जाणून घ्या 23 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

 

23 November Dinvishes

२३ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष

जाणून घ्या 23 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 23 November Today Historical Events in Marathi

23 November History Information in Marathi
23 November History Information in Marathi

23 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 November  Historical Event

  • आजच्याच दिवशी १७४४ साली तत्कालीन ब्रिटीश प्रधानमंत्री जॉन कार्टरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
  • १८७३ साली आजच्याच दिवशी विएतनाम या देशाची राजधानी हनोई वर फ्रांस च्या सैनिकांनी कब्जा केला होता.
  • १९०४ साली आजच्याच दिवशी अमेरिकेतील सेंट लुईस या शहरात तिसऱ्या ऑलम्पिक खेळांची समाप्ती झाली होती.
  • १९८३ साली आजच्याच दिवशी पहिल्यांदा भारतात राष्ट्रामंडळ शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
  • इथिओपिया या देशाचे अपहृत विमान इंधन संपल्यामुळे आजच्याच दिवशी १९९६ साली हिंद महासागरात कोसळले होते ज्यात जवळपास १०० जन मृत्युमुखी पडले होते.
  • जी-२० ह्या जागतिक शक्तिशाली २० देशांची मिळून बनलेल्या संघटनेचे २००२ साली भारतातील दिल्ली येथे बैठकीस सुरुवात आजच्याच दिवशी झाली होती.
  • २००६ साली आजच्याच दिवशी अमेरिकेने रशियाच्या सुखोई या जेट लढाऊ विमानिर्मिती कंपनीवरील निर्बंध हटविले होते.
  • २००७ साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलिया या देशात निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय झाला होता.
  • २००९ साली आजच्याच दिवशी फिलिपाईन्स या देशात ३२ पत्रकारिता क्षेत्रांतील व्यक्तींची हत्या करण्यात आली होती.

23 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • भारताचे प्रसिध्द इंग्रजी व बंगाली भाषेचे लेखक नीरद चंद्र चौधरी यांचा १८९७ साली जन्म झाला होता.
  • हिंदी भाषेचे कथाकार कृष्ण चंदर यांचा १९१४ साली जन्म झाला होता.
  • अध्यात्मिक गुरु सत्य साई बाबा यांचा आजच्या दिवशी १९२६ साली जन्म झाला होता.
  • प्रसिध्द पार्श्वगायिका गीता दत्त यांचा १९३० साली जन्म झाला होता.

23 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 November Death / Punyatithi / Smrutidin

  • क्रांतिकारी लेखक व इतिहासकार सखाराम देऊसकर यांचे आजच्या दिवशी १९१२ साली निधन झाले होते.
  • प्रसिध्द भारतीय वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांचे आजच्या दिवशी १९३७ साली निधन झाले होते.
  • प्रसिध्द फ्रांस भाषेचे लेखक आंद्रे मैलरो यांचे आजच्या दिवशी १९७६ साली निधन झाले होते.
  • संसद सदस्य व आर्य समाजाचे नेते प्रकाशवीर शास्त्री यांचे १९७७ साली निधन झाले होते.
  • विसाव्या शतकातील महान लेखक शुमार डोल्द यांचा १९९० साली आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here