Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

MPSC तयारी करत आहात! तर, जाणून घ्या त्या संबंधी काही महत्वपूर्ण माहिती

MPSC Exam Information in Marathi

मित्रांनो, देशांतील कोणत्याही राज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी महत्वाचा घटक असतो तो ‘सक्षम प्रशासन’. त्या करिता आपल्या देशांत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी ‘केंद्रीय लोकसेवा आयोगाची’ स्थापना केली आहे.

त्याचप्रमाणे, आपल्या देशांच्या प्रत्येक राज्यातील प्रशासन सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक राज्याच्या राज्य शासनाने आपआपल्या राज्यात प्रशासकीय आयोगाची स्थापना केली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील प्रशासन सक्षम करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्याच्या उद्देशाने सन १ मे १९६० साली महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यात ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची’ स्थापना केली.

आज आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते कि माझी शासकीय सेवेत निवड झाली पाहिजे. अगदी बरोबर विचार करत आहात तुम्ही. कारण जी शाश्वती आपल्याला शासकीय नोकरी मध्ये मिळते ती इतर कुठे ही मिळू शकत नाही.

शिवाय शासकीय नोकरी मध्ये मिळणारे वेतन, मिळणाऱ्या सुट्या, इतर भत्ते, कामाची वेळ असे खूप सारे कारणे आहेत कि ज्यामुळे ही नोकरी प्रत्येकाला हवी-हवीशी वाटते.

शासन वेळो-वेळी अशा नोकऱ्यासाठी भरती प्रक्रिया घेत असते. यामध्ये वर्ग १ अधिकारी पदांपासून ते चतुर्थ श्रेणी कार्मचारी पदासाठी हि भरती घेतली जाते. ही भरती प्रक्रिया शासनाच्या विविध विभागांद्वारे घेतली जाते.

केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वर्ग १ व २ अधिकारी पदांसाठी UPSC ही संस्था भरती प्रक्रिया आयोजित करते. तर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वर्ग १, २ व ३ पदांसाठी MPSC ही संस्था भरती प्रक्रिया आयोजित करित असते.

चला तर सुरु करूयात.

Contents show
1 MPSC Exam Information in Marathi
2 महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा संबंधी माहिती – Maharashtra Public Service Commission (MPSC) Exam Information in Marathi
2.1 MPSC म्हणजे काय? – What is MPSC or MPSC Full Form
2.2 आयोगा मार्फत राज्यात खालील प्रशासकीय पदाच्या परीक्षा घेतल्या जातात – MPSC Pariksha Mahiti
2.3 MPSC वेतन व भत्ते: MPSC Salary and Allowances :
2.4 MPSC परीक्षेसाठीची पात्रता: MPSC Exam Eligibility Criterion:
2.5 ३. MPSC परीक्षेसाठी शैक्षणीक पात्रता: MPSC Exam Educational Qualification:
2.6 आरक्षण: Reservation :
2.6.1 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम – MPSC Exam Syllabus
2.6.2 मुख्य परीक्षेकरिता आवश्यक असणारा अभ्यासक्रम – MPSC Syllabus: MPSC Mains Exam Pattern
2.6.3 पुरुष शारीरिक चाचणी
2.6.4 महिला शारीरिक चाचणी
2.7 आपण जास्तीत जास्त किती वेळा ही परीक्षा देऊ शकतो : Number of Attempts:
2.8 अभ्याक्रमातील घटक: Components in Syllabus :
2.9 अर्ज कसा करायचा : How to Apply :
2.10 MPSC परीक्षा शुल्क: MPSC Exam Application Fee:
2.11 MPSC ची तयारी कशी करावी : How to Prepare for MPSC Exam:
2.12 पुस्तके कोणती वापरावी : Books for MPSC:
2.13 Some Important Tips : काही महत्वाच्या Tips :
2.13.1 निकर्ष: Conclusion :
2.13.2 MPSC बद्दल विचारल्या जाणारे नेहमीचे प्रश्न: FAQs about MPSC Exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा संबंधी माहिती – Maharashtra Public Service Commission (MPSC) Exam Information in Marathi

MPSC Exam Information in Marathi
MPSC Exam Information in Marathi

MPSC म्हणजे काय? – What is MPSC or MPSC Full Form

MPSC म्हणजे (Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोग). हि एक संस्था आहे जी महाराष्ट्र शासनातील वर्ग १, वर्ग २ अधिकारी पदांसाठी परीक्षा आयोजित करते. व विविध विभागांतील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नेमणूक करून देते.

MPSC ला घटनात्मक दर्जा प्राप्त असून, अनुच्छेद ३१५ अनुसार या संस्थेची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र शासनातील प्रशासकीय अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड करणे हे MPSC चे मुख्य कार्य आहे.

आयोगा मार्फत राज्यात खालील प्रशासकीय पदाच्या परीक्षा घेतल्या जातात – MPSC Pariksha Mahiti

  • उपजिल्हाधिकारी (Deputy Collector)
  • पोलीस उप-अधीक्षक (Deputy Superintendent of Police)
  • तहसीलदार
  • नायब तहसीलदार
  • विक्री कर सहायक आयुक्त (Assistant Commissioner of Sales Tax)
  • सहायक संचालक, वित्त व लेख विभाग (Assistant Director, Finance and Accounts Department)
  • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant Regional Transport Officer)
  • गट विकास अधिकारी (Block Development Officer : BDO)
  • पोलीस उप-निरीक्षक (Police Sub-Inspector)
  • मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद (Chief Officer)
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer)
  • उपनिबंधक, सहकारी संस्था (Deputy Registrar Co-operative Society)

इ. व यांसारखी महत्वाची पदे MPSC द्वारे भरण्यात येतात.

यासारख्या राजपत्रित प्रशासकीय पदाकरिता, राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यात येते. यानंतर निवड झालेल्या विद्यार्थांना मुलाखती करिता बोलावण्यात येते. या प्रकारच्या राजपत्री पदाकरिता दरवर्षी अर्ज मागविले जातात. विद्यार्थांना अर्ज करायचा असल्यास तो इंटरनेट च्या मध्यमातून online भरावा लागतो. त्या करीता mpsc.gov.in ही वेब साईट उपलब्ध करून दिल्या जाते.

या साईटच्या माध्यमातून आपणास सर्व प्रकारच्या प्रशासकीय पदा संबंधी माहिती मिळते. तसचं, मित्रांनो, अराज पत्रीत पद गट ‘ब’ संवर्गातील PSI/ STI/ ASST पदाकरिता प्रामुख्याने पूर्व व मुख्य या स्वरुपात परीक्षा घेतली जाते. या पदाकरिता अर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. याव्यतिरिक्त मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आयोगामार्फत संबंधित शाखेच्या पदवीधर विद्यार्थांसाठी राज्य पातळीवर परीक्षा या घेतल्या जातात. जसे की

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा
  • वन सेवा परीक्षा
  • कृषी सेवा परीक्षा
  • दिवाणी न्यायाधीश परीक्षा
  • महिला व बालविकास परीक्षा

यासारख्या अनेक गट ब व गट क वर्गाच्या परीक्षा दरवर्षी या आयोगा मार्फत घेतल्या जातात. परीक्षा संबंधीची संपूर्ण माहिती महाराष्ट्र आयोगाच्या MPSC. GOV. IN या साईट वर उपलब्ध करून दिल्या जाते. आयोगा मार्फत जाहीर केलेल्या प्रशासकीय अधिकारी पदांच्या परीक्षेसाठी आभ्यासक्रम देखील जाहीर केलेला असतो. PSI / STI/ ASST या पदाकरिता आवश्यक असणाऱ्या अभ्यास क्रमाविषयी सर्वसामान्य माहिती आपण या ठिकाणी जाणून घेवू. मित्रांनो, PSI / STI/ ASST या पदाकरिता परीक्षा ही दोन टप्यात घेतली जाते.

MPSC वेतन व भत्ते: MPSC Salary and Allowances :

विविध पदांकरिता वेगवेगळे वेतन देण्यात येते. हे वेतन वेळोवेळी बदलत जाते. (साधारण वेतन १५,६००-३९,१०० + ५४०० महागाई भत्ता आणि इतर भत्ते.)

MPSC परीक्षेसाठीची पात्रता: MPSC Exam Eligibility Criterion:

१. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२. वयोमर्यादा : उमेदवार हा कमीत कमी १९ व जास्तीत जास्त ३८ वर्षाचा असावा. (शासनाने वेळो वेळी जाहीर केलेल्या निर्णयानुसार वयोमर्यादे मध्ये सवलती लागू आहे.)

  • खुला प्रवर्ग/अमागास (Open/General Category) उमेदवारांकरिता वयोमर्यादा: ३८ वर्षे
  • इ.मा.व. (O.B.C.) उमेदवारांकरिता वयोमर्यादा: ४३ वर्षे
  • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांकरिता वयोमर्यादा: ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवार (Persons with Disability): ४५ वर्षे
  • प्राविण्य प्राप्त खेळाडू (Qualified Players): ४३ वर्षे
  • माजी सैनिक (Ex-Servicemen): ४८ वर्षे

३. MPSC परीक्षेसाठी शैक्षणीक पात्रता: MPSC Exam Educational Qualification:

  • उमेदवाराने आपले पदवीचे किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा हि परीक्षा देऊ शकतात.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
  • काही पदांकरिता(सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक संचालक, वित्त व लेख विभाग इ.) उमेदवारांना विशिष्ट विषयांचे ज्ञान किंवा कौशल्य असणे आवश्यक आहे.
  • पोलीस उप-अधीक्षक (DySP), पोलीस उप-निरीक्षक (PSI), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant RTO) इ.पदांकरिता शारीरिक अहर्ता गरजेची आहे.

आरक्षण: Reservation :

शासनाने वेळो वेळी जाहीर केलेल्या परिपत्रकांनुसार परीक्षेमध्ये आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळतो.

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम – MPSC Exam Syllabus

  • PSI / STI/ ASST या प्रशासकीय पदाकरिता ‘सामान्य ज्ञान’ हा एकच पेपर असतो. शिवाय, प्रश्न पत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी सावर्पाचे असते.
  • परीक्षेत एकूण १५० प्रश्न विचारले जात असून, प्रत्येक प्रश्नाला २ गुण दिले जातात. त्यामुळे संपूर्ण पेपर हा ३०० गुणांचा गृहीत धरला जातो.
  • परीक्षेकरिता निर्धारित वेळ ही सुमारे ९० मिनिट म्हणजे १.३० तास इतकी असते.
  • परीक्षेत विचारलेल्या १५० प्रश्नांपैकी २० प्रश्न हे अंकगणितावर आधारित असतात व उर्वरित प्रश्न हे सामन्य ज्ञान वर आधारित असतात.

परीक्षा ही नकारात्मक स्वरुपाची असल्याने चुकीच्या उत्तरला गुण कमी केले जातात. परीक्षेसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम कला शाखेसंबंधी महत्वपूर्ण घटक

  • भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास
  • जगाचा व भारताचा भूगोल, विशेषतः महाराष्ट्राची भौगोलिक माहिती
  • नागरिकशास्त्र, राज्यघटना, राज्यव्यवस्था इत्यादी
  • महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक

अर्थव्यवस्था संबधित महत्वपूर्ण प्रश्न

  • भारताच्या पंचवर्षीय योजनासंबंधी संपूर्ण माहिती

सामान्य ज्ञान

  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पती शास्त्र व आरोग्य शास्त्र

अंकगणित

  • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, काम काळ वेग, शेकडेवारी, नफा तोटा, इत्यादी.
  • राष्ट्रीय तसचं, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

या प्रकारे आपणास पूर्व परीक्षेची तयारी करावी लागते. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थांना मुख्य परीक्षेकरिता अर्ज कर्ता येतो.

मुख्य परीक्षेकरिता आवश्यक असणारा अभ्यासक्रम – MPSC Syllabus: MPSC Mains Exam Pattern

  • मुख्य परीक्षा ही २०० गुणांची असून , परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते.
  • मुख्य परीक्षा ही दोन टप्यात घेतली जाते प्रत्येक पेपर हा २०० गुणांचा असतो.

पेपर क्र. १ :- इंग्रजी व मराठी

  • पेपर हा एकूण २०० गुणांचा असून त्यास सुमारे २ तासांचा कालावधी देण्यात येतो.
  • परीक्षा ही ऋणात्मक स्वरुपाची असल्याने चुकीच्या उत्तरास गुण कमी केले जातात.
  • मराठी व इंग्रजी भाषे संबंधित व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात.
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी व वाक्प्रचार यांच्या वाक्यात उपयोग आणि अर्थ अश्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

पेपर क्र. २ :- सामान्य ज्ञान व बुद्धिमापन

  • परीक्षा ही २०० गुणांची असून सुमारे २०० प्रश्न विचारले जातात. त्याकरिता सुमारे २ तासाचा कालावधी देण्यात येतो.
  • कला शाखे संबंधित प्रश्न :- आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल व ग्राम प्रशासन
  • भारतीय अर्थव्यवस्था :- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, लोकसंख्या बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय निती तसचं, बँक व्यवस्था.
  • पंचवार्षिक योजना
  • शासकीय अर्थव्यवस्था :- वार्षिक अर्थसंकल्प व लेखा परीक्षण इत्यादी.
  • विज्ञान व कृषिविषयक घटक
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
  • बुद्धिमापन चाचणी

अश्या स्वरुपात मुख्य परीक्षा घेतली जाते. मुख्य परीक्षेत आहर्ता प्राप्त विद्यार्थांना मुलाखती करिता बोलावण्यात येते. त्यानंतर तो विद्यार्थी शारीरिक चाचणी करिता पात्र ठरतो. शारीरिक पात्रते संबंधी महिला व पुरुष उमेदवारांना आवश्यक असणारी पात्रता

पुरुष शारीरिक चाचणी

  • उंची किमान १६५ सेमी असावी.
  • छाती:- न फुगविता ७९ सेमी व किमान ५ सेमी वाढवण्याची क्षमता.

चाचणी स्वरूप एकूण २०० गुण

चाचणी प्रकारकमाल गुण
८०० मी.धावणे: कालावधी २.३० मी १००
पुलअप्स किमान ८४०
गोळाफेक वजन ७.२६० किलो३०
लांब उडी३०
एकूण गुण२००

महिला शारीरिक चाचणी

  • उंची किमान १५७ सेमी

चाचणीचे स्वरूप :- एकूण २०० गुण

चाचणीचे प्रकारकमाल गुण
२०० मी. धावणे८०
२०० मी. चालणे ८०
गोळाफेक वजन ४ किलो.४०
एकूण गुण२००

मुलाखत : Interview

  • मुलाखत : मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने ठरवून दिलेल्या कमीत कमी गुण (Cut off ) किंवा त्या पेक्षा जास्त गुण मिळवलेले उमेदवार हे मुलाखतीसाठी पात्र ठरतात.
  • मुलाखत (राज्य सेवा परीक्षा : १०० गुण आणि दुय्यम सेवा परीक्षा : ४० गुण : PSI (पोलीस उप-निरीक्षक)) घेतल्या जाते, यामध्ये मुख्यत्वे उमेदवाराचे व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
  • एखाद्या विषयाला आपण कसे सामोरे जाऊ, निर्णय घेण्याची क्षमता, तसेच एखाद्या विषयावरील आपली मते काय असे प्रश्न येथे प्रामुख्याने विचारण्यात येतात.

आपण जास्तीत जास्त किती वेळा ही परीक्षा देऊ शकतो : Number of Attempts:

नुकत्याच शासनाने दिलेल्या शासन निर्नायानुसार:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार जास्तीत जास्त ६ वेळा
  • इमाव प्रवर्गातील उमेदवार ९ वेळा तर
  • अनुसुचीत जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार ही परीक्षा किती पण वेळा देऊ शकतात.

अभ्याक्रमातील घटक: Components in Syllabus :

परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा ठराविक नसून विविध विषयांवर आधारित आहे. त्या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात.
१. मराठी : यामध्ये खालील महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

  • मराठी व्याकरण
  • साहित्य
  • लेखक व पुस्तके
  • म्हणी व वाकप्रचार
  • संत साहित्य
  • लेखक व त्यांची टोपण नावे इ.

२. English : यामध्ये खालील महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

  • English Grammar
  • Comprehension
  • Sentence Formation
  • Vocabulary
  • Phrases
  • Writing skill
    इ. बाबीबद्दल प्रश्न विचारल्या जातात.

3. भूगोल : यामध्ये भारताचा व महाराष्ट्राचा भूगोलाबद्दल प्रश्न समाविष्ट होतात. उदा.

  • प्राकृतिक भूगोल
  • भौगोलिक स्थान
  • क्षेत्रफळ, अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्थार
  • नद्या व टेकड्या
  • शेती व पिके
  • व्यापार
  • साधन सामुग्री, खनिजे, योजना इ.

४. इतिहास : इतिहासमध्ये प्रामुख्याने

  • प्राचीन, मध्ययुगीन, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर भारत
  • कला व संस्कृती
  • प्रांतीय नृत्य प्रकार, बोलीभाषा, सण-उत्सव
  • राजे व त्यांची राज्ये इ.

५. विज्ञान : यामध्ये प्रामुख्याने

  • जीवशास्त्र
  • वनस्पतीशास्त्र
  • जीवाणू – विषाणू व त्यांमुळे होणारे आजार
  • रसायनशास्त्र
  • भौतिकशास्त्र इ.

६. सामान्य ज्ञान :
यामध्ये जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठे-लहान, लांब-आखूड,उंच-ठेंगणे, देशातील उच्च पदस्थ व्यक्ती, नवीन नेमणुका, अर्थव्यवस्था, इ. बाबींवर प्रश्न विचारल्या जातात.

७. राज्यशास्त्र : यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • भारताची राज्यघटना
  • आजी- माजी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री
  • प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांची कार्ये व नेमणूक.
  • पंचायतराज व्यवस्था इ.

८. गणित : यामध्ये

  • लसावी मसावी
  • समीकरणे
  • नफा तोटा
  • सरळ व्याज चक्रवाढ व्याज
  • सरासरी
  • काळ काम वेग
  • भागीदारी
  • पूर्णांक अपूर्णांक
  • टक्केवारी इ.

९. तर्कशास्त्र : काही प्रश्न हे तार्किक बुद्धीच्या आधारे आपल्याला सोडवावी लागतात. यामध्ये प्रामुख्याने

  • आकृत्या पूर्ण करा
  • त्रिकोणी संख्या
  • वेगळा शब्द ओळखा
  • संख्यामाला पूर्ण करा
  • बैठक व्यवस्था
    इ. विषयांचा समावेश होतो.

१०. चालू घडामोडी : जगात, भारतात व महाराष्ट्रात रोज काय नवीन घडते, कोणत्या नवीन योजना येतात, अर्थव्यवस्था इ. विषयांवरील घडामोडींवर विशेष लक्ष द्यावे.

अर्ज कसा करायचा : How to Apply :

  • अधिकृत संकेत स्थळाला (Official Website : https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx ) ला भेट द्या.
  • नवीन नोंदणी वर Click करा व नोंदणी करून घ्या.
  • विचारलेला तपशील/माहिती भरा.
  • तुम्हाला एक username व password मिळेल.
  • आता तुमची Profile Create करा.
  • तुमचा फोटो व सही Upload करा.
  • अर्ज भरा.
  • ‘My Account’ वर click करा.
  • परीक्षा फी भरा.

अशाप्रकारे आपण अर्ज करू शकता.

MPSC परीक्षा शुल्क: MPSC Exam Application Fee:

राज्यसेवा पूर्व परीक्षा : खुला प्रवर्ग/अमागास ५२४ रू., इतर ३२४ रू.
राज्यसेवा मुख्य परीक्षा : खुला प्रवर्ग/अमागास ५२४ रू., इतर ३२४ रू.

दुय्यम सेवा परीक्षा : खुला प्रवर्ग/अमागास ३७४ रू., इतर २७४ रू.

MPSC ची तयारी कशी करावी : How to Prepare for MPSC Exam:

मित्रांनो, अभ्यास करण्याचे वेगळे असे शास्त्र नाही. सुरुवातीला नियमित २ – ३ तास अभ्यास करावा. हळू-हळू वेळ वाढवा. कारण स्पर्धा परीक्षा पास होण्याकरिता साधारणतः १२ – १५ तास रोज अभ्यास करणे गरजेचे आहे.

जरी परीक्षेची पात्रता पदवी उत्तीर्ण असली तरी देखील पदवीच्या पहिल्या वर्षापासून जर हळू हळू अभ्यासाला सुरुवात केली तर अंतिम वर्षापर्यंत आपला बराचसा अभ्यासक्रम पूर्ण होईल.

सुरुवातीला अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. मागील वर्षीचे पेपर काढा, त्यानुसार अभ्यासाला लागा. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन घ्या. स्वतःच्या नोंदी तयार करा. आपल्या मित्रांसोबत चर्चा करा.

पुस्तके कोणती वापरावी : Books for MPSC:

MPSC साठीची ठराविक अशी पुस्तके नाहीत. अभ्यासासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त पुस्तके वापरावी लागतील. एका विषयाची २ – ३ पुस्तके वाचावी. त्यामधून आपल्याला समजेल अशा शब्दांमध्ये स्वतःच्या Notes बनवा.

पुस्तके विश्वासार्ह असावीत. शिवाय आपण internet वरून सुद्ध्या खूप माहिती गोळा करू शकतो. Youtube वर अशा विषयांवरील खूप सारे video उपलब्ध आहेत. त्यातून देखील आपण आपल्या notes काढू शकतो.

MPSC परीक्षेसाठी काही महत्वाची पुस्तके : Some Important Books for MPSC:

  • भारताचा भूगोल : श्री. सवदी सर
  • K. सागर चा ठोकळा
  • मराठी व्याकरण : बाळासाहेब शिंदे
  • लक्षवेध : चालू घडामोडींसाठी
  • भारताचा स्वतंत्र लढा : बिपीन चंद्र
  • Indian Polity : एम. लक्ष्मिकांत

ही काही महत्वाची पुस्तके आहेत. याशिवाय सुद्धा बरीच पुस्तके आपल्याला मिळतील. त्यामधून व्यवस्थित notes तयार करा.

Some Important Tips : काही महत्वाच्या Tips :

  • सुरुवातीला शासनाची ५ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके वाचून घ्या.
  • अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.
  • वर्तमान पत्र वाचण्याची सवय लावा व रोजच्या नोंदी ठेवा.
  • English वर्तमानपत्र वाचा. त्यातून जे शब्द कठीण आहेत व समजत नाहीत त्यांचे अर्थ शोध व लिहून ठेवा.
  • यामध्ये तुम्हाला Group Study ने सुद्धा खूप फायदा मिळू शकतो.
  • जे काही वाचले त्यातून स्वतःच्या भाषेत नोंदी घ्या.
  • आपल्या मित्रांना प्रश्न विचारा. त्यांनी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.

निकर्ष: Conclusion :

मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज अभ्यास सुरु केला व लगेच पहिल्या प्रयत्नात यश मिळेल याची शक्यता कमी असते. पण लोक अपयशाला घाबरून परीक्षेपासून दूर जातात. येथे तुम्हाला थोडा संयम बाळगावा लागेल.

कोण काय करतं, काय सांगतं याकडे लक्ष न देता आपला अभ्यास सुरु ठेवावा. काही लोक ५ – ६ वेळा परीक्षा देऊनही निवडल्या जात नाहीत. अशा वेळी आपण कुठे कमी पडत आहोत याचा शोध घ्यावा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

तर वाट कसली बघताय, लागा कि अभ्यासाला……
All The Best………..

MPSC बद्दल विचारल्या जाणारे नेहमीचे प्रश्न: FAQs about MPSC Exam

१. MPSC मधील सर्वोच्च पद कोणते?

उत्तर: MPSC द्वारे भरले जाणारे उप-जिल्हाधिकारी आणि पोलीस उप-अधीक्षक ही दोन सर्वोच्च पदे आहेत.

२. MPSC साठी किती वर्ष अभ्यास करावा लागेल?

उत्तर: हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे. जवळपास २-३ वर्षाच्या सातत्यपूर्ण अभ्यास करून आपण सहज परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.

३. नोकरीचे ठिकाण कोणते मिळते?

उत्तर: ही परीक्षा महाराष्ट्र शासन आयोजित असल्यामुळे आपल्याला संपूर्ण राज्यात कुठेही नियुक्त केल्या जाऊ शकते.

४. जास्तीत जास्त किती पगार मिळू शकतो?

उत्तर: शासनाने वेळो-वेळी घेतलेल्या निर्णयानुसार पगार हा नेहमी बदलत राहतो. या बद्दल अधिक माहिती करिता आपण विविध निर्णय आपण MPSC च्या संकेतस्थळावर (Website) वर पाहू शकतो.

५. अर्ज कसा भरायचा?

उत्तर: MPSC साठीचा अर्ज online पद्धतीने भरल्या जातो. आयोगाने निश्चित केलेल्या website वरून आपण अर्ज भरू शकतो. (https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx) या लिंक वर जाऊन आपली profile बनवा. यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरून ठेवा. नंतर जेव्हा भर्ती निघेल तेव्हा अर्ज करा.

६. माझे शिक्षण English माध्यमातून झालेले आहे. मी अर्ज करू शकतो का?

उत्तर: हो. पेपर हा मराठी आणि English दोन्ही भाषेत असल्यामुळे आपण अर्ज करू शकता.

७. मी MPSC परीक्षेची तयारी शिकवणी (Coaching Class) न लावता करू शकतो का?

उत्तर: होय. परीक्षा उत्तीर्ण होण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी हवी. योग्य पुस्तके व मार्गदर्शन घेऊन आपण शिकवणी न लावता सुद्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.

Previous Post

जाणून घ्या 12 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Next Post

जाणून घ्या 13 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

10 वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता, येथे करा चेक…
Career

10 वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता, येथे करा चेक…

  महाराष्ट्र 10वी चा निकाल 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2 जून रोजी सकाळी 11...

by Editorial team
June 2, 2023
ChatGPT म्हणजे काय?
Career

ChatGPT म्हणजे काय?

इंटरनेट वर सध्या ChatGPT ची फार वेगाने चर्चा होत आहे. पुष्कळ लोकांसाठी ChatGPT एक उत्कृष्ठ tool आहे, तर खूप लोकांसाठी...

by Editorial team
May 23, 2023
Next Post
13 February History Information in Marathi

जाणून घ्या 13 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Annabhau Sathe Information in Marathi

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

valentine day

"काय आहेत हे व्हॅलेंटाईन डे जाणून घ्या या लेखाद्वारे.”

14 February History Information in Marathi

जाणून घ्या 14 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

Valentine Day Msg in Marathi

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

Comments 5

  1. Ishwari Nalawade says:
    7 months ago

    Thanks for giving such important knowledge about MPSC.It will definately help me.

    Reply
    • Suhasini says:
      3 months ago

      Thank you

      Reply
  2. Rajshri Waghmare says:
    7 months ago

    Thank you so much,this information is very important and valuable for those who don’t know about MPSC exam and syllabus and how to start to study for it. This will help me a lot. Thank you 😊.

    Reply
  3. Swayam Bansode says:
    6 months ago

    Thank you so much for giving this amazing information to us 😊🙏.

    Reply
  4. Amol Ganpat Sonwalkar says:
    6 months ago

    Khup chan Mahiti milala. Thanks

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved