जाणून घ्या 24 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

 

24 November Dinvishes

२४ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या , सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो , चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

जाणून घ्या 24 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 24 November Today Historical Events in Marathi

24 November History Information in Marathi
24 November History Information in Marathi

24 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 November  Historical Event

 • जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे प्रसिध्द जैवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी आजच्याच दिवशी १८५९ साली संशोधन पर माहितीचे पुस्तक ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीस ‘ चे प्रकाशन केले होते.
 • आजच्याच दिवशी १९२६ साली प्रख्यात तत्वज्ञानी महर्षी अरविंद यांना पूर्ण सिद्धी ची प्राप्ती झाली होती.
 • पक्षांतर बंदी कायद्यान्वये १९८८ साली पहिल्यांदा लोकसभा सदस्य लालदुहोमा यांना अयोग्य घोषित करण्यात आले होते.
 • १९८६ साली आजच्याच दिवशी तामिळनाडू राज्यातील विधानसभेत एकाच वेळी सर्वच सदस्यांना सदनातून बरखास्त करण्यात आले होते.
 • १९९२ साली आजच्याच दिवशी चीन चे देशांतर्गत हवाई प्रवास करणारे विमान दुर्घटना ग्रस्त होवून १४१ जण ह्यात मृत्युमुखी पडले होते.
 • नेपाळ या देशात आजच्याच दिवशी २००१ साली स्थानिक पोलीस ,सैन्य व माओवादी यांच्यात चकमक होऊन ३८ पोलीस व सैनिक मारले गेले होते.
 • २००७ साली आजच्याच दिवशी पूर्व पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ ८ वर्षाच्या देशबंदीनंतर मायदेशी परतले होते.
 • २००८ साली आजच्याच दिवशी मालेगाव बॉम्बस्फो टातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ए टी एस या दहशतवाद विरोधी शोध पथकावर अश्लील चलचित्र दाखविल्याचा आरोप लावला होता.

24 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • डेप्युटी कमिशनर बनणारे पहिले भारतीय कावसजी पेटिगारा यांचा १८७७ साली जन्म झाला होता.
 • स्वाधीनता सेनानी छोटूराम यांचा आजच्या दिवशी १८८१ साली जन्म झाला होता.
 • राजस्थान राज्याचे प्रथम मुख्यमंत्री व राजनेते हिरा लाल शास्त्री यांचा १८९९ साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द चित्रपट अभिनेते व निर्देशक अमोल पालेकर यांचा १९४४ साली जन्म झाला होता.
 • इंग्लंड संघाचे पूर्व कसोटी कर्णधार व समालोचक इयोन बोथम यांचा आजच्या दिवशी १९५५ साली जन्म झाला होता.

24 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 November Death / Punyatithi / Smrutidin

 • शीख धर्मियांचे नववे गुरु , गुरु तेगबहादूर यांचे आजच्याच दिवशी १६७५ साली निधन झाले होते.
 • हिंदी चित्रपट सृष्टीची प्रसिध्द हास्यकलाकार उमा देवी खत्री यांचे २००३ साली निधन झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top