1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त तडफदार भाषण

Speech on Maharashtra Day

आज १ मे महाराष्ट्र दिन ज्याप्रमाणे आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र मिळाले त्याप्रमाणे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा हा १ मे १९६० रोजी प्राप्त झाला. आणि तेव्हापासून या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि योगायोग म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच कामगार दिन (Labour Day) सुध्दा असतो आणि तो सुध्दा ह्याच दिवशी साजरा करण्यात येतो.

फक्त आपल्या देशात नाही तर संपूर्ण जगात आणि या दिवशी जवळ जवळ सर्वांना सुट्टीच असते, महाराष्ट्रामध्ये हा दिवस गणतंत्र दिवस किवां स्वतंत्रता दिवसा सारखा झेंडा फडकावून साजरा केला जातो त्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्या मध्ये महाराष्ट्रावर भाषण, निबंध, कविता या सारख्या प्रतियोगिता होत असतात. त्यासाठी आज आपण महाराष्ट्र दिनावर छोटास भाषण पाहणार आहोत, तर चला पाहूया…

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त तडफदार भाषण –  Maharashtra Din Speech in Marathi

Maharashtra Din Speech in Marathi
Maharashtra Din Speech in Marathi  

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..

व्यासपीठावर उपस्थित असलेली पाहुणे मंडळी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण येथे सर्व महाराष्ट्र दिनानिमित्त एकत्र जमलेले आहोत, आणि आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी काही दोन शब्द आपल्या समोर मांडणार आहे, आपल्याला विनंती आहे की आपण त्या शब्दांना लक्षपूर्वक ऐकावे.

मित्रहो आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेलेलं आहेत, एवढेच नव्हे तर महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते.

संत तुकाराम, ज्ञानेश्वर, आणि एकनाथ यांच्या सारख्या कित्येक महान संतांचे चरण आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत. आणि या महाराष्ट्राच्या मातीतून कित्येक थोर महात्मे जन्माला आलेले आहेत. अश्या या महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा १ मे १९६० रोजी देण्यात आला. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्राची जी लगाम आहे ती त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपविली.

तसे पाहिले तर आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक वारसा हा खूप मोठा आहे सोबतच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागे आपल्या या महाराष्ट्राच्या कित्येक क्रांतिकरांचा हात आहे, मग ते वासुदेव बळवंत फडके असोत की लोकमान्य टिळक असोत.

म्हणूनच महात्मा गांधीजींनी या महाराष्ट्र देशाला मोहळाची उपमा दिली होती. महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे पूर्व जन्मीच पुण्य सार्थक झाल्या सारखे आहे, प्रत्येकाला गर्व असावा असा आपला महाराष्ट्र.

याच महाराष्ट्राने कित्येक, कवी, कलाकार, संगीतकार, खेळाडू यांना जन्म दिलाय, ते कवी पु.ल.देशपांडे असोत की कवियत्री बहिणाबाई आजही ते साहित्याच्या रुपात आपल्या महाराष्ट्रात जिवंत आहेत.

हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने मुघलांचे राज्य स्वीकारले नाही आणि त्या काळात स्वराज्याचे स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवले, आणि फक्त डोळ्यासमोरच ठेवले नाही तर आपले प्राण पणाला लावून रयतेसाठी स्वराज्याची स्थापना सुध्दा केली, आणि सर्वदूर सुराज्य निर्माण केले, माझ्या राजांबरोबर असणाऱ्या मावळ्यांचा या स्वराज्यात आणि महाराष्ट्राच्या निर्माणात खारीचा वाटा आहे. आणि त्या सर्वांना विसरता काम नये.

अनेक महान लेखकांनी या महाराष्ट्राविषयी विशेष शब्द लिहिलेले आहेत राम गडकरी यांनी आपल्या महाराष्ट्राला मंगल देशा, पवित्र देशा, अश्या शब्दात याचे वर्णन केले आहे तर संत ज्ञानेश्वरांनी,

“माझ्या मराठीचे बोल कवतुके।

परी अमृतातेंहि पैजा जिंके।

ऐसी अक्षरेरसिकें । मेळवीन॥”

अशा शब्दांत मराठीचे भाषेचे गोड माधुर्य लोकांसमोर मांडले.

पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा वारसा योग्य रित्या आपण सांभाळण्याचा प्रयत्न करूया आणि झाले तर या महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या नावांची पाने सुध्दा सुवर्ण अक्षरात लिहिली जावो असे कार्य करूया! एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

तर मित्रांनो आपल्याला वरील लिहिलेले छोटस भाषण आपल्याला कसे वाटले कळवायला विसरू नका आशा करतो लिहिलेले भाषण आपल्याला आपल्या कार्यालयात किंवा शाळेत आपल्या उपयोगी येईल आपल्याला लिहिलेले छोटेसे भाषण आवडल असेल तर या भाषणाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, सोबतच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here