Friday, May 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ

Religious Places in Maharashtra

अखिल विश्वात भारत हा एक असा देश आहे की जेथे सर्व धर्म आणि पंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात.

धार्मिकता हे येथील आणखीन एक वैशिष्टय. आपापल्या धर्माप्रती श्रध्दा भक्ती सद्भावना व्यक्त करतांना मोठया प्रमाणात तिर्थयात्रा केल्या जातात.

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं देखील जगमान्य आहेत आणि दर्शनाकरता भारतातुनच नव्हे तर देश विदेशातुन देखील भाविक येथे भेटी देण्याकरता येतांना दिसतात.

पण तुम्हाला हे माहिती आहे का की महाराष्ट्रात अशी कोणती धार्मिक स्थळं आहेत जेथे भाविकांची सर्वाधिक गर्दी होते.

या लेखात माहिती करून घेऊया महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळांची!

Contents show
1 महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ – Religious Places in Maharashtra in Marathi
1.1 महाराष्ट्रातील धार्मिक काही स्थळांची माहिती – Information about Religious Places in Maharashtra
1.1.1 शिर्डी – Shirdi
1.1.2 पंढरपुर – Pandharpur
1.1.3 सिध्दीविनायक मंदिर मुंबई – Siddhivinayak Temple Mumbai
1.1.4 कोल्हापुरची महालक्ष्मी – Mahalaxmi Temple Kolhapur
1.1.5 शनि शिंगणापुर – Shani Shingnapur
1.1.6 तुळजापुर – Tuljapur
1.1.7 शेगांव – Shegaon

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ – Religious Places in Maharashtra in Marathi 

Religious Places in Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील धार्मिक काही स्थळांची माहिती – Information about Religious Places in Maharashtra 

  • शिर्डी – Shirdi

सबका मालिक एक हा संदेश देणारे साईबाबा.

शिर्डी ज्यांच्या पावन पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनित पावन झाली..

त्यांच्या पश्चात आज देखील भक्तांना त्यांच्या असल्याची सतत जाणीव होते.

रोज भक्तांच्या झुंडी च्या झुंडी दर्शनाकरता लोटतात असे साईबाबांचे शिर्डी धाम आपल्या लेखात सर्वात वरचे स्थान मिळवते त्याचे विशेष कारण म्हणजे साईबाबांच्या दर्शनाकरता भारतातुन तर भाविक भक्त येतातच पण विदेशात देखील बाबांचे असंख्य भक्त असुन ते देखील भारतात आल्यानंतर शिर्डी ला आवर्जुन दर्शनाकरता येतात.

अनेक भाविक भक्त साईबाबांना सोने चांदी, नगदी रोकड अर्पण करतात.

त्यातुन संस्थानच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरू असुन रूग्णांकरता मोठे हॉस्पिटल देखील शिर्डी येथे सेवाकार्य करत आहे.

साईबाबांचे शिर्डी धाम अहमदनगर जिल्हयात असुन महामंडळाच्या बसेस, रेल्वे आणि खाजगी वाहनाने या धार्मिक स्थळाला आपल्याला भेट देता येते.

  • पंढरपुर – Pandharpur

विठु माऊली तु… माऊली जगाची… माऊलीत मुर्ती विठ्ठलाची!

अशी ही सावळी विठ्ठलाची मुर्ती भक्ताला इतके वेड लावते की हा भक्त तहान भुक, प्रपंच सगळं विसरतो आणि लिन होतो ते विठ्ठलाच्या चरणाशी.

या देवतेचं महत्वाचं वैशिष्टय म्हणजे त्याचा भक्त हा वारकरी आहे, शेतकरी आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे.

शिवाय जातीपातीच्या पलिकडचा हा सावळा विठुराया सगळया जाती धर्माच्या पलिकडचा असल्याने सर्वधर्म समभावाचा जणु पुरस्कर्ताच म्हणावा असा.

आषाढी वारी तर अनुपम्य असं आगळंवेगळं आणि सर्वांनाच विचारात पाडणारं कार्य! या विठ्ठलाच्या वेडापायी वारकरी शतकानुशतके करत आहेत.

देहभान विसरून वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्याला पाहिले की जणु विठ्ठल आपल्याला भेटला असे वाटते.

पंढरपुर सोलापुर जिल्हयात असुन रेल्वे बससेवा आणि खाजगी वाहनाने चांगल्या तऱ्हेने जोडले गेले आहे.

भेटी लागी जिवा… लागलीसे आस…. असा हा सर्वधर्मीयांचा विठुराया महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे.

  • सिध्दीविनायक मंदिर मुंबई – Siddhivinayak Temple Mumbai

मुंबई येथील सिध्दीविनायक संपुर्ण विश्वात प्रसिध्द असे श्री गणेशाचे मंदिर आहे

नवसाला पावणारा गणेश अशी त्याची ख्याती सर्वदुर पसरल्याने मुंबईला आल्यानंतर भाविक येथे दर्शनाकरता आवर्जुन येतात.

या श्री गणेशाचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे हा उजव्या सोंडेचा गणेश असुन म्हणुन त्याला सिध्दीविनायक असे म्हंटल्या जाते.

हे मंदिर मुंबईत प्रभादेवी भागात असुन प्रत्येक मंगळवारी दर्शनाकरता भाविकांची मोठया प्रमाणात येथे गर्दी होते.

मोठमोठे चित्रपट कलावंत आणि उदयोगपती सिध्दी विनायकाचे भक्त असुन नेहमी दर्शनाकरता येत असतात.

मुंबईतील पर्यटन बसेस देखील आपल्याला या गणेशाचे आवर्जुन दर्शन घडवतात.

पुर्वी मंदिर लहान होते पण मिळणाऱ्या दानराशींमधुन आज जे मंदिर आपण पहातो आहोत ते चक्क पाच मजली असे भव्य मंदिर दृष्टीस पडते.

अनेक समाज उपयोगी कार्य मंदिर ट्रस्ट कडुन केले जात आहेत.

  • कोल्हापुरची महालक्ष्मी – Mahalaxmi Temple Kolhapur

साडे तिन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ कोल्हापुर निवासीनी महालक्ष्मी भक्तांचे श्रध्दास्थान आहे.

कोल्हापुर या शहराला ऐतिहासीक महत्व या मंदिरामुळे प्राप्त झाले आहे

या ठिकाणी दर्शना करता भाविकांची अमाप गर्दी होत असते.

हिंदु पुराणात उल्लेख केलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडे तिन शक्तीपीठांपैकी कोल्हापुर निवासी अंबाबाई महत्वाचे शक्तीपीठ आहे.

या देवीची रोज बांधण्यात येणारी पुजा अप्रतीम अशी असते त्या व्यतिरीक्त नवरात्रात देवीचे आभुषण, साजश्रृंगार हे अतिशय सुंदर आणि देखणे असे असते.

भक्तांच्या हृदयात या देवी बद्दल अपार भक्ती आणि श्रध्दा आहे.

या मंदिराचे बांधकाम देखील वैविध्यपुर्ण असुन भक्तांकरता निवासस्थानाची सुध्दा सोय या ठिकाणी संस्थानने केली आहे.

कोल्हापुर वरून कोकण जवळ असुन येथुन कोकणात जाण्याकरता भरपुर सोयी असल्याने सुध्दा पर्यटक या ठिकाणी दर्शन घेउन कोकणात फिरण्याकरता जातात.

  • शनि शिंगणापुर – Shani Shingnapur

हिंदु धर्मीयांच्या देवतांमधील ज्या देवाच्या रूष्ट (क्रोधीत) होण्याची भिती आपल्याला सर्वात जास्त वाटते ती देवता म्हणजे शनिदेव.

या शनिदेवाला प्रसन्न करण्याचे जेवढे उपाय सामान्य माणसाला ज्ञात आहेत तेवढे उपाय करून शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो.

शनिदेवाचे महत्वाचे स्थान महाराष्ट्रातील शनी शिंगणापुर असुन या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात शनीदेवाचे दर्शन घेण्याकरता येत असतात.

विशेषतः ज्या भाविकांना साडेसाती असते ते आवर्जृन या ठिकाणी शनिदेवाचे दर्शन घेतात अभिषेक आणि पुजाअर्चना करतात.

शनिवारी या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळते.

शनि शिंगणापुर हे ठिकाण शिर्डी पासुन जवळ असुन शिर्डी ला येणारे भक्त येथे सुध्दा दर्शनाकरता येतात.

शनि शिंगणापुर अहमदनगर जिल्हयात असुन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी वाहनाने येथे येणे सोयीचे आहे.

या गावाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे येथील एकाही घराला दरवाजा नाही.

  • तुळजापुर – Tuljapur

महाराष्ट्राची आराध्य देवता आणि साडे तिन शक्तीपीठांपैकी एक संपुर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापुरची आई तुळजाभवानी.

छत्रपती शिवरायांना जीने तळपती तलवार हाती दिली ती तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्हयात आहे.

शिवाजी महाराज आई जिजाऊं सोबत येथे नेहमी दर्शनाकरता येत असत.

अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.

प्राचीन ५१ शक्तीपीठांपैकी हे एक महत्वाचे शक्तीपीठ आहे.

हेमाडपंथी शैलीत या मंदिराचे बांधकाम असुन साधारण १२ व्या शतकात या मंदिराची निर्मीती करण्यात आली आहे.

हि मुर्ती स्वयंभु असुन भवानी रूपात या मुर्तीची पुजा करण्यात येते.

तुळजापुर उस्मानाबाद पासुन २२ कि.मी. आणि सोलापुर पासुन ४४ कि.मी. अंतरावर आहे.

  • शेगांव – Shegaon

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगांव ला श्री गजानन महाराजांची समाधी आहे. येथे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनाला येतात.

येथील व्यवस्थापक मंडळ हे प्रशंसा करण्यायोग्य आहे, तेथील मंदिराची स्वच्छता हि उल्लेखनीय आहे, तसेच तेथील कार्माच्यार्यांची शिस्तही प्रशंसे जोगी आहे.

येथे गजानन महाराजांची समाधी असून दरवर्षी माघ महिन्यामध्ये प्रगटदिन साजरा केल्या जातो, तेव्हा तेथे लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी उमळते,

महाराष्ट्रातील तीर्थस्थानांपैकी एक असे शेगांव आपण जर अजून येथे भेट दिली नसेल तर आपल्या परिवारासोबत एकवेळ अवश्य भेट द्या.

आशा करतो कि आपल्याला आजचा लेख आवडला असेल आपल्याला आजचा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांपारायंत शेयर करायला विसरू नका.

Thank You So Much And Keep Loving Us!

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved