जाणून घ्या २६ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

26 October Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या देशांतील ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने खूप दिवस आहे. आज आपल्या देशांतील अनेक महान व्यक्तीचा जन्म झाला होता. तसचं, अनेक महान व्यक्तींचे निधन देखील झालं होत. अश्या प्रकारच्या बऱ्याच घटनांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २६ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 26 October Today Historical Events in Marathi

26 October History Information in Marathi
26 October History Information in Marathi

२६ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 October Historical Event

 • इ.स. १७७४ साली फिलाडेल्फिया येथे अमेरिकेतील पहिली महाद्विपीय कॉंग्रेस स्थगित झाली होती.
 • इ.स. १८५८ साली एच. इ. स्मिथ यांनी वाशिंग मशीन चा पेटेंट घेतलं.
 • सन १९०५ साली नॉर्वे देशाने स्वीडन देशाकडून स्वातंत्र्य मिळवलं.
 • सन १९३६ साली जगातील पहिले इलेक्ट्रिक जनरेटरने काम करणे सुरु केलं होत.
 • सन १९४७ साली भारत पाकिस्तान फाळणीनंतर जम्मू काश्मीर येथील शासक राजा हरि सिंह यांनी जम्मू काश्मीरला भारतात समाविष्ट करण्याची सहमती दर्शविली.
 • सन १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो देशांना लंडन कडून स्वातंत्र्य मिळालं.

२६ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८८१ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक, कायदेपंडित व राजकीय नेते बीरेंद्रनाथ ससमल यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८६ साली ओडिसा राज्यातील उल्लेखनीय समाजवादी व कवी पंडित गोदाबरीश मिश्रा यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८८ साली प्रसिद्ध बंगाली लेखक व साहित्यक समीक्षक मोहितलाल मजुमदार यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९० साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस नेते, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ता व पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्मदिन.
 • सन १९२४ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्ता व गांधीवादी शोभना रानडे यांचा जन्मदिन.
 • सन १९३७ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीतकार तसचं, प्रसिद्ध संगीतकार दिनानाथ मंगेशकर यांचे पुत्र आणि गान सम्राट लता मंगेशकरआशा भोसले यांचे धाकटे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन.
 • सन १९७४ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री व चित्रपट निर्माता रविना टंडन यांचा जन्मदिन.

२६ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 October Death / Punyatithi / Smrutidin

 •  सन १९४७ साली ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय यांचे निधन.
 • सन १९५५ साली हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांचे निधन.
 • सन १९७९ साली मुंबई विद्यापीठात देशांतील पहिल्या  अर्थशास्त्र विभागाची सुरुवात करणारे महान भारतीय अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.
 • सन १९८१ साली भारतीय पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कन्नड भाषिक कवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे निधन.
 • सन २००० साली भारतीय स्वतंत्रता संग्रामातील प्रमुख क्रांतिकारक व सिद्धहस्त लेखक तसचं, हिंदी, इंग्रजी व बांग्ला बाषिक आत्मकथाकारसाहित्यिक मन्मथनाथ गुप्ता यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top