स्वातंत्र्य संग्रामातील पहिले क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके…..

Vasudev Balwant Phadke Yanchi Mahiti

मातृभूमी करता आपले सर्वकाही त्यागणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडकेंचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. इंग्रजांविरोधात भारतीयांच्या मनात जागृती करणारे आद्य क्रांतिकारक अशी त्यांची ख्याती आहे.

ते देशाचे पहिले असे क्रांतिकारी होते ज्यांनी स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात आलेल्या पराजया नंतर पुनश्च सगळ्यांमध्ये स्वातंत्र्याची आग पेटवली आणि ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र विद्रोह पुकारला होता.

एक सच्चा देशभक्त आणि राष्ट्रभक्त, जो अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवेत समर्पित राहीला आणि कधीही ब्रिटिशांसमोर झुकला नाही.

अश्या क्रांतीकारकाची माहिती आपल्याला असायलाच हवी…या लेखातून वासुदेव बळवंत फडकेंची अधिक माहिती आपण घेऊया.

स्वातंत्र्य समराचे पहिले क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडकेंचा जीवन परिचय – Vasudev Balwant Phadke Information in Marathi

Vasudev Balwant Phadke in Marathi

वासुदेव बळवंत फडके यांचा थोडक्यात महत्वपूर्ण परिचय – Vasudev Balwant Phadke Biography

पूर्ण नांव (Name) वासुदेव बळवंत फडके
जन्म (Birthday) 4 नोव्हेंबर 1845 शिरढोण जिल्हा रायगड महाराष्ट्र
वडील (Father Name)   बळवंत फडके
आई (Mother Name) सरस्वतीबाई
मृत्यू (Death)  17 फेब्रुवारी 1883

वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म, परिवार, शिक्षण आणि प्रारंभिक जीवन – Vasudev Balwant Phadke History

रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी राहणाऱ्या फडके कुटुंबात 4 नोव्हेंबर 1845 ला वासुदेव बळवंत यांचा जन्म झाला. आईचे नांव सरस्वतीबाई तर वडील बळवंत. वासुदेवांना एक भाऊ आणि दोन बहिणी. सुरुवातीपासून वासुदेव हे अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे, फार लहानवयात त्यांनी मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविलं.

याशिवाय राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्यात बालपणीच रुजली होती. अगदी लहानपणा पासून शूरवीरांच्या गोष्टी वाचण्याची त्यांना फार आवड. त्यांनी एक व्यायाम शाळा बनविली होती, त्याठिकाणी त्यांची भेट थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुलेंशी झाली. याशिवाय त्या ठिकाणी त्यांना शस्त्र चालविण्याचे धडे थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिले.

वासुदेव हे टिळकांच्या क्रांतिकारी आणि देशभक्तीच्या विचारांनी फार प्रभावित होते. वासुदेव बळवंत फडकेंनी आपले सुरुवातीचे शिक्षण कल्याण आणि पुणे येथे राहून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांची इच्छा होती की त्यांनी व्यवसायात उतरावं, परंतु त्याचं न ऐकता वासुदेव फडक्यांनी मुंबई गाठली, येथे नौकरी करून त्यांनी आपले पुढील शिक्षण सुरु ठेवले.

वासुदेव फडकेंचा विवाह आणि व्यक्तिगत जीवन – Vasudev Balwant Phadke Marriage

क्रांतिकारी वासुदेव फडकेंचा पहिला विवाह वयाच्या 28 व्या वर्षी झाला, परंतु पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.

जेंव्हा इंग्रजांविरोधात फडकेंनी पुकारला विद्रोह:

वासुदेव फडके ब्रिटीशांच्या सेवेत ‘ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे‘ आणि ‘मिलिट्री फाइनेंस डिपार्टमेंट’ मध्ये नौकरीला होते. त्यावेळी त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे सुट्टीची मागणी केली, परंतु त्यांची ही मागणी इंग्रज अधिकाऱ्यांनी धुड्कावून लावली.

फडके विना सुट्टीचे गावी परतले, परंतु या घटनेमुळे त्यांच्या हृदयात इंग्रजांविरोधात भयंकर चीड उत्पन्न झाली व त्यांनी नौकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि क्रूर ब्रिटीश अधिकाऱ्यां विरोधात क्रांतीच्या तयारीला लागले. ब्रिटीशांच्या विरोधात उठाव करण्यासाठी फडकेंनी गल्ली-बोळात, चौका-चौकात, ढोल-थाळ्या वाजवून आपल्या सशक्त आणि दमदार भाषणांच्या सहाय्याने आदिवासींची सेना, मोठ-मोठे जमीनदार, शुरविरांना एकत्रित आणलं व महाराष्ट्रात आपल्या क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून नवयुवकांना संघटीत केलं.

संपूर्ण तयारीने 1879 साली इंग्रजांविरोधात वासुदेव फडकेंनी विद्रोहाची घोषणा केली.

इतकेच नव्हे तर या विद्रोहाकरता लागणारे धन जमविण्यासाठी त्यांनी इंग्रजांचे खजिने लुटले, व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कित्येक अत्याचारी इंग्रजांना यमसदनी धाडले.

वासुदेव फडके इंग्रजांकरता ठरले होते कडवे आव्हान…त्यांच्यावर ठेवले होते बक्षीस:

वासुदेव फडकेंच्या क्रांतिकारी चळवळी समोर इंग्रज सरकार देखील थरथरा कापू लागले, त्यांना अटक करण्याकरीता अनेक योजना देखील आखण्यात आल्या.

परंतु आपल्यातील चतुराई आणि साहसाने फडकेंनी इंग्रजांच्या सर्व योजनांवर पाणी फेरले.

इतकेच नव्हे तर पुढे इंग्रजांनी फडकेंना जिवंत अथवा मृत पकडणाऱ्याला 50,000 रुपये बक्षीस देण्याची देखील घोषणा केली.

पुढे वासुदेव बळवंत फडकेंना पकडण्यात ब्रिटीशांना यश आले होते.

वासुदेव बळवंत फडके एक असे क्रांतिकारी होते की ज्यांना इंग्रज फार घाबरत असत,

त्यांना अटक केल्यानंतर देखील ब्रिटीशांना महाराष्ट्रात विद्रोहाची परिस्थिती उद्भवण्याची भीती वाटायला लागली होती.

त्यानंतर इंग्रजांनी फडकेंवर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना काळ्यापाण्याची कठोर शिक्षा सुनावली व अंदमानला पाठवले, त्याठिकाणी त्यांच्यावर अत्यंत क्रूर आणि अमानवीय अत्याचार केल्या गेले.

इंग्रजांचे अमानवीय अत्याचार आणि फडकेंचा मृत्यू – Vasudev Balwant Phadke Death

महाराष्ट्रात जन्माला आलेले देशाचे प्रथम क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांनी आयुष्यभर भारत देशाची सेवा केली,

स्वातंत्र्याच्या या लढाई दरम्यान त्यांना अत्यंत कष्ट आणि अमानवीय अत्याचारांना सामोरं जावं लागलं. 1879 साली क्रूर इंग्रज अधिकाऱ्यांनी वासुदेव बळवंत फडकेंना अटक केली व आजीवन काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली.

कारागृहात त्यांना अनेक शारीरिक यातना देण्यात आल्या परिणामी 17 फेब्रुवारी 1883 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अश्या तऱ्हेने अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्याची धग त्यांनी स्वतःत जिवंत ठेवली आणि असह्य कष्ट आणि यातना सहन करून देखील हिम्मत हारली नाही,

निष्ठावंत देशभक्ता प्रमाणे राष्ट्रसेवेचा घेतलेला वसा अखंड जपला.

वासुदेव बळवंत फडकेंसारखे क्रांतिकारी आपल्या देशात…महाराष्ट्रात जन्माला आले ही आपल्या करता मोठ्या अभिमानाची बाब आहे.

प्रत्येक भारतीयानं त्यांच्या देशभक्तीतून प्रेरणा घेण्याची आज आवश्यकता आहे.

स्वातंत्र्य समरातील पहिले क्रांतिकारी म्हणून आज देखील वासुदेव बळवंत फडकेंना प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचं स्थान आहे.

देशाकरता त्यांच्या त्याग, बलिदान, आणि समर्पणाला कधीही विसरता येणार नाही.

वासुदेव बळवंत फडकेंसारख्या क्रांतीकारकांमुळेच आपण सगळे भारतीय आज स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेऊ शकतोय. अश्या असंख्य क्रांतीकारकांना माझी मराठी तर्फे विनम्र श्रद्धांजली…

1 thought on “स्वातंत्र्य संग्रामातील पहिले क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके…..”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top