समावेश आहे….

या व्यतीरीक्त लताजींना गायनासाठी 1958, 1960, 1965, आणि 1969 ला फिल्म फेयर अवाॅर्ड प्राप्त झाले आहेत. ‘गिनीज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्डस्’ तर्फे देखील त्यांचा विशेश सन्मान करण्यात आला आहे. मध्यप्रदेश सरकार तर्फे त्यांच्या नावे प्रत्येक वर्शी 1 लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1989 ला लतादिदींना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

लता मंगेशकर यांना आजवर मिळालेले पुरस्कार असे आहेत

 • फिल्म फेयर अवाॅर्ड पुरस्कार ( 1958, 1962, 1965, 1969, 1993, आणि 1994 )
 • नॅशनल फिल्म अवाॅर्ड ( 1972, 1974 आणि 1990 )
 • महाराश्ट्र सरकार पुरस्कार ( 1966 आणि 1967 )
 • पùभुशण 1969
 • संपुर्ण विश्वात सर्वात जास्त गितं गाण्याचा गिनीज बुक रेकाॅर्ड 1974
 • दादासाहेब फाळके पुरस्कार 1989
 • फिल्मफेयर लाइफ टाईम अचीव्हमेंट अवाॅर्ड 1993
 • स्क्रीन लाईफटाईम अचीव्हमेंट अवाॅर्ड 1996
 • राजीव गांधी पुरस्कार 1997
 • एन.टी.आर.पुरस्कार 1999
 • पùविभूशण 1999
 • झी सिने लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार 1999
 • आई.आई.ए.एफ. लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार 2000
 • स्टारडस्ट लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार 2001
 • भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘‘भारतरत्न’’
 • नुरजहा पुरस्कार 2001
 • महाराश्ट्र भूशण 2001

लता मंगेशकर यांना भारताच्या 60 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी 2008 साली ‘‘वन टाईम अवाॅर्ड फाॅर लाईफटाईम अचीव्हमेंट’’ ने गौरवान्वित करण्यात आले.

भारतरत्न लता मंगेशकर भारताच्या सर्वात लोकप्रीय आणि सन्माननिय महागायिका आहेत त्यांची कित्येक दशकांची कारकिर्द विविध उपलब्धींनी भरलेली आहे…  आपल्या आवाजाने लताजींनी 7 दशकांहुन जास्त काळ पर्यंत संगित जगताला आपल्या सुरांनी सजविले आहे. भारताच्या या गानकोकीळेने अनेक भाषांमध्ये मध्ये हजारो गाणी गायिली आहेत.

त्यांचा आवाज ऐकुन कधी कुणाच्या डोळयात अश्रु आलेत तर कधी सिमेवर उभ्या असलेल्या जवानाला हिम्मत मिळाली. लतादिदींनी आजही स्वतःला पुर्णपणे संगीताला समर्पित ठेवले आहे. लतादिदी एक लिजंड आहेत त्यांच्यावर प्रत्येक भारतियाला गर्व आहे….

लता मंगेशकर याचं निधन – Lata Mangeshkar Death

भारतरत्न लता मंगेशकर यांच ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये 92 व्या वर्षी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी निधन झाल.

लता मंगेशकर या विश्वातील एक अश्या कलाकार आहेत….   त्यांच्यासारखा पुर्वी झाला नाही आणि शक्यतोवर पुढे होणार देखील नाही….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top